मागील तीन लेखात ॐ नादचतन्याच्या उच्चारणातील अष्टगुणापकी विस्सष्ठ, मंजू, िबदू, अविसारी अशा सात गुणांबद्दल जाणून घेतले. या लेखात ॐकाराचा महत्त्वाचा गुण म्हणजेच निन्नादी याचा अर्थ काय व उच्चारणात त्याचे निन्नादीपण कसे साकारायचे हे समजावून घेऊ.
निन्नादी
निन्नादी म्हणजे नाद व झंकार असलेला, ज्याला इंग्रजीत रेझोनंट असे संबोधतात. कोणाही व्यक्तीच्या स्वरयंत्रातील स्वरतंतू कंपित होऊन निर्माण होणारा आवाज अतिशय सूक्ष्म असतो, लहान असतो. तो कंठातून व मुखातून बाहेर पडताना मोठा होऊन बाहेर पडतो. म्हणूनच तो इतरांना ऐकू येतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे कंठपोकळ्या व चेहऱ्यावरील विविध पोकळ्यात तो नाद सहकंपित झाल्यानेच. यासाठी आपण तंबोऱ्याचे उदाहरण पाहू. तंबोऱ्याला जशा तारा असतात तसा एक भोपळाही असतो. तारांतून नाद निघतो पण भोपळ्याच्या पोकळीमुळे तो सहकंपित व निन्नादी होतो आणि त्यामुळेच मोठेपणाने ऐकू येतो.
परमेश्वर इतका कृपावंत आहे, की त्याने मानवाला जन्माला घालताना त्याच्या वाणीतून उमटणारा नाद योग्यरीत्या सहकंपित होऊन निन्नादी व्हावा म्हणून १ किंवा २ नव्हे तर आवाजाच्या सहकंपनासाठी तो नादमय झंकारमय होण्यासाठी एकूण १५ पोकळ्या दिल्या आहेत. त्या म्हणजे ३ कंठपोकळ्या, चेहऱ्यावरील सायनेसच्या ८ पोकळ्या, नाकाच्या २ पोकळ्या, १ मुखपोकळी व १ श्वासनलिकेची पोकळी. शास्त्रशुद्ध ॐ नादचतन्य उच्चारणाचे ठळक महत्त्व असे की, त्याच्या उच्चारणात वर नमूद केलेल्या सर्व १५च्या १५ पोकळ्या एकाच वेळी स्पंदित होतात, सहकंपित होतात.
त्यामुळेच ओम् नाद हा झंकार असलेला म्हणजेच निन्नादी असतो व तसा तो असला पाहिजे. आता ॐ उच्चारणात त्यात अंतर्भूत असलेल्या अकार (अ), उकार (उ), म्कार (म) व िबदू या साडेतीन मात्रांपकी प्रत्येक मात्रेच्या उच्चारणात सर्व पोकळ्या एकाच वेळी कशा सहकंपित होतात, त्याची स्पंदने कुठे कुठे लागतात व ती कशी तपासायची हे आपण समजून घेऊ. प्रथम अ चा उच्चार ब्रह्मकंठातून म्हणजे खालच्या कंठातून करावा. त्याची स्पंदने छातीच्या उजव्या व वरच्या भागात व मानेच्या पुढील भागावर लागली पाहिजेत. त्यानंतर उकाराचे उच्चारण करावे. त्याची स्पंदने दोन्ही गालांवर व ओठावर लागतात. तद्नंतर ओठ मिटून म्कार गुंजन सुरू करावे. त्याची स्पंदने चेहऱ्याच्या दोन्ही म्हणजे उजव्या व डाव्या भागावर, कपाळावर व माथ्यावर लागली पाहिजेत. आपल्या पंजाच्या बोटांनी ही सर्व स्पंदने तपासावीत. अशा प्रकारे स्पंदने लागली तर उच्चार नादमय, झंकारयुक्त म्हणजे निन्नादी ह्य़ा गुणांनीयुक्त झाला आहे असे समजण्यास हरकत नाही.
अशी स्पंदने ॐकाराचा उच्चार कंठस्थ नाभीस्थ परावाणीतून व श्वासपटलाधारित श्वसनाने झाला तरच अनुभवास येतात. ज्यांना अशी स्पंदने लागणार नाहीत त्यांनी उदास होऊ नये शास्त्रशुद्ध साधना अंगीकारून व ती नित्यनेमाने करून त्यांना या स्पंदनाचा अनुभव निश्चित मिळेल व तसा मिळतोही.
डॉ. जयंत करंदीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा