व्यवसाय भेटी उपक्रम म्हणजे दोन-तीन तास मुलांना त्या त्या व्यावसायिकाशी गप्पा मारता येतील अशी व्यवस्था. त्यातून त्यांच्या संभाषण विकासातील ‘प्रश्न विचारू शकणे’ हे कौशल्य विकसित करण्यासही मदत होईल असं वाटलं.. हा उपक्रम चांगलाच यशस्वी झाला.

माझ्या या दारी कोण कोण आलं, कोण कोण आलं,

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये

दूधवाला गवळीदादा, गोड गोड दूध देऊन गेला

पेपरवाला पेपरवाला, आजचा पेपर देऊन गेला

असे कचरावाला, भाजीवाला, सुतारदादा, इलेक्ट्रिशियन, डॉक्टर असे वेगवेगळे मदतनीस आणि व्यावसायिक येऊन त्यांची सेवा देऊन आपल्याला कशी मदत करतात याचं वर्णन करणारं एक आमचं सुरेख बालगीत. यात शेतकरी, सोनारदादा, लोहारदादा, चांभारदादा असेही अनेक व्यावसायिक आहेत की जे आपल्या घरापर्यंत येत नाहीत पण तरीही आपल्याला त्यांची मदत होत असते. या आणि अशा व्यावसायिकांची, मदतनीसांची ओळख बालवर्गात मुलांना करून दिली जाते. काळ बदलला. व्यावसायिकही खूप बदलले. परंतु व्यावसायिक ओळख मात्र अजून त्याच त्याच आणि तेवढय़ाच व्यावसायिकांच्या अशी जाणीव व्हायला लागली. आजूबाजूच्या घराघरात छोटे छोटे व्यावसायिक दिसू लागले. सणानुसार, ऋतूनुसार, लोकांच्या आवडीनुसार, गरजेनुसारचे अनेक आसपासचे व्यवसाय आठवू लागले. पोळीभाजीचा व्यवसाय, पाळणाघरं चालवणारे, दागिने, शोभेच्या वस्तू तयार करणारे, तोरणं, गणपतीच्या दिवसात मखरं, दिवाळीच्या दिवसात डिझाइनर पणत्या, कंदील तयार करणारे, हे आणि असे किती तरी व्यवसाय.

मनात विचार आला या वर्षी व्यावसायिक ओळख ही अशा प्रकारच्या वेगळ्या व्यावसायिकांची करून देऊ  या आणि व्यावसायिक आपल्या दारी येण्यापेक्षा आपण त्यांच्या दारात जाऊ  या. उपक्रम सुरू करण्याआधीच्या चर्चेदरम्यान आमच्या सर्व शिक्षिकांना व्यावसायिक भेटीची संकल्पना स्पष्ट करताना मी म्हटलं, ‘‘आपल्याला नेहमीचे व्यावसायिक दाखवायचे नाहीत. त्यांची ओळख आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने देऊच, पण तुमच्या आजूबाजूला जे नेहमीच्या व्यावसायिकांपेक्षा वेगळे व्यावसायिक आहेत त्यापैकी कुठल्याही एकाची निवड करा. त्यांच्या भेटीची परवानगी घेऊन पालकांना मुलांना तिथेच सोडायला सांगा. दोन-तीन तास मुलांना त्या व्यावसायिकाशी गप्पा मारता येतील अशी व्यवस्था करून घ्या. मुलांना त्याची मुलाखत घ्यायला, प्रश्न विचायला उद्युक्त करा.’’ मुलांनी त्या त्या व्यावसायिकांना प्रश्न विचारून भंडावून सोडावे अशीच माझी अपेक्षा होती. त्यातून त्यांच्या संभाषण विकासातील ‘प्रश्न विचारू शकणे’ हे कौशल्य विकसित करण्यासही मदत होईल असं वाटलं. एकूण मुलांना व्यावसायिकांची ओळख करून देण्यापेक्षा ती स्वत:च त्या व्यावसायिकांची ओळख करून घेऊ  शकतात का हे पडताळून पाहणे, हा हेतू होता.

