मी मुक्त आहे ही भावना ज्याच्या मनात सतत प्रकाशत असते तो मुक्त होतो, स्वतंत्र होतो. जसे विचार, तसा उच्चार, तशी कृती आणि त्यानुसार फळ मिळतं हा अगदी तर्कशुद्ध क्रम आहे. मी बद्ध आहे. मला अमुक तमुक कसं जमणार? असे विचार जो सतत करतो तो तसाच घडतो, कारण निराश व भीतिग्रस्त असलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या माणसाकडून काहीही कार्य होऊ शकत नाही.

‘परोपकार करणे हा धर्म होय. दुसऱ्याला पीडा देणे हा अधर्म होय. सामर्थ्य आणि पौरुष्य हा धर्म होय. दौर्बल्य आणि भेकडपणा हा अधर्म होय. स्वातंत्र्य हा धर्म होय. पारतंत्र्य हा अधर्म होय. सामर्थ्यआणि पौरुष्य हे गुण इतरांना सर्वतोपरी साहाय्यभूत होण्यासाठी कामी यायला हवेत. बलशाली माणूस कधीही गुलामीचे जिणे जगत नाही. सामर्थ्यशाली व्हायचे तर शरीर सुदृढ हवे आणि मनही सुदृढ हवे. म्हणजे रजोगुण प्रबळ होऊन सत्त्वगुणांकडे वाटचाल सुरू होते.
 ‘नायमात्मा बलहीनेन लभ्य:’ हे सूत्र विवेकानंद स्वामी वारंवार सांगत असत. बलहीन, भित्र्या माणसाला आत्मप्रकाश कदापीही लाभणार नाही. भीती माणसाला दुर्बल बनविते. गुलाम बनविते. स्वामीजी सांगत असत, ‘‘तुमची भाषासुद्धा सामथ्र्यशाली हवी. खाणेपिणे, चालणे, बोलणे, भाव, भाषा या साऱ्यात तेजस्विता आणावी लागेल. सर्वत्र प्राणांचा संचार करावा लागेल. नसानसातून रक्त खेळवावे लागेल की जेणेकरून सर्वच बाबतीत जिवंतपणाचा अनुभव येऊ लागेल. तरच या भयंकर जीवनसंग्रामात देशातील लोक टिकू शकतील.’’
सामर्थ्यांची अनुभूती घेण्यासाठी विचार मोलाची भूमिका बजावतात, हे सांगताना स्वामीजी म्हणत, ‘आपण जे काय झालो आहोत, ते आपल्या विचारांचेच फळ होय. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे विशेष लक्ष असू द्या. शब्द तर गौण गोष्ट. विचारच टिकतात, ते स्थायी असतात, ते पसरतातही दूरवर-खूप दूपर्यंत प्रवास करू शकतात. कर्म करणे चांगले आहे, पण त्याचा उगम होत असतो चिंतनातून, विचारांतून, म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शानी भरून टाका. रात्रंदिवस ते स्वतसमोर बाळगा, आणि मग बघाल की त्यातून मोठमोठी कर्मे प्रत्यक्षात घडतात’
 सावित्री अत्यंत निर्भय होती. यमाच्या मागे स्वर्गापर्यंत जाण्याइतकी ताकद तिच्या अंगी होती. प्रत्यक्ष मृत्यूलाही तिनं आपल्या बुद्धिसामर्थ्यांने, निर्भयपणाने नमविलं आणि पतीचा जीव वाचविण्याचं ध्येय साध्य केलं. प्रल्हादाने अनेक तऱ्हेचा भयंकर छळ निर्भयपणे सोसला, पण ईश्वरभक्तीचा त्याग केला नाही. सारं कृष्णचरित्र हा निर्भयपणाचा मानदंडच आहे. कृष्णाने इंद्रपूजा बंद केली. कालियासारख्या उद्दाम विषारी नागाची हकालपट्टी केली. अनेक राक्षसांशी दोन हात करून त्यांना नमविलं. कंसवध केला. नरकासुराचा वध करून जनतेची असह्य़ अत्याचारातून मुक्तता केली. हे सारं त्याने सत्तेसाठी किंवा आत्मगौरवासाठी केलं नाही. दुर्जनांचा विनाश आणि सामान्य जनतेला सुखी, सुरक्षित जीवन हा ठाम विचार या साऱ्या पराक्रमामागे होता. कृष्णाने सामान्य माणसांनाही अन्यायाचा प्रतिकार करायला उद्युक्त केलं. ऐन युद्धक्षेत्रावर हातपाय गाळणाऱ्या अर्जुनासारख्या वीराला न्याय आणि नीतीच्या राज्यस्थापनेसाठी युद्धाला प्रवृत्त केलं.
कृष्णाचा दाखला विवेकानंदांनी अनेक ठिकाणी दिला आहे. कृष्णासारखी निर्भयता प्राप्त करण्यासाठी आधी शरीर सुदृढ करायला हवं तेव्हा मन शक्तिसंपन्न होईल. मन हा शरीराचा अंश आहे. मन आणि वाणी ही अत्यंत प्रभावी असायला हवीत. ‘मी हीन मी दीन’ असं घोकत राहिल्यानेच माणूस हीन दीन होतो, असं बजावून शास्त्रार्थ सांगताना विवेकानंद म्हणतात,
मुक्ताभिमानी मुक्तोहि बद्धो बद्धाभिमान्यापि
किम्वदन्तीति सत्येयं या मति: सा गतिर्भवेत्                                                                                                           
मी मुक्त आहे ही भावना ज्याच्या मनात सतत प्रकाशत असते तो मुक्त होतो, स्वतंत्र होतो. जसे विचार, तसा उच्चार, तशी कृती आणि त्यानुसार फळ मिळतं हा अगदी तर्कशुद्ध क्रम आहे. मी बद्ध आहे. मला अमुक तमुक कसं जमणार? मला याच्या त्याच्या आश्रयालाच राहायला हवं. माझ्या अंगी कसलीच ताकद नाही. असे विचार जो सतत करतो तो तसाच घडतो. ऐहिक आणि पारमाíथक अशा दोन्ही जीवनांमध्ये निराश व भीतिग्रस्त असलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या माणसाकडून काहीही कार्य होऊ शकत नाही.
स्वामीजी सांगत असत ‘वीर व्हा. नेहमी म्हणत जा, अभि: अभि:. भय म्हणजे दु:ख आणि अकर्तृत्वाची जननी! भय म्हणजे मृत्यू, भय म्हणजे पाप, भय म्हणजे नरक, भय म्हणजे अधर्म. अनीतीच्या मार्गावर चालण्यास भय प्रवृत्त करते. जे जे आकारणात्मक विचार आहेत ते भयरूपी सतानापासून निर्माण झाले आहेत.’
कोणत्याही ऐहिक किंवा पारमाíथक ध्येयाच्या प्राप्तीसाठी मन निर्भय हवं. एवढंच काय रोजचं जगणं तणावरहित, शुद्ध, आनंदी असण्यासाठी मन निर्भय हवं. अमुक केलं तर समोरचा गुंड माणूस माझा जीव घेईल, म्हणून त्याला दबून वागायला हवं. अमुक व्यक्ती लाच घेते आहे, तिच्याविरुद्ध तक्रार केली तर माझी नोकरी जाईल. त्याला हवा असलेला काळा पसा मला नेऊन द्यायला सांगितला तर तो दिला पाहिजे नाहीतर मला कोणत्या तरी प्रकरणात अडकवतील. अमुक माणूस स्त्रियांशी गरवर्तन करतो आहे पण मी प्रतिकार केला तर तो मलाच मारेल. असं प्रत्येक पावलाला घाबरून जगणारा माणूस स्वतंत्र नीतिमान विवेकी असूच शकत नाही. त्याची वाटचाल निर्थक असते आणि जगणं मृतप्राय असतं.
स्वामीजींनी नि:संदिग्धपणे घोषित केलं होतं, ‘जी कोणती मतप्रणाली माणसाचे मन दुर्बल करते, भयभीत करते, माणसाला खुळचट बनविते, मनात विषाद भरते, भलभलत्या अशक्य गोष्टींच्या मागे धावायला शिकवते, चमत्कारांच्या नादी लावते. ती अगदी त्याज्य समजायला हवी. तिचा परिणाम घातक होतो आणि मने रोगट, विकृत व दुबळी होतात.’
 स्वामीजींनी तेव्हा सांगितलेलं हे तत्त्व आजही आपल्या जगण्याला पायाभूत ठरतं. अमुक नवससायास करायचे, तमक्याने सांगितलेले अघोरी उपाय करायचे भीतीपोटी अनेक अंधश्रद्ध प्रथा पाळायच्या नशिबावर हवाला ठेवून चमत्कारांची वाट पाहायची, असल्या  कर्मकांडातून काही हाती पडलं नाही की मन निराशेने अधिकच दुर्बल होतं. काहीही करण्याची इच्छा उरत नाही. नराश्य आणि औदासीन्य हा आजच्या काळातील सर्वात मोठा आजार असल्याचं मानसशास्त्रज्ञ सांगतात. आजघडीला माणूस दुबळा झाला आहे. स्पध्रेच्या जगात बाहेर फेकले जाण्याच्या भीतीने संत्रस्त झाला आहे. मला काहीही जमणार नाही. मी तुच्छ आहे. असे निराशेचे विचार प्रबळ होत आहेत. अशा वेळी स्वामीजींचे विचार संजीवनीसारखेच आहेत.
स्वामीजी म्हणत असत, ‘माझ्या तरुण मित्रांनो सामथ्र्य संपन्न व्हा. दुर्बल मेंदू काहीही करू शकत नाही. गीतेचे अध्ययन करण्याआधी फुटबॉल खेळून शरीर सुदृढ करा. म्हणजे तुम्हाला गीता अधिक चांगली कळेल. तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा व सामथ्र्य यांचे तुम्हाला अधिक चांगले ज्ञान होईल. तुमचे शरीर मजबूत व मन निर्भय झाले की आपण मनुष्य आहोत अशी जाणीव होऊन उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा अधिक चांगला कळेल. मग माझ्या दैवाला मीच जबाबदार आहे. माझे भले करणारा मीच आणि बुरे करणारा मीच! मी स्वरूपत: शुद्ध आनंदघन आहे ही भावना जागृत होईल. मग आपण स्वत: ध्येयाप्राप्तीकडे निर्भयपणे चालू शकू आणि इतरांना सांगू शकू, ‘उठा, जागे व्हा. ध्येयाप्रत पोहोचेपर्यंत थांबू नका.’     

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Story img Loader