अस्मिता देशपांडे

सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे हे माझे नाते.. हे गाणं म्हणत म्हणतच मी सुमंतरावांची धर्मपत्नी, निलंगेकर देशपांडे यांच्या घराण्याची सून, अस्मिता सुमंत देशपांडे झाले. ‘सप्तपदीनंतर’च्या आमच्या सहजीवनाचा आढावा घेताना लक्षात आलं, की आपलंही नातं कितीतरी चढउतारातून गेलं आहे.

Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

कित्येक सुख-दु:खाचे प्रसंग सोबतीनं अनुभवले.. प्रसंगी कित्येकदा कडकडून भांडणं केली, अबोला, रुसवा, पुन्हा गोडीगुलाबीनं एकत्र येणं.. कित्येकदा घेतलेला निर्णय चुकीचा ठरतोय असं वाटत असताना एकमेकांवर दाखवलेला प्रबळ विश्वास.. मला वाटतं, या सगळय़ा गोष्टी

आमचं सहजीवन खऱ्या अर्थानं फुलण्यास कारणीभूत होत्या..लग्नानंतर वर्षभरात मुलीचा जन्म झाला. मुलगी, समृद्धी एक वर्षांची झाली आणि मला इंजिनीअिरग कॉलेजमध्ये नोकरीची संधी मिळाली. त्या वेळी लहान मुलीचं संगोपन आणि चालून आलेली संधी यातला एक पर्याय निवडणं ही फार अवघड निर्णयाची वेळ होती. ठाण्यात चांगल्या आणि घराच्या अगदी जवळ असलेल्या कॉलेजमधली नोकरीची आलेली संधी न घालवता आम्ही लेकीला पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घेतला. लेकीला पाळणाघरात सोडून कॉलेजला जाताना मात्र खूप वाईट वाटायचं, की आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर? तेव्हा सुमंत एका मोठय़ा फार्मा कंपनीत व्यवस्थापक होते. त्यांचा ठाणे ते पनवेल हा रोजचा प्रवास. सकाळी आठला घर सोडलं की रात्री दहा वाजता भेट होणार, अशी आमची दैनंदिनी. पण यांनी मला आश्वस्त केलं आणि माझी नोकरी सुरू झाली.

तेव्हा एकमेकांना देण्यासाठी पुरेसा वेळच नसायचा, पण दोघांनी मनाशी एक गोष्ट ठरवली होती, की ठाण्यात स्वत:चं घर घेणं आणि त्यासाठी आर्थिक तजवीज करणं ही सध्या आपली ‘टॉप प्रायॉरिटी’ आहे. त्यामुळे जेवढा वेळ एकत्रित मिळेल तो आनंदात घालवायचा, हे सूत्र गाठीशी बांधलं आणि तसेच आयुष्याला सामोरे गेलो..

निभावलं सगळं आणि दोघांच्या नोकरीच्या जोरावर ठाण्याला पहिलं घरही झालं.. काहीतरी कमावण्याचा मोठ्ठा आनंद होता तो.. सहजीवनातील पहिला मैलाचा दगडच!

मग मुलाचा जन्म, मुलांची शिक्षणं, नोकरी, यात एकमेकांना आधार देत, प्रसंगी एकमेकांची ढाल होत सहजीवन बहरत गेलं. नोकरीत थोडी स्थिरावले होते, तेव्हा पुढचं शिक्षण घेण्यासाठी सुमंतनी मला प्रोत्साहन दिलं. एवढंच नव्हे, तर दोघांनीही एकाच वेळी ‘मास्टर्स ऑफ इंजिनीअिरग’साठी प्रवेश घेतला आणि विशेष श्रेणीत दोघांनीही ‘मास्टर्स’ पूर्ण केलं. या संपूर्ण दोन वर्षांत माझी आई, बाबा आणि सासूबाई यांनी वेळोवेळी घरी राहून मला खूप मदत केली. पुढील शिक्षण घेतल्यामुळे बढती मिळत गेली आणि मिळकतही वाढली. त्यामुळे पुढचा टप्पा गाठला. ठाण्यात मोठं, प्रशस्त, मनासारखं घरही घेतलं. सगळं काही सुरळीत चालू असताना आणखी एक मोठा बदल आयुष्यात आला.

वडिलांच्या सततच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे म्हणा किंवा महानगरात असलेल्या सतत धावपळीच्या, गर्दीच्या निरस, रटाळ जगण्याचा कंटाळा आला, म्हणून अस्सल मातीची ओढ असणारे माझे पती सुमंत यांनी लातूरला येण्याचा निर्णय घेतला. त्यांची लठ्ठ पगाराची नोकरी, मनापासून सजवलेलं सुंदर घर सोडून लातूरला येण्याचा निर्णय नक्कीच सोपा नव्हता.

इथे आल्यानंतर पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करायचं होतं. पुन्हा नवीन आव्हानं. त्यात दोघांना नोकरी मिळाली, पण माझ्या मुलाची तब्येत थोडी नाजूक असल्यानं आणि त्याच दरम्यान सासऱ्यांची तब्येत ठीक नसल्यानं नोकरी न करता मी घरी राहून घरची जबाबदारी सांभाळावी, असा निर्णय आम्ही  घेतला. सासरे काही वर्षांनी वारले, पण समाधान या गोष्टीचं वाटतं, की त्यांच्या शेवटच्या दिवसांत आम्ही सतत सोबत होतो त्यांच्या.

त्यानंतर काही महिन्यांत मला ‘सिव्हिअर ह्रूमाटोईड आर्थरायटिस’चं निदान झाले. हा विकार एवढा बळावला, की हाताची बोटं आणि पायाचे सांधे आखडलेले असल्यानं हालचाल करणं अशक्य झाले. एवढी वर्ष इतक्या साऱ्या धावपळीनंतर हे आयुष्यात अचानक आलेलं संथपण खूप निराशा घेऊन आलं. या नाजूक क्षणांत माझ्या पतीनं खंबीर साथ दिली. नाजूक झालेली माझी मनोवस्था समजून घेऊन वेळोवेळी आश्वस्त केलं. हरेक उपचार केला मला या आजारातून बरं करण्यासाठी. ‘तू काहीतरी करत राहा, म्हणजे रिकामं वाटणार नाही,’ असं म्हणत त्यांनीच वाट दाखवली. मग मी ‘फ्रीलान्सर’ म्हणून काम करायला सुरुवात केली.  इंग्लिश-मराठी अनुवादक म्हणून बऱ्याच प्रोजेक्टस्वर काम केलं. मुलांसोबत घरी असण्याचा आनंद, अर्थार्जन आणि काम केल्याचा आनंद, या सर्वच गोष्टींचा आनंद मिळाला यात. याच दरम्यान सुमंत यांनी ‘पीएच.डी.’ मिळवली आणि मलाही प्रोत्साहन दिलं.

याच काळात सुमंत यांनी इंजिनीअिरग कॉलेजमधली बेभरवशाची नोकरी सोडून क्लासेस चालू करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा एक अवघड वळण. हाताशी असलेली मिळकत क्लासेसच्या उभारणीसाठी कामी आली. अत्यंत देखणं इंटिरियर असलेला, अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असा डिजिटल क्लास सुरू केला. विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसादही येऊ लागला, तोच करोनाचं ग्रहण लागलं. हाताशी आलेला घास हातातच राहिला. शिक्षण घेण्यासाठी लातूरला आलेले विद्यार्थी आपापल्या गावी परतले. त्यामुळे त्या काळात क्लास चालवणं म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं होतं. शेवटी मनावर दगड ठेवून हा क्लास बंद करावा लागला. मग ऑनलाइन क्लासेस चालू केले. पोर्टल बनवलं, ते यशस्वी ठरलं. आयुष्याला अशी ग्रहणं लागत गेली, पण एकमेकांच्या साथीनं सर्व अडचणींतून विचारपूर्वक मार्ग काढत गेलो.

सहजीवनाच्या या मार्गात आम्ही दोघांनी ठरवलं होतं, की जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा चर्चा दोघांनी मिळून करायची. दोघांनी त्या निर्णयाच्या सकारात्मक तसंच नकारात्मक बाजूचा ऊहापोह करायचा, पण एकदा अंतिम निर्णय घेतला, की मग तो ताकदीनं पूर्ण करायचा.. बरेच प्रसंग असे आले, की सपशेल अपयश आलं, भरपूर आर्थिक नुकसान झालं, पण याच कठीण प्रसंगांत आमची एकमेकांवरची निष्ठा अढळ झाली. आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात. कधी असतं प्रखर ऊन तर कधी मिळते उबदार सावली, पण या काळात एकमेकांवर चिखलफेक करून चालत नाही. तुझ्यामुळे अमुक घडलं किंवा माझ्यामुळे अमुक झालं, या चर्चेला फार हवा न देता कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा यावर विचार करणं त्या वेळी आवश्यक असतं, तेच आम्ही केलं. हेच प्रसंग सहजीवनाला बळकटी देत असतात.

सोन्याला जसे झळाळी मिळण्यासाठी अग्नीमध्ये तप्त होऊन बाहेर पडावं लागतं, त्याचप्रमाणे अपमानाचं, अपयशाचं, कठीण परिस्थितीचं, आर्थिक, मानसिक संकटाचे प्रसंग दोघांचं नातं अधिक परिपक्व करतात.. कधीतरी अचानकच जोडीदाराची आतापर्यंत न उमगलेली बाजू समोर येते आणि पुन्हा आपण त्यांच्या/ तिच्या प्रेमात पडतो..

हेच तर असतं सहजीवन.. आमच्यासारखं!

asdeshpande18@gmail.com

Story img Loader