विल्यम सीअर्स या बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी १९९१ साली ‘अॅटॅचमेंट पेरेंटिंग’ची चळवळ सुरु केली. यामागची संकल्पना अशी की मुलं आणि आई-बाबा अगदी पहिल्यापासून आपुलकीच्या, प्रेमाच्या नात्याने जोडले गेले तर मोठेपणी मुलं निर्भय आणि समंजस बनतील. िहसेपासून लांब राहतील. शांत आणि प्रेमळ होतील. त्या संकल्पनेविषयी..
गेले चार महिने लेकीच्या बाळंतपणासाठी मी अमेरिकेत होते. त्या दरम्यान गर्भारपण, प्रसूती आणि बालसंगोपन अशा विविध अवस्थांतून जाणाऱ्या पन्नास एक तरुण-तरुणींशी माझा संपर्क झाला. या विषयाला वाहिलेली अनेक पुस्तकं वाचनात आली. काही डॉक्टरांबरोबर चर्चाही झाली. एक गोष्ट अगदी नेमकेपणाने लक्षात आली ती म्हणजे, अब जमाना बदल रहा है! गेले ते दिवस, जेव्हा बाळाचा जन्म म्हणजे आईच्या स्वातंत्र्याला मोठीच बाधा समजली जाई. फॉम्र्युला फीिडग, बाळाला स्वतंत्र खोलीत एकटं झोपवंण, शक्य तितक्या लवकर डे केअरमध्ये दाखल करणं हेच सर्वसामान्य होतं, मुलांना रडायला बंदी होती, त्यांच्या तोंडात कायम चुंफणी वा चोखणी दिलेली असायची. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. तरुण मंडळी बाळाचं संगोपन खूप विचारपूर्वक करताहेत. चांगल्या शिकलेल्या करिअरिस्ट मुली वर्ष-दोन र्वष ब्रेक घेत आहेत, बाळाला शक्यतो अंगावर पाजताहेत. दीर्घकाळ पाजता यावं यासाठी अनेक प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ आणि आयुर्वेदिक औषधं घेत आहेत.
कशामुळे झालाय हा बदल? आज अमेरिकेसारख्या प्रगत, स्त्री-पुरुषाना समान संधी देणाऱ्या देशात ही लाट कशी पसरली? मध्ये ‘टाइम’सारख्या नामवंत नियतकालिकाने मुखपृष्ठावर जेमी लीन ग्रुमेट ही मॉडेल आणि स्टुलावर चढून स्तनपान करणारा तिचा तीन वर्षांचा मुलगा यांचा फोटो छापून एक खळबळ उडवून दिली. त्यावर वाचकांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या. त्या निमित्ताने अॅटॅचमेंट पॅरेंटिंग आणि या कल्पनेचा जनक डॉक्टर विल्यम सीअर्स यांच्यावर माध्यमातून भरपूर चर्चा झाली.
काय आहे ‘अॅटॅचमेंट पॅरेंटिंग’? ही सुजाण पालकत्वाची एक शैली आहे ज्यात आई आणि बाळ यांच्यामधल्या अतूट बंधनाचं महत्त्व विशद केलेलं आहे. (अमेरिकेत केयर गिव्हर असा शब्द वापरतात, पण आईबाबा असा अर्थ अभिप्रेत आहे.) या शैलीचा सर्वात महत्त्वाचा संदेश असा की, तुमच्या बाळाला कोणत्याही क्षणी काय हवं आहे हे जाणून घेण्यासाठी तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही जागृत ठेवा म्हणजे त्या क्षणाला सुयोग्य असा निर्णय घेण्याचं शहाणपण तुम्हाला आपोआप येईल. ‘अॅटॅचमेंट पॅरेंटिंग’ची कल्पना अजिबात नवीन नाही. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका अशा तिसऱ्या जगात कित्येक शतकं परंपरेनुसार चालत आलेली ती बालसंगोपनाची पद्धत आहे, तिला सुरुंग लागला तो अलीकडच्या काही दशकांत, जेव्हा शिक्षण आणि
विल्यम सीअर्स या बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी १९९१ साली ‘अॅटॅचमेंट पॅरेंटिंग’ची चळवळ सुरू केली. त्यांची कल्पना होती की मुलं आणि आई-बाबा अगदी पहिल्यापासून आपुलकीच्या, प्रेमाच्या नात्याने जोडले गेले तर मोठेपणी मुलं निर्भय आणि समंजस बनतील. जगातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवतील. िहसेपासून लांब राहतील. शांत आणि प्रेमळ होतील. अनेकांना हा विचार भाबडा किंवा स्वप्नाळू वाटला तरी आता ही चळवळ चांगली फोफावली आहे. आजच्या उच्चशिक्षित तरुणांनी स्वीकारली आहे. ‘अॅटॅचमेंट पॅरेंटिंग इंटरनॅशनल’ या संस्थेत तिचं रूपांतर झालं आहे. खालील आठ तत्त्वांवर ही चळवळ आधारित आहे.
तुम्हाला एक गोजिरवाणं बाळ हवंय?
तर मग प्रथम गर्भधारणा, प्रसूती आणि पालकत्वाची तयारी करा. शारीरिकआणि मानसिकसुद्धा. बाळाचा जन्म झाल्यावर त्याची काळजी कशी घेणार त्याचा विचार करा. या विषयाची संपूर्ण माहिती घ्या. जरुरीच्या वस्तू जमवा. मदतीसाठी माणसं गोळा करा. नवजात बाळाची वाढ कशी होते हे जाणून घ्या. बाळाचं स्वागत करायला उत्सुक आणि सुसज्ज राहा.
स्तनपान : बाळाच्या आणि आईच्या शारीरिक आणि भावनिक गरजा भागवणयासाठी, दोघांच्या शरीरातील होर्मोन्सचं संतुलन योग्य ठेवून त्यांचे नातेसंबंध अगदी घट्ट व्हावेत यासाठी स्तनपान हे एक उत्कृष्ट माध्यम आहे. बाळाच्या जन्मानंतर काही मिनिटांतच ते सुरू करता येतं. भूक लागली हे वेगवेगळ्या खुणांमधून बाळ सांगत असतं. आईने त्या खुणा ओळखल्या पाहिजेत. बाळ रडायच्या आत दूध पाजायला पाहिजे. जेवढी भूक असेल तेवढंच ते पिणार, भूक भागली की थांबणाार हे आईने स्वीकारायला हवं. यात जबरदस्ती नको. मोठय़ा मुलांनाही हाच नियम. जेवण हे आनंदाने व्हायला पाहिजे, जुलमाचा रामराम नको. काही वैद्यकीय कारणांनी अंगावर पाजता आलं नाही तरी बाटली किंवा वाटी-चमचाने दूध पाजता येतंच. तेही बाळाला स्तनपानाइतकच जवळचं वाटू शकतं. आज कित्येक तरुण माता पम्पाच्या साहाय्याने दूध काढून फ्रिझमध्ये राखून ठेवत आहेत. बाळाला अंगावर पाजण्याशिवाय दिवसातून ३-४ वेळा पंप करून आपल्या तान्हुल्याच्या पोटाची सोय करीत आहेत. बाळासाठी तटावरून उडी टाकणाऱ्या हिरकणीपेक्षा त्यांचं अपत्यप्रेम जराही कमी नही. आश्चर्य वाटेल पण असा पम्प भारतात सुद्धा उपलब्ध असून इथेही तरुण मुली त्याचा वापर करत आहेत.
बाळाशी संवाद : आई-बाळात आपुलकी आणि विश्वास असेल तर संगोपन खूप सुरळीत होतं. छोटय़ा बाळाला काही त्रास होत असेल तर त्याला स्वत:ला शांत करता येत नाही. भूक लागली, ओलं झालं, पोट दुखलं, झोप आली तर बाळ आपल्या परीने सूचना देतं. त्या त्या वेळी त्याचं रडणं वेगवेगळं असतं. शरीर भाषासुद्धा वेगळी असते. बाळ रडण्यामधून संवाद साधत असतं. त्यात आई-बाबांना वाकवायचा उद्देश नसतो. बाळावर मनापासून जीव लावणारे आईबाप त्याचं डोळस निरीक्षण करून ही भाषा शिकतात. तक्रारी दूर करतात.
स्पर्श : तान्हुल्याच्या कोमल त्वचेचा आईला होणारा स्पर्श हा दूध स्रवण्यासाठी अत्यंत हितकारक असतो. तर आईच्या कुशीत निर्धास्त झोपलेल्या बाळाला तिचा स्पर्श आश्वासक वाटत असतो. बाळाला गरज असते प्रेमाची, सुरक्षिततेची, उत्तेजनाची. आईच्या स्पर्शामधून हे सगळं मिळत असतं. ती त्याला जवळ घेते, कुरवाळते, जोजवते, मसाज करते, अंघोळ घालते, कडेवर घेऊन फिरवते. या सगळ्यामधून बाळाला अखंड प्रेम मिळत असतं. थोडय़ा मोठय़ा मुलांनाही जवळ घेणं, पापा घेणं, बिलगून झोपणं, त्यांच्याशी दंगामस्ती करणं यातून स्पर्शाची गरज भागली जाते. डॉक्टर सीअर्स ‘बेबी वेअिरग’ असा शब्द वापरतात. आई-बाबांनी कडेवर, पाठुंगळी, झोळीत किंवा हाताशी धरलेली मुलं किरकिर, हट्ट करत नाहीत. उत्सुकतेने, शांतपणे आई-बाबा काय काम करताहेत ते बघत असतात, त्यातून खूप काही शिकत असतात. अंगा-खांद्यावरचं बाळ आईलाही जास्त उमगतं.
एकत्र झोपणं : छोटय़ा बाळाला आईने स्वत:पासून दूर झोपवू नये. बाळांना दिवसाप्रमाने रात्रीसुद्धा आईची गरज असते. त्यांना भूक लागते, एकटं वाटतं, भीती वाटते, कधी थंडी वाजते, कपडे ओले होतात, त्यांना आई जवळ हवी असते. अगदी लहान मुलांना वेगळ्या खोलीत झोपवण्यामुळे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होऊ शकतात. आईसाठी रडणं आणि आई न आल्याने निराश होऊन रडणं थांबवणं यातून बाळाला वेगळाच संदेश मिळूू शकतो.
‘स्लीप ट्रेिनग’: हे मूल सलग रात्रभर झोपायला लागल्यावर, म्हणजे अडीच-तीन वर्षांचे झाल्यावर सुरू केलं पाहिजे. आजच्या जागरूक माता नर्सरी सजवण्यावर खर्च न करता को-स्लीिपग म्हणजे मुलाला स्वत:जव़ळच झोपवणं पसंत करत आहेत.
संगोपनातील सातत्य : छोटी बाळं आणि थोडे मोठे शिशु यांना जगरूक आणि प्रेमळ पालकांची सतत आणि नितांत गरज असते. कामाच्या निमित्ताने आई-बाबांना काही काळासाठी बाहेर जावं लागलं तर ही गरज दुसरी एखादी व्यक्ती- आजी, आजोबा किंवा दाई भागवू शकते. पण या व्यक्तीसुद्धा सतत बदलत्या नसाव्यात. आई बाळाची ताटातूट दीर्घ काळ असू नये. आई घरी परतल्यावर बाळाशी पुन्हा भेट होण्यासाठी तिने काही काळ राखून ठेवायला हवा. तरच बाळाला येणारा ताण कमीत कमी राहील. बाळ घडय़ाळाकडे बघून वागत नाही. भूक, झोप, शी-शू सगळं बदलत असतं. आईने आपली कामं बाळाच्या अवतीभोवती करत राहिलं तर ते दोघांनाही सुखाचं होतं. आपल्या वेळापत्रकात बाळाला कोंबून बसवलं तर ते त्रासदायक आहे. उदाहरणार्थ, भूक लागली तरच पाजावं, खेळकर मूड असेल तेव्हाच अंघोळ घालावी. मूड ओळखून वागलं तर सगळ्या गोष्टी आनंददायक होतील.
