नीलिमा कीराणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनेकांना भूतकाळातील दु:ख, संघर्ष, कष्ट याचं भांडवल करत जगायची सवय झालेली असते. त्यामुळे वर्तमानात परिस्थिती बदलली, तरी भूतकाळाचं ओझं उतरवायची त्यांची तयारी नसते. साहजिकच त्याच्या काळ्या सावल्या त्यांच्या रोजच्या जगण्यावर पडत राहातात…त्या दु:खाचा हात सोडता आला तर?
‘‘मावशी, मी उद्या संध्याकाळी परत येतेय, तुम्ही आणखी खूप दिवस राहाणार आहात.’’ या श्वेताच्या प्रेमळ आग्रहावर मीना मावशीने, ‘‘हो गं, राहायलाच आलेय. तू लवकर ये.’’ म्हणत निरोप दिला. सूनबाई श्वेता आणि बाळाला घेऊन त्याच्या मामाची गाडी फाटकाबाहेर पडली तशी ताई, सागर आणि मावशी घराकडे वळले.
तिच्या ताईचं घर तिच्या लहानपणापासून मीनाचं दुसरं घर होतं. दाजी आणि सागरचीही ती लाडकी होती. सागर अकरावीत असताना दाजींना अर्धांगाचा झटका आला, तेव्हापासूनच सागरवर वडिलांसह घराची जबाबदारी पडली. ताईचा दिवस दाजींच्या सेवेतच जायचा. कॉलेजच्या कॅम्पसमधून चांगली नोकरी मिळाल्यानंतर घरची परिस्थिती जरा सुधारली.
त्यानंतर सागरला कंपनीतर्फे वर्षभरासाठी परदेशी जाण्याची संधी मिळाली होती. ताई ‘जा’ म्हणाल्यावर त्याने दाजींसाठी मदतनीस वगैरे व्यवस्था केली. मात्र वेळ आल्यावर, विकलांग वडिलांना एकट्या आईवर सोडून तो निघू शकला नाही. जाणं रद्द केलेल्या रात्री आपल्या नशिबावर चिडचिड करत, आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडणाऱ्या सागरला थोपटत राहिलेली ताई मीनाने पाहिली होती. तिच्या अशक्त, पांढरट, अकाली वृद्ध चेहऱ्यावरचे परिस्थितीचे चटके तेव्हा मीनाला जास्तच जाणवले. या मायलेकरांनी सोसलेल्या दु:खांनीच त्यांच्या नात्याचे बंध घट्ट झालेत असं तिला वाटलं.
आणखी वाचा- जिंकावे नि जगावेही : त्रिसूत्री!
पुढे सागरचं लग्न ठरवताना दाजींच्या परिस्थितीमुळे स्थळांकडून नकारच यायचे. श्वेताला सागर आवडल्यावर तिने आग्रहाने घरच्यांचं मन वळवलं होतं. मोकळ्या मनाची, हसरी, चटपटीत श्वेता ताई-दाजींची लाडकी झाली. तिनंही हे घर मनापासून आपलंसं केलं. सागरला तर तिच्याशिवाय सुचतच नव्हतं. लवकरच नव्या पाहुण्याची चाहूलही लागली. मात्र आजोबा होण्यापूर्वीच दाजींनी या जगाचा निरोप घेतला.
त्यानंतर मावशी पहिल्यांदाच निवांतपणे ताईकडे आली होती. बाळाच्या असण्याचं चैतन्य अनुभवतानाच मावशीचं मन इतर बदलही नोंदवत होतं. आता अधिकारपदावर गेलेल्या सागरच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. दाजींनंतर एकदम रिकाम्या झालेल्या वेळात ताईला मोबाइलचं जणू व्यसन लागलं होतं. श्वेताला स्वयंपाक, आवराआवरी आणि बाळ यातून उसंत नव्हती. तिचा स्वच्छतेवरचा कटाक्ष बाळामुळे जास्तच वाढला होता. शिवाय एका कंपनीचं सोशल मीडिया मॅनेजमेंटचं ऑनलाइन काम करून तिनं बाहेरच्या जगाशी संपर्क टिकवला होता. प्रत्येकावर आपापला ताण होता.
मीनामावशीला कालची दुपार आठवली. ती आणि श्वेता स्वयंपाक करत होत्या, ताई नेहमीप्रमाणे मोबाइलमध्ये गुंग. तेवढ्यात बाळ दिसेना म्हणून श्वेता शोधायला गेली, तर साहेब आजीच्या खोलीतल्या पायपुसण्याच्या दशा चोखण्यात मग्न होते. ‘आई, हे घाणेरडं, फाटकं पायपुसणं तुम्ही पुन्हापुन: घरात कशाला आणता हो? स्वच्छतेपेक्षा काटकसर मोठी का?’ असं त्रासिकपणे म्हणत तिने पायपुसणं खसकन ओढल्याबरोबर बाळाने भोंगा पसरला, ताईचं तोंड उतरलं, त्याच वेळी कुकरची शिट्टी वाजली आणि कढईतली भाजी करपल्याचाही वास आला. ऑनलाइन मीटिंगमध्ये बसलेला सागर खोलीतून ताडकन बाहेर आला. ‘आईवर का ओरडते आहेस?’ म्हणत श्वेतावर खेकसून आई-श्वेता कुणाचंच बोलणं न ऐकता आत निघून गेला. श्वेताने बाळाला शांत केलं, ताईने दुसरी भाजी टाकली. जेवताना हवा तंगच राहिली होती.
आणखी वाचा- मनातलं कागदावर : शेवटचे घरटे माझे…
‘‘मावशी, हल्ली हे काय होतंय हो? बाबा आजारी असतानासुद्धा गोडीत असायचं सगळं. हल्ली ‘आई’ हा सागरचा वीक पॉइंट झालाय. आईंशी माझं कधी वाजलं तरी स्वच्छता आणि अति काटकसर एवढीच कारणं असतात. नंतर मी सॉरी म्हणते; त्याही समजून घेतात, राग धरत नाहीत, त्याच्याकडे तक्रारही क्वचित करतात. पण आईंचा चेहरा उतरलेला दिसला की सागर भडकतो. काय झालंय तेही न ऐकता दोनदोन दिवस अबोला नेहमीचा झालाय. त्यामुळे हल्ली माझीही चिडचिड वाढलीय, पण काय करू? आईंच्यानं कामं उरकत नाहीत, बाळाला उचललं तरी दमतात. मला मदतीला येतात, पण त्यांच्या सांडलवंडीनं माझंच काम वाढतं. इतकं करून नवरा रोज रुसलेला… सहन होत नाही कधीकधी.’’ मीनामावशीनं श्वेताच्या खांद्यावर हलकेच थोपटलं.
‘‘मावशी, उद्या माझ्या वहिनीच्या डोहाळजेवणाला जायचंय, तर सागरचा कालपासून अबोला. दादा न्यायला-सोडायला येईलच, पण सागरला कायमच वेळ नसतो हे माहेरच्यांना कधीतरी खटकणारच ना? आमची निरर्थक भांडणं अशी लांबल्यावर कधीकधी वाटतं, यासाठी मी इथे आले का? सागरशी हट्टानं लग्न करून चूक केली का?’’ श्वेताच्या प्रश्नांवर मावशी काहीच बोलली नव्हती.
श्वेता माहेर गेल्यानंतर निवांतपणे तिघांच्या गप्पा सुरू झाल्या. कालचा विषय साहजिकच निघाला. ताई उदासपणे म्हणाली, ‘‘माझं सगळं आयुष्य ‘असं’ गेलं, आता निदान मुलांची तरी भांडणं होऊ नयेत एवढीच इच्छा आहे.’’ आईचा केविलवाणा चेहरा आणि हताश आवाजाने सागर बेचैन झाला, ‘‘श्वेता किती ओरडते आईवर? आई इतकी गरीब आहे, भांडूही शकत नाही. कधीकधी वाटतं आई, आपण दोघंच बरे होतो का गं? आपल्या नशिबात सुख नाहीच का?’’
‘‘असं म्हणतोस? मग तुझ्याशी लग्नाचा निर्णय चुकला का? असा प्रश्न श्वेतालाही कालच्या भांडणानंतर पडू शकतो?’’ मावशीच्या अनपेक्षितपणे प्रश्नाने सागर गांगरला.
‘‘ काहीतरी काय बोलताय? श्वेता गुणी मुलगी आहे. मात्र बाळाला घेऊन माहेरून आल्यापासून इतकी चिडचिड का करायला लागली? हा प्रश्न पडतो.’’ ताई म्हणाली तशी मीनाला बोलायला जागा सापडली.
‘‘माझा प्रश्न वेगळा आहे ताई. तुम्ही दोघंही भूतकाळाचं ओझं कधी बाजूला काढून ठेवणार आहात? निदान तेव्हाचं दु:ख मधेमध्ये आणायचं नाही, याबद्दल जागरूक राहाल?’’
‘‘म्हणजे?’’ दोघं एकदमच म्हणाले.
