शनिवार (१७ ऑगस्ट) च्या पुरवणीतील भारती महाजन रायबागकर यांचा ‘पंचतारांकित पर्यटनाचा प्रलय’ हा लेख वाचला. केरळमधील वायनाड येथे नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. ही आपत्ती केवळ निसर्गनिर्मित नसून ती माणसाच्या भोगवादी वृत्तीचे पाप आहे हे या लेखातून अत्यंत अभ्यासू आणि शास्त्रीय कारणमीमांसेतून लेखिकेने तळमळीने मांडले आहे. माणूस आपले चोचले पुरविण्यासाठी पर्यटन क्षेत्रात जे संकट निर्माण करीत आहे त्याची भयानकता तीव्रतेने जाणवते. पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा विचार करून निदान शासनाने या अरिष्टाला त्वरित थांबवले पाहिजे. निसर्ग भरभरून देतो पण आपण हव्यासापोटी त्याला ओरबाडत आहोत. लेखकाने निद्रिस्त समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.मनुष्य निसर्गाचा शत्रू बनला आहे. तर निसर्ग कोपणारच. -अ. द. पत्की, अंबाजोगाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दु:ख पालकांचे आणि मुलांचेही

दु:ख ‘एकुलत्या एक’मुलांचं (लेख -१० ऑगस्ट) असतंच, परंतु आजकाल दोन आपत्ये असूनही परिस्थिती तीच आहे. अनेक मुले नोकऱ्यांसाठी परदेशी जातात त्यामुळे दोन मुलगे असले काय किंवा मुलगा -मुलगी असले काय परिस्थिती तशीच राहते.

पण जसे लेखात म्हटले आहे तसे मुली हल्ली लग्न करताना शक्यतो आईवडिलांसाठी त्याच सोसायटीमध्ये घर घेतात, किंवा त्याच विंगमध्ये घर घेतात. करोनानंतर भावंडे किंवा नातेवाईक जवळपास राहणे पसंत करू लागले आहेत. मदतीच्या हाताचे महत्त्व खूप चांगल्या तऱ्हेने लक्षात घेतले जाऊ लागले आहे.

वरिष्ठ मंडळी परदेशी जाणे पसंद करीत नाहीत. तेथील हवा, एकटेपण त्यांना मानवत नाही. पण आईवडिलांसाठी नोकरी व्यवसाय सोडणेही मुलांना शक्य नसते. जरी मदतनीस ठेवला तरी त्याची विश्वासार्हता ही एक कठीण बाब असते. वृद्ध आईवडिलांसाठी सगळ्या सुविधा असलेल्या सहकारी सोसायटी तयार होऊ लागल्या आहेत पण मायेचा ओलावा कमी पडणारच आहे. त्यामुळे एकुलत्या मुलाचे दु:ख आणि त्याच्या आईवडिलांचे दु:ख थोड्या फार प्रमाणात तसेच आहे. -नीता शेरे