आजच्या लेखाला मी ‘पिकासो’ नाव का दिलं आहे माहितीये? ‘पिकासो’ म्हणजे ‘कला किंवा कलात्मक दृष्टिकोन’. तसे बघितले तर बरेच अर्थ निघू शकतात, पण मी इथे वापरण्यामागे उद्दिष्ट असं की, प्रत्येक गृहिणीला कलात्मक दृष्टी असते, मग ती घरातील फर्निचरची रचना असो किंवा साडय़ामधील निवड, तिथे ‘तिचा’ स्वत:चा ठसा असतो. मग हीच कला आपल्या आहारामध्ये वापरली- विविध अन्नपदार्थाचा उपयोग करून तर पूर्ण कुटुंबाचं आरोग्य अबाधित राहू शकतं यात शंका नाही.
‘‘डॉ क्टर, मी काय खाऊ?’’ हे वाक्य अगदी ठरलेलं आहे- औषध समजून घेतल्यानंतर रुग्ण हमखास डॉक्टरांना विचारणारच. (म्हणूनच बहुतेक स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या बाजूलाच डाएटिशनची ओ.पी.डी. असते.) कारण कोणताही आजार होण्याच्या इतर अनेक कारणांपैकी अयोग्य ‘खाणं’ हे एक महत्त्वाचं कारण आहे हे जसं एक सत्य आहे तसंच योग्य आहाराची साथ नसेल तर आजार झाल्यानंतर इतर कोणतेही उपचार कमी पडतात. माझ्या आयुष्यातील अनेक व्यक्तींपैकी एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर मधुरा कुलकर्णी! त्यांच्या एका व्याख्यानात मी हा श्लोक ऐकला होता जो आजच्या आपल्या लेखासाठी एकदम परफेक्ट आहे.
‘पथ्येसती गदार्तस्य किं औषधे निषेवण:
पथ्येअसती गदार्तस्य किं औषधे निषेवण:’
म्हणजेच योग्य आहाराने आरोग्य शाबूत राहतं आणि अनारोग्यात औषधांच्या जोडीला योग्य आहाराची साथ दिली तर आरोग्य लवकर प्राप्त होतं! तर मित्र-मैत्रिणींनो, आज आपण काही पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत जे आरोग्यासाठी हितकर आहेत, आपल्यापैकी बहुतेक जणांना माहिती आहेत, पण नेहमीच्या आहारात क्वचित वापरले जातात.
दलिया, किनोआ, कुळीथ, अळशी, अळीव, जर्दाळू, चारोळी, लाल तांदूळ (हातसडीचा), काळे/पांढरे तीळ, कलौंजी, हुरडा, मेथीचे दाणे, शाहजिरं, नाचणी, राजगिरा, राजमा, रताळं, पुदिना, तुलसी, आलं, दालचिनी, ओट्स, शेपू सर्व पदार्थाचा उपयोग इथे सांगता येणार नाही, पण जर वर नमूद केलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये नसतील तर ते कसे समाविष्ट केले जाऊ शकतात हे प्रत्येक सुगरण गृहिणी जाणून असेलच! काही पदार्थ या लेखामध्ये देत आहे.
दलिया- म्हणजेच लापशी. लापशीचा उपयोग फक्त आजारपणातच होतो असं नाही तर रोजच्या खाण्यामध्ये बारीक रवा वापरायच्या ऐवजी लापशी वापरल्याने फायबर आणि योग्य प्रकारची कबरेदके मिळतात. मधुमेही रुग्णां साठीसुद्धा उपयोगी आहे.
रेसिपी : दलिया खिचडी, दलिया उपमा, दलिया खीर, दलिया डोसे वगैरे.
अळशीच्या बिया/ (flax seeds) पूर्णत: शाकाहारी असणाऱ्या लोकांना हृदय रोगापासून बचाव करण्यासाठी ओमेगा-३ युक्त माशाचे तेल (कॅप्सूल रूपात) घेणे म्हणजे एक दिव्यच. मग मनाविरुद्ध जाऊन ‘मांसाहारी’ बनण्यापेक्षा ओमेगा-३ युक्त अळशीचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये केलेला काय वाईट? ओमेगा-३ बरोबरच त्यात तंतूचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, रजोनिवृत्तीनंतरचा होणारा त्रास वगैरे बऱ्याच विकारांमध्ये अळशीचा उपयोग करता येतो.
रेसिपी : चटणी, मुखवास, ताकामध्ये घालून, चपातीच्या पिठामध्ये, घावन/थालीपिठामध्ये वगैरे.
टीप : बिया थोडय़ाशा भाजून अर्धवट भरडून घ्याव्या आणि हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या. (५-७ दिवसांपेक्षा जास्त काळासाठी नाही.)
कुळीथ – विविध खनिजे आणि प्रोटीनयुक्त कडधान्य हाडांच्या बळकटीसाठी तर छानच आहे, पण मूतखडय़ासारख्या विकारांमध्येसुद्धा उपयोगी आहे. मग त्याचं पिठलं असू दे किंवा सूप किंवा आंबील. माझ्या एका रुग्णाने त्याचे छान, चटपटीत मुठिया बनविले.
अळीव – फक्त प्रसूतीनंतरच खायला पाहिजे असं काही नाही, तर कोणत्याही फळांच्या किंवा लिंबाच्या रसामध्ये घालून (भिजवलेले) किंवा त्याची पावडर करून चपातीच्या पिठामध्ये/ घावनामध्ये घालून खाल्लं, तर हिमोग्लोबीन वाढीसाठी उत्तमच. पांढरे तीळ/ काळे तीळ/ ओवा हे  चपाती/ परोठय़ामध्ये घालून चव तर वाढतेच, पण पोषण मूल्यसुद्धा वाढते. दालचिनी, लवंग, वेलची, मेथी दाणे, तुळस, पुदिना, शेपू वगैरे माहितीतले अन्नपदार्थ नावीन्यपूर्ण पद्धतीने रोजच्या आहारामध्ये वापरल्याने आरोग्याला उपकारच ठरतात. उदा. शेपूचे पराठे बनवून, मोड आलेले मेथीदाणे खिचडी किंवा डाळ/ सलाडमध्ये वापरून, तुळस-पुदिना चहा किंवा मसाला ताकामध्ये वापरून दालचिनी पावडर रायत्यामध्ये वापरून रोजचं जेवण वेगळं आणि आरोग्यपूर्ण बनवू शकतो. अंजीर, खजूर, जर्दाळू, मनुका, कोकम चटणी म्हणजे अमृतच. हातसडीचा तांदूळ दिसायला फार चांगला नाही, पण रूपावर जाण्यापेक्षा गुणधर्म बघा. मुलं (काही घरांमध्ये नवरे मंडळीसुद्धा) नाक मुरडतात म्हणून निकृष्ट तांदूळ वापरण्यापेक्षा त्यांच्या आरोग्याला जास्त महत्त्व नाही का? समजा मुलांना अभ्यास करायला आवडत नाही, आपण पालक म्हणून कोणता पर्याय देतो? अभ्यास सोडून द्यायला सांगतो? नाही ना? उलट अभ्यासाची गोडी कशी वाढेल यासाठी अथक प्रयत्न करतो.
एका वाचकाला किनवा (quinoa) ची रेसिपी हवी आहे. म्हणून या ‘धान्याचा’ मी इथे उल्लेख करते. पाश्चिमात्य देशांमध्ये विविध प्रकारचा किनवा मिळतो, पण आपण भारतामध्ये येणाऱ्या किनवापासून छान खिचडी किंवा उपमा करू शकतो किंवा त्याचं पीठ करून घावनसुद्धा बनवू शकतो. भारतामध्ये गुजरातकडे कुटु नावाचं धान्य मिळतं- साधारण किनवाशी मिळतंजुळतं, ज्याचे परोठे खूप छान होतात. नाक मुरडून ओट्स खाण्यापेक्षा त्याचा उपमा/ घावन बनवा. खायला मजा येते. कोकणामध्ये किंवा मंगलोर स्टोरमध्ये मिळणारे लाल पोहे ओट्सपेक्षा चविष्ट. नुसते भिजवून, मिरची-आलं पेस्ट मिसळा, लिंबू पिळा आणि ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, काकडी, किसलेलं गाजर, मीठ आणि थोडीशी बडीशेप घाला. फोडणीची गरज नाही.
दिवाळी नुकतीच झाली आहे. फराळाचे बेत (करण्याचे आणि खाण्याचे) आखतानाच दिवाळीनंतर आणि नवीन वर्षांच्या सेलिब्रेशन आधी ‘आहार आणि विहारासंबंधी’सुद्धा नियोजन केले असेलच. त्याची जरा आठवण करा आणि कामाला लागा. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये एवढेच नाही तर असे अनेक पदार्थ आहेत जे आरोग्यपूर्ण आहेत, पण विस्मृतीमध्ये गेले आहेत. अळशीच्या बियांचा शोध हल्ली लागला का? नाही, जवसाची चटणी पारंपरिक आहे. खेडय़ापाडय़ामध्ये जेवणाचा ‘चटणी’ एक अविभाज्य भाग आहे, पण वाढविण्यासाठी (चांगलं कोलेस्टेरोल) उपयोग होतो म्हटल्यावर अचानक सर्व ‘शहरी’ दुकानांमध्ये अळशी अचानक दिसायला लागली. करवंदं म्हणजे रानमेवा. पण ‘बेरीज’ (berries) हृदयाला चांगल्या असतात असं समजल्यावर त्याची किंमत कळली.
एक आहारतज्ज्ञ म्हणून मी ‘चतुरंग’च्या वाचकांना हा ‘आहारमंत्र’ देऊ इच्छिते :
१) आहारामध्ये विविधता ठेवा. सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, धान्य, कडधान्य, तेलबिया आहारामध्ये पाहिजेच.
२) ‘इम्पोर्टेड’ खाद्यपदार्थापेक्षा भारतात पिकणारे स्वस्त आणि आरोग्यकारक आणि प्रीझरवेटिव्ह नसलेलं अन्न कधीही चांगलं.
३) अन्नातील ‘प्राणाचे’ जतन करणे महत्त्वाचे आहे. (पुढील लेखामध्ये सविस्तर बोलूच)
आजच्या लेखाला मी ‘पिकासो’ नाव का दिलं आहे माहितीये? ‘पिकासो’ म्हणजे ‘कला किंवा कलात्मक दृष्टिकोन’. तसे बघितले तर बरेच अर्थ निघू शकतात, पण मी इथे वापरण्यामागे उद्दिष्ट असं की, प्रत्येक गृहिणीला कलात्मक दृष्टी असते, मग ती घरातील फर्निचरची रचना असो किंवा साडय़ामधील निवड, तिथे ‘तिचा’ स्वत:चा ठसा असतो. मग हीच कला आपल्या आहारामध्ये वापरली- विविध अन्नपदार्थाचा उपयोग करून तर पूर्ण कुटुंबाचं आरोग्य अबाधित राहू शकतं यात शंका नाही.
आहारतज्ज्ञ काय खाऊ नका ते सांगतात ना त्यातसुद्धा आवडीचे पदार्थ ‘नको’च्या लिस्टमध्ये असतात (?) म्हणूनच आज अशा पदार्थाविषयी सांगितलं की, जे पोटाला चांगलेच, पण जिभेसाठीसुद्धा चमचमीत. तर मग तुमच्याच ‘ओळखी’च्या शब्दांत सांगायचं झालं तर ‘मस्त खा, स्वस्थ राहा’
अचारी मसाला :
मेथी दाणे- १/४ चमचा
मोहरी- १/४ चमचा
जिरं- १/२ चमचा
बडीशेप- १/२ चमचा
कालोन्जी (कांद्याचे बी): १/२ चमचा
हिंग- चिमूटभर
तेल- १/२ चमचा.
कृती: तेल गरम करा. सर्व जिन्नस घालून फोडणी तयार करा. हिंग घाला.
या फोडणीमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ घालून मिक्सरमधून काढून मसाल्याचा गोळा तयार करा. खाकरा, चपातीबरोबर खायला मज्जा येते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader