निरंजन मेढेकर
लैंगिक ताठरतेविषयीची समस्या बहुसंख्य पुरुषांना, विशेषत: चाळिशीनंतर कधी ना कधी जाणवतेच. त्यानं पुरुषाचा आत्मविश्वास डळमळीत होतोच, पण जोडीदाराचीही लैंगिक घुसमट होते. प्रामुख्यानं जीवनशैलीशी संबंधित मनोशारीरिक कारणं त्यामागे असतात. शिवाय ही केवळ लैंगिक समस्या नसून तिचा संबंध हृदयाच्या आरोग्याशीही असू शकतो. तेव्हा लज्जेमुळे सांगता न येणाऱ्या या समस्येकडे वेळीच लक्ष दिलेलं बरं.
बरोबर पाचशे वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये किंग हेन्री (आठवा) याचं राज्य होतं. १५०९ ते १५४७ असा तब्बल ३८ वर्ष तो ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. आपला पहिला विवाह रद्द करण्यास पोपनं नकार दिल्यानंतर पोपचा राजघराण्यातला हस्तक्षेप संपुष्टात आणत स्वत:ला इंग्लंडच्या चर्चच्या सर्वोच्चपदी विराजमान करणं असो, की ब्रिटिश नौदलाची भक्कम पायाभरणी असो. हेन्रीनं आपल्या कार्यकाळात इंग्लंडसह युरोपच्या राजकारणात दूरगामी ठरतील असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पण आजही हेन्री (आठवा) हा त्यानं केलेल्या (आणि काही मोडलेल्याही!) सहा लग्नांमुळे आणि त्याला आलेल्या नपुंसकत्वामुळे ओळखला जातो. इंग्लंडच्या या राजावर आणि विशेषत: त्याच्या नपुंसकत्वावर आजवर बरंच संशोधन झालं आहे. याबाबत बरेच तर्कवितर्कही आहेत. या सगळय़ात एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतो, तो म्हणजे गेल्या पाचशे वर्षांत मनुष्यानं चंद्रावर पाऊल ठेवण्यापासून ते संपूर्ण पृथ्वी बेचिराख करण्याची क्षमता असलेल्या अणूबॉम्बपर्यंत अचाट शोध लावले असले तरी व्यक्तीच्या पुरुषत्वावर आघात करणाऱ्या नुंपसकत्व (impotency) या समस्येवर त्याला शंभर टक्के मात करता आलेली नाही.
वास्तविक ‘नपुंसकत्व’ ही संज्ञा आता वैद्यकीय परिभाषेत वापरली जात नाही. कारण या शब्दात कमालीचं न्यूनत्व आहे. मराठी साहित्यात आणि चित्रपटांतही षंढ, नामर्द किंवा नुपंसक या शब्दांचा उच्चार एखाद्या शिवीसारखा करण्यात आल्याचे बरेच दाखले दिसतील. मागील लेखात शीघ्रपतानासंबंधी जाणून घेतल्यावर अकाली वीर्यपतनाइतकाच पुरुषांमध्ये, विशेषत: चाळिशीपुढच्या पुरुषांना प्रकर्षांनं भेडसावणाऱ्या लैंगिक ताठरते-विषयीच्या समस्येचा आढावा घेत आहे.
