रजनी परांजपे

आई-वडील हा तर मुलांच्या शिक्षणाचा मोठा आधार. आपण आपल्या घरातच बघितले तरी मूल शिकावे म्हणून आपण किती प्रकारे प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येईल. सतत गावे बदलणाऱ्या मुलांच्या घरात कोणाला शाळेचा अनुभव नसतो, शाळेचे वातावरण नसते. काहीही करून शिकलेच पाहिजे असे मनावर बिंबलेले नसते. अशा मुलांना शाळेत जाती, टिकती आणि शिकती करण्यासाठी त्यांच्या पालकांबरोबर काम करणे अत्यंत जरूरीचे असते.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

माझे ‘चतुरंग’मधील लेख वाचून एक जोडपं मला भेटायला आले. त्यांचे घर गावाबाहेर. घराच्या आजूबाजूच्या दोन तीनकिलोमीटरच्या परिसरात बऱ्याच वीटभट्टय़ा आहेत. दर वर्षी नियमाने ऑक्टोबरपासून ते मे, जूनपर्यंत तिथे बरीच मजूर कुटुंबे येतात. त्यांच्याबरोबर चार पाचशे तरी मुले असतात. जवळच दीड एक किलोमीटरवर दोन शिक्षकी शाळा आहे. पण जाण्यायेण्याचा रस्ता नीट नाही. आणि मुख्य म्हणजे मुलांना त्या शाळेत घालण्याचा प्रयत्न ना पालक करतात ना शिक्षक.

परिणामी मुले शाळेत जात नाहीत. दिवसभर आई-वडिलांना कामात मदत करणे आणि उरलेल्या वेळात इकडे तिकडे हिंडणे असे चाललेले असते. मला भेटायला आलेल्या जोडप्यातील बाई या पूर्वाश्रमीच्या शिक्षिका. या मुलांना शिकवावे असे त्यांना वाटते. त्यांच्या परीने त्या तसा प्रयत्नही करतात. त्यातल्या त्यात जवळची मुले अधून-मधून त्यांच्याकडे येतातही. पण नियमितपणा नाही. या मुलांबरोबर काय करावे हा त्यांचा प्रश्न. म्हणजे त्यांना आणि मुख्यत: त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व कसे पटवावे. ती निदान तास-दोन तास का होईना पण नियमित कशी येतील, त्यासाठी काय करता येईल हे विचारण्यासाठी ते दोघे जण आमच्यापर्यंत पोहचले. असा प्रश्न पडणारी पुष्कळ मंडळी आहेत. सर्वाच्याच आजूबाजूला एवढय़ा मोठय़ा संख्येने मुले असतात असे नाही. इकडे-तिकडे हिंडणारी दोन चार मुले आपल्या आजूबाजूला दिसली तर आपल्या फावल्या वेळात त्यांना शिकवावे, असे आपल्याला वाटते. मात्र प्रयत्न करूनही यश आले नाही, की  ‘हे लोक कधी सुधारणार नाहीत.’ अशा निष्कर्षांला येऊन आपण तो प्रयत्न सोडूनही देतो.

आई-वडील हा तर मुलांच्या शिक्षणाचा मोठा आधार. आपण आपल्या घरातच बघितले तरी मूल शिकावे म्हणून आपण किती प्रकारे प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येईल. आपण आता ज्या मुलांविषयी विचार करतो आहोत त्यांच्या घरात त्यांचा अभ्यास घेणारे कोणी नसते. घरात कोणाला शाळेचा अनुभव नसतो, शाळेचे वातावरण नसते, शाळेत नियमित जावे लागते, वेळेवर जावे लागते याची माहिती नसते असे नाही पण त्याचे महत्त्व लक्षात आलेले नसते आणि रोजच्या रामरगाडय़ात यासाठी  वेळ नसतो. किंवा काहीही करून शिकलेच पाहिजे असे मनावर बिंबलेले नसते. अशा मुलांना शाळेत जाती, टिकती आणि शिकती करण्यासाठी त्यांच्या पालकांबरोबर काम करणे अत्यंत जरुरीचे असते. पालकांबरोबर काम करायचे असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनातली ‘हे कधी सुधारणार नाहीत’ हे गृहीतक काढून टाकावे लागते. ती ही माणसेच आहेत. आजूबाजूची परिस्थिती त्यांनाही दिसते. शिक्षणाने फायदा होतो, आयुष्य सुधारते हे त्यांनाही कळते. पण ते मिळविण्याचा मार्ग दिसत नाही.

