केतकी जोशी

दोन व्यक्तींमधल्या शरीरसंबंधांच्या क्लिप्स एकाच्या संमतीशिवाय दुसऱ्यानं मुद्दाम ‘व्हायरल’ करणं, अर्थातच समोरच्या व्यक्तीच्या बदनामीसाठी; म्हणजे ‘रिव्हेंजपॉर्न’. हा विषय तसा नवा नाही, पण सध्या तो प्रचंड चर्चेत आलाय, तो जॉर्जिया हॅरिसन या एका समाजमाध्यमसेलिब्रिटीच्या प्रकरणामुळे. आपल्या संमतीशिवाय आपले असे व्हिडीओपसरवणाऱ्यापूर्वाश्रमीच्या मित्राला जॉर्जियानंनेटानंन्यायालयीन लढा देऊन धडा शिकवला. अशा पुरुष जोडीदाराला तुरुंगवासाची शिक्षा होण्याचं नुकतंचघडलेलं हे दुर्मीळ प्रकरण जाणून घ्यायलाच हवं..

Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Neil Gaiman sexual misconduct
Who is Neil Gaiman: ‘लहान मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार’, ८ महिलांचे प्रसिद्ध लेखकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Torres
Torres Scam : टोरेस फसवणूकप्रकरणी आरोप असलेले सीए अभिषेक गुप्तांची न्यायालयात धाव; वकील म्हणाले, “युक्रेनिअन माफिया…”
Same Sex marriage
Same Sex Marriage : “समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच”, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली; नेमकं कारण काय?

‘ती’ एकदम आधुनिक विचारांची, स्वच्छंद, मनस्वी तरुणी! स्वप्नं पाहणारी आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करत राहणारी, सोशलमीडियावरचीसेलिब्रिटी. आधी रिलेशनशिपमध्ये असलेल्या माजी जोडीदाराबरोबर करोनाच्या टाळेबंदीच्या काळात तिची जवळीक वाढली. त्यांच्यात जे काही घडलं ते दोघांच्या संमतीनं होतं, दोघांचंच होतं. पण ते फक्त दोघांपुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांच्यामधल्या अत्यंत खासगी गोष्टी, त्यांच्या शरीरसंबंधाच्या व्हिडीओक्लिप्स‘व्हायरल’ झाल्या. तिच्यासाठी हा धक्का होता. ती कोलमडली.. पण मोडली नाही. आपल्यावर झालेल्या या अन्याया- विरोधात ती उभी राहिली, लढली आणि जिंकलीही. जगभरात‘रिव्हेंजपॉर्न’ या संकल्पनेवर तिच्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ती आहे जॉर्जिया हॅरिसन.

हेही वाचा >>> मला घडवणारा शिक्षक: पित्याने दिला ज्ञानरूपी वसा

खरं तर जॉर्जियाच्या बाबतीत जे घडलं, ते कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. किंबहुना तसं घडलंही आहे. जॉर्जियाचं वैशिष्टय़ हे, की ती सेलेब्रिटी असून या ‘रिव्हेंजपॉर्न’च्या विरोधात स्वत:ची ओळख न लपवता उभी राहिली, बोलली आणि तिनं तिच्यावरच्या अन्यायाची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यामुळे तिची फसवणूक केलेल्या स्टीफन बेअरला  शिक्षा मिळाली. जॉर्जियाच्या बाबतीत जे घडलं, ते जाणून घेण्यापूर्वी ‘रिव्हेंजपॉर्न’ म्हणजे काय हेही पाहायला हवं.

‘रिव्हेंजपॉर्न’ म्हणजे एका अर्थी तुटलेल्या नात्याचा सूड उगवण्यासाठी केलेला उद्योग. सहसा अशा पोस्ट त्या व्यक्तीचा आधीचा जोडीदार म्हणजे ‘एक्स-पार्टनर’ (आधीचा बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड किंवा लाइफ पार्टनर) करतो. ज्यांच्यात भांडण आहे किंवा एकमेकांपासून कटू कारणांमुळे विभक्त झाले आहेत, अशा वेळी तिचा वा त्याचा अपमान करण्याच्या, त्या व्यक्तीला बदनाम करण्याच्या हेतूनं त्या व्यक्तीच्या अश्लील किंवा उत्तेजक इमेजेस किंवा व्हिडीओसमाजमाध्यमावर अर्थातच त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय टाकल्या जातात, व्हायरल केल्या जातात. सहसा याबद्दल बोलायला कुणी पुढे येत नाही. कारण ज्या व्यक्तीचे फोटो, व्हिडीओ पोस्ट झालेले असतात, तिची आधीच भरपूर बदनामी झालेली असते. पण जॉर्जियानं आपल्यावरच्या बदनामीचा डाग पुसण्यासाठी लढायचं ठरवलं.

कोण आहे जॉर्जिया हॅरिसन?

मूळची लंडनची असलेली जॉर्जिया हॅरिसन रिअ‍ॅलिटीशो स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. २०१४ मध्ये ती पहिल्यांदा The Only Way Is Essexlया लोकप्रिय शोच्या १३ व्यासीझनमध्ये दिसली. त्यानंतर  ‘Love Island’‘Celebrity ghost Hunt’ या शोजमध्येहीतिनं काम केलं. ‘The Challenge’ या शोमध्ये असताना तिची भेट टेलिव्हिजनपर्सनॅलिटी स्टीफन बेअरशी झाली. ते दोघं एकमेकांना काही काळ- म्हणजे जुलै २०१९ पर्यंत डेट करत होते. स्टीफन बेअर हा ‘Celebrity Big Brother’या शोचा विजेता होता.

जॉर्जिया आणि स्टीफन दोघे एकमेकांना डेट करत असले, तरी ते एकमेकांत गुंतले नव्हते. पण पुन्हा त्यांची भेट झाली आणि ही भेट मात्र दोघांनाही चांगलीच लक्षात राहणारी ठरली. झालं असं, की टाळेबंदीच्या काळात सगळेजण आपापल्या घरात होते. एकटी राहणारी जॉर्जिया एकटेपणाला कंटाळली होती आणि तिच्या समोरच्याच घरात राहात होता, तिचा हा एके काळचा सहकारी,

को-स्टार स्टीफन बेअर. स्टीफन बेअरनं तिला चहासाठी बोलावलं. तिथं जाणं ही काही फारशी चांगली कल्पना नाहीये, असं तिला वाटलंही. पण तरी एकटेपणाला कंटाळलेली जॉर्जिया एका बेसावध क्षणी स्टीफनकडे गेली. सकाळी चहापासून सुरू झालेल्या दोघांच्या गप्पा दुपारचं जेवण, त्यानंतरची ‘टकिला’इथपर्यंतयेऊन पोहोचल्या. त्यानंतर त्यांच्या जवळिकीचं रूपांतर अगदी ‘इंटिमेट’ अशा क्षणांत झालं. दोघांमध्ये याआधीही शरीरसंबंध आले होते, पण आताचा स्टीफन जॉर्जियाला अधिक मोकळा वाटला. तो अनुभव जॉर्जियाला सुखावून गेला. मात्र त्या वेळेस तिला वाटलंही नव्हतं, की याचंच रूपांतर पुढे भयावह आणि दु:खद घटनांत होणार आहे. नंतर सहज गप्पा मारताना स्टीफननं तिला सांगितलं, की आपण आता जे केलं, ते सीसीटीव्हीमध्येरेकॉर्डझालेलं असू शकतं. हे ऐकल्यावर जॉर्जिया चमकली. त्यानं तिला ते फुटेजही दाखवलं. ते बघितल्यावर तिला रडू कोसळलं. ‘ही व्हिज्युअल्स तू आधी डिलीट कर, कुणालाही दाखवू नकोस. हे जर कुणी पाहिलं तर मी मरून जाईन,’ असं जॉर्जियानं त्याला सांगितलं. त्यावर हे फुटेज आपण डिलीट करणार असल्याचं आश्वासन स्टीफननं तिला दिलं. प्रत्यक्षात मात्र त्यानंतसं केलं नाही.

हेही वाचा >>> पाहायलाच हवेत: वहिवाटेच्या पलीकडचा प्रवास

तीन महिन्यांनंतर स्टीफननं त्यातली काही दृश्यं त्याच्या व्हेरिफाईड असलेल्या ‘फॅन्सओन्ली’च्या अकाऊंटवर टाकली. काही क्षणांत इंटरनेटवरून ती जगभरातव्हायरल झाली. त्यानंतर एका वेबसाइटवरही ती व्हायरल झाली. इतकंच नाही, तर गूगलवर‘Georgia Harrison sex tape’हे काही काळ ‘टॉपसर्च’मध्ये राहिलं. 

या सगळय़ाचा जॉर्जियाला काहीच पत्ता नव्हता. तिला तिच्या अमेरिकेतल्या एका फॅननं या दृश्यांचा स्क्रीनशॉट काढून पाठवला आणि ‘तू हे पाहिलंस का?’ असं विचारलं. ते पाहून ती हादरून गेली. ती थेट पोलिसांकडे गेली. परिणामस्वरूप स्टीफन बेअरला अटक करण्यात आली, त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि त्याला शिक्षा सुनावण्यात आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये, म्हणजे अगदी नुकतीच स्टीफन बेअरला खासगी लैंगिकफोटोग्राफ्स आणि फिल्म्स बदनामी करण्याच्या हेतूनं पसरवल्याच्या आरोपाखाली २१ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

जरी दोघांच्या संमतीनं शरीरसंबंध प्रस्थापित झाले असले, तरी त्यांच्यातल्या नाजूक क्षणांचे फोटो, व्हिडीओ अशा प्रकारे पसरवण्याला ‘knon consensual pornography’किंवा ‘image based sexual abuse’असं म्हटलं जातं. ‘क्रिमिनलजस्टिसअ‍ॅण्डकोर्टस्अ‍ॅक्ट २०१५’द्वारे इंग्लंड आणि वेल्समध्ये मध्ये त्याविरोधात कायदा करण्यात आला. खासगी सेक्शुअलइमेजेस प्रसिद्ध करण्याची धमकी देणं हाही गुन्हा ठरवण्यात आला. नंतर अशा कृत्यामागील बदनामीचा वा त्रास देण्याचा हेतू सिद्ध होणंही बंधनकारक ठेवण्यात आलं नाही.  

फोटो, व्हिडीओजव्हायरल झाल्यापासून ते स्टीफनला शिक्षा होईपर्यंत लढण्याचा प्रवास जॉर्जियासाठी मुळीच सोपा नव्हता. आपल्याबद्दलचे अशा अवस्थेतले व्हिज्युअल्सजगभरातपाहिले जात असल्याचा धक्का जबरदस्त होता. आपल्या घरच्यांना हे कळलं तर काय होईल, असा विचार तिच्या मनात आला. तिच्या आईला हे माहिती होतं. ती तिच्या वडिलांशी, काकांशीही बोलली. तिच्या घरातल्यांनासुद्धा धक्का बसला होता, पण ते सगळे जण तिच्याबाजूने उभे राहिले. त्यामुळे तिला लढायला अधिक बळ मिळालं.

हेही वाचा >>> शोध आठवणीतल्या चवींचा!: भौगोलिक विविधतेतील खाद्यसंस्कृती

स्टीफन आणि जॉर्जिया आधीही एकत्र होते. तो वागायला विचित्र होता, ‘वूमनायझर’ होता, हे सगळं माहिती असूनही एका बेसावध क्षणी जॉर्जिया मोहाला बळी पडली. जगभरात‘रिव्हेजपॉर्न’ घटना नवीन नाहीत आणि त्यावर न्याय मिळणंही नवीन नाही. अगदी भारतातही अशा घटना घडल्याचं समजतं. मात्र आपल्याकडे असं काही झालं की ‘समाज काय म्हणेल’ हीच भीती प्रत्येकाच्या मनात आधी येते. करिअर, लग्न, संसार, सामाजिक प्रतिष्ठा अशा विळख्यात अडकलेल्या किती तरी जणी आपल्यावरचे अत्याचार सहन करत राहतात. त्यातूनही ज्या काही थोडय़ा जणी पुढे येतात, त्यातल्या अनेक पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकतातच असं नाही. चौकशीचा ससेमिरा, कायदेशीर कारवाया, यामुळे वैतागलेल्या स्त्रिया सगळं अर्धवट सोडून देतात. त्यामुळे अशा प्रकरणांत आरोपीलातुरुंगवास होणं ही एक दुर्मीळ गोष्ट मानली जाते. त्यातही जॉर्जिया प्रकरणात स्टीफनसारखा लोकप्रिय चेहरा अडकलेला होता. अशा वेळेस ‘त्याच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेण्यासाठी हे केलं असावं,’ असं सहज म्हटलं जाऊ शकत होतं. पण तरीही जॉर्जिया त्याच्याविरोधात उभी राहिली. त्याच्याबद्दलच्या बातम्या जगभरातील वृत्तपत्रं, वेब पोर्टल्सवर झळकल्या. स्टीफनसारख्या अनेकांना त्यातून नक्कीच कडक संदेश गेला असेल. ही शिक्षा सुनावली गेल्यानंतर लंडनमधील सरकारच्या revenge pornया हेल्पलाइनवरयेणाऱ्याकॉल्समध्ये ५६ टक्के वाढ झाल्याचं कळतंय.  

परदेशातली मुक्त संस्कृती, लैंगिक स्वातंत्र्य, अशा अनेक गोष्टी यात अंतर्भूत असल्या तरीही मुख्य मुद्दा आहे फसवणुकीचा. एका एकल आईची एकुलती एक मुलगी असलेली जॉर्जिया फोटोशूट करून मिळालेल्या पैशांत मनासारखं आयुष्य जगत होती. कोणताही ‘गॉडफादर’ नसताना तिनं‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून स्वत:चं करिअर घडवलं. तिनं वयाच्या २१ व्या वर्षी तिचा स्वत:चा प्लॅट घेतला. एके काळचा तिचा मित्र स्टीफन बेअर तिचा शेजारी म्हणून राहायला आला आणि त्यामुळे तिचं आयुष्य बदललं. ती त्याच्या सापळय़ात अडकली. हे सगळं नियोजनपूर्वक घडवण्यात येत होतं, हे तिला खूप उशिरा कळलं. त्याच्या मनात आपल्याबद्दल थोडासा तरी आदर, प्रेम असेल अशी वेडी आशा तिला वाटत होती. आपण असं काय वाईट वागलो की त्याने आपल्याला असं बदनाम करावं? हा प्रश्न मात्र तिला छळत राहिला. ते व्हिडीओव्हायरल झाल्यावर तिला काही दिवस बाहेर पडायचीही भीती वाटत होती. अगदी दारात येणाऱ्यापोस्टमननंही तो व्हिडीओपाहिला असेल तर,असं तिला सतत वाटायचं. काही काळ तिनंएकांतवास पत्करला. स्वत:च्या कमाईतून घेतलेला फ्लॅटतिनंभाडय़ानं दिला आणि ती काही दिवस तिच्या आईबरोबर राहायला गेली.

‘चार्मर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेअरची ही दुसरी बाजू जगासमोर आणायला जॉर्जियाला खूप धीर गोळा करावा लागला. या व्हिडीओतली मुलगी जॉर्जिया नाहीच, असा दावाही स्टीफननं केला. तिला आपलं शूटिंग केलं जात आहे हे माहिती होतं आणि त्याबद्दल तिला आक्षेप नव्हता, असंही त्यानंन्यायालयातम्हटलं. आपणच हो फोटोअपलोड केल्याचा पुरावा नसल्याचा दावाही त्याच्या वतीनं करण्यात आला, पण जॉर्जिया

 ठाम राहिली.

जॉर्जियाची घटना प्रातिनिधिक आहे. ‘यापेक्षा वाईट काय घडू शकतं?’ असा सवाल करत आयुष्यातल्या त्या एका घटनेनं जॉर्जियाचं आयुष्य थांबलं होतं. पण ती खूप काळ रडत, कुढत बसली नाही. तिनंमोठय़ा प्रमाणावर जागरूकतेसाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. तिचा हा लढा इतर स्त्रियांना अन्याय सहन करायचा नाही आणि त्याविरुद्धलढायचं, याचा धडा देत राहील.

ketakijoshi.329@gmail.com

Story img Loader