‘योनीत प्रवेश करण्याइतपत व संभोगक्रिया पूर्ण होण्याइतपत लिंगात सातत्यानं ताठरता नसणं म्हणजे नपुंसकत्व,’ अशी व्याख्या डॉ. विठ्ठल प्रभू यांनी ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकात केली आहे. नपुंसकत्वाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. प्राथमिक नपुंसकत्व आणि द्वितीयक नपुंसकत्व. भूतकाळात लैंगिक ताठरता कधीच आली नसेल, तर त्याला प्राथमिक नपुंसकत्व समजलं जातं. संभोगाविषयीच्या चुकीच्या कल्पना, संभोग म्हणजे पाप ही भावना, शरीरसंबंधांविषयी तिरस्कार, जननेंद्रियांमधील दोष, संप्रेरकांची उणीव, या कारणांमुळे प्राथमिक नपुंसकत्व निर्माण होतं. इथे एक गोष्ट आवर्जून समजून घ्यायला हवी, ती म्हणजे जननेंद्रियांमधील दोष किंवा हॉर्मोन्सची उणीव असणाऱ्या पुरुषांचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं. त्यामुळे काही प्रसंगांत लैंगिक ताठरता आली नाही, तर आपल्या जननेंद्रियात काही दोष आहेत, अशा परस्पर निष्कर्षांवर आल्यास त्यानं समस्या बरी होण्यापेक्षा भीतीमुळे आणखी बळावू शकते.
बहुतेक पुरुषांमध्ये द्वितीयक नुपंसकत्व असतं. वाढतं वय आणि वयाच्या पटीत वाढलेलं वजन, कमरेचा वाढता घेर, मधुमेह, उच्च रक्तदाब, व्यायामाचा संपूर्ण अभाव, व्यसनाधीनता, अशा शारीरिक कारणांमुळे तसंच चिंता, नैराश्य, कामाचा आणि समागमाचा ताण, अशा मानसिक कारणांमुळे द्वितीयक नपुंसकत्व उद्भवतं. या लेखाची तयारी करताना ‘Erectile Dysfunction: Finding Whatls Right for You’ हे वॉर्ड व्हिवियन लिखित पुस्तक वाचनात आलं. या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे या पुस्तकाचे लेखक वॉर्ड हे कुणी डॉक्टर अथवा सेक्सॉलॉजिस्ट नसून, वयाच्या चाळिशीत अनेक वर्ष लैंगिक ताठरतेबद्दलच्या समस्येनं ते स्वत: ग्रस्त होते. मुळात स्वत:ला ही समस्या आहे, हे जगजाहीर करणं आणि त्यापुढे जाऊन त्यावर पुस्तक लिहिणं हे आज एकविसाव्या शतकातही धैर्याचंच म्हणायला हवं! या अचानक उद्भवलेल्या समस्येमुळे वॉर्ड यांना वैवाहिक जीवनात आलेले अडथळे, या समस्येवर इलाज करण्यासाठी त्यांनी केलेले नानाविध उपाय, त्यात आलेलं अपयश, पण तरीही सकारात्मकपणे प्रयत्न करत इरेक्टाईल डिसफंक्शनवर त्यांनी केलेली मात, असा या पुस्तकाचा साधारण प्रवास आहे.
‘‘इरेक्टाईल डिसफंक्शनची परिणती केवळ नात्यात विसंवाद निर्माण होण्यातच होत नाही तर त्यानं त्या नात्यातलं ‘स्पिरिट’ संपतं. ही पुरुषांची समस्या असली तरी यामध्ये पुरुषाबरोबरच त्यांच्या जोडीदारालाही सहन करावं लागतं. याबद्दल बोलायची चोरी असल्यानं ही शब्दश: एकटं पाडणारी समस्या आहे. इरेक्टाईल डिसफंक्शनबाबत मोकळेपणा असणं म्हणजे आपल्याला ही समस्या आहे हे सर्वप्रथम मान्य करणं. दारूच्या व्यसनामध्ये आपल्याला व्यसन आहे हे रुग्णानं स्वत:शी मान्य केल्याशिवाय त्यावर उपचार होऊ शकत नाही. अशीच स्वकबुली या लैंगिक आजारात रुग्णानं देणं आवश्यक आहे,’’ असा सल्ला वॉर्ड हे लैंगिक ताठरतेबद्दलच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या रुग्णांना देतात. इंग्लंडच्या आरोग्य केंद्राच्या आकडेवारीनुसार जगभरातल्या १० टक्के पुरुषांना वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर नपुंसकत्वाचा सामना करावा लागतो. तर मधुमेह असलेल्या पुरुषांपैकी ५० टक्के पुरुषांमध्ये लैंगिक ताठरतेची समस्या असते.
स्त्रीरोगतज्ज्ञ व सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे यांच्याकडे तिशीतला नीलेश आपली पत्नी कामिनीसह लैंगिक ताठरतेबाबतची समस्या घेऊन आला होता. त्याच्या समस्येविषयी माहिती देताना त्या सांगतात, ‘‘नीलेशची सध्याची कौटुंबिक स्थिती खूपच चढउतारांची आहे हे त्याच्याशी बोलताना जाणवलं. त्याच्या वडिलांचं हृदयविकाराचं मोठं ऑपरेशन झालंय, तसंच नोकरी स्थिर नसल्यानं आर्थिक घडी विस्कटलेली आहे. यातच सहा महिन्यांपूर्वी त्याला जाणवलं, की समागमादरम्यान त्याला ताठरता नीट येत नाही. पण समुपदेशनादरम्यान हे आढळलं, की दहापैकी सहा वेळा त्याला ताठरतेबाबत प्रश्न भेडसावत नव्हता. एक-दोनदा त्याच्या दृष्टीनं लिंग पुरेसं कडक होत नव्हतं. तर केवळ एक-दोनदा ताठरता आली नव्हती. पण या एखाद्-दोन अपवादांचं नीलेशनं इतकं दडपण घेतलं, की त्यानं त्याची कामेच्छाच कमी केली.’’ याचा परिणाम केवळ नीलेशवर झाला नाही, तर त्यामुळे कामिनीचीही लैंगिक आणि मानसिक घुसमट व्हायला लागली. ‘‘समागम करू शकू की नाही, या धास्तीनं नीलेशनं कामिनीजवळ जायचं बंद केलं. त्यामुळे तिचा असा गैरसमज झाला, की त्याला माझ्याविषयी आता आकर्षण वाटत नाही किंवा त्याचं बाहेर काही सुरू आहे. त्यामुळेच जोडप्यांनी लैंगिक समस्येवरून नात्यात विसंवाद येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी,’’ डॉ. नीलिमा सांगतात.
आज सगळय़ांच्याच आयुष्यात या ना त्या कारणानं ताण इतका वाढलाय, की त्याचा थेट परिणाम कामजीवनावर होतोय. लैंगिक ताठरतेबद्दलच्या समस्येतील मानसिक कारणांमध्ये या ताणाचा खूप मोठा वाटा आहे. वाढलेल्या ताणाची परिणती ही बऱ्याचदा मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधींमध्ये होते. पुरेसा एकांत, जोडीदाराबद्दल आकर्षण आणि प्रत्यक्ष समागमादरम्यान मनात भीती, काळजी, शंका नसणं, ही यशस्वी संभोगाची पूर्वअट आहे, असं निरीक्षण सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. अनिकेत कुलकर्णी नोंदवतात. त्यांच्या बीडमधल्या दवाखान्यात शंभर किलोमीटरवरच्या परळी तालुक्यातून ३४ वर्षांचा एक रुग्ण लैंगिक ताठरतेबाबतची समस्या घेऊन आला होता. ‘‘या रुग्णाच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती. त्यांची पत्नी नोकरीनिमित्त दुसऱ्या गावी असल्यामुळे या जोडप्याची आठवडय़ातून एकदा गाठ पडायची. आठ दिवसांनी भेटल्यावर ते मीलनासाठी उत्सुक असले, तरी एकदा काही कारणानं ताठरता आली नाही आणि तेव्हापासून पतीचा आत्मविश्वास डळमळीत झाला. याची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्याला भीती वाटायला लागली. आत्महत्येचे विचार डोकावू लागले. पण समुपदेशन आणि काही औषधोपचारांनी त्यांची समस्या पूर्णपणे बरी झाली.’’
