हा प्रशिक्षण वर्ग आणि त्याचा अभ्यासक्रम अमेरिकन फेडरल लॉनुसार रजिस्टर केलेला असून त्याचे कादयेकानून अत्यंत कडक आहेत. एव्हिएशन विषयाशी संबंधित अशी काही पुस्तकं त्यासाठी ठरवून दिलेली आहेत. त्यांचा अभ्यास करावा लागतो. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. प्रचंड कठीण आणि मेहनतीला पर्याय नसलेले हे प्रशिक्षण असते. प्रत्यक्ष लायसन्स हातात पडण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांला ४० तास ‘फ्लाइंग’ पूर्ण करावं लागतं तसंच पाच तास स्वतंत्र (एकटय़ाने) विमान चालवावं लागतं आणि तीन तास रात्रीच्या वेळी प्रशिक्षकासह फ्लाइंग करून दाखवावं लागतं. या वेळी प्रशिक्षक अनेक प्रश्न विचारून वैमानिकाच्या ज्ञानाची आणि विमान चालविण्याच्या कौशल्याची परीक्षा घेत असतो. सर्व परीक्षा, प्रात्यक्षिकं पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला विमान चालविण्याचा परवाना मिळू शकतो आणि मगच तुम्हाला खासगी वापराकरिता विमान वापरता येते.
अशा प्रवासासाठी आपल्याजवळ आपले, स्वत:च्या मालकीचे विमान असावे, या हेतूने अनी आणि त्याचे चार मित्र यांनी प्रत्येकी १६ हजार डॉलर खर्च करून हे ८० हजार डॉलर्सचे विमान खरेदी केले. हे विमान पार्क करण्यासाठी ‘विंग्ज एव्हिएशन सेंटर’ या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे प्रशस्त विमानतळ भाडय़ानं घेण्याचं ठरलं. या विमानतळावर अनीच्या विमानासारखी २०-२५ विमानं नेहमीच पार्क केलेली असतात. या विमानाच्या देखभालीचा खर्च म्हणून दर महिना ८० डॉलर्स फी द्यावी लागते. प्रत्येक जण पाच आठवडय़ांतून एकदा विमान वापरू शकतो. त्या वेळी तो फक्त मनमुराद फ्लाइंग करून सराव करू शकतो अथवा एखाद्या जवळपासच्या ठिकाणी विमानाने जाऊन येऊ शकतो. उदा. अनी फिलाडेल्फियाला राहतो आणि त्याची बहीण न्यू जर्सीला. एखाद्या रविवारी तो, हवा चांगली असल्यास, तिला भेटायला गाडी घेऊन न जाता, तिला अक्षरश:‘फ्लाइंग व्हिजिट’ देऊ शकतो. त्याला आपलं विमान मात्र अशाच एका खासगी विमानतळावर पार्क करावं लागतं. अर्थात ‘आपण विमान घेऊन जात आहोत,’ अशी रीतसर नोंद तारीख, वार, वेळ आणि कोठे जात आहोत, केव्हा परतणार या सर्व तपशिलांसह करणे आवश्यक असते.
अशा रीतीने खासगी वापराकरिता विमान नेताना इतरही काही पथ्यं (नियम) पाळावी लागतात. अमेरिकन फेडरल लॉनुसार आकाशमार्गाचे ए, बी, सी, डी आणि जी असे पाच विभाग (झोन्स) पाडलेले आहेत. त्याचे उल्लंघन तुम्हाला करता येत नाही. तसेच आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक विमानतळावर, तुम्हाला तुमचे हे विमान उतरविता येत नाही. कारण त्या विमानांच्या कक्षेत तुम्ही आलात तर त्या प्रचंड विमानांच्या पुढे तुमचे हे खासगी विमान, एखाद्या खेळण्यातल्या विमानाप्रमाणे भरकटून जाईल आणि फार मोठी हानी होईल. ती टाळणं गरजेचं असतं. असो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा