आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यत हेच माहीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील डॉ. अॅना मोकगोकाँग. मृत्यूनंतर आपण काय सोबत नेणार असतो? त्यापेक्षा आपण जिवंत असेपर्यंत आपण कमावलेल्या अमाप पैशाचा जगाच्या कल्याणासाठी वापर करायला हवा या विचारांनी चालणाऱ्या अॅनाविषयी..सर्वसाधारण, किंबहुना गरीब परिस्थितीत जन्मलेली दक्षिण आफ्रिकेतील डॉ. अॅना मोकगोकाँग अनेक खटपटी करून आपले शिक्षण पूर्ण करते, शिकत असतानाच छोटासा व्यवसाय करते. शिक्षणातही अव्वल राहते आणि पुढे आपल्या शिक्षणाचा उपयोग मोठमोठय़ा व्यवसायांच्या उभारणीसाठी करते. आपल्यासह अनेक वंचित समाजबांधवांचंही जीवनमान सुधारण्यासाठी धडपडते. व्यक्तिमत्त्वातली सकारात्मकता एखाद्याला किती उत्तुंग यश मिळवून देऊ शकते याचे अॅना हे चालतं-बोलतं उदाहरण आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृष्णवर्णीयांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने  डॉ. अॅना मोकगोकाँग यांनी ‘मलीस्ला इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज’ या गुंतवणूक कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या त्या सहसंस्थापक आणि एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन आहेत. हेल्थ केअर, फायनान्शियल सव्र्हिसेस, एनर्जी आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात या कंपनीची विशेष गुंतवणूक आहे. यासह अनेक बडय़ा कंपन्यांच्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर’ पदावर त्या आहेत. इतकंच नव्हे तर अमेरिकेतील ‘स्टार ग्रुप’ने घेतलेल्या एका जनमत चाचणीत १९९८ साली लीडिंग वुमेन ‘आंत्रप्रेन्युर ऑफ द वर्ल्ड’साठी त्यांना सर्वाधिक मते मिळाली होती. हा पुरस्कार अवार्ड मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेतील केवळ पाच महिलांपैकी त्या एक आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अत्यंत खडतर बालपण आणि पुढील आयुष्यातदेखील असंख्य अडथळे आणि चढउतार पाहिलेल्या डॉ. अॅना यांनी एक अब्ज डॉलरहून अधिकचा व्यवसाय उभारला आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधल्या सोवेतो या शहरात मे १९५७ साली अॅना यांचा जन्म झाला.
अॅना यांचे आईवडील बेनोनी आणि पिंव्हिल येथे शिक्षक होते. अपुऱ्या उत्पन्नामुळे वडिलांनी भाजी विकण्याचा व्यवसाय काही काळ केला, त्यात त्यांनी सपाटून मार खाल्ला. जवळ होती-नव्हती तेवढी पुंजीही ते गमावून बसले. मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशाने त्यांनी स्वित्र्झलडला बस्तान हलवलं. अॅनाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेतास बात होती. अगदी प्राथमिक शाळेत असताना आपला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी त्या शाळेत सॅन्डविचेस विकत असत. त्याचं शालेय शिक्षण इथेच पार पडलं. अॅनाची भावंडंसुद्धा अशीच स्वत:च्या कष्टाच्या बळावर इंग्लंड व अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. केवळ चांगलं शिक्षणच प्रगतीचे मार्ग खुले करते या विचारांवर तिच्या पालकांची अटळ निष्ठा होती आणि त्यांचं म्हणणं तंतोतंत खरं असल्याची प्रचीती पुढे येत गेली, असं अॅना सांगतात.
आपल्या बालपणीच्या आठवणी अॅना सांगतात, ‘माझे आईवडील शिक्षक असल्याने शिक्षणासाठी आमच्याकडे बरेच नातेवाईक व इतर परिचित येऊन राहत. आमची परिस्थिती फार बरी नव्हती, पण शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. माझे आजोबा आम्हाला थोडीबहुत आर्थिक मदत करीत. अनेकदा आमचं छोटंसं घर या मंडळींनी इतकं भरलेलं असायचं की माझी झोपण्याची जागा सोफ्याच्या खाली असायची. जे असेल ते सर्वानी वाटून घ्यायचे संस्कार आम्हाला आमच्या बालपणीच मिळाले. त्याचा मला माझ्या व्यवसायात खूप फायदा झाला.’
आपलं उच्चशिक्षणही त्यांनी स्वकष्टाने पूर्ण केलं. बोत्स्वाना विद्यापीठातून बी. एस्सी.ची पदवी घेतली आणि मेडुसा विद्यापीठातून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान स्वत:मधील उद्यमशीलतेचा त्यांना साक्षात्कार झाला. हॅन्डबॅग्ज आणि बेल्ट्स आपल्या सहाध्यायांना विकून त्यांनी एक छोटासा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळला आणि आपल्या वैयक्तिक तसेच शैक्षणिक खर्चाची तजवीज त्यांनी केली. स्वित्र्झलडमधून ४०,००० रॅन्ड एवढी रक्कम त्यांना गुंतवणूक म्हणून मिळाली. आफ्रिकन क्लोदिंग आणि क्युरिओजमध्ये या रकमेची गुंतवणूक करून अॅना यांनी हाही व्यवसाय उत्तम चालवला.
परंतु त्याचं व्यवसायात जम बसवणं प्राध्यापकांना पसंत नव्हतं. त्यांनी व्यवसाय बंद करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं यासाठी सतत दबाव आणला जाई. परंतु अॅना मेडुसा वैद्यकीय अभ्यासक्रामध्येही सतत वरचढ राहिल्या. ‘मेडुसा’मध्ये अॅनाला ‘बेस्ट स्टुडन्ट ऑफ फॅमिली मेडिसिन’चे अॅवार्ड मिळालं.
डॉक्टर बनल्यावर अॅनाने १९८४ ते १९८७ पर्यंत ‘गा रँकुआ हॉस्पिटल’मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं. पण स्वत:चा व्यवसाय करण्याच्या कल्पनेने भारलेल्या अॅनाला तिथे जास्त दिवस राहता आलं नाही. लवकरच त्यांनी ही नोकरी सोडली. हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंत ४०,००० रॅन्डपासून केलेला व्यवसाय १,५०,००० रॅन्डपर्यंत पोहोचला होता. या पैशाचा उपयोग त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वायव्य प्रांतात हेब्रोन मेडिकल सेंटरच्या उभारणीसाठी केला. आत्यंतिक अडथळे पार करीत अगदी तुटपुंजा रकमेतून उभारलेलं हे सेंटर प्रायमरी हेल्थ केअर आणि बेबी वेल्फेअर क्लिनिकमध्ये रूपांतरित झालं आणि ४०,००० रुग्ण या ठिकाणी उपचार घेऊन गेले.
याच काळात म्हणजे साधारणपणे १९९४ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेत लोकशाहीची पाळेमुळे रुजू लागली आणि अॅना यांच्या लक्षात आलं की हेल्थ केअर क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आहेत. त्यातूनच ‘मलीसा इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज’ या कंपनीची स्थापना तिने केली. नंतर या कंपनीचं नाव ‘कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज’ असं झालं. या कंपनीत गुंतवणूक असणारी मंडळी १०० टक्के कृष्णवर्णीय आहेत. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेत विशेष स्थान नसणाऱ्या कृष्णवर्णीयांनीच फक्त तिच्या कंपनीत गुंतवणूक करावी याबाबत अॅना कायम आग्रही राहिली. कृष्णवर्णीयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेत जोपर्यंत ठळक सहभाग राहणार नाही तोपर्यंत देशात त्यांचे स्थानही बळकट होऊ शकत नाही असं त्यांचं मत होतं.
त्यांच्या कंपनीत मध्यंतरीच्या काळात काही घोटाळे झाल्याचं निदर्शनास आलं. कंपनीची छबी काळवंडली, पण अॅना डगमगल्या नाहीत. १९९९ सालचा एक्झिक्युटिव्ह वुमेन्स क्लबचा ‘बिझनेस वुमन ऑफ द इयर’ हा सन्मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. लगेचच २००३ साली नव्या जोशाने त्यांनी आपल्या कंपनीची बांधणी केली आणि भागधारकांची त्यांच्याप्रति असलेली विश्वासार्हता परत मिळवली. हेल्थ केअरसारखं क्षेत्र सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतूनच भरभराटीला येऊ शकतं असा अॅनाला विश्वास आहे.
जितकी भागधारकांची संख्या अधिक तेवढी दीर्घकालीन फायद्याची हमी असल्याने त्यांनी बहुतेक सर्व कृष्णवर्णीयांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केलं. आज त्यांच्या मुख्य कंपनीच्या चार उपकंपन्या स्थापन झाल्या असून १३ अब्ज रॅन्डहून अधिकचा व्यवसाय या कंपन्या करतात. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका आणि सहारा प्रांतात या कंपन्यांचं जाळं आहे.
‘बिल क्लिंटन फाउंडेशन’चं काम करीत असताना आपल्यावर बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नीचा मोठाच प्रभाव पडला, असं त्या सांगतात. ‘माणुसकी आणि मानवतेचं कार्य हे दात्यांच्या प्रेरणेनेच (स्पिरिट ऑफ गिव्हिंग) केवळ शक्य असतं हे मी त्यांच्यासोबत काम करताना शिकले. शेवटी मृत्यूनंतर आपण काय सोबत नेणार असतो? त्यापेक्षा आपण जिवंत असेपर्यंत आपण कमावलेल्या अमाप पैशाचा जगाच्या कल्याणासाठी वापर करायला हवा हे त्यांचे विचार मला फार पटले. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात असंच काही तरी करून जावं असं मला सतत वाटतं आणि त्या दृष्टीने मी माझी वाटचाल
सुरू केली आहे,’ असं त्या सांगतात.
अॅनाने ज्याच्याशी विवाह केला त्याला आधीच्या विवाहातून झालेली दोन मुलं आहेत. दोघंही आता अॅनाजवळच असतात. ‘माझ्या यशस्वी असण्याने जो पुरुष झाकोळून जाणार नाही असं मला वाटलं त्याच्याशी मी लग्न केलं.’ आपले विचार ते असे स्पष्टपणे मांडतात.
तुम्ही नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या महिलांसाठी ‘रोल मॉडेल’ आहात का, असं विचारताच अॅना म्हणते, ‘माझं यश सहज मिळालेलं नाही, अष्टौप्रहर कष्ट आणि अडथळ्यांची शर्यत ही माझ्या जगण्याची अपरिहार्यता आहे. तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहिला नाहीत तर दुसऱ्याच दिवशी तुम्ही व्यवसायातून बाहेर फेकल्या जाल’,  आपल्यासारखंच काही करू पाहणाऱ्या महिलांना अॅनाचा हा मोलाचा सल्ला आहे.