आपण मात्र ‘हे कधी सुधारणार नाहीत’ हे वाक्य जसे आपण कळत-नकळत उच्चारत असतो, तसेच ‘हे आपल्यासाठी नाही.’ हे वाक्य त्यांच्या मनात त्यांच्या नकळत रुजलेले असते. पालकांबरोबरच्या कामाची सुरुवात लहान लहान गोष्टींपासून करावी लागते. मुलांना नुसते शाळेत घालून चालत नाही तर सुरुवाती सुरुवातीला शाळेच्या वेळेआधी तेथे पोहचून मुलांना उठवण्यापासून सुरुवात करावी लागते. उदाहरणार्थ पुलाखाली, फुटपाथवर झोपणारी मंडळी रात्रीचा दिवस करतात. त्यामुळे सकाळी लवकर उठणे अवघड. शाळा साडेसातची तर निदान सातपर्यंत तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण लवकर उठले पाहिजे, मुलाला उठवले पाहिजे, निदान तांब्याभर पाणी अंगावर घालून तयार केले पाहिजे आणि शाळेत जाताना पाटी-पेन्सिलीबरोबर डबाही दिला पाहिजे, असा स्पष्ट विचार मनात केलेला नसतो. मुलाला डबा देण्याऐवजी हातात खाऊसाठी पाच दहा रुपये देऊन त्याला शाळेत पाठवणे सोयीचे वाटते. हातात पैसे दिल्याने दोन गोष्टी साधतात. एक तर शाळेत जायला नाराज असलेले मूल शाळेत जायला तयार होते आणि दुसरे म्हणजे मुद्दाम काही तरी रांधून किंवा बांधून देण्याचे कामही वाचते.

पालकांना काय काय सांगितले पाहिजे याचा विचार करण्याआधी आपण पालकाच्या भूमिकेत असताना काय काय केले किंवा काय काय करतो याचा विचार करू या. आपल्या मुलांचे शाळेत किंवा तत्सम घराबाहेरच्या संस्थेत जाण्याचे वय तर आता कमी कमी होत होत दीड ते दोन वर्षांवर आले आहे. मूल थोडे चालू बोलू लागले की आपण त्याला प्ले-ग्रुपमध्ये घालतो. इथून सुरुवात होते मुलाच्या शाळा तयारीची. वेळेवर उठणे, वेळेवर तयार होणे, काही विशिष्ट नियम पाळणे, इतर मुलांबरोबर जमवून घेणे या गोष्टी मूल शिकते, आणि सहा वर्षांचे होईपर्यंत तो त्याच्या सवयींचाच एक भाग होतो. हे झाले मुलाचे. पालकही प्रत्येक वेळेला विचार करताना मूल आणि त्याची शाळा, त्याच्या सुट्टय़ा, त्याच्या परीक्षा या सर्व गोष्टी केंद्रस्थानी ठेवूनच विचार करतात. स्वत:च्या सुट्टय़ा, सण समारंभ, पाहुण्यांचे आगतस्वागत एवढेच नाही तर टीव्ही बघण्याच्या वेळा हे सर्व मुलाच्या शिक्षणाभोवती फिरत असते. आपण ज्यांचा विचार करतो आहोत त्या पालकांना या कशाचीच जाणीव नसते. गावची जत्रा आली की जे काय हातात असेल ते बाजूला सारून गावी जायचे हा शिरस्ता. मग मुलाची ‘परीक्षा’ उद्यावर का आलेली असेना.

पालकांबरोबर काम करताना मुलाला शिकवण्यापासूनच सुरुवात करावी लागते पण इथेच थांबता येत नाही. शिकवायचे असले तर काय काय करावे लागते ते सांगावे लागते, त्याचा वस्तुपाठही घ्यावा लागतो. उदारहणार्थ त्यांना ‘शिक्षण हक्क कायद्या’ची माहिती दिली, कायद्याप्रमाणे मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी, मुलाचा जन्मदाखला, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी लागत नाहीत हे सांगितले तरी तेवढय़ावरच भागत नाही. माहिती दिल्यावर पालकांना ‘आता तुम्ही शाळेत जा आणि मुलाचे नाव घाला’ असे सांगता येत नाही कारण बऱ्याच शाळा अजून हे दाखले मागतातच. वयाच्या दाखल्यावर अडणारे तर पुष्कळच. असे का म्हणाल तर कायद्याप्रमाणे मुलाला वयानुरूप इयत्तेत बसवावे लागते. म्हणजे मूल जर दहा वर्षांचे असेल तर त्याला चौथीत दाखल करून घ्यावे लागते. आता जन्मदाखलाच नसेल तर वय किती हे कसे ठरवायचे?

तर दाखल्याची आणि इतर तत्सम गोष्टींची अडचण येणारच. शाळा ही गोष्ट तशी नवीन. कधीच न बघितलेली किंवा लहानपणी बघितली असेल तरी त्याच्या आठवणी पुसट आणि फारशा सुखद नाहीत अशा परिस्थितीत पालक शाळेत जाणे शक्यतो लांबणीवर टाकताना दिसले तर ते मनुष्य स्वभावाला धरूनच. त्यामुळे पहिल्यांदा तरी पालकांबरोबर स्वत: जाऊन मुलाचा शाळाप्रवेश करून देणे, शाळेकडून होणाऱ्या आगत-स्वागताचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पुढील कामाची दिशा ठरवणे हे करावेच लागते. पण ही तर झाली सुरुवात. पालक पूर्णपणे सक्षम होण्यासाठी किती आणि काय काय करावे लागते हे आपण पुढील लेखात पाहू.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com