‘‘ताई, तू म्हणालीस, ‘माझं आयुष्य ‘असं’ गेलं, आता निदान मुलांची तरी भांडणं नकोत.’ तुमचा भूतकाळ दु:ख सोसण्यात गेला हे खरं आणि मुलांची भांडणं नकोत हेही खरंच. पण स्वतंत्रपणे खरी असणारी ही दोन वाक्यं जेव्हा तुझ्याकडून उदास आवाजात ‘आता निदान’ ने जोडून येतात, तेव्हा जुन्या आठवणी जाग्या होऊन सागरही हळवा होतो. ‘अशा’ गेलेल्या बारा वर्षांतल्या शेकडो क्षणांचं ओझं ‘मुलांची भांडणं नकोत’ वर येऊन पडतं. आपल्यामुळे आई ‘अजूनही’ दु:खी पाहून सागरला अपराधी वाटतं, तो राग निघतो त्याच्या हक्काच्या बायकोवर. भूतकाळातल्या तीव्र दु:खाशी ही जोडाजोडी दोघांकडूनही नकळत पुन्हापुन्हा घडते. ही वाक्यं उलटी करून जोडलीस, तर गडबड लक्षात येईल. म्हणजे ताई, तुझं आयुष्य जर सुखाचं गेलेलं असतं, तर मुलांची भांडणं झालेली चालली असती का? नाही ना? म्हणून अशा वाक्यांना जाणीवपूर्वक स्वतंत्रच ठेवायला हवं.’’
‘‘पटतंय तुझं म्हणणं मावशी. पण तरी श्वेता आईशी वरच्या पट्टीत बोलूच कशी शकते? आईच्या आयुष्यात आता तरी सुख नको का?’’
आणखी वाचा- सांदीत सापडलेले.. ! भावना पालकत्वाची!
‘‘बघ, जोडलंस परत सुखाला ‘आता तरी’शी? ताईचे कष्ट श्वेता आल्यामुळेच संपलेत हे विसरलास का? घरातलं, नाहीतर बाळाचं करत ती अखंड कामातच असते. खेळणाऱ्या बाळाला सगळेच घेतात, पण रडणाऱ्या बाळाची, त्याच्या शी-शूची, जाग्रणांची जबाबदारी आली की लगेच ‘श्वेता’ ही हाक ऐकतेय मी. तरीही तिनं कंटाळायचं, त्रासायचं नाही, कारण तुझ्या आईनं केवढं दु:ख झेललंय. मग ‘आईवर ओरडू नकोस’ हे श्वेताला तू तिच्याहून वरच्या पट्टीत सांगितलंस, तरी चालतं.’’
‘‘असं म्हणतेस?’’ सागर चमकलाच.
‘‘हो. कुणीही कुणावरही आवाज चढवणं अयोग्यच आहे, पण त्यानंतर तिनं ताईला ‘सॉरी’ म्हटलेलं तुला माहीत नसतं. यावेळी मला सतत ताईच्या कुटुंबातला ‘कर्ता’ पुरुषच दिसतोय सागर. प्रेमाने श्वेता-श्वेता करत मदत करणारा, पूर्वीचा समजूतदार नवरा कुठे गेला? आईसाठी इतकं प्रोटेक्टिव्ह व्हायचं, की ती काय सांगतेय तेही ऐकायचं नाही? तुला जे वाटलंय तेच खरं? श्वेताच्या स्वच्छतेच्या अतिरेकामागे तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी आहे, इतकी साधी गोष्टही तुला समजेना?’’ मीनाकडे डेटा आणि प्रश्न भरपूरच होते. पण त्यामुळे, घरातल्या चिडचिडीचं कारण दोघांनाही उमगत चाललं होतं.
‘‘तुमच्या भूतकाळातल्या दु:खाला श्वेता जबाबदार आहे का रे? माहेरी लाडाकोडात वाढलेली ती मुलगी भरभरून आनंद घेऊन तुमच्याकडे आलीय, पण तुम्ही मात्र तुमच्या दु:खाचा हात सोडायलाच तयार नाही आणि वर जबाबदारीही तिच्यावरच टाकताय, हे लक्षात येतंय का?’’ मावशीनं विचारलं.
‘‘हो, मावशी, किती झापशील? ‘आमच्या नशिबात सुख नाहीच का?’चं माझं किरकिरं चक्र थांबलंय आता.’’ सागर वरमून म्हणाला.
‘‘मग ते श्वेताला कृतीतून दिसायला पाहिजे, काय?’’ मावशीनं दम दिलाच.
‘‘होय दुर्गामाते, मी उद्या श्वेताला आणायला जातो.’’ सागर हात जोडत हसत म्हणाला.
काय घडत होतं ते उलगडल्यामुळे ताईही समाधानाने हसली.
neelima.kirane1@gmail.com