डॉ. स्मिता लेले
dr.smita.lele@gmail.com
शरीरात जैविक घडय़ाळ असते. बहुधा सगळी छोटी बाळं सकाळी ५-६ वाजता उठतात. तेव्हा आई त्याला दामटून, दूध पाजून झोपवते. तीन वर्षांनंतर मुलं सकाळच्या शाळेसाठी उठायला कुरकुर करायला लागतात, कारण निर्सगत: सूर्योदय झाल्यावर उठायची जैविक घडय़ाळाची सवय त्याच्या आईनेच त्याला लहानपणीच बळेबळे झोपवून बिघडवलेली आहे. दुसरी गोष्ट आहाराची. लहान बाळाला छोटे छोटे घास आपण भरवतो. ते मूल पोट भरलं की फुर्र्र.. करत घास तोंडाबाहेर काढायला लागतं. त्या वेळी आई हा बघ चिऊ, तो काऊ करत, व्हिडीओ बघत खायला लावते. जास्त खायची सवय झालेल्या या मुलांमध्ये पुढे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून श्रेयस काय आणि प्रेयस खाणं काय याचा विचार करायला हवा.
आपण ज्याला पारंपरिक शहाणपण म्हणतो ते नेमके काय? आयुर्वेदात सांगितले आहे की ज्याची कफप्रवृत्ती आहे त्यांनी रात्रीचा भात खाऊ नये किंवा दूध पिऊ नये. आधुनिक अभ्यास केलेले म्हणतात की भात खाल्ला काय आणि पोळी खाल्ली काय, कॅलरी आणि प्रथिने कमी-जास्त होतील त्याचा कफाशी काय सबंध? रात्री खाल्ले काय आणि दिवसा खाल्ले काय, असा काय फरक पडणार आहे? हे खरे नाही, फरक पडतो.
आपलं शरीर ज्या ठिकाणी, प्रदेशात आहे तिथल्या सूर्याच्या उगवण्याशी आपला संबंध असतो. रात्री सूर्य त्या भागात नसला की वातावरणाचे तापमान कमी होते, शरीराची मंद ज्वलनक्रिया आणखी मंद, अति मंद होते. म्हणून जे पिष्टमय पदार्थ आपण खातो त्याचे रूपांतर कफासारखं बनण्याची रासायनिक क्रिया सहज होते. भात जर खूप वेळ शिजवला तर त्याची चिकट पेज तयार होते. रासायनिक क्रिया तीच आहे, फक्त घडण्यासाठीचे तापमान आणि संप्रेरकं वेगळी आहेत. आपले शरीर लबाड किंवा हुशार आहे. आपण एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा रस्ता असेल तर लांबच्या रस्त्याने जात नाही, नेमके तसेच आपले शरीरसुद्धा वागते. रात्रीच्या वेळी थंडावा आहे, कुठे हे पिष्टमय पदार्थ आंबवायचे, त्यांची साखर करायची आणि पुढे प्रक्रिया करा, रक्तात सामावून घ्या. कोणी सांगितले एवढे उपद्व्याप? झटपट पेजेसारखे कफपदार्थ बनवूया, असं म्हणतं. आणि म्हणून असे पदार्थ रात्री खाल्ले आणि ज्यांची कफप्रवृत्ती असेल, तर अन्नाचे कफात रूपांतर होणे सहज शक्य होते. म्हणून रात्री असे पदार्थ खाणे टाळावेत. आवडत असतील तर सकाळी उठून खा, दुपारी खा. तुम्ही दिवसभर भरपूर हलचाल करणार असल्याने त्याचे पचन पूर्णपणे होते.
जेव्हा मी थंड हवेच्या प्रदेशात, अमेरिकेला पहिल्यांदा गेले, तेव्हा दालचिनीच्या वासाचे गोड पदार्थ, विशेषत: केक किंवा रोल खाताना खूप चमत्कारिक वाटलं, गोड पदार्थाला दालचिनीचा वास? भारतामध्ये तर आपण केशर, वेलची, जायफळ गोड पक्वान्नांमध्ये घालतो. वेलची थंड आहे आणि लवंग, दालचिनी उष्ण आहे. म्हणजे नेमकं काय? जर खाद्यपदार्थाचे तापमान मोजलं तर वापरलेल्या मसाल्याप्रमाणे ते वेगळं होतं का? अर्थातच नाही. याविषयी खोलवर विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की थंड हवेच्या प्रदेशामध्ये खाताना तिखट अन्न काळी मिरी घालून खातात आणि गोड पदार्थामध्ये दालचिनी वापरतात. थंड आणि उष्ण याची एक वैज्ञानिक सुटसुटीत व्याख्या (पुस्तक किंवा पब्लिश पेपरची नाही) साध्या माणसाला समजेल अशी मी केली आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट प्रसरण पावते तेव्हा थंड होते आणि आकुंचन पावते तेव्हा उष्णता निर्माण हाते, हे भौतिकशास्त्र आहे व स्नायूविषयी इडा-पिंगळा (चंद्र-सूर्य) नाडय़ा म्हणजे असेच काहीसे. दुसरा विचार म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरात पाणी साठविले जाते तर त्याला म्हणायचे थंड आणि जेव्हा तुमच्या शरीरात कोरडेपणा येतो त्याला म्हणायचे उष्ण!
प्रत्येक रसायनाला स्वत:चे गुणधर्म असतात. लवंगतेल शरीरातील पाणी बाहेर टाकतं किंवा स्नायू आकुंचित करतं. तर वेलचीमुळे विरुद्ध परिणाम होतो. म्हणून काश्मीरमध्ये थंडीतून माणूस आला की, पाण्यामध्ये केशर घालून केशराचा चहा (कावा) दिला जातो. हा चहा जर तुम्ही मुंबईत किंवा चेन्नईमध्ये उन्हातून आल्यावर दिला तर तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होणार. यालाच पारंपरिक शहाणपण म्हणता येईल. अशीच आणखी एक गमतीदार गोष्ट मला अमेरिकेत दिसली, हिमवर्षांव होत असताना लोक चक्क आइस्क्रीम खात होते. आपल्याकडे लहान मुलाला आइस्क्रीम खायचं असेल तर आई म्हणते, ‘‘अरे-अरे आइस्क्रीम खाऊ नकोस, उन्हाळा आहे, बाधेल. सर्दी होईल, घसा खराब होईल.’’ अमेरिकन आईला मुलाची काळजी नाही का? न्यू यॉर्कच्या रस्त्यावर चक्क बर्फ आहे आणि तरीही मुलं आइस्क्रीम खात आहेत. पुन्हा एकदा मी माझा वैज्ञानिक डोळा उघडला, काही लोकांशी चर्चाही केली आणि खूप मजेदार गोष्ट माझ्या नजरेसमोर आली. खूप थंड हवेच्या प्रदेशात जेव्हा बाहेर प्रचंड गारवा आहे आणि तुम्ही घराबाहेर फिरत असाल (अर्थातच उबदार कपडे घालून) तर तुम्ही चक्क गारच खायचं असतं. तुम्ही जर तेव्हा गरम सूप प्यायलात तर पाच ते दहा मिनिटांत रक्तप्रवाह वाढून तुम्हाला खूप घाम येतो आणि अधिक थंडी वाजते. आणि मुख्य म्हणजे ती बाधू शकते. तर गंमत पाहा बाहेर थंडगार वातावरण आहे. सूप प्यायलो तर सर्दी होईल आणि आइस्क्रीम खाल्लं तर काहीच होणार नाही. (घरात बसून मात्र तुम्ही गरम सूप पिऊ शकता.) तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मुंबईसारख्या उष्ण शहरात येता-जाता गरम चहा पितो (हल्ली फॅशन म्हणून कॉफी). उष्ण प्रदेशात जेव्हा आपण चहा पितो तेव्हा उकडल्यामुळे घाम येतो आणि गार वाटते. जसे पाणी माठामध्ये गार होतं. तसा घाम आला की त्वचेला थंडावा मिळतो. म्हणून उष्ण प्रदेशात चहा पिऊन तरतरी येते.
मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा निसर्गत: त्यांच्यात काही सवयी असतात तर इतर काही गोष्टी आपण संस्काराने मुलांना शिकवितो. एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे शरीराचे जैविक घडय़ाळ (बायोलॉजिकल क्लॉक). तीन महिन्यांच्या आधी बाळ दिवसातील २० तास झोपते. तो भाग सोडून द्या, पण तीन-चार महिन्यांनंतर मूल हळू हळू कमी झोपायला लागते. बहुधा सगळी छोटी बाळे सकाळी ५-६ वाजता उठतात. तेव्हा आई त्याला दामटून, दूध पाजून झोपवते कारण तिला झोपायचे असते. तीन वर्षांनंतर मुलं सकाळच्या शाळेसाठी उठायला कुरकूर करायला लागतात कारण निर्सगत: सकाळी सूर्योदय झाल्यावर उठायची जैविक घडय़ाळाची सवय (संगणक प्रोग्राम) त्याच्या आईनं त्याला लहानपणीच बळेबळे झोपवून बिघडवलेली आहे. दुसरी गोष्ट आहाराची. ७-८ महिन्यांचं बाळ किंवा १ वर्षांचं मूल. जेवणाचे छोटे छोटे घास आपण त्यांना भरवतो. ते मूल पोट भरले की फुर्र्र.. करत घास तोंडाबाहेर काढायला लागते. त्या वेळी आईला वाटतं की त्यानं खूप खावं. पटपट खाऊन झटझट मोठं व्हावं. अशा वेळी ती आई बाळाशी बोबडं बोलते. ‘‘हा बघ चिऊ, तो काऊ.’’ भरवला एक घास! व्हिडीओ समोर लावला की मुलं दोन घास जास्त खातात म्हणून आई-बाप अशा प्रकारे जास्त जेवायची सवय लावतात. हे योग्य नाही. यामुळे जास्त खायची सवय लागून पुढच्या आयुष्यात होणाऱ्या आरोग्याच्या समस्या, स्थूलता यांना आमंत्रण मिळते. निसर्गत: त्याच्या पोटाला जेवढी गरज आहे तेवढं खाल्ल्यावर एक तृप्ती येते. अन्न नकोसं वाटतं. हा नैसर्गिक सिग्नल वा इशारा खाणाऱ्याच्या मनाआड किंवा दृष्टीआड करून त्याच्या मेंदूला दुसऱ्या कामात गुंतवून, भुलवून अति खायला घातल्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये साधारण १०-१४ वर्षांच्या मुलांमुलींमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढलं आहे. त्या वेळी आई -वडील त्याला चॉकलेट खाऊ नको, आइस्क्रीम खाऊ नकोस, कमी खा अशा सूचना देत राहते, पण उपयोग नसतो. म्हणजे, लहानपणी तो जेव्हा सकाळी उठत होता तेव्हा त्याला जबरदस्तीनं झोपवलं गेलं. त्याची निसर्गत: सवय मोडली. आणि शाळेसाठी त्याला जबरदस्तीनं उठवणं सुरू झालं. म्हणजे त्याचा आहार आणि झोप या दोन्ही नैसर्गिक सवयी पालकांनीच बिघडवल्या.
