मृदुला भाटकर

एके सकाळी ‘त्यांच्या’ घराबाहेरून नवीन कोरे बूट गायब झाले.. न्यायव्यवस्थेतील व्यक्तीचे बूट गायब झाल्यावर अर्थातच यंत्रणा कामाला लागली आणि शोध सुरू झाला..
एके सकाळी ६ वाजता मला कळलं, की मी काल फिरायला घालून गेलेले आणि दाराबाहेर काढून ठेवलेले नुकतेच घेतलेले बूट गायब आहेत.. वकिली पेशामुळे ‘चोरी’ या गोष्टीशी माझा तसा नेहमीच संबंध आलेला. Taking a fish out of the tank without consent म्हणजे चोरी,’ असं लॉ कॉलेजमध्ये व्याख्या लक्षात ठेवताना शिकवलेलं. मान्यता नसताना मालकाच्या ताब्यातून पळवलेली असते ती चोरी. मग वकिली करताना मी चोरीच्या आरोपींचा बचाव करताना स्वत:ची पर्स सांभाळत, त्यांनी दिलेली फी ‘चोरीचा माल असेल का?’ हा विचार दूर ठेवून न्यायाधीशांसमोर साळसूद चेहऱ्याने मुद्दे मांडायचे. नंतर न्यायाधीशाच्या खुर्चीत बसल्यावर तर चोरलेल्या ३८ सोनसाखळय़ा ज्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्या चोराला शिक्षा देण्याचा प्रसंग आला. तो लोकलमध्ये फक्त सोनसाखळी चोरायचा; म्हणजे पाकीटसुद्धा नाही! त्या वेळी मानसशास्त्राबद्दल सतत गांभीर्याने बोलणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्यामुळे मीही सखोलपणे चोराच्या मानसशास्त्राचा अभ्यास करू लागले. मग मी चोरीवर कविता करायला लागले. एका भावुक कवी मैत्रिणीमुळे ती जशी ढगाला ‘ढगूलं’ म्हणे, तसं मी कोर्टात बसून मनातच चोराला ‘कसं गं ते चोरुलं!’ असं म्हणू लागले. मला काही दिवसांतच हे कळलं, की नजरेची चोरी, मन चोरणं, हा रोमान्स खऱ्या चोरीत नसतोच. कारण पोटाला मन नसतं. गरीब असणं फार वाईट. या आकलनाबरोबर गांभीर्यानं सखोल विचार करण्याचं माझ्या मनावरचं सावटही दूर झालं.

Pedestrian day Pedestrian Policy Pune Municipal Corporation pune news
पदपथांंअभावी पादचारी ‘दीन’
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
scooter caught fire man urinated on it crazy video viral on social media
त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Lakshmi road in Punes Madhya Vasti will open for pedestrians only on December 11
गजबजलेला रस्ता ऐकणार पायरव

तर आता ही बुटाची चोरी. दादर पोलीस ठाण्याला कळवलं. बुटाची ती चोरी; त्यात काय कळवायचं? हा विचार माझ्या मनाला अजिबात शिवला नाही. ती न्यायखात्यातल्या व्यक्तीकडे झाल्यामुळे पोलिसांनी जास्त सतर्क होऊन तातडीने तक्रार नोंदवली. पंचनामाही केला. पोलिसांनी बुटाचं वर्णन, किंमत, कोणती कंपनी, बरंच काही विचारलं. तक्रार नोंदवायला गेल्यावर पोलिसांनी पहिलाच प्रश्न विचारला, ‘मंदिरातून गेले का बूट चोरीला?’ तेव्हा मला एक प्रसंग आठवला. मी वकिली करत असताना एक बनेल पक्षकार माझ्यासमोर बसला होता. मी स्टेनोला दावा सांगत होते. इतर वेळी उद्धटपणे वावरणारा माझा हा पक्षकार आज नजर खाली पाडून शांत बसला होता. तेवढय़ात नवीन पक्षकार आले. मी त्यांच्याशी बोलायला तोंड उघडणार तेवढय़ात तो म्हणाला, ‘‘मॅडम, तुमच्या एका पायात चॉकलेटी अन् दुसऱ्या पायात काळय़ा रंगाचा बूट आहे. मी बराच वेळ विचार करतोय.’’ ‘‘हो हो हो, हे नवीन पद्धतीचे शूज आहेत,’’ असं सांगून घाईघाईत देवळासमोरून वेगवेगळे बूट घालण्याचा मीच केलेला धांदरटपणा लपवला होता अन् दिवसभर याच आत्मविश्वासानं कोर्टात वावरले होते.

हेही वाचा : निद्रानाशाच्या विळख्यात..

