प्रत्येक ऐतिहासिक वास्तू अनेक आठवणी घेऊन उभी असत़े या भग्नावस्थेतील वास्तूंना आपले मन मोकळे करायचे असत़े ऐन भराच्या काळातील आठवणींचे संचित कोणाला तरी सांगायचे असते, शिल्पा परब-प्रधानसारख्या काही इतिहासप्रेमींना ती भाषा कळते, आवडते आणि ती इतरांनाही कळावी, म्हणून कष्ट घेण्याची त्यांची तयारीही असत़े इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या शिल्पा यांच्या या धडपडीविषयी ..
सह्य़ाद्रीच्या रांगांतून रायगडाकडे उतरायला सर्वात जवळची वाट म्हणजे कावले- बावले खिंडीची.़ शिवकालात इथे रायगडाच्या रक्षणासाठी चौकी तयार करून जवळच्या सांदोशी गावातील जीवा सख्रेल या उमद्या तरुणाला चौकीचा नाईक करण्यात आलं होतं.़ नाईक आणि त्याच्यासोबत नऊ सैनिक अशी दहा जणांची ही चौकी होती़ शिवरायांच्या निधनानंतर संपूर्ण दख्खन गिळण्याच्या मनसुब्याने स्वत: औरंगजेब दख्खनेत उतरला, तेव्हा त्याच्या रेटय़ापुढे मराठय़ांच्या राजधानीचा गड लढवणंही आव्हानाचं होतं. शिवरायांनंतर या चौकीकडे दुर्लक्ष झाले असेल, या समजुतीने मुघल सरदार शाहाबुद्दिनखान याच्यासोबतच्या माणकोजी पांढरेने हजारोंच्या तुकडीनिशी या खिंडीतून रायगड गाठण्याचा प्रयत्न केला़ अर्थातच नाईक आणि त्याच्या नऊ वीरांनी आपल्या हौतात्म्याचा बांध घालून खिंड अडवली आणि माणकोजीचा प्रयत्न हाणून पाडला़ तत्कालीन प्रथेनुसार, वीरपत्नी सती गेल्या आणि त्यांची आठवण म्हणून दहा सतिशीला तेवढय़ा मागे राहिल्या़..
कालौघात या सतिशिलांचे तात्विक आणि ऐतिहासिक संदर्भ विस्मृतीत जाऊन, त्यांचे भौतिक अस्तित्व तेवढे शिल्लक राहिलं. काहीतरी कोरीव काम केलेले हे दगड, गावकऱ्यांनी शेंदूर फासून, पूजेला लावल़े गिरीभ्रमणाची आवड असणारी मंडळी या दगडांच्या जवळून जात, ग्रामदैवत वगैरे समजून त्याचे फोटो-बिटो काढत़ पण त्या निर्जिव धोंडय़ांना सांगायचा असलेला बलिदानाचा इतिहास ना गावकऱ्यांना ऐकू येत होता, ना भटकंती करणाऱ्यांना़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा