उन्हाळ्यात ताक अतिशय महत्त्वाचे पेय आहे. त्याविषयी माहिती जाणून घेऊ. फक्त उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर ताक घेण्याने नक्कीच फायदा होतो.
ताक दुधाचाच एक पदार्थ आहे. वेगळ्या गुणधर्माच्या आणि अतिशय उपयुक्त. दुधामध्ये विरजण घालून दही बनविले जाते. या दह्य़ामध्ये पाणी घालून घुसळून ताक बनवले जाते. जिरे, धणे, हिंग, पुदिना, कढिपत्ता, कोथिंबीर, सैंधव इत्यादी अनेक पदार्थ त्यामध्ये आवडीनुसार मिसळले जातात.
१०० मिली ताकामध्ये कबरेदके ४-८ ग्रॅम, प्रथिने – ३.३ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ – ०.९ ग्रॅम आणि ऊर्जा ४० कॅलरी एवढी असते. शिवाय कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, ब जीवनसत्त्व इत्यादी अनेक पदार्थ यापासून मिळतात.
फायदे
१) उन्हाळ्यामध्ये पातळ पदार्थ नेहमीच फायद्याचे असतात, पण ताकातून बराच थंडावा शरीरास मिळतो. उष्णतेमुळे शरीरावर होणारे परिणाम आपण टाळू शकतो. विविध प्रकारचे क्षार मिळतात जे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक आहेत.
२) ताकात ऊर्जा खूप कमी प्रमाणात आहे, त्यामुळे प्रमाण जास्त घेतले तरी वजन वाढत नाही. स्थौल्य, हृद्रोगी, ज्यांना खूप जास्त प्रमाणात भूक लागते अशा रुग्णांना अतिशय उपयोगी.
३) शरीराला चांगल्या प्रकारचे प्रोबायोटिक्स मिळतात. प्रोबायोटिक्समुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते. आतडय़ांची हालचाल चांगली राहते व जीवनसत्त्वे चांगल्या प्रकारे शोषली जातात.
४) ताकामधून एमएफजीएम नावाचे द्रव्य भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात घट होते.
५) पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. मंदाग्नी, अपचन, मलबद्धता, पित्ताच्या तक्रारी, गॅसेस कमी होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– डॉ. सारिका सातव

– डॉ. सारिका सातव