‘‘गेल्या चाळीस वर्षांचा माझा प्रवास.. प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून.. खूप आणि सातत्याने केलेल्या कामाने मला आनंद जसा दिला तसं समाधानही, पण आता मी आहे मनोरंजनाच्या या इंडस्ट्रीचा एक भाग. सतत धावपळ, अस्थिरता असलेलं हे जग.. आता हवाय थोडा निवांतपणा.. मुक्तपणे, मोकळ्या मनाने करायच्यात भूमिका.. रमायचंय रंगभूमीवर म्हणूनच विसावलेय थोडी या वळणावर..’’ सांगताहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी.
आ त्तापर्यंत अनेक भूमिका केल्या. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळे कंगोरे असणाऱ्या, अभिनेत्रीपण कसाला लावणाऱ्या.. पण या सर्वात एक भूमिका मला जरा जास्तच जवळची आहे, ‘शेवरी’तली विद्याची. कारण त्यात मी वेगळ्या कारणासाठी भावनिकदृष्टय़ा अधिक गुंतले होते. दिलीपचं निधन झालं होतं. आणि बाबाही नुकतेच गेले होते. ज्याला आपण घर म्हणतो ते माझं घरच कोसळलं होतं. अक्षरश: सैरभैर झाले होते मी त्या काळात. भविष्याबद्दल पूर्ण अंधार, सावरणारं कोण तर स्वत:च. त्याच वेळी ही विद्या आली माझ्या आयुष्यात! तिचंही आयुष्य अगदी माझ्यासारखंच, शेवरीच्या पिसासारखं दिशाहीन. एका रात्रीतला हा सिनेमा. पण तिच्या आयुष्याला एक वळण देऊन जातो अशी ती कथा. विद्याचा घटस्फोट झाल्याने तिला घरातून बाहेर पडावं लागलंय आणि त्या दिवशी तिच्या रुममेटच्या भवितव्यासाठी तिला घराबाहेर राहणं गरजेचं आहे. घरहीन, सैरभैर विद्या रात्री साडेदहा वाजता घराबाहेर पडते, कुठे जायचं, काय करायचं माहीत नसलेली विद्या सरत्या आयुष्याचा जमा खर्च मांडत आयुष्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतेय. त्याकाळात विद्याचं आयुष्यच मी जगत होते. दिलीपची खूप इच्छा होती चित्रपट निर्मिती करायची. ती मी पूर्ण करायची ठरवली आणि या चित्रपटात नुसती भूमिकाच केली नाही तर निर्मितीही केली. त्याला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच शिवाय ‘पिस’चा ‘तुकाराम’ पुरस्कारही मिळाला. आजही समाधान वाटतंय ‘शेवरी’ करून. इट्स माय बेबी.. कायम जवळची असलेली..
तिच्यामुळे मी निर्माती झाले आणि अलीकडे ‘महासागर’ करून दिग्दर्शिकाही झाले. पण गेली चाळीस वर्षे.. कदाचित त्याहीपेक्षा जास्त काळ असेन मी अभिनयाच्या क्षेत्रात. सर्वाधिक काम मी अभिनेत्री म्हणूनच केलंय. नाटक केलं, चित्रपट केले, मालिका केल्या, जाहिराती केल्या, शोज केले.. खूप काम केलंय.. सतत कामं केलंय.. सातत्याने काम केलंय.. म्हणूनच आज जेव्हा मी माझ्याकडे बघते तेव्हा अभिनेत्री असणं म्हणजे काय, माझ्यासाठी अभिनय म्हणजे काय हे बघण्याबरोबरच आज मी कुठे आहे, कोणत्या टप्प्यावर उभी आहे, हे बघणंही मला महत्त्वाचं वाटतंय. कारण मी काळाबरोबर चालणारी व्यक्ती आहे. अभिनेत्री म्हणून माझा भूतकाळ खूपच चांगला होता. अजरामर झाल्यात त्यातल्या काही भूमिका, संचित आहे ते माझ्यासाठी! पण म्हणून त्यावर मी अवलंबून नाही राहू शकत. माझ्या वर्तमानकाळात काय किंवा भविष्यकाळासाठीसुद्धा!
म्हणूनच या लेखाच्या निमित्ताने आज मी जिथे आहे, त्या टप्प्यावरून कालचा, आजचा आणि उद्याचा विचार करावासा वाटतोय..
टुडे आय अॅम अ प्रोफेशनल अॅक्ट्रेस. एक व्यावसायिक अभिनेत्री आहे मी आज. कारण मनोरंजनाचं क्षेत्र म्हणजे मोठी इंडस्ट्रीच झालीय. त्याचाच मी एक भाग. एक कलाकार! आज माझं अभिनेत्री असणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. कारण तीच माझी सर्वात मोठी ओळख आहे आणि सर्वात मोठी गुंतवणूकही. जी भूमिका माझ्यासमोर येते तिच्यात जीव ओतायचा. लेखक-दिग्दर्शकाला जी व्यक्तिरेखा अपेक्षित आहे, त्यात माझी म्हणून जी व्हॅल्यू अॅडिशन आहे ती करायची आणि त्यातून बाहेर पडायचं, हेच सध्या मी करतेय.. एकाच वेळी चित्रपट, मालिका तेही कधी मराठी, कधी हिंदी, कधी जाहिराती, मधूनच कधी नाटकंही, असं वेगळ्या पातळ्यांवर काम करत असताना तुम्ही सदा सर्वकाळ एकाच भूमिकेत नाही राहू शकत. पूर्वी जेव्हा मी नाटक करायचे तेव्हा ते शक्य असायचं कारण दुसरं माध्यम नव्हतं त्याकाळी. यामुळे शंभर टक्के फक्त त्याच भूमिकेत, त्याच्या विचारात असणं शक्य असायचं. ‘महासागर’ मधली चंपू काय किंवा ‘हमिदाबाईची कोठी’ मधली शब्बो काय, ती करताना तुम्ही झोकून दिलेलं असायचं त्या त्या भूमिकेत. शंभर टक्के परकायाप्रवेश असायचा तो, पण आता तसं नाहीए. आता माध्यमंही वाढली आहेत, स्पर्धाही आहे. भूमिकांच्या मागण्याही वाढल्यात. त्यामुळे परकायाप्रवेश आताही होतो माझा, पण फक्त ‘अॅक्शन आणि कट’ या दोन शब्दांच्या दरम्यान. या दोन शब्दांच्या मधला जो काही वेळ असतो, तो असतो माझा एकटीचा, माझ्यात भिनलेल्या त्या व्यक्तिरेखेचा! ‘हिंदी है हम’ या मालिकेमधली ७५ वर्षांची आजी मी साकारली होती. उत्तर प्रदेशमधली, तिथल्या भाषेचा लहेजा घेऊन बोलणारी, पुरोगामी विचारांची आजी मला प्रचंड आवडली होती. किंवा अलीकडची ‘मेरी माँ’मधली ममता प्रधान! अप्रतिम भूमिका होती ती. एकदा मला त्या भूमिकेचा आवाका कळला की माझ्यात ती आपोआप उतरायला लागते. तिचं वागणं, तिचं चालणं, तिचं बोलणं माझ्यात येतंच आणि एकदा दिग्दर्शकाने ‘अॅक्शन’ म्हटलं की ती प्रत्यक्षात वावरायला लागते. मला माझं काम बघायला मॉनिटर नाही बघावा लागत. मी फक्त माझा पहिला लूक मॉनिटरमध्ये बघते तोही गेट-अप बघायला, अन्यथा मला माहीत असतं मी कोण आहे ती. ममता प्रधानचाच विषय निघालाय म्हणून सांगते. ‘ममता’ माझ्याकडे आली तेव्हा त्या भूमिकेचा आवाका मला माहीत होता. कारण बंगालीमध्ये ती मालिका चालू होती. तिचं जगणं, तिचा प्रवास माहीत होता. हळूहळू मी ती व्हायला लागले. मला मीच तिच्या ठिकाणी तिच्या रूपात दिसायला लागले. आणि मी अमूलाग्र ममता प्रधान झाले. ज्या क्षणी मला भूमिकेचा सूर सापडतो ती उत्तम होतेच..
हा सूर सापडणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा असंही होतं की नाहीच सापडत तो सूर, मग त्याची कारणं शोधत अस्वस्थ व्हायला होतं. अलीकडेच मी ‘हमिदाबाईची कोठी’ केलं. २५ प्रयोग. पण मला सूर सापडला शेवटच्या पाच प्रयोगात. काही तरी चुकतंय, मी गुंतत नाहीए हे मला जाणवत होतं, पण का ते कळत नव्हतं. नंतर माझ्याच लक्षात आलं की मी एकटीच बाजूला पडलेय, माझ्यात आणि सहकलाकारांमध्ये थेट संवादच होत नव्हते. मी तो संवाद साधायला सुरुवात केली आणि आमच्या मधली इंटर अॅक्शन प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचायला लागली. विजयाबाईंच्या भाषेत हा theatrical moment महत्त्वाचा. तो का एकदा साधला गेला की ती भूमिका क्लीक होतेच. ‘हमिदाबाई’च्या शेवटच्या पाच प्रयोगांना प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळाला तो आधीच्या प्रयोगात नव्हता. ते ‘जाणणं’ महत्त्वाचं. अर्थात, रंगभूमीवर जसा थेट प्रतिसाद मिळतो तसा चित्रपट, मालिकांमध्ये मिळत नाही. पण त्यांच्या प्रतिक्रिया या ना त्यानिमित्ताने मिळतातच. ‘उंच माझा झोका’ बघितल्यावर ‘काटा आला हो अंगावर’ अशी प्रतिक्रिया सगळं सांगून जाते. तेच ‘तुम्हाला पाहिलं ‘देवयानी’त.’ ही प्रतिक्रियाही बरंच काही सांगून जाते. पण आता इतक्या वर्षांच्या प्रवासात हेही लक्षात आलंय की सगळ्यांना सरसकट आवडतील अशा भूमिका फारच थोडय़ा असतात. कुणाला तुमची एखादी भूमिका आवडेल दुसऱ्याला दुसरी. ते व्यक्तिसापेक्ष असतं. लोकांना काय आवडेल हे बघून मी नाही ना ठरवू शकत कोणती भूमिका घ्यायची? मी अभिनेत्री आहे. कलाकार म्हणून जी भूमिका मला साद घालते तीच माझ्यासाठी महत्त्वाची. एखाद्या भूमिकेकडे बघण्याचा माझा आतला डोळा जोपर्यंत उघडा आहे तोपर्यंत मला कसलीच भीती नाही. तो डोळा मला ती भूमिका स्वीकारायची की नाही हे सांगतो. आज भूमिका स्वीकारायचे माझे दोन मुख्य निकष असतात. एक तर त्या भूमिकेला ‘खोली’ असायला हवी किंवा मग संपूर्ण चित्रपट वा मालिकेच्या दृष्टीने ती व्यक्तिरेखा महत्त्वाची हवी. नुकताच मी ‘अनुमती’ चित्रपट केला. त्यातली ती बाई व्हेंटिलेटरवर आहे. तिचे दोनच प्लॅशबॅक आहेत त्यात. इतकी छोटी भूमिका, पण त्यातूनच चित्रपट उलगडत जातो. त्या सिनेमासाठी ती भूमिका क्रुशल होती. शूटिंग पूर्ण झालं तरी मी गजेंद्रला परत परत विचारत होते. ‘अरे, थोडं लाऊड झालंय. बदलायला हवं होतं का रे,’ तो मला सारखं, ‘नाही हो नीनाताई. नका काळजी करू’ म्हणत होता. एखादी भूमिका जेव्हा मला इतकी एक्साइट करते तेव्हा ती करायलाही मजा येते. नाही तर अलीकडे खूप छोटय़ा छोटय़ा भूमिका देण्याकडे कल वाढलाय. खूप जणं घ्यायची आणि छोटे छोटे रोल द्यायचे. त्याच्यासाठी ते चांगलं असेलही. पण कलाकाराचं काय होतंय? आज कलाकार जोपासला जातोय का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. मराठीत तर सध्या ‘सोशल इश्यू’वर चित्रपट काढण्याची फेज आलीय. ती चांगलीच आहे. खूप ग्रेट दिग्दर्शक सध्या मराठीत कामं करताहेत. पण कलाकार म्हणून हाती काहीच लागत नाही. पूर्णत: कॅरेक्टर रोल असणारे चित्रपट सध्या तरी नाहीच आहेत. छोटय़ा छोटय़ा भूमिका नको वाटतात आता. गेल्या वर्षी ‘महासागर’ दिग्दर्शित केलं. त्यात मी प्रचंड व्यस्त होते त्यामुळे अभिनयाचे छोटेच रोल केले. ‘देवयानी’ केलं, ‘उंच माझा झोका’, ‘दृष्टिदान’, ‘वासू’, ‘स्वामी’, ‘अनुभूती’ केलं. सात-आठ रोल केले. त्यापैकी एक-दोनच ‘टच’ झाले. हे असं अनेकदा होतं हल्ली.
आणखी एक गोष्ट प्रकर्षांने जाणवतेय ती म्हणजे, कमर्शियलायझेशन झालंय म्हणून असेल किंवा कलाकार म्हणून माझी इन्सिक्युरिटी असेल, पण आज जेव्हा मी मालिकेचं शूटिंग करून घरी येते तेव्हा अनेकदा अस्वस्थ असते, ‘काय नीना, काय मूर्खासारखा अभिनय केलास तू, हा लूक असा द्यायला हवा होता. हा डायलॉग तू असा बोलायला हवा होतास.’ मी तीन शॉट दिले, देव करो, त्यातला तो मधला ठेवायची बुद्धी त्यांना होवो, असं रोजच्या रोज मी स्वत:ला सांगते. अर्थात यात सकारात्मकताही आहे. कारण मी इतका त्या भूमिकेचा विचार करते आणि त्यामागचं सर्वात महत्त्वाचं जे मला आत्तापर्यंतच्या प्रवासाने शिकवलंच. अभिनय ही सोपी गोष्ट नाहीच. मला काहीच करता आलं नाही म्हणून मी अभिनेत्री झालेय, असं होऊच शकत नाही. प्रत्येक भूमिका करताना तो ‘करेक्ट मोमेण्ट’ यावाच लागतो. तो आला नाही की अस्वस्थ व्हायला होतं आणि मला ते रोज होतं. कारण अभिनय ‘इॅट्स मीडियम ऑफ एक्स्प्रेशन’. आली भूमिका केली आणि जमून गेली. इतकं सोपं नाहीए ते. म्हणूनच ‘उंच माझा झोका’तल्या आजीच्या भूमिकेसाठी ज्या क्षणी मी आलवण घातलं त्याक्षणी मला आतमध्ये काही तरी झालं. हे जे ‘होणं’ आहे त्या होण्यातूनच ती भूमिका ‘जमून’ जाते. सुदैवाने मला आजही ते ‘होतं’. आतल्या आत ती भूमिका मला साद घालते आणि त्यातूनच आपसूक ती व्यक्तिरेखा साकारली जाते. माझ्यासाठी अशा भूमिका मिळत जाणं, किंबहुना योग्य भूमिका निवडणं आणि त्यात शंभर टक्के झोकून देणं हीच माझी अभिनयाची व्याख्या आहे.
अर्थात, हा साक्षात्कार मला झाला वयाच्या नवव्या वर्षी. ‘सोसायटी डे’साठी मी ‘वयम् मोठम् खोटम्’ नाटक केलं होतं. तो अर्धा तास मी स्वत:ला विसरून गेले होते. मी पूर्णत: दुसरी कुणी तरी बनले होते. तो अनुभव माझ्यासाठी विलक्षण होता, इतका की आजही प्रत्येक भूमिका करताना ते वेगळं कुणी तरी बनणं, वेगळ्या जगात जाणं मला मोहवतं. नवव्या वर्षीच माझ्यासाठी ते माझं असं वेगळं विश्व तयार झालं होतं, माझं एकटीचं जग. कारण माझ्या आजूबाजूच्या कुणालाच त्याची फार आवड नव्हती, माझ्याबरोबर ‘सोसायटी डे’ला जे काम करायचे त्यांच्यासाठी पण ते तात्पुरतं असायचं. मला कळायचं नाही, मलाच का त्याचं इतकं वेड आहे. मलाच का हे इतकं हवं आहे, मग मी एकटीच माझ्या विश्वात रमायची. पुढे जेव्हा दिलीप भेटला, तेव्हा ते माझं जग आम्हा दोघाचं झालं. रंगभूमी आमच्यासाठी आमचं पॅशन होतं. पण तरीही मी म्हणेन माझा सुरुवातीचा प्रवास खूपच सरळ होता. कॉलेजमध्ये असताना रत्ना (पाठक)-सुनील(शानभाग)भेटल्या म्हणून दुबे भेटला. विजयाबाईंचं एक शिबिर केलं म्हणून बाईंनी ‘हमिदाबाईची कोठी’ दिली. पुढे त्यांच्यासोबत मोठं पर्व सुरू झालं. नंतर दिलीपशी लग्न केलं. त्यावेळी असंच म्हणून ‘वटवट सावित्री’ केलं. मग थोडा ब्रेक घेतला. मग पुन्हा नाटक सुरू केलं. नाटकं येत गेली आणि मी करत गेले. याचं कारण मी ज्या काळात जन्मले तो काळच सुदैवी होता. माझ्याबरोबरचे किती तरी जण विक्रम, नाना, रीमा, भारती, वंदना, सुहास आजही तितक्याच जोरात कामं करताहेत.
पण माझा हा अभिनय प्रवास तिथपर्यंतच सोपा होता जोपर्यंत त्याची ‘इंडस्ट्री’ झाली नव्हती आणि माझ्यासाठी तो फायनान्शिअल सपोर्ट झाला नव्हता. दिलीप बँकेत नोकरी करायचा. मी अनेकदा म्हणायची त्याला, ‘सोड रे नोकरी, इतक्या भूमिका मिळताहेत आपल्याला’ पण तो ठाम नकार द्यायचा. हे क्षेत्र पैशाच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित, अस्थिर होतं हे त्याला माहीत होतं. दिलीप २००२ मध्ये गेला आणि माझ्यासाठी तो सर्वात कठीण काळ होता. माझं वय ४७ वर्षांचं होतं, मी नव्याने कुठे काय शोधू शकणार होते? माझ्या जगण्यासाठी, मुलांसाठी मला असं क्षेत्र शोधायचं होतं जे सतत काम देऊ शकेल, सतत पैसा देऊ शकेल! विजयाबाईंनी आणि मी खूप विचार केला. ज्यात मी सर्वाधिक ‘गुंतवणूक’ केली असं अभिनय हे एकच क्षेत्र होतं. तेच मला तारणार होतं आणि मला खरंच सावरलं टेलिव्हिजनने! या माध्यमाने भूमिकेची जी व्हरायटी दिली तशी कोणत्याच क्षेत्राने नाही दिली. तसं हे क्षेत्र मला नवं नव्हतंच. ‘अडोस-पडोस’, ‘हिना’ या मालिका मी केल्या होत्या. त्याही पूर्वी माझी सुरुवात झाली होती टीव्ही अनाऊन्सर म्हणून. पण तेव्हा त्या साप्ताहिक मालिका होत्या. डेलीसोपचं कल्चर नव्हतंच. ते स्वीकारणं ही माझ्यासाठी त्या काळातली फार मोठी तडजोड होती. ते हॉरिबल होतं माझ्यासाठी. दहा दहा – बारा बारा तास काम करणं.. ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. प्रचंड चिडायचे, राग राग करायचे, खूप वाईट वागलेय मी त्या काळात सगळ्यांशी. याचं कारण मी इतर माध्यमांशी त्याच्याशी तुलना करत होते. ते अगदीच अयोग्य होतं. प्रत्येक माध्यमाची गरज वेगळी, आवाका वेगळा तशा मर्यादाही वेगळ्या होत्या. हळूहळू मला हे माध्यम कळायला लागलं. माझ्या लक्षात आलं की मलाच काय सगळ्यांनाच हे माध्यम नवीन होतं कारण नुकतंच ते भारतात आलं होतं. त्यामुळे सगळ्यांचाच शोध सुरू होता. आता मात्र या माध्यमाशी माझी मैत्री झालीय.
२००४ मध्ये माझ्या टीव्ही सिरियल्सची सुरुवात झाली ती ‘अधुरी एक कहाणी’ या मराठी आणि ‘सारथी’ या हिंदी मालिकेमुळे. दोन्ही एकाच वेळी सुरू होत्या. ‘अधुरी एक’ मधली कल्याणी पटवर्धनची भूमिका खूपच आव्हानात्मक होती. ती राजकारणी बाई होती, सुज्ञ. सत्ता हातातून जातेय म्हटल्यावर डाव खेळणारी, महत्त्वाकांक्षी, चाणाक्ष स्त्री. चार वर्षे सुरू होती ही मालिका.. आता मात्र कुठली मालिका किती महिने चालेल यावर प्रश्नचिन्हच असतं. त्यामुळे झोकून देऊन एखादी भूमिका करायची आणि ती मध्येच बंद तरी होईल किंवा वेगळं वळणं तरी घेईल याचीच भीती असते. तशी निराशा मला ‘लज्जा’ करताना आली. ती सोशित बाई असते आणि पुढे नवऱ्याचा खून करते इतपर्यंतच ती भूमिका मला माहीत होती, पण पुढे तिने वेगळंच वळण घेतलं. शेवटी तर त्याला सोशल अँगलच मिळाला. खूप क्षमता होती या भूमिकेत, पण खूप वरवरचीच राहिली. अर्थात आनंद देणाऱ्या भूमिकाही खूप केल्या या काळात. नाटकांमधल्या तर विशेष. ‘ध्यानीमनी’ मधली शालन, हा माझ्यासाठी आव्हानात्मक रोल होता. प्रचंड शारीरिक एनर्जी वापरायला लागायची मला तो करताना, शेवटी जेव्हा सत्य वाचकांसमोर येतं. तेव्हा जो विस्मय, सहानुभूती आणि संवेदनाच्या जो विलक्षण खेळ प्रेक्षक आणि माझ्यात होतो. तो लाजबाब! ‘सवत माझी लाडकी’तील सीमा करण्यासाठी मला काहीच वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत इतकी मी तिच्यासारखी होते. खूप पॉझिटिव्ह होती सीमा. ‘आईचं घर उन्हाचं’ मधली क्षमा, ‘अकस्मात’मधली अरुंधती, ‘नागमंडळ’मधली राणी, ‘प्रेमपत्र’मधली ऊर्मिला साऱ्यांनीच मला काही ना काही दिलंय. सुरुवातीच्या काळातली माझी आवडती भूमिका म्हणजे ‘एज्युकेटिंग रिटा’मधली रिटा. ही ब्रिटिश मुलगी होती. कॉन्व्हेन्टमध्ये शिकल्याचा फायदा मला ही भूमिका करताना झाला. मी रिटा जगले. रिटा ही माझी सर्वात उत्तम वठलेली व प्रभाव करणारी भूमिका होती. त्यानंतर आणखी एक खूप चांगला अनुभव देणारी भूमिका ‘महात्मा व्हर्सेस गांधी’मधली कस्तुरबा. इंग्रजीतल्या या नाटकात गांधीच्या भूमिकेत नसीरुद्दीन शहा होता. नसीरला मी दुबेच्या काळापासून ओळखत होते आणि त्याच्याबरोबर कामही खूप केलं होतं. त्यामुळे ही भूमिका करण्यातला आनंद वेगळाच होता. मी जेव्हा मराठीतली ‘कस्तुरबा’ पाहिली, तेव्हा असं लक्षात आलं की एरवी झोकून देऊन काम करणारी भक्ती (बर्वे) खूप जपून ही भूमिका करायची. रियल लाइफ कॅरेक्टर करताना जरा काळजी घ्यावीच लागते. पण मी ठरवलं माझी कस्तुरबा अशी नाही होऊ द्यायची. खरं तर कस्तुरबा खूप स्प्राइटली होत्या. योग्य ते गांधीजींना बेधडक सुनवायच्या. त्याचं स्प्राइटली असणं मी प्रत्यक्षात उतरवलं. मी आणि नसीर, गांधी व कस्तुरबाचं बाह्य़ जगणं जगत नव्हतोच. ते अांतरिक होतं. रंगभूमीवर, डोळ्यात थेट डोळे घालून ‘तू माझी बायको आहेस’ या भूमिकेतून वावरणं हे नसीरच करू शकतो. म्हणून त्याचा अभिनय जिवंत होतो. त्याच्याबरोबर काम करणं हा खरंच वेगळा अनुभव असतो. म्हणजे आपल्याला जे करायचंय पण ते करायचा कॉन्फिडन्स नाही, पण हा समोरचा नट ते करतोय आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला देतो, हे नसीरच्या बाबतीत घडतं. इंटर-अॅक्टिव्ह अॅक्टिंग काय असतं हे मी त्याच्याबरोबर अनुभवलं. एखाद दिवशी त्याचा सूर नाही लागला तर माझाही नाही लागायला इतकं आमच्यात टय़ूनिंग होतं. असे अनुभव आपल्याला मोठं करत असतात. असाच अनुभव मला दिला मि. बच्चन अर्थात अमिताभ बच्चन यांनी. त्यांच्याबद्दल बरंच ऐकून होते, वाचलंही होतं. तेव्हा वाटायचं जरा जास्तच लिहितात लोकं. पण नाही, मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि तो माणूस ‘मोठा’ का आहे ते कळलं. खरंच इन्स्पायरिंग व्यक्तिमत्त्व आहे. इगोच नाही या माणसाला, ना कसले छक्के-पंजे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, समोरच्या कलावंताचं मोठेपण जाणून घेणं, मी दोन चित्रपट केले त्यांच्याबरोबर ‘भूतनाथ’ आणि ‘रण’. ‘भूतनाथ’मध्ये सहा-सात तेही इमोशनल सीन होते त्यांच्याबरोबर. माझा एक स्वभाव आहे. एखादा इमोशनल सीन करत असताना काही कारणास्तव ‘कट’ झालं की मी आहे त्या स्थितीत तशीच राहते. इमोशन सोडत नाही. कारण लगेच सीन सुरू झाला की सोपं जातं. ‘भूतनाथ’ करताना असंच झालं. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटलं नि मी इमोशनमध्ये तशीच घट्ट. बच्चनजींच्या ते लक्षात आलं आणि ते सगळ्यांना म्हणाले, ‘जल्दी करो, मूव्ह फास्ट, यहा जो है इमोशन को पकडके रखा है, समजा करो, कमॉन फास्ट’ असं दुसऱ्यांना जाणून घेणारा माणूस क्वचित सापडतो आणि आजारपण कसलंही असो त्यांनी काम चालूच ठेवलंय. मी ते अनुभवलं ‘रण’च्या वेळी. बोलताना त्यांचा जबडा अक्षरशा खाली सटकत होता. तो ते नीट करायचे नी काम चालू ठेवायचे. त्या दिवशी त्यांच्यामुळे पॅकअप नाही करावं लागलं. त्यांचं, त्यांच्या बाबूजीचं आवडतं वाक्य आहे, ‘जिंदगी मनकी हो जाए तो अच्छा, अगर ना हो जाए तो और अच्छा’ हे ते प्रत्यक्ष जगले आहेत. त्यांचं आयुष्य जेव्हा समोर येतं ना तेव्हा आपल्या आयुष्यातल्या संघर्षांचं खरंच काहीच वाटेनासं होतं. अभिनय तुम्हाला जगवतो, हेच खरं. म्हणूनच मी आज एक अभिनेत्री म्हणून माझ्या प्रवासाकडे बघते आहे..
चाळीस वर्षांचा हा प्रवास. आता खरंतर शांतपणे, हवी ती भूमिका, दिग्दर्शन मुक्तपणे करणं हाती यायला हवं, पण ही इंडस्ट्री आहे. आणि मी या इंडस्ट्रीचा भाग. त्याचे नियम वेगळे आहेत. इतकी वर्षे काम करूनही पुढची सिरीयल कधी, कसली मिळेल? तुम्ही जीव ओतून भूमिका करायची आणि अचानक ती बंदच झाली तर?.. ही प्रश्नचिन्हेच समोर येणार असतील तर, मला नाही ते योग्य वाटत. रोजची धावपळ, दगदग, अस्वस्थता, अस्थिरता नको वाटते आता. खरं तर व्यवसाय झाल्याने त्यात सुरक्षितता यायला हवी. पण उलट असुरक्षितता अधिक वाढलीय, कामातलं वैविध्य जपावंसं वाटतं, पण सगळ्या गोष्टी जेव्हा पैशाशी येऊन जुळतात तेव्हा ते नको वाटतं. पण मग पर्याय काय. तुम्ही दिग्दर्शन करा, निर्माती व्हा हे सांगणं सोपं आहे. पण ते प्रत्येक स्वतंत्र क्षेत्र आहे. प्रत्येकाची मागणी वेगळी असते. आज मला नाही वाटत मी निर्माती व्हावं. जेव्हा जोम होता, पैसा होता तेव्हा केलं तेही. ‘शेवरी’ करताना मी तीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. दर महिना एक लाख रुपये बँकेला द्यायला लागायचे आणि सिरीयलचे मिळायचे किती, तर साडेचार हजार रुपये. कसं केलं असेन मी? पण केलं. खूप धडपडले. पण निभावलं. अर्थात त्याचं फळही मिळालं. जेव्हा मी सगळ्या जबाबदाऱ्यांतून मोकळी होईन, आत्ताच्या मनस्थितीतून बाहेर येईन तेव्हा अगदी ‘पृथ्वी’त जाऊन फ्री नाटकं करेनच, पण आता थोडा निवांतपणा हवाय. यासाठीच मला शिफ्ट व्हायचंय, व्यावसायिकतेकडून कलात्मकतेकडे..
म्हणूनच सध्या मी ब्रेक घेतलाय. जरा या वळणावर विसावलेय.. अर्थात ‘बालाजी’ची एक पूर्ण लांबीची भूमिका असलेली मालिका माझी वाट पाहाते आहे, एका मराठी चित्रपटाचीही ऑफर आहे.. पण हे कुठवर चालत राहाणार हा मी स्वत:च स्वत:ला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्या उत्तराच्या शोधात मी सध्या आहे.
अभिनेत्री म्हणून मी कधी निवृत्त होऊच शकणार नाही. कारण तो माझ्यासाठी माझ्या असण्याचा भाग आहे.. माझ्या जिवंतपणाचं लक्षण.. पण त्याहीपेक्षा दिलीपला दिलेला तो शब्द आहे. मरणापूर्वीचे त्याचे शेवटचे शब्द हेच होते, ‘नीना, थिएटर कधी सोडू नको, तो आपला श्वास आहे..’
मी तो शब्द आयुष्यभर पाळणार आहे..
11
Story of nina kulkarni
Marathi movie, marathi cinema, nina kulkarni, chaturang maifil
Marathi movie, marathi cinema, nina kulkarni, chaturang maifil, loksatta, chaturang
चतुरंग मैफल : जरा विसावलेय या वळणावर..
नीना कुलकणी – ं१ं३्र.‘िंे@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे
‘‘गेल्या चाळीस वर्षांचा माझा प्रवास.. प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून.. खूप आणि सातत्याने केलेल्या कामाने मला आनंद जसा दिला तसं समाधानही, पण आता मी आहे मनोरंजनाच्या या इंडस्ट्रीचा एक भाग. सतत धावपळ, अस्थिरता असलेलं हे जग.. आता हवाय थोडा निवांतपणा.. मुक्तपणे, मोकळ्या मनाने करायच्यात भूमिका.. रमायचंय रंगभूमीवर म्हणूनच विसावलेय थोडी या वळणावर..’’ सांगताहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी.
आ त्तापर्यंत अनेक भूमिका केल्या. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळे कंगोरे असणाऱ्या, अभिनेत्रीपण कसाला लावणाऱ्या.. पण या सर्वात एक भूमिका मला जरा जास्तच जवळची आहे, ‘शेवरी’तली विद्याची. कारण त्यात मी वेगळ्या कारणासाठी भावनिकदृष्टय़ा अधिक गुंतले होते. दिलीपचं निधन झालं होतं. आणि बाबाही नुकतेच गेले होते. ज्याला आपण घर म्हणतो ते माझं घरच कोसळलं होतं. अक्षरश: सैरभैर झाले होते मी त्या काळात. भविष्याबद्दल पूर्ण अंधार, सावरणारं कोण तर स्वत:च. त्याच वेळी ही विद्या आली माझ्या आयुष्यात! तिचंही आयुष्य अगदी माझ्यासारखंच, शेवरीच्या पिसासारखं दिशाहीन. एका रात्रीतला हा सिनेमा. पण तिच्या आयुष्याला एक वळण देऊन जातो अशी ती कथा. विद्याचा घटस्फोट झाल्याने तिला घरातून बाहेर पडावं लागलंय आणि त्या दिवशी तिच्या रुममेटच्या भवितव्यासाठी तिला घराबाहेर राहणं गरजेचं आहे. घरहीन, सैरभैर विद्या रात्री साडेदहा वाजता घराबाहेर पडते, कुठे जायचं, काय करायचं माहीत नसलेली विद्या सरत्या आयुष्याचा जमा खर्च मांडत आयुष्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतेय. त्याकाळात विद्याचं आयुष्यच मी जगत होते. दिलीपची खूप इच्छा होती चित्रपट निर्मिती करायची. ती मी पूर्ण करायची ठरवली आणि या चित्रपटात नुसती भूमिकाच केली नाही तर निर्मितीही केली. त्याला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच शिवाय ‘पिस’चा ‘तुकाराम’पुरस्कारही मिळाला. आजही समाधान वाटतंय ‘शेवरी’करून. इट्स माय बेबी.. कायम जवळची असलेली..
तिच्यामुळे मी निर्माती झाले आणि अलीकडे ‘महासागर’करून दिग्दर्शिकाही झाले. पण गेली चाळीस वर्षे.. कदाचित त्याहीपेक्षा जास्त काळ असेन मी अभिनयाच्या क्षेत्रात. सर्वाधिक काम मी अभिनेत्री म्हणूनच केलंय. नाटक केलं, चित्रपट केले, मालिका केल्या, जाहिराती केल्या, शोज केले.. खूप काम केलंय.. सतत कामं केलंय.. सातत्याने काम केलंय.. म्हणूनच आज जेव्हा मी माझ्याकडे बघते तेव्हा अभिनेत्री असणं म्हणजे काय, माझ्यासाठी अभिनय म्हणजे काय हे बघण्याबरोबरच आज मी कुठे आहे, कोणत्या टप्प्यावर उभी आहे, हे बघणंही मला महत्त्वाचं वाटतंय. कारण मी काळाबरोबर चालणारी व्यक्ती आहे. अभिनेत्री म्हणून माझा भूतकाळ खूपच चांगला होता. अजरामर झाल्यात त्यातल्या काही भूमिका, संचित आहे ते माझ्यासाठी! पण म्हणून त्यावर मी अवलंबून नाही राहू शकत. माझ्या वर्तमानकाळात काय किंवा भविष्यकाळासाठीसुद्धा!
म्हणूनच या लेखाच्या निमित्ताने आज मी जिथे आहे, त्या टप्प्यावरून कालचा, आजचा आणि उद्याचा विचार करावासा वाटतोय..
टुडे आय अॅम अ प्रोफेशनल अॅक्ट्रेस. एक व्यावसायिक अभिनेत्री आहे मी आज. कारण मनोरंजनाचं क्षेत्र म्हणजे मोठी इंडस्ट्रीच झालीय. त्याचाच मी एक भाग. एक कलाकार! आज माझं अभिनेत्री असणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. कारण तीच माझी सर्वात मोठी ओळख आहे आणि सर्वात मोठी गुंतवणूकही. जी भूमिका माझ्यासमोर येते तिच्यात जीव ओतायचा. लेखक-दिग्दर्शकाला जी व्यक्तिरेखा अपेक्षित आहे, त्यात माझी म्हणून जी व्हॅल्यू अॅडिशन आहे ती करायची आणि त्यातून बाहेर पडायचं, हेच सध्या मी करतेय.. एकाच वेळी चित्रपट, मालिका तेही कधी मराठी, कधी हिंदी, कधी जाहिराती, मधूनच कधी नाटकंही, असं वेगळ्या पातळ्यांवर काम करत असताना तुम्ही सदा सर्वकाळ एकाच भूमिकेत नाही राहू शकत. पूर्वी जेव्हा मी नाटक करायचे तेव्हा ते शक्य असायचं कारण दुसरं माध्यम नव्हतं त्याकाळी. यामुळे शंभर टक्के फक्त त्याच भूमिकेत, त्याच्या विचारात असणं शक्य असायचं. ‘महासागर’मधली चंपू काय किंवा ‘हमिदाबाईची कोठी’मधली शब्बो काय, ती करताना तुम्ही झोकून दिलेलं असायचं त्या त्या भूमिकेत. शंभर टक्के परकायाप्रवेश असायचा तो, पण आता तसं नाहीए. आता माध्यमंही वाढली आहेत, स्पर्धाही आहे. भूमिकांच्या मागण्याही वाढल्यात. त्यामुळे परकायाप्रवेश आताही होतो माझा, पण फक्त ‘अॅक्शन आणि कट’या दोन शब्दांच्या दरम्यान. या दोन शब्दांच्या मधला जो काही वेळ असतो, तो असतो माझा एकटीचा, माझ्यात भिनलेल्या त्या व्यक्तिरेखेचा! ‘हिंदी है हम’या मालिकेमधली ७५ वर्षांची आजी मी साकारली होती. उत्तर प्रदेशमधली, तिथल्या भाषेचा लहेजा घेऊन बोलणारी, पुरोगामी विचारांची आजी मला प्रचंड आवडली होती. किंवा अलीकडची ‘मेरी माँ’मधली ममता प्रधान! अप्रतिम भूमिका होती ती. एकदा मला त्या भूमिकेचा आवाका कळला की माझ्यात ती आपोआप उतरायला लागते. तिचं वागणं, तिचं चालणं, तिचं बोलणं माझ्यात येतंच आणि एकदा दिग्दर्शकाने ‘अॅक्शन’म्हटलं की ती प्रत्यक्षात वावरायला लागते. मला माझं काम बघायला मॉनिटर नाही बघावा लागत. मी फक्त माझा पहिला लूक मॉनिटरमध्ये बघते तोही गेट-अप बघायला, अन्यथा मला माहीत असतं मी कोण आहे ती. ममता प्रधानचाच विषय निघालाय म्हणून सांगते. ‘ममता’माझ्याकडे आली तेव्हा त्या भूमिकेचा आवाका मला माहीत होता. कारण बंगालीमध्ये ती मालिका चालू होती. तिचं जगणं, तिचा प्रवास माहीत होता. हळूहळू मी ती व्हायला लागले. मला मीच तिच्या ठिकाणी तिच्या रूपात दिसायला लागले. आणि मी अमूलाग्र ममता प्रधान झाले. ज्या क्षणी मला भूमिकेचा सूर सापडतो ती उत्तम होतेच..
हा सूर सापडणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा असंही होतं की नाहीच सापडत तो सूर, मग त्याची कारणं शोधत अस्वस्थ व्हायला होतं. अलीकडेच मी ‘हमिदाबाईची कोठी’केलं. २५ प्रयोग. पण मला सूर सापडला शेवटच्या पाच प्रयोगात. काही तरी चुकतंय, मी गुंतत नाहीए हे मला जाणवत होतं, पण का ते कळत नव्हतं. नंतर माझ्याच लक्षात आलं की मी एकटीच बाजूला पडलेय, माझ्यात आणि सहकलाकारांमध्ये थेट संवादच होत नव्हते. मी तो संवाद साधायला सुरुवात केली आणि आमच्या मधली इंटर अॅक्शन प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचायला लागली. विजयाबाईंच्या भाषेत हा ३ँीं३१्रूं’ ेील्ल३ महत्त्वाचा. तो का एकदा साधला गेला की ती भूमिका क्लीक होतेच. ‘हमिदाबाई’च्या शेवटच्या पाच प्रयोगांना प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळाला तो आधीच्या प्रयोगात नव्हता. ते ‘जाणणं’महत्त्वाचं. अर्थात, रंगभूमीवर जसा थेट प्रतिसाद मिळतो तसा चित्रपट, मालिकांमध्ये मिळत नाही. पण त्यांच्या प्रतिक्रिया या ना त्यानिमित्ताने मिळतातच. ‘उंच माझा झोका’बघितल्यावर ‘काटा आला हो अंगावर’अशी प्रतिक्रिया सगळं सांगून जाते. तेच ‘तुम्हाला पाहिलं ‘देवयानी’त.’ ही प्रतिक्रियाही बरंच काही सांगून जाते. पण आता इतक्या वर्षांच्या प्रवासात हेही लक्षात आलंय की सगळ्यांना सरसकट आवडतील अशा भूमिका फारच थोडय़ा असतात. कुणाला तुमची एखादी भूमिका आवडेल दुसऱ्याला दुसरी. ते व्यक्तिसापेक्ष असतं. लोकांना काय आवडेल हे बघून मी नाही ना ठरवू शकत कोणती भूमिका घ्यायची? मी अभिनेत्री आहे. कलाकार म्हणून जी भूमिका मला साद घालते तीच माझ्यासाठी महत्त्वाची. एखाद्या भूमिकेकडे बघण्याचा माझा आतला डोळा जोपर्यंत उघडा आहे तोपर्यंत मला कसलीच भीती नाही. तो डोळा मला ती भूमिका स्वीकारायची की नाही हे सांगतो. आज भूमिका स्वीकारायचे माझे दोन मुख्य निकष असतात. एक तर त्या भूमिकेला ‘खोली’असायला हवी किंवा मग संपूर्ण चित्रपट वा मालिकेच्या दृष्टीने ती व्यक्तिरेखा महत्त्वाची हवी. नुकताच मी ‘अनुमती’चित्रपट केला. त्यातली ती बाई व्हेंटिलेटरवर आहे. तिचे दोनच प्लॅशबॅक आहेत त्यात. इतकी छोटी भूमिका, पण त्यातूनच चित्रपट उलगडत जातो. त्या सिनेमासाठी ती भूमिका क्रुशल होती. शूटिंग पूर्ण झालं तरी मी गजेंद्रला परत परत विचारत होते. ‘अरे, थोडं लाऊड झालंय. बदलायला हवं होतं का रे,’ तो मला सारखं, ‘नाही हो नीनाताई. नका काळजी करू’म्हणत होता. एखादी भूमिका जेव्हा मला इतकी एक्साइट करते तेव्हा ती करायलाही मजा येते. नाही तर अलीकडे खूप छोटय़ा छोटय़ा भूमिका देण्याकडे कल वाढलाय. खूप जणं घ्यायची आणि छोटे छोटे रोल द्यायचे. त्याच्यासाठी ते चांगलं असेलही. पण कलाकाराचं काय होतंय? आज कलाकार जोपासला जातोय का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. मराठीत तर सध्या ‘सोशल इश्यू’वर चित्रपट काढण्याची फेज आलीय. ती चांगलीच आहे. खूप ग्रेट दिग्दर्शक सध्या मराठीत कामं करताहेत. पण कलाकार म्हणून हाती काहीच लागत नाही. पूर्णत: कॅरेक्टर रोल असणारे चित्रपट सध्या तरी नाहीच आहेत. छोटय़ा छोटय़ा भूमिका नको वाटतात आता. गेल्या वर्षी ‘महासागर’दिग्दर्शित केलं. त्यात मी प्रचंड व्यस्त होते त्यामुळे अभिनयाचे छोटेच रोल केले. ‘देवयानी’केलं, ‘उंच माझा झोका’, ‘दृष्टिदान’, ‘वासू’, ‘स्वामी’, ‘अनुभूती’केलं. सात-आठ रोल केले. त्यापैकी एक-दोनच ‘टच’झाले. हे असं अनेकदा होतं हल्ली.
आणखी एक गोष्ट प्रकर्षांने जाणवतेय ती म्हणजे, कमर्शियलायझेशन झालंय म्हणून असेल किंवा कलाकार म्हणून माझी इन्सिक्युरिटी असेल, पण आज जेव्हा मी मालिकेचं शूटिंग करून घरी येते तेव्हा अनेकदा अस्वस्थ असते, ‘काय नीना, काय मूर्खासारखा अभिनय केलास तू, हा लूक असा द्यायला हवा होता. हा डायलॉग तू असा बोलायला हवा होतास.’ मी तीन शॉट दिले, देव करो, त्यातला तो मधला ठेवायची बुद्धी त्यांना होवो, असं रोजच्या रोज मी स्वत:ला सांगते. अर्थात यात सकारात्मकताही आहे. कारण मी इतका त्या भूमिकेचा विचार करते आणि त्यामागचं सर्वात महत्त्वाचं जे मला आत्तापर्यंतच्या प्रवासाने शिकवलंच. अभिनय ही सोपी गोष्ट नाहीच. मला काहीच करता आलं नाही म्हणून मी अभिनेत्री झालेय, असं होऊच शकत नाही. प्रत्येक भूमिका करताना तो ‘करेक्ट मोमेण्ट’यावाच लागतो. तो आला नाही की अस्वस्थ व्हायला होतं आणि मला ते रोज होतं. कारण अभिनय ‘इॅट्स मीडियम ऑफ एक्स्प्रेशन’. आली भूमिका केली आणि जमून गेली. इतकं सोपं नाहीए ते. म्हणूनच ‘उंच माझा झोका’तल्या आजीच्या भूमिकेसाठी ज्या क्षणी मी आलवण घातलं त्याक्षणी मला आतमध्ये काही तरी झालं. हे जे ‘होणं’आहे त्या होण्यातूनच ती भूमिका ‘जमून’जाते. सुदैवाने मला आजही ते ‘होतं’. आतल्या आत ती भूमिका मला साद घालते आणि त्यातूनच आपसूक ती व्यक्तिरेखा साकारली जाते. माझ्यासाठी अशा भूमिका मिळत जाणं, किंबहुना योग्य भूमिका निवडणं आणि त्यात शंभर टक्के झोकून देणं हीच माझी अभिनयाची व्याख्या आहे.
