हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, मँगनीज याशिवाय फॉस्फरस आणि झिंक असलेली खसखस बाळंतिणीच्या आहारात अवश्य असावी. खसखशीत तांबा, लोह, ‘ब’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियमही असतं, यामुळे रक्तातील लाल पेशींचं प्रमाण वाढायला मदत होते, रक्तदाब आटोक्यात राहतो, आवश्यक एन्झाइम्स मिळतात. खसखस भाजून केलेली पावडर घातलेला पदार्थ खमंग होतो. खसखस दुधात भिजवून, वाटून पदार्थात घातली की पदार्थ शाही बनतो.
यासह खसखस हा अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. चेतासंस्थेतील समस्यांवर खसखस उपयुक्त आहे. शिवाय ती अॅण्टी ऑक्सिडंट घटक म्हणून काम करते. बाळंतिणीसाठीच्या खास पदार्थामध्ये आवर्जून खसखशीचा वापर करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in