प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com
अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांना नुकताच साहित्यातील ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर झाला. ‘नोबेल’च्या आतापर्यंतच्या इतिहासात हा पुरस्कार मिळालेल्या ११७ साहित्यिकांमध्ये १६ स्त्रिया आहेत. त्यातही ‘नोबेल’ मिळवणाऱ्या लुईस या दुसऱ्याच कवयित्री. कौटुंबिक आयुष्यावर आधारलेले साधे विषय घेऊन लिहिणाऱ्या आणि सोप्या शब्दांत गुंतागुंतीच्या भावनांचं खुबीनं वर्णन करणाऱ्या लुईस यांच्या कविता वैयक्तिक अनुभवांना, भावनांना वैश्विक परिमाण देणाऱ्या मानल्या जातात. म्हणूनच त्यांची ओळख करून घेणं गरजेचं आहे.
१९०१ मध्ये सुरू झालेल्या ‘नोबेल’ पुरस्कारांमध्ये साहित्याचं नोबेल हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात अडकलेलं असतं. या पुरस्काराच्या ११९ वर्षांच्या इतिहासात असं क्वचितच घडलं असेल की कोणत्याही वादाशिवाय हे पारितोषिक दिलं गेलं आहे. पण या वर्षी जाहीर झालेल्या नावामुळे अनेक साहित्यप्रेमींना सुखद धक्का बसला. या वर्षी साहित्यातला हा नोबेल पुरस्कार लुईस ग्लुक या अमेरिकन कवयित्रीला जाहीर झाला. आजपर्यंत हा बहुमान ११७ साहित्यिकांना दिला गेला. त्यात १६ स्त्रिया आहेत. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार आत्तापर्यंत एकूण १७ स्त्रियांना मिळाला आहे. त्याच्या खालोखाल साहित्यातील १६ स्त्रियांना हा सन्मान आत्तापर्यंत दिला गेला आहे. ७७ वर्षीय लुईस ग्लुक कवितांसाठी साहित्याचं नोबेल मिळणारी दुसरी स्त्री आहे. याआधी पोलिश कवयित्री विस्लावा सिंबोस्र्का यांना १९९६ मध्ये हा बहुमान मिळाला आहे.
सिंबोस्र्का यांनी ३०० च्या आसपास कविता लिहिल्या. हा आकडा काही फार नाही. नोबेल मिळालं तेव्हा एका मुलाखतीत त्यांना याचं कारण विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘‘कारण माझ्या घरी कचऱ्याची टोपली आहे!’’ त्यांच्या सुरूवातीच्या कवितांवर पोलंडमधील समाजवादी विचारसरणीचा प्रभाव दिसतो. पुढे त्यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणामधून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिकाही घेतल्या.
साहित्याचं नोबेल मिळालेल्या स्त्रियांमध्ये ओल्गा तोकार्झूक हे नावही महत्त्वाचं आहे. यादेखील पोलिश लेखिका. ओल्गा या मानवाधिकार कार्यकर्त्यांही आहेत. त्यांनी २०१५ पासून सिरीयातून येणाऱ्या स्थलांतरितांची बाजू मांडत लिखाण केलं. त्यांच्या लिखाणामध्ये पर्यावरणवादी आणि स्त्रीवादी दृष्टीकोन असतो. त्या पोलंडमधील व्यावसायिकदृष्टय़ा सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी एक आहेत. २०१८ मध्ये त्यांना ‘फ्लाईट्स’ या आपल्या कांदबरीसाठी ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज’नं गौरविण्यात आलं होतं. त्याच वर्षी नोबेल पुरस्कारानं त्यांना गौरविण्यात आलं.
२०१५ मध्ये नोबेल मिळालेल्या बेलारुसच्या स्वेतलाना अलेक्झिएविच या व्यवसायानं पत्रकार. त्यांनी सोव्हिएत रशियातील नागरिकांचा जीवनानुभव विविध मुलाखतींमधून जगासमोर आणला. त्यांच्या लेखनामधून समोर आलेल्या अनेक गोष्टींमुळे त्यांना राजकीय रोषाला तोंड द्यावं लागलं. त्यांनी लिहिलेलं ‘चेर्नोबिल प्रेयर’ हे पुस्तक प्रचंड गाजलं. हे पुस्तक म्हणजे चेर्नोबिलच्या दुर्घटनेचे परिणाम भोगणाऱ्यांची मनोगतं आहेत. अलेक्झिएविच या बेलारुसच्या पहिल्या स्त्री नोबेल पारितोषिक विजेत्या आहेत.
आजपर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या जवळजवळ सर्व साहित्यिकांमध्ये एक साम्य प्रकर्षांनं जाणवतं. ते म्हणजे प्रत्येकाच्या साहित्यामध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य, टीका किंवा त्या अनुषंगानं केलेलं लिखाण पाहायला मिळायचं. पण लुईस ग्लुक यांचं लिखाण यांपेक्षा वेगळं आहे. हे पारितोषिक जाहीर करताना नोबेल समितीनं, ‘लुईस ग्लुक यांच्या साधेपणातील सौंदर्यानं, वैयक्तिक अस्तित्वाला वैश्विक परिमाण देणाऱ्या अचूक काव्यात्मक आवाजासाठी’ (‘फॉर हर अनमिस्टेके बल पोएटिक व्हॉईस, दॅट विथ ऑस्टिअर ब्युटी मेक्स द इंडिव्हिज्युअल एग्झिस्टन्स युनिव्हर्सल’) हे पारितोषिक बहाल केलं जात आहे असं म्हटलं आहे. नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सोन हे ग्लुक यांच्या साहित्याबद्दल म्हणतात, की ग्लुक यांच्या
एकू णच साहित्यात स्पष्टतेसाठीची धडपड आहे. बालपण, कौटुंबिक आयुष्य, आईवडील आणि भावंडांसोबत असलेलं घट्ट नातं, यांसारखे विषय त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीचा मुख्य भाग आहेत.
ग्लुक यांचा जन्म १९४३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांची आई ही रशियन ज्यू वंशाची, तर त्यांच्या वडिलांचं कुटुंब हे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या हंगेरीयन ज्यू वंशाचं. त्यांचे वडील लहान मुलांसाठी चारोळ्या लिहायचे. त्यांना लेखक होण्याची इच्छा होती, पण कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी व्यवसायाकडे अधिक लक्ष दिलं. ग्लुक यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाला आणि वाचनसंस्कृतीला कायमच महत्त्व दिलं जात होतं. पण ही आवड केवळ साहित्यापुरती मर्यादित होती असं म्हणता येणार नाही. त्यांच्या वडिलांचा आवडता विषय इतिहास आणि राजकारण, तर त्यांच्या आईला विविध कलांमध्ये रस होता. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या लेखनाच्या आवडीला कुटुंबाकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे, असं त्या आवर्जून सांगतात. आपल्याला लेखनाची गोडी आहे, त्यातच आपण रमतो, हे त्यांना खूप लहानपणी लक्षात आलं. साधारण १३-१४ वर्षांच्या असताना त्यांनी आपला पहिला कवितासंग्रह लिहिला. तो छापला गेला नाही ही गोष्ट वेगळी. पण साधारण ज्या वयात आपल्या लहानपणीच्या स्वप्नांना थोडं बाजूला ठेवा, असं सांगितलं जातं, आपल्याला वास्तवाची जाणीव करून दिली जाते, ज्या क्षेत्रांमध्ये ‘भविष्य’ आहे अशांमध्ये ढकललं जातं, अशाच वयात त्यांनी आपली खरी आवड जोपासली. त्यांच्या या निर्णयाचं श्रेयदेखील त्या त्यांच्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांना देतात.
शाळेत असताना त्यांना काही काळ अभिनयाची आवडही लागली. पण त्याची आवड जरी असली, तरी त्यात आपल्याला अजिबात गती नव्हती आणि ही आवड केवळ ‘लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं’ या भावनेतून निर्माण झाली होती, असंही त्या मान्य करतात. आयुष्याकडे बघण्याचा हा स्पष्टपणा त्यांच्या लिखाणात नक्कीच जाणवतो. उच्च माध्यमिक शाळेत स्वत:चं वेगळेपण सिद्ध करण्याच्या धडपडीमध्ये असताना त्यांना ‘एनोरेक्झिया नव्र्होसा’ या आजारानं ग्रासलं. तेव्हा त्यांना त्यांचं शिक्षण काही काळासाठी थांबवावं लागलं.
‘‘हा निर्णय घेताना जरी खूप अवघड वाटला असला तरी यामुळेच माझ्या आयुष्याला एक सकारात्मक कलाटणी मिळाली. विचार कसा करायचा याची मला स्पष्टता आली,’’ असं त्या सांगतात. कारण त्यांच्या या आजारावर मात करण्यासाठी त्यांनी ‘सायकोअनॅलिसिस’ची मदत घेतली होती. यानंतर काही र्वष त्यांनी कोलंबिया विद्यापीठातल्या ‘स्कूल ऑफ जनरल स्टडीज’ मधून कवितांविषयीच्या कार्यशाळांमध्ये भाग घेतला. या वर्षांमध्ये त्यांच्या कवितांना ‘मॅडेमोझेल’, ‘न्यू यॉर्कर’सारख्या नियतकालिकांमधून प्रसिद्धी मिळाली.