पाच वर्गाना पाच वेगवेगळ्या व्यावसायिक भेटी करायच्या होत्या. ‘‘बाई, आम्ही पणत्या रंगविणाऱ्या एका ताईला भेट देणार आहोत.’’ एका वर्गाच्या बाईंनी उत्साहाने त्यांच्या ठरलेल्या व्यावसायिकाची बातमी दिली. तर मुलांच्या शाळेतील विविध प्रोजेक्टसाठी, मॉल सजावटीसाठी, मल्टिनॅशनल कंपनीच्या सजावटीसाठी कागदाच्या वस्तू तयार करणाऱ्या एका ताईला भेट द्यायची, असं दुसऱ्या वर्गाच्या बाईंनी ठरवलं. तिसऱ्या वर्गाच्या बाईंनी कागदी फुलं तयार करणाऱ्या व्यावसायिकेची निवड केली. चौथा वर्ग इमिटेशन ज्वेलरी बघण्यास सज्ज झाला. तर पाचवा वर्ग देवीच्या मूर्ती तयार करणाऱ्या काकांना भेटण्यास तयार झाला. ‘व्यावसायिक भेट सप्ताह’ असं आमच्या या उपक्रमाचं नाव होतं. पाच वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या व्यावसायिकांकडे जायला ठेवले होते. त्यामुळे मलाही प्रत्येक ठिकाणी मुलांबरोबर भेट देता येणार होती, ज्याची मला उत्सुकता होतीच. सप्ताह सुरू करण्याआधीच्या आठवडय़ात आम्ही ठरवल्याप्रमाणे वर्गावर्गात वर्गशिक्षिका मुलांना आपण कुठे जाणार आहोत, ते काय करतात, त्यांचा तो व्यवसाय आहे म्हणजे काय, तिथे आपल्याला काय काय बघायचं आहे, त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत हे सांगत होत्या.

पहिली भेट  पणत्या रंगवणाऱ्या ताईची होती. तिच्या घरात मुलं दाटीवाटीनं पण छान बसली होती. शाळेच्या बाहेर कोणाच्या तरी घरी, तेही बाईंबरोबर जायला मिळाल्याचा एक वेगळाच आनंद आणि उत्सुकता मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होती. बाईंनी सुरुवातीला मुलांना आपण कोणाकडे आलोय, ती ताई काय करते, तो तिचा व्यवसाय आहे म्हणजे काय, हे सगळं त्यांना सांगितलं आणि ताईला सुरुवात करण्यास सांगितली. ताईने स्वत:ची ओळख करून दिली. तिच्याकडील भरपूर रंगवलेल्या पणत्या मुलांना दाखवल्या. या रंगीत पणत्या ती सगळ्यांना विकत देते हे ऐकल्यावर लगेच निहारिकानं विचारलं, ‘‘म्हणजे तुझं दुकान आहे का?’’ त्यावर ताईने उत्तर दिलं, तिचं दुकान नाही पण बदलापूरला कारखाना आहे जिथे खूप जण काम करतात आणि दिवाळीच्या दिवसात रात्रंदिवस पणत्या रंगवतात. ‘‘मग एरवी ते काय करतात?’’ दुसरा अगदी स्वाभाविक प्रश्न सईचा आला. प्रश्न विचारू शकणं हा आमचा संभाषणकौशल्य विकासाचा हेतू साध्य होत असल्याचं जाणवत होतं. ताईने सांगितलं की, ‘‘दिवाळी नसली तरी रंगीत, वेगवेगळ्या डिझाइनच्या पणत्या, मोठमोठे माठ, मातीच्या रंगवलेल्या वस्तू सतत तयार कराव्या लागतात.’’ ‘‘पणत्या पण तू तयार करतेस?’’ अजून एक प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला माझा चेहरा खुलत चाललेला. त्यांच्या बाईंच्या चेहऱ्यावरही आपली मुलं व्यावसायिकाची मुलाखत घेत आहेत, त्याच्या व्यवसायाची माहिती आपली आपण करून घेत आहेत याचं समाधान जाणवत होतं. थोडय़ा वेळाने ताईने एक मोठी पणती घेतली. ती रंगवण्यासाठी तिला लागणारे रंग आणि ब्रश अशा साहित्याची ओळख करून देत ताईनं पणती रंगवायला सुरुवात केली. गोलाकार बसलेली मुलं एकाग्रतेने ते बघत होती. पणतीला ताईने चार रंग दिले. तिला आरसे, टिकल्या चमचम यांनी छान सजवलं. बाजारात अशा रंगबेरंगी नटवलेल्या अनेक पणत्या आम्ही सगळ्यांनीच बघितल्या होत्या पण अशी आमच्या डोळ्यांसमोर हा हा म्हणता तयार झालेली पणती आम्ही सगळे प्रथमच बघत होतो. मग ताईने प्रत्येकाला एक पणती रंगवायला दिली. तिच्याकडच्या साहित्याचा उपयोग करून मुलांना स्वत:च्या हाताने ताईच्या व्यवसायाचा अनुभव घेता आला. मग त्यावर आरसे, टिकल्या असं लावून आपल्या मनाप्रमाणे त्या पणतीची सजावट मुलांनी केली. हे सगळं करताना ताईवर भरपूर प्रश्नांचा एकीकडे भडिमार होत होता. पणत्या रंगवणारी, त्या व्यवसायाची नुसती ओळख नाही तर अनुभव घेणारी मुलं पाहून आमच्या व्यावसायिक भेट उपक्रमाची सफलता जाणवायला लागली.

दुसऱ्या दिवशी दुसरा वर्ग गेला होता ती ताई कागदापासून विविध वस्तू तयार करीत होती. कुठलीही खरी वस्तू ती हुबेहूब कागदाची करू शकत होती. तिच्या घरीच तिचा व्यवसाय होता. मुलांसाठी तिने वारीच्या वेळेच्या सगळ्या वस्तू समोर ठेवल्या होत्या. कागदाच्या चिपळ्या, कागदाची झांज, कागदाचा ढोल, कागदाच्या पादुका, कागदाची पालखी, कागदाच्या वारकऱ्यांच्या टोप्या, एवढचं नाही तर कागदाचे विठ्ठल आणि रखुमाई बघून आमचा सगळ्यांचाच आ वासला होता.  त्या वस्तू तयार करताना लागणारा कागद नेमका कोणता असतो. कागदाचे विविध प्रकार कोणते. ते तिला कुठे मिळतात, आपल्या घरी येणाऱ्या लग्नाच्या पत्रिकांच्या कागदांचा ती कसा वापर करते, तिला त्यामुळे आजूबाजूचे सगळेच कसे त्यांच्याकडच्या लग्नाच्या पत्रिका देतात याची छान माहिती ताईने मुलांना दिली. अशा प्रकारच्या तिच्या या व्यवसायाची सुरुवात हल्ली शाळांमधील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रोजेक्टमुळे कशी झाली याचीही गोष्ट ताईने सांगितली. आई-बाबांना मुलांना मदत करायला वेळ नसतो आणि मुलांना शाळेत तर काय काय करून आणायला सांगितलेलं असतं. मग ही ताई आता त्यांच्यासाठी अगदी देवदूतच झाली आहे. तुम्ही सांगाल ते ती कागदाचं करून देते आणि मुलं आनंदानं शाळेत नेतात, पण ती थोडय़ा मोठय़ा मुलांना त्या वस्तू करायलाही शिकवते. एकूण ताईचा हा व्यवसाय आम्हा सगळ्यांना अचंबित करून टाकणारा होता. इथे मुलांना घरी जाताना छान वारकरी टोप्या मिळाल्या.

दागिने तयार करणाऱ्या ताईने वेगवेगळे कानातले तयार करून दाखवले, माळ तयार करून दाखवली, बांगडय़ा करून दाखवल्या. फुलं तयार करणाऱ्या ताईने वेगवेगळी फुलं तयार करून आणली होती. यासारखी फुलं बाजारात आपल्याला दिसतात पण ती कशा प्रकारे तयार होतात याचा अनुभव मुलांना मिळाला. प्रत्येक शिक्षिकेला भरपूर फोटो काढायला सांगितले होते. त्याचा त्यांना वर्गावर्गात चार्ट करायला सांगितला. त्यावर त्या व्यवसायाचं नाव, व्यावसायिक ताईचं नाव, तिला मुलांनी विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं अशी लिहिली जाणार होती. म्हणजे सप्ताह संपल्यावरही मुलांच्या डोळ्यांसमोर तो चार्ट असेल तर त्यांनी पाहिलेल्या गोष्टींची उजळणी होणार होती. प्रत्येक वर्गातल्या अशा चार्टमुळे बाकीच्या वर्गातील मुलं आपल्यासारखीच कुठे जाऊन आली, त्यांनी तिथे काय पाहिलं याची माहिती इतर वर्गातील मुलांना त्यांच्या वर्गशिक्षिकांना करून देता येणार होती.

आमच्या या व्यावसायिक सप्ताहामुळे मुलांना सुतार, लोहार, कुंभार, डॉक्टर, शेतकरी या पारंपरिक व्यावसायिकांबरोबर आधुनिक व्यावसायिकांचीही ओळख झाली. त्यांना लागणाऱ्या साहित्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचा वापर स्वत: करून बघण्याची संधी त्यांना मिळाली. प्रश्न विचारणं सोपं नसतं. तसंच त्या प्रश्नांमधून आपल्याला हवी ती माहिती मिळवणं ही तर त्याहून कठीण गोष्ट. पण ती गोष्ट या मुलांनी सहजसाध्य केली. भाषाविकासाचा केवढा तरी मोठा टप्पा यामुळे मुलांना गाठता आला. आता आमचं व्यावसायिकांचं नवं बालगीत तयार झालं आहे.

व्यावसायिकांच्या दारी आम्ही गेलो, आम्ही गेलो,

त्यांची हो ओळख करून आलो, करून आलो.

रती भोसेकर – ratibhosekar@ymail.com

 

तुम्ही आहात सर्वार्थाने जोडीदार आपल्या पत्नीचे?

आज अनेक घरांतली स्त्री ही नोकरी- करिअर वा व्यवसाय करणारी, वेगळं काही करू पाहाणारी आणि म्हणूनच खूपच व्यग्र झाली आहे. खूप मेहनत घेऊनही अनेकदा तिला घर आणि नोकरी याच्यातला समतोल साधणं शक्य होतोच असं नाही. मग असमाधान, निराशा, दु:ख, त्यातून होणारी चिडचिड, या गोष्टी येतात. अशा वेळी तिचा पती तिच्या मदतीला आला, त्याने तिच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर तिचा प्रत्येक दिवस आनंदाचा,  समाधानाचा असेल यात शंका नाही. आज अनेक पुरुष अशी मदत करत असतात. म्हणूनच समस्त नवरे मंडळींना (निवृत्त नव्हे)आम्ही आवाहन करतो आहोत, तुम्ही करता असं सहकार्य? अर्थात हे सहकार्य फक्त मदतीपुरतं मर्यादित न राहता एखाद्या कामाची संपूर्ण जबाबदारी, तीही नियमितपणे घेणं अपेक्षित आहे. आपल्या बायकोचा सर्वार्थाने जोडीदार असणाऱ्या पुरुषांकडून आम्ही त्यांचे अनुभव मागवत आहोत. आम्हाला कळवा ३०० शब्दांमध्ये. अनुभव प्रामाणिक हवेत, हे तर खरंच. मात्र पूर्वापार ‘तिच्या’ समजल्या जाणाऱ्या नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या तुम्ही घेता? पारंपरिक पुरुषी मानसिकतेपलीकडे जाऊन तुमच्या पत्नीला तुम्ही नेमकी कशी साथ देता ते आम्हाला कळवा. योग्य अनुभवांना ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. तुमचे हे अनुभव ३० नोव्हेंबपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवा.

पत्रावर ‘जोडीदार सर्वार्थाने’ असा उल्लेख असणे आवश्यक आहे.

आमचा पत्ता – लोकसत्ता, चतुरंग, ईएल – १३८,

टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

ई-मेल – chaturang@expressindia.com किंवा chaturangnew@gmail.com