तर दादर पोलिसांनी येऊन आमच्या सी.सी.टी.व्ही.चं सगळं फूटेज पाहिलं. ते बराच वेळ म्हणजे पूर्ण दोन दिवस बघत होते. मग जिथे जिथे अनोळखी व्यक्ती दिसल्या त्या त्या व्यक्तींबद्दल आमचा वॉचमन, कामाला येणारी माणसं यांना विचारलं. मला अर्थातच त्या बुटाची आशा नव्हतीच; पण मी उत्साहानं माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना चोरीची बातमी दिली. तितक्याच उत्साहानं बऱ्याच जणांनी ‘होक्का’, ‘अरेच्चा’ करत ती ऐकली.
‘‘निवृत्त न्यायमूर्तीकडे चोरी? बरंच झालं! म्हणजे आता तरी न्यायखात्याला कळेल, की सर्वसामान्यांचा सुरक्षेचा प्रश्न किती ऐरणीवर असतो ते,’’ अशीही एक प्रतिक्रिया. तसं पाहिलं तर, खरं तर न्यायमूर्ती हा सर्वसामान्य नागरिकच असतो. फक्त त्याला करावं लागणारं काम हे फार वेगळं आणि विशेष असतं. यातला गमतीचा भाग म्हणजे त्या सर्वाकडे कोणाच्या तरी चपला-बूट चोरीला जाण्याचा एक तरी किस्सा होताच.
‘‘साहेब, तुमच्या बुटाचा तळाचा भाग कोणत्या रंगाचा होता?’’ मला पोलिसांचा फोनवर प्रश्न आला. अरे देवा, मला हे काही आठवेना. तसा घरचा मदतनीस अरुण म्हणाला, ‘‘मॅडम गुलाबी. मी आदल्या दिवशी बुटानं झुरळ मारलं होतं.’’ अरुणकडे मी कृतज्ञतेचा कटाक्ष टाकून रंग सांगितला.

‘‘साहेब, बूट मिळाले. आमच्या लोकांनी चोरी क्रॅक केली.’’ मला खात्री वाटेना. ‘‘नक्की ते माझेच आहेत का? की दुकानातून आणले?’’ मी सरळ स्पष्टच विचारलं.
‘‘नाही, तुमचेच.. आरोपी पकडलाय. त्याने कबुली दिलीय.’’ मुंबई पोलिसांबद्दल त्यांच्या गणपती उत्सव, नवरात्र या सगळय़ा बंदोबस्ताबद्दल आणि २६/११ च्या घटनेबद्दल प्रचंड कौतुक मला नेहमीच वाटतं. तर पोलीस मंडळी काही दिवसांनी माझ्या घरी दाखल झाली. बूट खरंच तेच होते. दादरच्या पोलिसांनी विशेषत: तिथल्या सी.सी.टी.व्ही. सांभाळणाऱ्या पोलिसांनी कामगिरी केली होती. त्याबद्दल दादर पोलीस ठाण्याला शाबासकी!
‘‘कसं शोधलंत एवढय़ा मोठय़ा मुंबईत?’’
‘‘मॅडम, आम्हाला जो परका माणूस तुमच्या सी.सी.टी.व्ही. फूटेजमध्ये दिसला. तो वर लिफ्टने जाताना रिकाम्या हाताने गेला होता आणि येताना जिन्याने आला, तेव्हा त्याच्या हातात पिशवी होती. मग त्याची छायाचित्रं आम्ही सगळय़ा आमच्या लोकांकडे पाठवली. मग माहितीच्या आधारे खबऱ्यांबरोबर पोहचलो आम्ही गुन्हेगारापर्यंत.’’
‘‘कसे काय चोरले त्याने बूट?’’
‘‘अहो, हे असे चोर ठरवतात एकेक सोसायटय़ा आणि त्यातला मजला. आपल्या चोराच्या त्या दिवशी मनात आकडा आला ७. मग त्यानं ठरवलं की आज चोरी करायची ती सोसायटय़ांच्या सातव्या मजल्यावरच. त्यामुळे लिफ्टनं आठव्या मजल्यावर जाऊन तो सातव्या मजल्यावर जिन्यानं येऊन पटकन बूट पिशवीत घालून जिन्यानं खाली आला. कर्मधर्मसंयोगानं तुमचा मजला सातवा होता.’’

हेही वाचा : सांधा बदलताना : स्थित्यंतराचे पडसाद

‘‘कुठे मिळाला हा?’’ ‘‘हा गिरगावातला. त्याला पकडल्यावर त्यानं काढून दिले बूट.’’
‘‘गिरगावात घर आहे का याचं?’’ ‘‘नाही मॅडम, याला घर नाही.’’ ‘‘म्हणजे?’’
‘‘अहो, हा गर्दुला आहे. गरीब.’’
अरेरे, मी कळवळले. मला खरंच तो आता ‘चोरुलं!’ वाटायला लागला. ‘‘अहो, मीच याला एक हजार रुपये देते बिचाऱ्याला.’’ मी अंदाज बांधला, की बूट विकल्यावरती कदाचित एक हजार रुपये त्याला मिळाले असते. ‘‘मॅडम, अहो हे बूट विकून जेवढे पैसे मिळतील त्यातून तो नशापाणीच करणार. तुम्ही पैसे देऊ नका.’’ मी स्तब्ध!
त्यानंतर चार दिवसांनी माझ्या एका पायाच्या दोन बोटांत बधिरपणा जाणवायला लागला. मग काय दवाखान्यात गेले. डॉक्टर म्हणाले, सगळय़ा हालचाली ठीक आहेत. एमआरआय काढावा लागेल. मी काळजीत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तातडीनं कमरेत, पाठीवर फिजीओथेरपी, डायथर्नी सुरू केली.
दिवाळीत माझ्या मैत्रिणीला, डॉ. अनुजा पुरंदरेला भेटायला गेले. तिला बधिरपणाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, ‘‘बूट नवे आणि नेहमीपेक्षा वेगळे घेतलेस का?’’
‘‘हो.’’ ‘‘मग हे नको. नेहमीचेच घे.’’ मी परत बूट घेतले; पण नेहमीच्या कंपनीचे.
त्यानंतर चालले आणि लक्षात आलं, की आता चालताना कुठे काही दुखत नाही आणि बधिरपणासुद्धा गायब!
आता ते नवे बूट घालून मी रोज चालते..
चालताना तो चोर मात्र सोबत असतो..
chaturang.loksatta@gmail.com

Story img Loader