१९६८ मध्ये ‘फर्स्टबॉर्न’ या काव्यसंग्रहानं ग्लुक यांचं साहित्यविश्वात पदार्पण झालं आणि लवकरच त्या अमेरिकेतील महत्त्वाच्या समकालीन कवींपैकी एक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्याच काळात त्यांनी लग्न केलं, पण लवकरच घटस्फोटही घेतला. त्यानंतर १९७१ पर्यंत त्यांच्या हातून काही भरीव लिहिलं गेलं नाही. व्हर्मोटमधील गोदार्द महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुरू केल्यावर त्यांना लिखाणाची नव्याने प्रेरणा मिळाली. १९७५ मध्ये त्यांनी ‘द हाऊस ऑन मार्शलँड’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला. या कामामुळे त्यांना त्यांचा सूर गवसला, असं अमेरिकेतील समीक्षकांचं म्हणणं आहे. १९८० मध्ये त्यांचा तिसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला, पण याच वर्षी त्यांच्या व्हर्मोट ंमधल्या घराला आग लागली आणि या आगीत त्यांच्याकडील सर्व चीजवस्तू भस्मसात झाल्या. या दु:खद घटनेतून सावरण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा कवितालेखनाचा आधार घेतला. या काळात लिहिलेल्या कवितासंग्रहाला
(द ट्रायम्फ ऑफ अकीलीस) अनेक पारितोषिकं मिळाली. अमेरिकन कवयित्री लिझ रोझेनबर्ग यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं लिखाण यानंतर अधिकच धारदार, स्पष्ट होत गेलं.
‘ द ट्रायम्फ ऑफ अकीलीस’ (१९८५) आणि ‘अराराट’ (१९९०) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर ग्लुक यांचे अमेरिका व जगभरातील वाचक वाढत गेले.
नोबेल समिती त्यांच्या या काव्यसंग्रहांचं वर्णन करताना त्यांच्या लेखनातील तीन वैशिष्टय़ं आपल्यासमोर ठेवते. एक, त्यांच्या कवितेचे विषय हे कौटुंबिक आयुष्यातील साध्या साध्या घटनांवर आधारलेले आहेत; दोन, त्यांची बुद्धिमत्ता त्यामधून दिसते आणि तीन, साध्या सोप्या शब्दांच्या आधारे गुंतागुंतीच्या भावनांचं खुबीनं वर्णन करणारी त्यांची लेखनशैली आहे. त्यांच्या लिखाणामध्ये त्यांना आयुष्यात आलेल्या अनुभवांचं प्रतिबिंब नक्कीच जाणवतं. पण म्हणून त्यांच्या कविता या फक्त अनुभवकथन किंवा आयुष्यातील घटनांची, चुकांची कबुली देणाऱ्या नसतात, तर त्यांच्या कवितांना एक वैश्विक कोंदण असतं. आयुष्यात होणारे बदल, त्यामधून होणारं विरहाचं दु:ख, या सगळ्याकडे ‘डार्क कॉमेडी’ या अंगानं बघत त्या भाष्य करतात. त्यांच्या ‘विटा नोव्हा’ या प्रसिद्ध कवितेतील एका परिच्छेदात त्या म्हणतात,
बाबाला तुझी गरज आहे,
बाबाचं हृदय रिकामं झालं आहे,
तो आईला सोडून चालला आहे
म्हणून नाही, पण
त्याला जे प्रेम हवं आहे ते
आई देऊ शकत नाही म्हणून,
०*
हे जीवन कसंही संपलं तरी,
स्वप्नांनी बहरलेलं हे जीवन
महाविचित्र आहे.
मी कधीही तुझा चेहरा विसरू शकणार नाही,
तुझे अश्रूंनी सुजलेले, घाबरलेले डोळे.
मला वाटलं माझं आयुष्य आता संपलं आहे,
मन दुभंगलं आहे.
मग मी माझा मुक्काम केंब्रिजला वळवला.
त्यांच्या स्वत:चा ‘एनोरेक्झिया’शी सामना करण्याचा प्रवास त्या त्यांच्या ‘डेडिकेटेड टू हंगर’ या कवितेतून समोर आणतात. यामध्ये वयात येणारी मुलगी, तिच्या बदलत्या शरीराबद्दल तिला वाटणारी घृणा, ‘मोठं’ होताना तिला वाटणारी भीती, या सगळ्यात समाजाच्या नजरेत सुंदर दिसण्याची धडपड, याचं वर्णन केलं आहे.
त्याचं पहिलं कडवं असं-
काही विशिष्ट मुलींमध्ये
दबक्या पावलांनी याची सुरुवात होते,
मृत्यूच्या भीतीमुळे केलं गेलेलं
अविरत भुकेला समर्पण,
कारण बाईचं शरीर हे एक स्मशान आहे,
ते काहीही चालवून घेऊ शकतं.
लुईस ग्लुक यांचा जन्म होण्याच्या आधी त्यांच्या आईला एक मुलगी झाली होती, जी जन्मत:च गेली. पण ती कायम त्यांच्याबरोबर होती असं दिसतं. म्हणूनच त्यांना मिळणाऱ्या आईच्या प्रेमाची ती वाटेकरीण मृत्यूनंतरही तिचं अस्तित्व जाणवून देते आहे, ही भावना त्यांच्या अनेक कवितांमधून दिसते. वरच्या कवितेतलं ‘भुकेच्या भावनेला नाकारणं’ हे आपल्याला इथेही दिसतं. ‘लॉस्ट लव्ह’ या कवितेत त्या म्हणतात,
माझ्या बहिणीनं तिचं सारं जीवन
मातीमध्येच घालवलं.
ती जन्माला आली आणि ती मरून गेली.
या दरम्यान ओळखीची एक नजर नाही की
एखादं वाक्य नाही,
बाळं जे करतात तेच तिनं केलं,
ती रडली, पण तिला अन्न नको होतं.
ग्लुक यांना अमेरिकेतील साहित्य विश्वातील जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या ‘द वाईल्ड आयरिस’ या प्रसिद्ध कवितासंग्रहाला १९९३ मध्ये ‘पुलित्झर परितोषिक’ मिळालं आणि २०१४ मध्ये ‘फेथफुल अँड व्हच्र्युअस नाईट’ या कवितासंग्रहाला ‘नॅशनल बुक अवॉर्ड’ मिळाला आहे. एका मुलाखतीत त्यांना त्या का लिहितात, असं विचारलं असता, त्या म्हणतात, ‘‘मी लिहीत राहिले की मला जिवंत वाटतं. लिहिताना, लिहिण्याच्या आधी मी कायम संगीत ऐकत असते. संगीतामुळे मला सतत नवं सुचत राहातं, ’’ ९/११ नंतर अमेरिकन नागरिकांची भयग्रस्त, सगळं निसटत चाललं आहे, ही भावना त्यांनी ‘ऑक्टोबर’ या कवितेतून अतिशय प्रभावीपणे मांडली. २००४ मध्ये प्रसिद्ध झालेली ही दीर्घ कविता आजच्या अराजक, अस्थिर जगावरच आधारलेली आहे असं वाटतं. ग्लुक यांच्या कविता वैयक्तिक दु:खाला, अनुभवांना पारख्या झालेल्या क्षणांना वैश्विक परिमाण देतात ते असं.
सायंप्रार्थना
तुझ्या वाढीव गैरहजेरीत,तू मला जागा वापरू देतोस,
म्हणजे भांडवलावरील परताव्याच्या अपेक्षेने.
पण मला हा उपक्रम फसला हे सांगावेच लागेल.
विशेषत: टॉमेटोच्या रोपांबद्दल
मला वाटतं कुणी मला टॉमेटो लावायला उत्तेजन देऊ नये
आणि दिलेच तर तू मोठा पाऊस थांबवायला हवास
आणि आवरायला हव्यास थंडगार रात्री,
इतर भागाला बारा आठवडय़ांची ग्रीष्मता देत.
दुसऱ्या तऱ्हेने सांगायचे तर हे सारे तुझेच.
मी बिया पेरल्या. जमिनीतून कोवळे कोंब
रुजून येताना पाहिले जणू पंखाने माती भेदावे तसे.
मग लागलेली कीड, काळे ठिपके पटापट
वाढत जाताना पाहून माझं हृदय खचलं
तुला हृदय आहे का ,याबद्दलच मला शंकाआहे ,
म्हणजे तुला मला जो अर्थ माहीत आहे त्या अर्थाने,
तुझ्यासारखा जो जगणाऱ्या आणि मृत यात फरक करत नाही
जे असतात भविष्यातील चाहुलीबद्दल कोरडे
त्यांना आपण किती भय बाळगून असतो तेच कळत नाही.
ठिपकेदार पर्ण, मेपल वृक्षाची ऑगस्टमध्येही गळती पानं,
उगवत्या अंधारातली या साऱ्या लताभाराला जबाबदार मीच.
– लुईस ग्लुक
अनुवाद – वृंदावन अमृते