दुसरे उदाहरण म्हणजे कॉल सेंटरमध्ये काम करणारा तरुण वर्ग. भारतामध्ये राहून हा वर्ग अमेरिकेच्या घडय़ाळाप्रमाणे जीवनमान जगतात. रात्रभर काम करायचं आणि पहाटे ४ वाजता झोपायचं. दुपारी १२ वाजता उठायचं, त्याच्यानंतर ब्रंच- नाष्टा + जेवण एकत्र खायचं. सगळा उलटसुलट दिनक्रम. मी एकदा विचार केला, काय फरक पडतो, आपल्या इथे रात्र झाली तरी कुठेतरी उजेड आणि सूर्य आहे ना? माझ्या शरीराला का फरक पडतो? समजा मी शरीराला रोज रात्री १२ वाजता उठायचे आणि दुपारी १२ वाजता झोपायचं अशी सवय लावली तर काय बिघडलं? मी जेव्हा यावर मूलभूत विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या शरीराची अनच्छिक संस्था, ‘इनव्हॉलेंटरी नव्र्हस सिस्टिम’वर आपलं नियंत्रण नाही. शरीरामध्ये हजारो वर्ष जुना कॉम्प्युटर प्रोग्राम लिहिलेला आहे. त्यामुळे शरीरात तयार होणारे पाचक रस व इतर रसायने यांचा सूर्योदयाशी संबंध जोडलेला आहे. सकाळी तरतरीत, दुपारी एकदम उत्साहवर्धक, काळोख पडल्यावर हळू हळू शरीराची दमलेली स्थिती असते. म्हणजे शरीरातील जी द्रव्ये अन्न पचण्यासाठी लागतात ती मध्यरात्री तयार होत नाहीत, कारण तेव्हा पोटही विश्रांती घेत असतं. सूर्य हाच संपूर्ण सजीव सृष्टीसाठी ऊर्जास्रोत आहे.
जे एक घडय़ाळ निसर्गानं आपल्या शरीरात बसवून आपल्याला जन्माला घातलं आहे, त्याचा आदर करायला हवा. वयाच्या साधारण ३ ते ६ महिन्यांपर्यंत दर चार तासांनी दूध पिण्याची सवय लावता येते. अशा प्रकारे २४ तासांत ६ ऐवजी ५ वेळा अन्न व एकदा ८ तासांचा रात्रीचा उपास ही आदर्श सवय आहे. मूल खातं तितक्या वेळेला शीलाही जातं. म्हणजे ते शरीरातील पचनसंस्था एका आदर्श जैविक सयंत्र (आयडियल बायोरियाक्टर) असल्यासारखं काम करतं. पुढे आपण त्याच शरीराला ‘नॉन आयडियल’ करतो. मोठेपणी पाच वेळा खाणं शक्य आहे, परंतु तितक्या वेळा शौचाला जाणं हे गैरसोयीचं आणि हास्यास्पद ठरेल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपली पचनसंस्था ही एखाद्या बायोरिअॅक्टरसारखी आहे. म्हणून आवडीचे (प्रेयस) खाताना योग्य (श्रेयस) अन्नसुद्धा आहारात असणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञानाच्या मते, अन्नाचा उपयोग केवळ खाणे म्हणून नसून औषधाप्रमाणेसुद्धा करता येईल. याला प्रोबायोटिक, प्रीबायोटिक व सिनबायोटिक असे म्हणतात. त्याविषयी पुढच्या (१५ फेब्रुवारी) लेखात.