मानसी होळेहोन्नूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगातली महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत जे काही घडते त्याचा थेट परिणाम त्यांच्या शेजारी देशांवर तर होताच असतो, पण इतर देशांवरही प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या होतच असतो. २२ डिसेंबर २०१८ पासून अमेरिका शट डाऊन होती, म्हणजे अनेक ठिकाणचे काम ठप्प होते. ऑफिसेस, बागा, सरकारी मालकीची ठिकाणे अनेक गोष्टी बंद होत्या, त्यामुळे लाखो लोकांना पगार मिळाले नाहीत, या सगळ्याचे कारण होती मेक्सिको सीमेवरची भिंत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तिथली काँग्रेस यांच्यात या भिंतीसाठीच्या निधीवरून वाद आहेत. मुळात ट्रम्प यांचे म्हणणे आहे, मेक्सिकोमधील अनेक लोक अमेरिकेत घुसतात आणि इथल्या लोकांच्या नोकऱ्या हिसकावतात, हळूहळू इथलेच नागरिक होऊन जातात. त्यावर उपाय म्हणून पूर्ण सीमेवर मोठ्ठी भिंत बांधावी. मेक्सिकोपेक्षा अमेरिकेतली परिस्थिती नक्कीच चांगली असल्याने ही गोष्ट खरीही आहे, पण मेक्सिकोमध्ये फक्त या सीमेवरच नव्हे तर देशाच्या इतर भागामधूनदेखील लोक गायब होत आहेत. अमेरिकेला लागून असलेल्या प्रांतातले लोक अमेरिकेत जात असतील, असा संशय तरी बाळगता येतो, पण सिनालोआ या उत्तरेकडच्याच पण समुद्रकिनारा असलेल्या प्रांतातलेदेखील अनेक पुरुष हरवलेले आहेत. २००६ पासून संपूर्ण मेक्सिकोमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त जण गायब झाल्याच्या नोंदी आहेत. त्यातले काही जण या भागातलेदेखील आहेत. त्यातल्याच एल फ्युर्तो गावातून मिरना नेरीयदा मेदिना हिचा मुलगा रॉबर्ट २०१४ मध्ये अचानक गायब झाला. म्हणजे त्याला काही जण घेऊन गेल्याचे काही लोकांनी पाहिले, पण त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच कळले नाही. त्याचा शोध घेत असताना मेदिनाला कळले की तिच्यासारख्या अनेक जणी आहेत. कोणाचा नवरा, कोणाचा भाऊ, कोणाचे वडील गायब झाले आहेत. मुळात हा भाग कुप्रसिद्ध आहे इथल्या अमली पदार्थाच्या व्यवसायासाठी. त्यामुळे माणसे अचानक गायब होतात त्याचा संबंध अनेकदा या व्यवसायाशीदेखील असतो. किमान आपला माणूस जिवंत आहे की त्याचे काही बरेवाईट झाले एवढे तरी कळावे, असे या शोध घेणाऱ्या परिवारांना वाटणे साहजिक आहे. त्यामुळेच मग मिरना नेरीयदा मेदिना हिने

द सर्चर्स ऑफ एल फुअत्रे’ ही चळवळ सुरू केली. या चळवळीअंतर्गत आसपासच्या भागांमध्ये कुठेही एखादा बेवारशी मृतदेह सापडला तर त्याची डीएनए टेस्ट करतात आणि हरवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातल्या कोणाशी तो जुळतोय का हे पाहतात. कधी एखाद्या शेतकऱ्याला शेत नांगरताना मृतदेह किंवा त्यांचे सांगाडे, काही अवशेष सापडतात, किंवा कधी जनावरे जमीन उकरून हे अवशेष वर काढतात. या संबंधीची काहीही माहिती मिळाली की मेदिना आणि तिच्या सहकारी कुदळ फावडे घेऊन जातात आणि हलक्या हाताने मृतदेह, अवशेष गोळा करतात. या त्यांच्या शोधमोहिमेत त्यांना आजवर दोनशे मृतदेह मिळाले, मात्र त्यातल्या काहींचीच ओळख पटली. त्यांच्याकडे सातशे जणांच्या डीएनएचे नमुने आहेत, मिरनाने ज्या कारणासाठी हा शोध सुरू केला होता, तो शोध २०१७ मध्ये संपला, तिला रॉबर्टचे अवशेष सापडले. पण तरीही तिने हे कार्य थांबवले नाही. आता त्यांच्या या शोध मोहिमेत काही पुरुषदेखील मदतीला येत आहेत. आपल्या प्रियजनांचा मृत्यू हा कायमच दु:खद असतो, पण त्याहीपेक्षा ते जिवंत आहेत की नाहीत याची अनिश्चितता जास्त वाईट असते, त्यामुळे मिरनाला कळले तसेच इतरांना आणि तिच्या सहकारी कार्यकर्त्यांनाही त्यांच्या प्रियजनांचा ठावठिकाणा लवकरात कळो हीच प्रार्थना समर्पक ठरेल.

बदलाचे वारे?

आपण अनेक परीकथांमध्ये वाचलेले असते किंवा ऐकतो, एक राजा असतो, तो जनतेच्या कल्याणाचे सगळे निर्णय घेत असतो. त्यामुळे राज्याचे स्वरूपच बदलत असते. अशीच काहीशी गोष्ट झाली आहे सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्याबद्दल! २०१७ मध्ये राजेपदाचा मुकूट चढवल्यापासून त्यांनी सुधारणांचा सपाटाच लावलेला आहे. तिथे नव्या उद्योगांना चालना देण्याबरोबरच अनेक स्त्रीकेंद्रित निर्णयही घेतले गेले. त्यातलाच जगभर गाजलेला एक निर्णय म्हणजे सौदीमध्ये बायका पुरुषांशिवाय गाडी चालवू शकतात. त्याचबरोबर या राजे साहेबांनी स्त्रियांना शिक्षण, वैद्यकीय सोयींचा लाभ उठवण्यासाठी घरातल्या पुरुष मंडळींची परवानगी घेणे गरजेचे नसेल. त्या त्यांचा व्यवसायदेखील सुरू करू शकतात, खेळाचे सामने बघण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊ शकतात. खासगी क्षेत्रात नोकरी करू शकतात, घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी मिळवू शकतात, पण असे सगळे बदल घडले असले तरीही तिथले चित्र अजूनही खूप काही सुखकारक असेल असे वाटत नाही आणि असे वाटण्याचे कारण म्हणजे रहाफ मोहम्मद ही १८ वर्षांची तरुणी. सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना त्यांच्या घरातल्या पुरुषाच्या परवानगी शिवाय प्रवास करता येत नाही, इतरही अनेक बंधने आहेत. या सगळ्या बंधनांना आणि सतत कुटुंबीयांकडून होणाऱ्या शारीरिक मानसिक अत्याचारामुळे रहाफला सौदी सोडून आश्रित म्हणून ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा देशात जायचे होते. काही दिवसांपूर्वी या तरुणीला बँकॉकमध्ये पकडले होते. ही एकटीच कुवेतवरून बँकॉकला आली होती, ती पळून आल्याचा संशय आल्याने तिचा पासपोर्ट सौदीच्या अधिकाऱ्यांनी घेतला, त्या वेळी थायलंडच्या लोकांनी तिला परत पाठवण्याची तयारीदेखील केली होती, मात्र हिने सोशल मीडियाचा वापर करत, स्वत:ची परिस्थिती ट्विटरवर टाकली आणि बघता बघता तिची केस आंतरराष्ट्रीय प्रश्न बनली. तिची एक मत्रीण, जिने इस्लाम सोडून दुसरा धर्म स्वीकारला आहे, ती ऑस्ट्रेलियामध्ये असते, तिनेही रहाफला ट्वीट करण्यास मदत केली होती.

सुरुवातीला रहाफला ऑस्ट्रेलियामध्ये जायचे असे ती म्हणत होती, मात्र नंतर तिने ट्वीट करून कॅनडा, अमेरिका, यूके कुठेही आश्रय मिळाला तर चालेल, अशी भूमिका घेतली. तिचे वडील तिला घेण्यासाठी बँकॉकला पोहोचले होते मात्र जर मला माझ्या वडिलांकडे पाठवले तर सौदीमध्ये गेल्यावर कदाचित माझा खून करतील हेही तिने वारंवार सांगितले. २०१७ मध्ये दीना लासूम या सौदीमधून पळून जाणाऱ्या स्त्रीची अशीच काहीशी गत झाली होती, पण तिला तिच्या कुटुंबीयांनी परत नेले आणि त्यानंतर तिचे काय झाले हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही.

रहाफ मात्र या बाबतीत सुदैवी ठरली. तिने सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर करून घेतला. कॅनडा सरकारने तिला राजाश्रय दिलेला आहे आणि हा लेख छापून येईपर्यंत ती कॅनडापर्यंत पोहोचली देखील असेल. सौदी अरेबियात बदलाचे वारे जोरात फिरताहेत हे दिसतच आहे. तिथल्या वाळवंटात हे बदलाचे वारे मिटतात, की वादळ आणतात हे आता बघायचे आहे.

वेदनामय आयुष्य

स्त्रिया आता कोणत्याही क्षेत्रात आपण मागे नाही हे दाखवून देत आहेत, स्वत:चे निर्णय स्वत: घेत आहेत, हे प्रगत आणि प्रगतिशील देशांमधले चित्र असतानाच आफ्रिका, मध्यपूर्व आशियातल्या अनेक मुलींना आजही जुनाट प्रथांना बळी पडावे लागत आहे. मुलींचा सुंथा करणे ज्याला वैद्यकीय भाषेत एफएमजी (female genital mutilation) म्हणतात, हे आजही जगाच्या अनेक भागात सर्रास घडत आहे. जुन्या काळात स्त्रियांवर अंकुश राहावा, त्यांची कामभावना कमी/ मर्यादित राहावी अशा भावनेतून सुरू झालेली ही प्रथा आजही छुप्या मार्गाने पाळली जातेच. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे पश्चिम केनिया मधल्या शाळांनी ९१७ वर्षांच्या मुलींसाठी प्रेग्नन्सी टेस्ट आणि एफएमजी टेस्ट करून घेणे सक्तीचे केले आहे.

नवीन वर्ष सुरू झालेय. आता ही टेस्ट केली जाईल. यामध्ये एफएमजी झाले असेल तर पुढे काय काळजी घेतली पाहिजे, त्रास होत असेल तर त्यासाठीची उपाय योजना करणे, जर मुलगी गर्भवती असेल तर तिला घरी परत पाठवून तिची वैद्यकीय काळजी घेणे आणि मुलाच्या जन्मानंतर शाळेत परत प्रवेश दिला जाईल ही हमी देणे या गोष्टींवर भर आहे. खरे तर २०११ पासून केनियामध्ये एफएमजी करणे हा गुन्हा आहे, पण ही इतकी खासगी गोष्ट आहे की त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाही. या प्रथेला कोणताही वैद्यकीय किंवा धार्मिक आधार नाही, केवळ परंपरा म्हणून अनेक वर्षांपासून ही गोष्ट चालत आली आहे. पण याचा त्रास होऊन अनेक जणींना कायमचे वंध्यत्व आले आहे, काही मरण पावल्यात, पण तरीही ही प्रथा चालूच आहे. आपल्यावर आपल्या रूढी परंपरा यातून आलेल्या वर्चस्वाचा प्रभाव इतका असतो, की आपण त्यापलीकडे जाऊन त्यातून आपल्याला काही शारीरिक त्रास तर होणार नाही ना याकडे अनेक स्त्रियासुद्धा लक्ष देत नाही. केनिया सरकारच्या या निर्णयावर त्यांना पुरोगामी आणि प्रतिगामी दोन्ही लोकांकडून विरोध सहन करावा लागत आहे. प्रतिगामी अर्थातच अशी कोणती टेस्ट करायच्या विरोधात आहेत तर पुरोगामी लोकांच्या मते ही खूप खासगी गोष्ट आहे, हे मुलींच्या खासगी आयुष्यावर बंधन घालण्यासारखेच आहे. त्यामुळे खरे तर सर्व स्तरांवर या विरोधात आवाज उठणे गरजेचे आहे. स्त्रीच्या आयुष्यातील अशी वेदना थांबायला हवीय.

अशीही इन्व्हेस्टमेंट

नोकरीमध्ये असताना, कामाचे स्वरूप तेच, कामाची वेळ तेवढीच असली तरीही त्या दोघांच्या वेतनात फरक बघायला मिळतोच. हा फरक अगदी खालच्या आणि खूप वरच्या स्तरावर जास्त अनुभवायला मिळतो. स्त्रिया १०० टक्के झोकून देऊन काम करत नाहीत, त्यांच्या डोक्यात कायम घरचे, मुलांचे विचार असतात हा नेहमीचा आरोप तर अनेकदा असतोच. गमतीची गोष्ट अशी असते की हा आरोप करणारे त्यांच्या घरी त्यांच्या बायकोकडून हीच अपेक्षा ठेवत असतात. ‘यूके’मध्ये झालेल्या एका सव्‍‌र्हेक्षणामध्ये नामांकित विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांचे वेतन त्यांचा वर्ण, वंश, लिंग यावर आधारित असते ही माहिती नुकतीच समोर आली. गोऱ्या पुरुषांना अर्थातच सर्वाधिक पगार मिळतो. गोऱ्या स्त्रियांना त्यांच्यापेक्षा थोडा कमी, त्यानंतर भारतीय किंवा दक्षिण आशियाई पुरुष, मग दक्षिण आशियाई स्त्रिया आणि मग इतर. यातले अजून एक निरीक्षण म्हणजे गौरवर्णीय स्त्रियांना भारतीय किंवा दक्षिण आशियाई पुरुष सहकाऱ्यांपेक्षाही कमीच वेतन मिळते. अनेक जण या वेतनतफावतीचे समर्थन करतात, तर अनेक जण हिरिरीने स्त्रिया कशा कामचुकार असतात, त्या झोकून देऊन काम करत नाहीत हे सांगत राहतात. पण स्वत:वरील कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे एकटे राहणाऱ्या, किंवा उशिरा लग्न करणाऱ्या स्त्रियांची वाढती संख्या हेच सिद्ध करते. आताशा अनेक स्त्रियादेखील कामाला पहिले प्राधान्य देत आहेत, पण तरीही त्यांना नोकरीच्या ठिकाणी समान वागणूक मिळतेच असे नाही. अशा वातावरणात गोल्डमन सॅक्सने त्यांच्या इंग्लड मधल्या स्त्रीकर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली खास सवलत सुखावह आहे. या जगप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीने तिच्या लंडन येथील स्त्रीकर्मचाऱ्यांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. अनेकदा मूल आजारी आहे किंवा वृद्ध, परावलंबी आईवडिलांकडे बघण्यासाठी कोणी नाही म्हणून स्त्रिया कर्मचारी रजा घेतात, म्हणून कंपनीने त्यांच्यासाठी अल्प दरात मदतीची सोय उपलब्ध करून दिली आहे. कर्मचारी वर्षभरात कोणतेही २० दिवस या सोयीचा फायदा घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना तासाला फक्त ४ पौंड द्यायचे आहेत, उरलेली रक्कम कंपनीकडून दिली जाईल. आपल्यासाठी आपल्या स्त्रीकर्मचारीदेखील महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ही खास सुविधा आपण देत आहोत, असे या कंपनीने सांगितले होते. या आधीदेखील या कंपनीने स्तन्यदा आणि कामानिमित्त दुसरीकडे जावे लागणाऱ्या आयांना त्यांचे ब्रेस्ट मिल्क घरी पाठवण्याची सोय करून दिली होती. ज्या इंग्लंड मध्ये विद्यापीठे वेतन देताना स्त्रीपुरुष भेदभाव करतात, तिथेच ही बँक त्यांच्या स्त्रीकर्मचाऱ्यांना खास सवलत देते. बहुतेक इन्व्हेस्टमेंट बँकेला कुठे इन्व्हेस्ट केले म्हणजे चांगले रिटर्न्‍स मिळतील याचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे, ते अनुभवाला प्राधान्य देत असावेत.

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com