‘‘ अस्वस्थ, नकोशा भिडस्तपणाच्या प्रसंगाला टाळण्याऐवजी त्याच्याकडे नीट पाहायचं. ‘चांगला माणूस दिसायचं’ म्हणजे अमुकच प्रकारे वागायचं अशी स्वत:च्याच मनाची सक्ती होतेय,  हे समजून घ्यायचं. प्रत्येक प्रसंगात स्वत:वर पहारा करण्याची गरज नाही, पण अटीतटीच्या वेळी स्वत:ची सेल्फ स्टेटमेंट्स तपासायची. ‘मला काय हवंय?’ कौतुकाचे फुसके शब्द, की माझ्या प्रामाणिक मतांचा सन्मान?  भिडस्थपणा टाळण्याचा हा एक उपाय आहे.’’

‘‘यापुढे संदीपचा भिडस्त स्वभाव असाच राहिला ना, तर आमचं जमणं अशक्य आहे. माझी सहनशक्ती संपलीय. लग्नाला बारा र्वष झाली, घरच्यांच्या बाबतीत तर कधी काही बोलणार नाहीच, पण क्लाएंट्सबाबतही तेच. आता जर तू स्वत:ला बदललं नाहीस, तर माहेरी निघून जाईन, अशी धमकी दिलीय मी. म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय’’ आल्या आल्या शुभानं तडतड केली.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Supriya Sule criticizes Mahayuti over Uddhav Thackeray bag checking case Pune news
उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

‘‘बापरे, म्हणजे माझ्यावर मोठीच जबाबदारी.’’ मानसी हसून म्हणाली.

‘‘बघ ना, बायकोनं असा रुद्रावतार धारण केल्यावर माझ्यासारखा भिडस्त माणूस काय करणार? आलो बिचारा.’’ संदीपनं ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

‘‘वर माझीच टिंगल कर. स्वत:चा स्वभाव बदलायचं नाव नाही. तुझ्या कामात तू कितीही ग्रेट असलास, तरी तुझा भिडस्तपणा चुकीचाच आहे.’’

‘‘चूक-बरोबर सापेक्ष असतं गं, बदलण्याची गरज त्याला वाटली पाहिजे शुभा.’’

‘‘ हे बघ, मी पहिल्यापासून असाच भिडस्त आहे. खूप गरिबीच्या परिस्थितीतून वर आलोय. खूप जणांचे उपकार घ्यावे लागलेत. हिच्यासारखं तडकफडक बोलून माणसांना दुखावणं मला जमत नाही आणि पटतही नाही.’’

‘‘याच्या याच गुळमुळीतपणाचा सगळे फायदा घेतात. स्पष्ट ‘नाही’ म्हणायचं नाही. घरात, बाहेर, सगळ्या जगानं याला गृहीत धरायचं आणि यानं फक्त बायकोला. क्लाएंट्स गोड बोलून याच्याकडून कामं करून घेतात, नंतर गायब. काही लोक तर पुढच्या र्अजट कामाच्या वेळीच तोंड दाखवतात. आधीच्या बिलातले थोडे पैसे देतात. तरी हा भिडस्त माणूस रात्रीचा दिवस करून डेडलाइन पाळतच राहतो, वर्षांनुर्वष..’’

‘‘शब्द दिल्यावर तो जबाबदारीनं पाळायला नको? आणि उशिरा काम दिल्यामुळे पैसे अडवले तर?’’

‘‘काहीही केलं तरी तेच होतंय हे का मान्य करत नाहीस तू? वेळेवर पेमेंट करण्याची त्यांचीही जबाबदारी नाही का? या आठवडय़ात मुलांची फी द्यावीच लागणार आहे मानसी, मी मोठय़ा थकबाकीदारांची यादी करून दिली, पण हा फॉलोअप करतच नाही. आज अगदी भरवशाचे एक जण पैसे न देता फक्त अडचणींचा पाढा ऐकवून गेले. तरी हा गप्पच. आम्हाला नाहीत अडचणी? म्हणून एवढं डोकं सरकलं माझं.’’

‘‘तुमच्यातले संबंध इतके अटीतटीला येण्यापेक्षा थोडं मोकळेपणानं बोलून स्पष्टता घेऊ  या संदीप? घर चालवण्याची तुझी जबाबदारीपण तेवढीच महत्त्वाची नाही का?’’

‘‘ते कळतंय, म्हणून तर हल्ली बदलतोय ना मी स्वत:ला. नवीन कस्टमरकडे निर्लज्जपणे अ‍ॅडव्हान्स मागतो मी हल्ली.’’

‘‘अ‍ॅडव्हान्स ही व्यवहाराची गरज आहे, दोन्ही बाजूंसाठी बांधिलकी आहे संदीप. अ‍ॅडव्हान्स मागणं हा निर्लज्जपणा वाटणं, इथेच गडबड आहे. लाज कुणाला वाटायला हवी? महिनोन्महिने पैसे न देणाऱ्याला, की पदरमोड करून त्याचं काम करणाऱ्याला?’’

‘‘आपले पैसे अडकले असताना असं वागता येत नाही गं. लोक दुखावतील, संबंध बिघडतील अशी भीती वाटते. शिवाय माझ्याहीकडून बिलं करण्याचा आळसच होतो.’’

‘‘ही सबब फुसकी आहे. काम मनासारखं आणि वेळेवर गेलं, क्लाएंटनं कौतुक केलं, की हा स्वत:वर खूश होणार. त्या वेळी लगेच बिल मागणं अवघड जाणार. मग ‘मी क्रिएटिव्ह माणूस आहे, आर्थिक गोष्टी मला जमत नाहीत,’ असं काही तरी म्हणून बिल करणं पुढे ढकलणार.’’ शुभा वैतागून म्हणाली.

‘‘हो, घडतं असं.’’

‘‘मी ‘क्रिएटिव्ह माणूस’ अशासारखी कुठली सेल्फ स्टेटमेंट्स तुझ्या भिडस्तपणाच्या मागे आहेत ते शोधू या. जेव्हा तू बोलतच नाहीस किंवा बोलायचंय त्यापेक्षा वेगळंच बोलतोस. तेव्हा तुला काय वाटलेलं असतं?’’

‘‘क्लाएंट कौतुक करत असताना किंवा ते स्वत:च कामाच्या घाईत असताना मी पैसे मागितले तर त्यांना कसं वाटेल? पैसे देतील नंतर, पण मागणं आपल्याला शोभत नाही असं वाटतं.’’

‘‘त्यामुळे त्यांना जे बोललेलं बरोबर वाटेल असं तुला वाटतं, ते तू त्या वेळी बोलतोस. आणखी?’’

‘‘आई-बाबांनी आयुष्यभर आपल्यासाठी मरमर केलीय.. नातलगांनी एके काळी मदत केलीय. त्यांना दुखावणं जिवावर येतं..’’ बोलताबोलता एकदम थांबून संदीप म्हणाला, ‘‘खरं सांगू का मानसी, हे असं पोस्टमार्टेम मला नाही आवडत. खूप अस्वस्थता येते. यावर बोलावंसंही वाटत नाही.’’

‘‘कारण भिडस्तपणा सोडण्याची आपल्याला गरज असली, तरी ते अशक्य आहे, आपण आयुष्यभर भिडस्तपणात अडकलेलेच राहणार आहोत हे तू स्वत:पाशी कायमचं मान्य करून टाकलंयस. स्वत:तल्या त्या नावडत्या गोष्टीबद्दल अस्वस्थ होऊन तू जिथे संवाद आणि विचारही थांबतोयस, तिथेच खरं तर त्या कुलपाची किल्ली आहे हे ओळखून ‘मी असाच आहे’वाल्या नेहमीच्या सबबी थांबवल्यास आणि स्वत:ला सामोरा गेलास तरच यातून सुटू शकशील, नाही तर आणखी वीस वर्षांनीही परिस्थिती अशीच असेल.’’

‘‘अगं, तुझ्याशी संदीप बोलतोय तरी. मी हा विषय काढायचा अवकाश, अतिशय चिडतो. भांडणंच होतात.’’ शुभाला राहवलं नाही.

‘‘कारण लोक तुझा गैरफायदा घेतायत हे तुला कळत असतं, स्वत:च्या या मर्यादेचा राग येत असतो; पण लक्षात घे, स्वत:ला गृहीत धरलं जाण्यावरचा राग तू शुभावर काढतोस तेव्हा अजाणता तू तिला, तिच्या सहनशक्तीला, पर्यायाने तुमच्या नात्याला गृहीत धरत असतोस. हळूहळू तुमच्या नात्यात निराशा, कोरडेपणा येऊ  शकतो संदीप. शोध जरा, आणखी काय अडवतं तुला?’’

‘‘अंऽ, लोक काय म्हणतील? संदीप बदलला, व्यवहारी झाला, पैशात सगळं मोजायला लागला..’’

‘‘म्हणजे, ‘पैशापेक्षा संबंध महत्त्वाचे’ हा सुविचार तुझ्यावर राज्य करतोय का? की ‘संदीप शब्दाला पक्का, त्याच्या कामाचा दर्जा पैशावर अवलंबून नसतो’ हे कौतुक?’’

‘‘…’’

‘‘आपण लहानपणापासून, परिस्थितीतून जे ऐकत, पाहात, शिकत आलेलो असतो ना, त्यातली काही मतं आपलीशी करून आपण त्यात स्वत:ची ओळख शोधतो. पूर्वीच्या गरिबीच्या काळात तू स्वत:ला खूप लहान समजत असणार. भरपूर कष्ट आणि अदबशीर वागणं एवढंच भांडवल तुझ्याकडे होतं, त्या वेळी ‘संदीप खूप प्रामाणिक, कामात तडजोड नाही’ असं लोकांनी कौतुक करण्यामध्ये नकळत तुला तुझी ओळख, सेल्फ इमेज सापडली. ती हातून सुटली तर आयुष्यातला अर्थच संपला अशा भीतीचा वेढा हळूहळू पडला. अशा भीतीमुळे तुम्ही त्या चांगुलपणाने वागण्याचे गुलाम बनता. त्रास झाला तरीही वेगळं वागण्याची शक्यता स्वत:च संपवून टाकता. भिडस्तपणा इतका मुरतो, की इच्छा असूनही रोखठोक वागता-बोलता येत नाही, शब्दच  सुचत नाहीत.’’

‘‘अगदी असंच घडतं. तरीही शुभासारखं फटकळ, उद्धट पद्धतीनं बोलायला मला कधीच आवडणार नाही.’’

‘‘तुझ्यासारखं गुळमुळीत आणि तिच्यासारखं फटकळ बोलणं हेच दोन पर्याय तुझ्या सवयीचे आहेत; पण याच्या मधलेही अनेक पर्याय असू शकतात. मनातलं वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करण्याची सवयच नाहीये म्हणून शब्द सापडत नाहीत. यावर थोडा स्वत:चा विचार दिलास, चांगला संवाद जमणाऱ्या तुझ्या मित्र-मैत्रिणी, व्यावसायिकांचं निरीक्षण केलंस, तरी जमेल. जेव्हा जे बोलण्याची गरज असेल, तेच बोलेन, असा मनापासून निर्धार करशील तेव्हाच नवी पद्धत सुचेल. तिचे चांगले परिणाम दिसल्यावर ती सवय अंगवळणी पडेल. हळूहळू तुला पटणारी तुझी स्वत:ची संवादाची स्टाईल सापडत जाईल.’’

‘‘म्हणजे नेमकं करायचं काय?’’

‘‘त्या अस्वस्थ, नकोशा भिडस्तपणाच्या प्रसंगाला टाळण्याऐवजी त्याच्याकडे नीट पाहायचं. ‘चांगला माणूस दिसायचं’ म्हणजे अमुकच प्रकारे वागायचं अशी स्वत:च्याच मनाची सक्ती होतेय, वेगळं वागण्याचं स्वातंत्र्य संपतंय हे समजून घ्यायचं. प्रत्येक प्रसंगात स्वत:वर पहारा करण्याची गरज नाही, पण किमान अटीतटीच्या वेळी स्वत:ची सेल्फ स्टेटमेंट्स तपासायची. ‘मला काय हवंय?’ फक्त कौतुकाचे फुसके शब्द, की माझ्या प्रामाणिक मतांचा सन्मान? केलेल्या कामाचा सन्मानानं मोबदला? संबंध टिकवण्याची जबाबदारी माझी एकटय़ाची कशी? शुभाला मी दर वेळी गृहीत कसं धरू शकतो? असे प्रश्न स्वत:ला विचारायचे. त्यांची प्रामाणिक उत्तरं तुला रस्ता दाखवतील.’’

‘‘पटतंय तुझं, पण जमेल मला?’’

‘‘स्वत:ची सेल्फ स्टेटमेंट्स तपासणं, त्यात दुरुस्त्या करणं आणि बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींच्या सरावासाठी तू माझ्याकडे येऊ  शकतोस.’’ मानसीने हसतहसत कोपरखळी मारली.

neelima.kirane1@gmail.com