सकारात्मक शिस्त: संगोपन करताना शरीराबरोबर सदसद्विवेकबुद्धी वाढते आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे, काय बरोबर, काय चूक हे अगदी छोटय़ा वयातच दाखवावं लागतं. पण त्यातून निवड करण्याची जबाबदारी शक्यतो मुलाची आहे. मुलाने चूक केली तर पटकन प्रतिक्रिया देऊ नका, चुकीमागचं कारण शोधून काढा. शिस्त लावतानासुद्धा मुलाची मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या त्याच्यावरील प्रेमाची त्याला खात्री वाटू द्या.
वैयक्तिक आयुष्य आणि पालकत्व यांच्यातला समतोल : अॅटॅचमेंट पॅरेंटिंग या कल्पनेचे खूप टीकाकारही आहेत. संगोपनाची ही शैली म्हणजे प्रतिगामीपणा आहे, आजच्या करिअरिस्ट मुलींच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे, असा त्यांचा आरोप आहे. अशा प्रकाच्या संगोपनात वेळ घालवताना आईला बाळाशी जखडून गेल्याची भावना ग्रासू शकते. अतिरेकी पालकत्वाच्या भरात आपल्या वैयक्तिक गरजांचा बळी जातोय, असं तिला वाटलं तर आश्चर्य नाही.
डॉक्टर सीअर्सनाही हे मान्य आहे. या पती-पत्नीनी स्वत: ८ मुलांना जन्म दिला, उत्तम वाढवलं आणि त्याचबरोबर अत्यंत यशस्वी बालरोगाचे डॉक्टर म्हणून कामही अद्यापि करत आहेत. ते म्हणतात, आई बाबांनाही विश्रांती, झोप, करमणूक यांची गरज असते. यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी यांचे मदतीचे हात गोळा करा. ठरवून एकमेकांना काही काळ आपापल्या गोष्टी करायला मोकळीक द्या. थोडय़ा मोठय़ा मुलांचे पालक मित्र असतील तर पाळीपाळीने मुलांच्या ‘प्ले डेट्स’ ठरवून काही जोडप्यांना मोकळा वेळ देऊ शकतील. मात्र मूल अडीच-तीन वर्षांचं होईपर्यंत त्याच्यासाठी वेळ काढणं, स्वत:च्या करिअरच्या निर्णयात योग्य ते बदल करणं हे आजच्या आई-बाबांनी केलंच पाहिजे. आणि याची मानसिक तयारी मूल जन्माला येण्याआधीच केली पाहिजे. अशा प्रकारचं सुजाण संगोपन हे बाळ आणि आई-बाबा दोघांनाही खूप आनंद देणारं, चतन्यमय असू शकतं. आई-बाबांना पूर्णत्वाचा अनुभव देतं. अॅटॅचमेंट पॅरेंटिंगची ही चर्चा वाचून प्रौढ वाचकांना कदाचित वाटेल, ‘यात काय नवीन आहे? आपण हे सगळं केलेलंच आहे की!’ संगोपनाचं हे शहाणपण’ अविकसित, विकसनशील देशांतल्या परंपरेने, घरोघरच्या आयाबायांनी जपलं, पुढच्या पिढीला दिलं. या सगळया कल्पनांचं अमेरिकन तज्ज्ञांनी संकलन केलं, शास्त्रीय कसोटय़ांवर ते तपासून पाहिलं आणि सद्धांतिक स्वरूपात मुद्देसूदपणे ते आजच्या नवीन पिढीसमोर आणलं. आई-बाबा होण्यामागची बांधीलकी आणि त्यातून मिळणारा आनंद या दोन्हीची जाणीव चांगल्या पद्धतीने करून देणारी ही संगोपन शैली आहे हे मान्य करावं लागेल.
अॅटॅचमेंट पेरेंटिंग
विल्यम सीअर्स या बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी १९९१ साली ‘अॅटॅचमेंट पेरेंटिंग’ची चळवळ सुरु केली. यामागची संकल्पना अशी की मुलं आणि आई-बाबा अगदी पहिल्यापासून आपुलकीच्या, प्रेमाच्या नात्याने जोडले गेले तर मोठेपणी मुलं निर्भय आणि समंजस बनतील. िहसेपासून लांब राहतील. शांत आणि प्रेमळ होतील. त्या संकल्पनेविषयी..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-12-2012 at 05:06 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parenting