जीवनशैलीच्या संदर्भात विचार करता जो आहार हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य नसतो, तो लैंगिक आरोग्यासाठीही हितावह नसतो. डॉ. नीलिमा सांगतात, ‘‘पुरुषाच्या मनात उत्तेजित विचार आले, की तशा चेतना मेंदूकडून लिंगाकडे जातात आणि लिंगाच्या वाहिन्यांकडे रक्तपुरवठा होऊन लिंग कडक होतं. पण उच्च रक्तदाब, मधुमेहाची समस्या असेल किंवा धूम्रपानाचं व्यसन असेल, तर रक्त घट्ट झाल्यानं किंवा लिंगाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही अडथळे निर्माण झाले असल्यास लिंगाकडे पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे लिंगात ताठरता येत नाही. लैंगिक ताठरतेचा हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशीही (कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ) थेट संबंध असतो. कारण लिंगाची रक्तवाहिनी ही हृदयाच्या रक्तवाहिनीपेक्षा (कोरोनरी आर्टरी) लहान असते. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह वाढल्यानं रक्तवाहिनीत येणारा ब्लॉक हा हृदयाच्या रक्तवाहिनीपेक्षा लिंगाच्या रक्तवाहिनीत आधी येण्याची शक्यता असते. थोडक्यात इरेक्टाईल डिसफंक्शन हे हृदयविकाराचा इशारा देणारंही असू शकतं. त्यामुळेच हे दुखणं अवघड जागेचं जरी असली तरी वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेणं अतिशय गरजेचं असतं.’’
अमेरिकी कार्डिऑलॉजिस्ट टॉड ए. वूड यांनी ‘Whatls the connection between ED and Heart Disease?’ या आपल्या लेखात ऑस्ट्रेलियाच्या एका सर्वेक्षणाचा संदर्भ दिला आहे. ऑस्ट्रेलियात ९५ हजार पुरुषांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला, की ज्या पुरुषांना लैंगिक ताठरतेबद्दलची समस्या आहे, त्यांना अशी समस्या नसलेल्या पुरुषांच्या तुलनेत हृदयाशी संबंधित समस्या अधिक असतात. यात हृदयविकाराचा झटका आणि हृदयक्रिया बंद पडणं या गंभीर गोष्टींचा प्रामुख्यानं समावेश होतो. त्यामुळेच योग्य लैंगिक ताठरतेचं पुरुषांच्या एकूण आरोग्यात महत्त्वाचं स्थान आहे. तसंच ताठरतेबद्दलची समस्या ही हृदयाचं किंवा अन्य महत्त्वाच्या अवयवांचं कार्य बिघडल्याचा इशारा असू शकतो.
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख असलेल्या किंग हेन्री (आठवा) याचा घोडेस्वारीच्या खेळादरम्यान जानेवारी १५३६ मध्ये अपघात झाला आणि तो घोडय़ावरून कोसळला. तेव्हा त्याचं वय ४३ होतं. त्याच्या डाव्या पायाला झालेली गंभीर दुखापत बरी न झाल्यामुळे त्याच्या रोजच्या हालचालींवर, व्यायामावर मर्यादा आल्या. व्यायामाला पूर्णविराम मिळाल्यावरही मांसाहारानं परिपूर्ण असा त्याचा राजेशाही आहार त्यानं थांबवला नाही. परिणामी त्याच्या कमरेचा घेर कमालीचा वाढला. वाढलेल्या वजनामुळे त्याला नपुंसकत्व आलं असं म्हटलं जातं. या उदाहरणातून आज काही बोध घ्यायचा झाला तर तो हाच, की निरोगी, ताणविरहीत, व्यसनमुक्त आणि सुदृढ जीवनशैली ही नपुंसकत्व टाळण्याची पूर्वअट आहे. तसंच आवश्यकता भासल्यास आधुनिक वैद्यकीय उपचारांनी नपुंसकत्वावर यशस्वी मात करणं आज खरोखर शक्य आहे. फक्त संकोच बाजूला सारत तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला हवं.