रेणू दांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमृतसरमधली ‘सच की पाठशाला’ ही मुलींनी मुलींसाठी चालवलेली अनोखी शाळा आहे. तिथली शिक्षणप्रणाली अनोखी आहे. इथलं सगळं या मुलीच करतात. महाविद्यालयाच्याच मुली शाळेत शिकवतात. या विद्यार्थिनींची समिती प्रत्येक निर्णय चर्चा करून घेते. प्रवेश समिती, गुरुद्वारा समिती, भोजनगृह समिती, ग्रंथालय समिती, प्रशासन समिती सर्व कारभार मुलीच बघतात. इथे कोणी शिपाई नाही, कारकून नाही. वसतिगृहाच्या अधीक्षकही मुलीच. इतकंच नव्हे तर प्राचार्याची निवडही मुलीच करतात. स्वयंशिस्त शिकत इथल्या मुली स्वयंपूर्ण होत जातात.

‘तुमच्या शाळेचं वैशिष्टय़ काय? तुम्ही या शाळेत का आलात?’ याचं उत्तर इथल्या मुली ठामपणे देतात. ‘‘ही ‘सच की पाठशाला’ आहे, मुलींची मुलींनी चालवलेली मुलींसाठीची शाळा.’’ स्त्री-शिक्षणातली ही लोकशाही पंजाबसारख्या राज्यातील एका शाळेत आहे, ज्या राज्यात स्त्रीभृण हत्येचं प्रमाण जास्त आहे.

आज इथे दोन ते अडीच हजार मुली शिक्षण घेतायत, तेही रीतसर शिक्षकांशिवाय. ते आपण गेल्या लेखामध्ये (२० एप्रिल) वाचलंच आहे. हे कसं घडतंय? पैसे कुठून येतात हा पसारा चालवायला? याची स्पष्ट उत्तरे आहेत. मुलीच जर सगळं करतायत तर पैसे कशाला? पैशांसाठी इथली फी ठरवली जात नाही. अनेक गोष्टींतून पैसे वाचवले जातात. कोणतीच गोष्ट श्रमदानाशिवाय होत नाही, हेच तर इथलं वैशिष्टय़! पण तरीही ‘आमच्या मुलींना कामं लावतात’ म्हणून कुणी तक्रार करत नाही, कारण ‘आम्ही हे सर्व स्वेच्छेने करतो’ असं उत्तर मुली ठामपणे देतात. ‘हे आमचंच आहे,’ असंही सांगतात. विद्यार्थिनीची समिती आहे. प्रत्येक निर्णय इतर मुलींच्या मदतीने, मताने ही समिती घेते. या मुख्य समितीत पाच सदस्य आहेत. यांची निवड लोकशाही पद्धतीनं होत असली तरी पाया ‘सच’चा आहे. हे पाच जण सचिवाची निवड करतात. नंतर वेगवेगळ्या समित्या बनवल्या जातात. यात प्रवेश समिती, गुरुद्वारा समिती, भोजनगृह समिती, ग्रंथालय समिती, प्रशासन समिती, अ‍ॅकेडमिक समिती आदी समित्या सर्व कारभार बघतात. इथे कोणी शिपाई नाही, कारकून नाही. इतकंच काय, शिक्षकही मुलींमधलेच. वसतिगृहाच्या अधीक्षकही मुलीच. शिवाय जे प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल्स मुली, मुलींमधले शिक्षक करतात. ते काम इथल्या बी. एड. / डी. एड. शिक्षकांनाही करावं लागतं. प्रत्येक वर्गासाठी एक मुलगी कारकुनाचं काम करत असते जी फोन जमा करणं, हिशोब ठेवण्याचं काम करते. प्राचार्याची निवडही मुलीच करतात.  एकदा तर गैर वागले म्हणून इथल्या मुलींनी प्राचार्याकडून दंड आकारला. घडलं असं की एकदा उपायुक्त महाविद्यालयामध्ये आले होते, तेव्हा त्यांना काही सहयोग देण्याची इच्छा होती. प्राचार्यानी गरजेची यादी करून दिली. ही गोष्ट विद्यार्थी समितीला सांगितली गेली नाही. तेव्हा समिती प्राचार्याकडे आली आणि त्यांनी प्राचार्याना केवळ दंडच नाही आकारला तर ‘पुन्हा असं घडता कामा नये’ अशी सूचनाही दिली.

संस्थेची १५ एकर शेती आहे. शेतीची सर्व कामं मुली करतात. दोन वेळचा स्वयंपाक मुली करतात. कोण जेवण करणार त्या १५ जणींच्या ग्रूपला दोन महिने आधी कळतं. स्वयंपाक काय करायचा हे मुली ठरवतात. सर्व मुलींना लागणारं धान्य, भाजीपाला मुली पिकवतात. उसाची शेती आहे. गुऱ्हाळ आहे. रस प्यावासा वाटला की मशीन सुरू करतात. रस पितात. फळफळावळे मुलींना दिली जातात. महाविद्यालयाचे स्वत:चे सोलर पॉवर स्टेशन आहे. गोशाळा आहे. दूध काढणं, मोजणं हा इथल्या शिक्षणाचा एक भाग आहे नि झोपाळ्यावर बसून झुलणं हाही जगण्यातला आनंद-शिक्षणाचा एक भाग आहे. पाच गोबर गॅस प्लँट आहेत. कधी जेवण बनवायला चूलही पेटवली जाते. गुरांना लागणारा चारा कापण्याचे कामही मुली करतात. गवत कापण्यासाठी जवळजवळ पाचशेच्यावर खुरपी आहेत. ‘खुरपे नाही म्हणून बसून राहिलो.’ असं घडत नाही. सकाळी ४५ मिनिटं त्यासाठी दिली जातात. अगदी प्रामाणिकपणे! केली नाही तर कबुली देतात, कारण सांगतात, ‘सच की बानी!’

मी गेले त्या दिवशी मुलींना शिकवताना पाहिलं आणि अक्षश: चकित झाले. इथे कोणाला ‘सो कॉल्ड’ प्रशिक्षण कार्यक्रम नाही. माझ्यातल्या साच्यातल्या शिक्षकानं विचारलं, ‘‘प्रशिक्षण नाही मग कसं काय शिकवू शकतात?’’ तिथल्या विद्यार्थिनी शिक्षकेनं उत्तर दिलं, ‘‘मुली मुलीच शिकतात. आम्हीपण शिकतोच त्यांच्याबरोबर.’’ तिनं पंजाबी-हिंदी भाषेत उत्तर दिलं. ‘लर्निग टू लर्न’ हे खरं घडत होतं. ‘कन्स्ट्रक्टिविजम’ वगैरे भानगड इथे प्रत्यक्ष होती. कारण औपचारिक शिक्षक नव्हतेच. ‘‘घरपे तैयारी करके आते है। पढते है, पढाते भी है!’’ मुली सांगत होत्या. ‘‘मुलींमध्ये खूप काही असतं आपण त्याचा योग्य वापर करत नाही’’ असं दीदींचं म्हणणं होतं. त्या म्हणाल्या, ‘‘ही शाळा चालवणाऱ्या मुलीच आहेत. आम्ही सगळे इथे ‘अजनबी’ आहोत. त्यांचं काम आहे. त्यांनीच करावं. विचार प्रामाणिक असतील तर सत्य समोर येतं.’’

दुपारची सुट्टी झाली. मुलींबरोबर बोलताना जाणवलं प्रत्येक मुलीत आपलेपणा आहे, प्रत्येक मुलीत आत्मनिर्भरता आहे. प्रत्येक मुलीत बांधिलकी, जिद्द, जिव्हाळा आहे. किती विलक्षण होतं ते ! बी. ए. तृतीय वर्षांचा वर्ग सुरू होता. वर्ग संपल्यावर तिथली विद्यार्थिनी बी. ए. द्वितीय वर्षांच्या वर्गात शिक्षिका म्हणून उभी राहिली. इकडे मैदानात दहा-दहाच्या गटांना एकेका वर्गातली एकेक मुलगी शिकवत होती. नि थोडय़ा वेळाने गरजेनुसार ‘इच वन – टीच वन’साठी मुली जोडय़ा-जोडय़ात बसल्या. त्याच वयाच्या मुली आपल्या वर्गातल्या गटाबरोबर काम करत होत्या. सरावानं हे त्यांना जमतं. कोणतं प्रशिक्षण नाही, समजेल असं शिकवणं एवढंच महत्त्वाचं नि समजेपर्यंत शिकवणं – अडेल तिथे मदत घेणं असं घडत होतं.

हे महाविद्यालय गुरुनानक देव विश्वविद्यालयाशी संलग्न आहे नि शाळा पंजाब बोर्डाशी. महाविद्यालयाचे नाव ‘बाबा आयासिंग रायरारकी कॉलेज’ असं असलं तरी तिथे नर्सरी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. महाविद्यालयाच्या मुलींनीच एकमेकांना शिकवणं, बी. ए. प्रथम वर्षांच्या मुलींनी त्याखालच्या वर्गातल्या म्हणजे बारावीला शिकवणं अशी उतरती रचना आहे. गुणवत्ता आणि दर्जा, नीतिमूल्ये, श्रमसंस्कार, स्वयंसेवा, सच्चाई (सत्याचे प्रयोग) स्वयंशिस्त आणि स्वावलंबन हे इथे संस्कारांचाच भाग आहे. प्रत्यक्षात मुलींनीच मुलींचे शिक्षक होणं हा अनोखा प्रयोग इथे यशस्वीपणे सुरू आहे. हे सर्व पाहतानाच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. नेहमीच्या अभ्यासक्रमाबाहेर पडायची इच्छा आहे. तरीही आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करताना मैदानाची रचना, मैदानावर निर्माण केलेली शैक्षणिक साधने, हे सर्वच वेगळे आहे. इमारती मोठय़ा असल्या तरी साध्या आहेत.

मी वर्ग बघितले. मग मैदानावर आले. एका मैदानात मुली सांस्कृतिक कार्यक्रमावेळी एकत्र येतात. दुसरं मैदान व्हॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन यासाठी आहे. तिसऱ्या मैदानात शैक्षणिक साधनांची मांडणी आहे. एका चबुतऱ्यावर खूप मोठा पृथ्वीचा गोल आहे. फाळणीपूर्वीचा आणि नंतरचा भारत नकाशाच्या रूपात सिमेंटमध्ये जमिनीवर बनवलाय. भारताच्या नकाशात वेगवेगळे रेल्वेमार्ग सायकलच्या चेनचा वापर करून दाखवले आहेत. सगळ्या मुली गोलगोल बसतील अशी बैठकव्यवस्था आहे. कडेला हिंदी, पंजाबी, इंग्रजी, उर्दू या चार भाषांतली मूळाक्षरं, अंक आहेत. सर्व वर्गाच्या बाहेर मोठे-मोठे सूचना फलक आहेत. त्यावरील साहित्य सतत बदलले जाते. कोणते साहित्य फलकावर लावायचे हाही निर्णय मुली घेतात. विशेष असं वाटलं, की शैक्षणिक साहित्याचा आकार मोठा, ठसठशीत आहे. सर्व साधने जमिनीवर ठेवलेली आहेत. ही साधने जाता-येता सहज बघणाऱ्या मुलीही दिसल्या. मुली उत्साही आणि नीटनेटक्या होत्या. विशेष म्हणजे नटणं मुरडणं अजिबात नव्हतं.

लग्नानंतर प्रत्येक मुलगी एक-दोन वर्षांनी आपल्या सासूला घेऊन शाळेत येते, महाविद्यालयातही जाते आणि तिथे सासू आपल्या सुनेबद्दल बोलते. यात बहुधा प्रत्येक सासूबाई सांगतात, ‘‘माझ्या सुनेला शेतातलं काम करायला, दूधदुभतं-शेणगोठा करायला, सगळा स्वयंपाक करायला जसा येतो तसं शिकवता येतं, विणकाम-शिवणकाम येतं, तसाच कॉम्प्युटरही येतो. इतरांना शिकवताही येतं. मुख्य म्हणजे सर्व काही ‘सच्चे’पणाने ती करते. मी खूश आहे..’’

अजबच आहे! सकाळी नऊपासून साडेतीनपर्यंत सगळीकडे सगळेजण कामात दंग! जो तो आपापलं काम करत असतो. मोठी माणसं दिसतच नाहीत. खरंच ही शाळा ‘सच की पाठशाला’ आहे. मुलींनी मुलींसाठी चालवलेली ‘सच की कार्यशाळा’च आहे.

(समाप्त)

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com