पाणी हा रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक. पावसाळा या ऋतुमध्ये जशी अन्नाची स्वच्छता पाहिजे. तसेच पाण्याचीही हवी. इतर ऋ तुंच्या तुलनेत पावसाळ्यात दूषित पाणी जास्त प्रमाणात आढळते आणि अनेक आजारांना निमंत्रण मिळते. या आजारांपासून लांब राहण्यासाठी पाणी र्निजतुक व स्वच्छ असणे गरजेचे आहे. कावीळ, गॅस्ट्रो इत्यादी आजार या दूषित पाण्यामुळे होतात.
पाण्याच्या दोन प्रकारच्या दुष्टीपासून आपण आपली काळजी घेतली पाहिजे. भौतिकदृष्टय़ा पाणी दुष्ट होते ते म्हणजे कचरा, माती, गाळ इत्यादी आणि जीव-जंतूंनी पाणी दुष्ट होते. हा अतिशय धोकादायक प्रकार. भौतिक दुष्टी आपण पाणी गाळून, तुरटी फिरवून घालवू शकतो, पण जीव-जंतूंच्या दुष्टीमध्ये पाणी उकळून घेणे जास्त सोयीस्कर आहे.
या ऋ तूमध्ये सर्वानीच पाणी उकळून व गाळून घ्यावे. पाणी उकळून मग थंड करून घेतल्यास हरकत नाही. सर्दी, खोकला किंवा इतर श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी ज्यांना वारंवार असतील आणि या ऋ तूमधील हवामानामुळे त्या वाढत असतील तर पाणी सूंठ घालून उकळावे.
ज्यांना जुलाब, उलटय़ा इत्यादी त्रास वारंवार होतो. त्यांनी त्या वेळी मीठ व साखर घालून घातलेले पाणी प्यावे. स्वयंपाकासाठी पण उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा