उसाचा रस
उन्हाळ्यातील सगळ्यांचे आवडते आणि सर्वात जास्त घेतले जाणारे पेय म्हणजे उसाचा रस. उसाच्या रसात चांगल्या प्रमाणात ऊर्जा आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे मिळतात. उष्णता कमी होते आणि मिळणारी ऊर्जा त्वरित शोषली जाते.
उसाच्या रसामध्ये कबरेदके, लोह, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.
उसाच्या रसामुळे त्वचेच्या तक्रारी दूर होतात. उन्हामुळे आलेला काळवंडलेपणा, सुरकुत्या, त्वचेवर येणाऱ्या तारुण्यपीटिका इत्यादी तक्रारी कमी होतात. त्वचेला तजेला येतो. त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. रसामुळे लवकर ऊर्जा मिळते, थकवा लवकर दूर होतो. कॅल्शियम, फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत राहतात. तसेच दातपण निरोगी राहतात. विविध प्रकारच्या काविळींमध्ये अत्यंत उपयोगी. अरुची, मळमळ, थकवा, अशक्तपणा लवकर दूर होण्यास मदत होते. मलप्रवृत्ती आणि मूत्रप्रवृत्ती साफ होते, त्यामुळे मलबद्धता लघवीच्या तक्रारी कमी होतात. विविध प्रकारच्या कर्करोगांमध्येपण अतिशय उपयुक्त आहे.
उसाचा रस नेहमी ताजा प्यावा, त्यात लिंबू मिसळलेले असल्यास उत्तम, मात्र बर्फ टाकलेला उसाचा रस टाळलेलाच बरा. तसेच गुऱ्हाळाची स्वच्छताही महत्त्वाची बाब आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा