उन्हाळा आणि आंबा यांची जोडी अगदी घट्ट मानली जाते. आंब्याच्या चवीमुळे व त्यातल्या विविध गुणधर्मामुळे त्याला फळांचा राजा अर्थात आजच्या भाषेत सुपर फूड म्हटले जाते.
१०० ग्रॅम आंब्यामध्ये ६० कॅलरीज एवढी ऊर्जा असते तर पोटॅशिअम १६८ मिलीग्रॅम एवढे असते. जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत. रोज आपल्याला लागणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाच्या २१ टक्के आपल्याला एकटय़ा १०० ग्रॅम आंब्यामधून मिळते तर त्यात ‘क’ जीवनसत्त्व ६० टक्के असते.
उपयोग
आंब्यात ‘अ’ जीवनसत्त्व’, ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आतडय़ांचा, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आदी अनेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये आंबा उपयोगी मानला जातो.
आंब्यात लोह, ‘क’ जीवनसत्व, ‘अ’ जीवनसत्व आणि फॉलिक अॅसिड, कॉपर भरपूर प्रमाणात असल्याने रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अॅनेमियावर हा चांगला उपाय आहे.
‘अ’ जीवनसत्व व ‘क’ जीवनसत्व भरपूर असल्याने तसेच व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन इ इत्यादीमुळे जंतुसंसर्गापासून शरीराचे रक्षण होते.
जीवनसत्व ‘अ’ मुळे त्वचेवर स्रवणाऱ्या द्रावाचे नियंत्रण केले जाते. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या कमी होतात तसेच केस व चेहऱ्यावरील स्निग्धांश कायम ठेवला जातो. केसांची वाढ होते. त्वचेचा रंग उजळतो.
उन्हाळ्यातील अरुची, भूक न लागणे यावर आंबा हा उत्तम उपाय आहे.
इी३ं ूं१३ील्ली या द्रव्यांमुळे डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.
मात्र आंबे जपून खावेत. त्याच्या खाण्याच्या पद्धतीवरच त्याचे फायदे अवलंबून असतात.
– डॉ. सारिका सातव