‘फिटे.. नैराश्य कृष्णमेघी’ या १४ जूनच्या ‘फादर्स डे’निमित्ताने आलेल्या लेखामुळे एका वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे आमच्याही दु:खाला वाचा फोडली गेली. हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक भागांतून फोन आले कारण आम्हीही रामकृष्ण मरकडेय यांच्याच
रामकृष्ण यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी जी हिम्मत दाखवली ती निश्चितच अन्य पालकांना प्रेरणादायी आहे. मतिमंद पाल्य जन्माला आले की त्याच्या आई-वडिलांची होणारी कुचंबणा आम्ही अनुभवली आहे, अजूनही अनुभवत आहोत. समाजव्यवस्था अशा मुलांना नीटपणे जगू देत नाही. आई-वडील असेपर्यंत थोडा तरी निभाव लागतो, पण त्यानंतर मात्र सारे परमेश्वराच्या हाती सोपवावे लागते.
एक मतिमंद मूल सांभाळताना, आईवडील मेटाकुटीला येतात. आपल्या सबंध आयुष्याचे गणित चुकले म्हणून आयुष्यभर रडत बसतात. आपल्या पश्चात मुलांचे काय होणार या काळजीने ते अहोरात्र जळत असतात. या पाश्र्वभूमीवर रामचंद्र यांची तर तीनही मुले सौम्य डाऊन सिंड्रोमची. त्यांनी त्यांना सक्षम बनवले, जगण्यालायक केले, हे अर्थातच त्या कुटुंबाचे धाडस म्हणायला हवे. त्याबद्दल त्यांना श्रेय द्यावेच लागेल.
किंबहुना अन्य पालकांना हे प्रेरणादायी उदाहरण म्हणून ठसठशीतपणे दाखवणे गरजेचे आहे. या लेखामुळे आमच्यासारख्या पालकांना एक नवा आदर्श घालून दिला आहे. भविष्याच्या उदरात काय दडलेले आहे हे कुणालाच माहीत नसते. पण सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल कदाचित उद्यासाठी येणाऱ्या एखाद्या संधीचे दार उघडू शकते, हे रामकृष्ण मरकडेय यांनी सिद्ध केले आहे. प्रत्येक ओळ, त्यातील शब्द वाचताना, अंत:करणात ज्या वेदना होत होत्या त्या शब्दांत व्यक्त करता येणे कठीण आहे. ‘फादर्स डे’निमित्ताने अनेक लेख छापून आले, पण या लेखाने एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे. मरकडेय यांच्या धाडसाला मी सलाम करतो. परमेश्वर त्यांच्या मुलांना नेहमी निरोगी व आनंददायी ठेवो, अशी विनम्रपणे प्रार्थना करतो.
माझाही मुलगा त्याच अवस्थेतून गेला आहे. आज तो २५ वर्षांचा असून, नववीपर्यंतचे शिक्षण असूनही एका मोठय़ा टेक्सटाइल अभियांत्रिकी महाविद्यालयात साहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. ही मुले स्टिरिओटाइप कामे चांगली करतात, हे जाणून आम्ही त्याला संगणकाचे शिक्षण दिले.
आज संपूर्ण ताकदीनिशी तो आपले काम सांभाळतो. याची दखल घेऊन २००९ साली भारत सरकारने त्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान केला. २०१२ साली आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ग्रंथालय क्षेत्रात काम करणारा जगातील तो एकमेव मतिमंद मुलगा ठरला. आम्हाला त्याचा आज अभिमान वाटतो.
आशेचा किरण देणारा ‘नैराश्य कृष्णमेघी’
'फिटे.. नैराश्य कृष्णमेघी' या १४ जूनच्या 'फादर्स डे'निमित्ताने आलेल्या लेखामुळे एका वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे आमच्याही दु:खाला वाचा फोडली गेली. हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक भागांतून फोन आले कारण आम्हीही रामकृष्ण मरकडेय यांच्याच नावेत बसलेले आहोत. …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-07-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reader response on chaturang articles