अर्थात, हा साक्षात्कार मला झाला वयाच्या नवव्या वर्षी. ‘सोसायटी डे’साठी मी ‘वयम् मोठम् खोटम्’नाटक केलं होतं. तो अर्धा तास मी स्वत:ला विसरून गेले होते. मी पूर्णत: दुसरी कुणी तरी बनले होते. तो अनुभव माझ्यासाठी विलक्षण होता, इतका की आजही प्रत्येक भूमिका करताना ते वेगळं कुणी तरी बनणं, वेगळ्या जगात जाणं मला मोहवतं. नवव्या वर्षीच माझ्यासाठी ते माझं असं वेगळं विश्व तयार झालं होतं, माझं एकटीचं जग. कारण माझ्या आजूबाजूच्या कुणालाच त्याची फार आवड नव्हती, माझ्याबरोबर ‘सोसायटी डे’ला जे काम करायचे त्यांच्यासाठी पण ते तात्पुरतं असायचं. मला कळायचं नाही, मलाच का त्याचं इतकं वेड आहे. मलाच का हे इतकं हवं आहे, मग मी एकटीच माझ्या विश्वात रमायची. पुढे जेव्हा दिलीप भेटला, तेव्हा ते माझं जग आम्हा दोघाचं झालं. रंगभूमी आमच्यासाठी आमचं पॅशन होतं. पण तरीही मी म्हणेन माझा सुरुवातीचा प्रवास खूपच सरळ होता. कॉलेजमध्ये असताना रत्ना (पाठक)-सुनील(शानभाग)भेटल्या म्हणून दुबे भेटला. विजयाबाईंचं एक शिबिर केलं म्हणून बाईंनी ‘हमिदाबाईची कोठी’दिली. पुढे त्यांच्यासोबत मोठं पर्व सुरू झालं. नंतर दिलीपशी लग्न केलं. त्यावेळी असंच म्हणून ‘वटवट सावित्री’केलं. मग थोडा ब्रेक घेतला. मग पुन्हा नाटक सुरू केलं. नाटकं येत गेली आणि मी करत गेले. याचं कारण मी ज्या काळात जन्मले तो काळच सुदैवी होता. माझ्याबरोबरचे किती तरी जण विक्रम, नाना, रीमा, भारती, वंदना, सुहास आजही तितक्याच जोरात कामं करताहेत.
पण माझा हा अभिनय प्रवास तिथपर्यंतच सोपा होता जोपर्यंत त्याची ‘इंडस्ट्री’झाली नव्हती आणि माझ्यासाठी तो फायनान्शिअल सपोर्ट झाला नव्हता. दिलीप बँकेत नोकरी करायचा. मी अनेकदा म्हणायची त्याला, ‘सोड रे नोकरी, इतक्या भूमिका मिळताहेत आपल्याला’पण तो ठाम नकार द्यायचा. हे क्षेत्र पैशाच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित, अस्थिर होतं हे त्याला माहीत होतं. दिलीप २००२ मध्ये गेला आणि माझ्यासाठी तो सर्वात कठीण काळ होता. माझं वय ४७ वर्षांचं होतं, मी नव्याने कुठे काय शोधू शकणार होते? माझ्या जगण्यासाठी, मुलांसाठी मला असं क्षेत्र शोधायचं होतं जे सतत काम देऊ शकेल, सतत पैसा देऊ शकेल! विजयाबाईंनी आणि मी खूप विचार केला. ज्यात मी सर्वाधिक ‘गुंतवणूक’केली असं अभिनय हे एकच क्षेत्र होतं. तेच मला तारणार होतं आणि मला खरंच सावरलं टेलिव्हिजनने! या माध्यमाने भूमिकेची जी व्हरायटी दिली तशी कोणत्याच क्षेत्राने नाही दिली. तसं हे क्षेत्र मला नवं नव्हतंच. ‘अडोस-पडोस’, ‘हिना’या मालिका मी केल्या होत्या. त्याही पूर्वी माझी सुरुवात झाली होती टीव्ही अनाऊन्सर म्हणून. पण तेव्हा त्या साप्ताहिक मालिका होत्या. डेलीसोपचं कल्चर नव्हतंच. ते स्वीकारणं ही माझ्यासाठी त्या काळातली फार मोठी तडजोड होती. ते हॉरिबल होतं माझ्यासाठी. दहा दहा – बारा बारा तास काम करणं.. ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. प्रचंड चिडायचे, राग राग करायचे, खूप वाईट वागलेय मी त्या काळात सगळ्यांशी. याचं कारण मी इतर माध्यमांशी त्याच्याशी तुलना करत होते. ते अगदीच अयोग्य होतं. प्रत्येक माध्यमाची गरज वेगळी, आवाका वेगळा तशा मर्यादाही वेगळ्या होत्या. हळूहळू मला हे माध्यम कळायला लागलं. माझ्या लक्षात आलं की मलाच काय सगळ्यांनाच हे माध्यम नवीन होतं कारण नुकतंच ते भारतात आलं होतं. त्यामुळे सगळ्यांचाच शोध सुरू होता. आता मात्र या माध्यमाशी माझी मैत्री झालीय.
२००४ मध्ये माझ्या टीव्ही सिरियल्सची सुरुवात झाली ती ‘अधुरी एक कहाणी’या मराठी आणि ‘सारथी’या हिंदी मालिकेमुळे. दोन्ही एकाच वेळी सुरू होत्या. ‘अधुरी एक’मधली कल्याणी पटवर्धनची भूमिका खूपच आव्हानात्मक होती. ती राजकारणी बाई होती, सुज्ञ. सत्ता हातातून जातेय म्हटल्यावर डाव खेळणारी, महत्त्वाकांक्षी, चाणाक्ष स्त्री. चार वर्षे सुरू होती ही मालिका.. आता मात्र कुठली मालिका किती महिने चालेल यावर प्रश्नचिन्हच असतं. त्यामुळे झोकून देऊन एखादी भूमिका करायची आणि ती मध्येच बंद तरी होईल किंवा वेगळं वळणं तरी घेईल याचीच भीती असते. तशी निराशा मला ‘लज्जा’करताना आली. ती सोशित बाई असते आणि पुढे नवऱ्याचा खून करते इतपर्यंतच ती भूमिका मला माहीत होती, पण पुढे तिने वेगळंच वळण घेतलं. शेवटी तर त्याला सोशल अँगलच मिळाला. खूप क्षमता होती या भूमिकेत, पण खूप वरवरचीच राहिली. अर्थात आनंद देणाऱ्या भूमिकाही खूप केल्या या काळात. नाटकांमधल्या तर विशेष. ‘ध्यानीमनी’मधली शालन, हा माझ्यासाठी आव्हानात्मक रोल होता. प्रचंड शारीरिक एनर्जी वापरायला लागायची मला तो करताना, शेवटी जेव्हा सत्य वाचकांसमोर येतं. तेव्हा जो विस्मय, सहानुभूती आणि संवेदनाच्या जो विलक्षण खेळ प्रेक्षक आणि माझ्यात होतो. तो लाजबाब! ‘सवत माझी लाडकी’तील सीमा करण्यासाठी मला काहीच वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत इतकी मी तिच्यासारखी होते. खूप पॉझिटिव्ह होती सीमा. ‘आईचं घर उन्हाचं’मधली क्षमा, ‘अकस्मात’मधली अरुंधती, ‘नागमंडळ’मधली राणी, ‘प्रेमपत्र’मधली ऊर्मिला साऱ्यांनीच मला काही ना काही दिलंय. सुरुवातीच्या काळातली माझी आवडती भूमिका म्हणजे ‘एज्युकेटिंग रिटा’मधली रिटा. ही ब्रिटिश मुलगी होती. कॉन्व्हेन्टमध्ये शिकल्याचा फायदा मला ही भूमिका करताना झाला. मी रिटा जगले. रिटा ही माझी सर्वात उत्तम वठलेली व प्रभाव करणारी भूमिका होती. त्यानंतर आणखी एक खूप चांगला अनुभव देणारी भूमिका ‘महात्मा व्हर्सेस गांधी’मधली कस्तुरबा. इंग्रजीतल्या या नाटकात गांधीच्या भूमिकेत नसीरुद्दीन शहा होता. नसीरला मी दुबेच्या काळापासून ओळखत होते आणि त्याच्याबरोबर कामही खूप केलं होतं. त्यामुळे ही भूमिका करण्यातला आनंद वेगळाच होता. मी जेव्हा मराठीतली ‘कस्तुरबा’पाहिली, तेव्हा असं लक्षात आलं की एरवी झोकून देऊन काम करणारी भक्ती (बर्वे) खूप जपून ही भूमिका करायची. रियल लाइफ कॅरेक्टर करताना जरा काळजी घ्यावीच लागते. पण मी ठरवलं माझी कस्तुरबा अशी नाही होऊ द्यायची. खरं तर कस्तुरबा खूप स्प्राइटली होत्या. योग्य ते गांधीजींना बेधडक सुनवायच्या. त्याचं स्प्राइटली असणं मी प्रत्यक्षात उतरवलं. मी आणि नसीर, गांधी व कस्तुरबाचं बाह्य़ जगणं जगत नव्हतोच. ते अांतरिक होतं. रंगभूमीवर, डोळ्यात थेट डोळे घालून ‘तू माझी बायको आहेस’या भूमिकेतून वावरणं हे नसीरच करू शकतो. म्हणून त्याचा अभिनय जिवंत होतो. त्याच्याबरोबर काम करणं हा खरंच वेगळा अनुभव असतो. म्हणजे आपल्याला जे करायचंय पण ते करायचा कॉन्फिडन्स नाही, पण हा समोरचा नट ते करतोय आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला देतो, हे नसीरच्या बाबतीत घडतं. इंटर-अॅक्टिव्ह अॅक्टिंग काय असतं हे मी त्याच्याबरोबर अनुभवलं. एखाद दिवशी त्याचा सूर नाही लागला तर माझाही नाही लागायला इतकं आमच्यात टय़ूनिंग होतं. असे अनुभव आपल्याला मोठं करत असतात. असाच अनुभव मला दिला मि. बच्चन अर्थात अमिताभ बच्चन यांनी. त्यांच्याबद्दल बरंच ऐकून होते, वाचलंही होतं. तेव्हा वाटायचं जरा जास्तच लिहितात लोकं. पण नाही, मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि तो माणूस ‘मोठा’का आहे ते कळलं. खरंच इन्स्पायरिंग व्यक्तिमत्त्व आहे. इगोच नाही या माणसाला, ना कसले छक्के-पंजे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, समोरच्या कलावंताचं मोठेपण जाणून घेणं, मी दोन चित्रपट केले त्यांच्याबरोबर ‘भूतनाथ’आणि ‘रण’. ‘भूतनाथ’मध्ये सहा-सात तेही इमोशनल सीन होते त्यांच्याबरोबर. माझा एक स्वभाव आहे. एखादा इमोशनल सीन करत असताना काही कारणास्तव ‘कट’झालं की मी आहे त्या स्थितीत तशीच राहते. इमोशन सोडत नाही. कारण लगेच सीन सुरू झाला की सोपं जातं. ‘भूतनाथ’ करताना असंच झालं. दिग्दर्शकाने ‘कट’म्हटलं नि मी इमोशनमध्ये तशीच घट्ट. बच्चनजींच्या ते लक्षात आलं आणि ते सगळ्यांना म्हणाले, ‘जल्दी करो, मूव्ह फास्ट, यहा जो है इमोशन को पकडके रखा है, समजा करो, कमॉन फास्ट’असं दुसऱ्यांना जाणून घेणारा माणूस क्वचित सापडतो आणि आजारपण कसलंही असो त्यांनी काम चालूच ठेवलंय. मी ते अनुभवलं ‘रण’च्या वेळी. बोलताना त्यांचा जबडा अक्षरशा खाली सटकत होता. तो ते नीट करायचे नी काम चालू ठेवायचे. त्या दिवशी त्यांच्यामुळे पॅकअप नाही करावं लागलं. त्यांचं, त्यांच्या बाबूजीचं आवडतं वाक्य आहे, ‘जिंदगी मनकी हो जाए तो अच्छा, अगर ना हो जाए तो और अच्छा’हे ते प्रत्यक्ष जगले आहेत. त्यांचं आयुष्य जेव्हा समोर येतं ना तेव्हा आपल्या आयुष्यातल्या संघर्षांचं खरंच काहीच वाटेनासं होतं. अभिनय तुम्हाला जगवतो, हेच खरं. म्हणूनच मी आज एक अभिनेत्री म्हणून माझ्या प्रवासाकडे बघते आहे..
चाळीस वर्षांचा हा प्रवास. आता खरंतर शांतपणे, हवी ती भूमिका, दिग्दर्शन मुक्तपणे करणं हाती यायला हवं, पण ही इंडस्ट्री आहे. आणि मी या इंडस्ट्रीचा भाग. त्याचे नियम वेगळे आहेत. इतकी वर्षे काम करूनही पुढची सिरीयल कधी, कसली मिळेल? तुम्ही जीव ओतून भूमिका करायची आणि अचानक ती बंदच झाली तर?.. ही प्रश्नचिन्हेच समोर येणार असतील तर, मला नाही ते योग्य वाटत. रोजची धावपळ, दगदग, अस्वस्थता, अस्थिरता नको वाटते आता. खरं तर व्यवसाय झाल्याने त्यात सुरक्षितता यायला हवी. पण उलट असुरक्षितता अधिक वाढलीय, कामातलं वैविध्य जपावंसं वाटतं, पण सगळ्या गोष्टी जेव्हा पैशाशी येऊन जुळतात तेव्हा ते नको वाटतं. पण मग पर्याय काय. तुम्ही दिग्दर्शन करा, निर्माती व्हा हे सांगणं सोपं आहे. पण ते प्रत्येक स्वतंत्र क्षेत्र आहे. प्रत्येकाची मागणी वेगळी असते. आज मला नाही वाटत मी निर्माती व्हावं. जेव्हा जोम होता, पैसा होता तेव्हा केलं तेही. ‘शेवरी’करताना मी तीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. दर महिना एक लाख रुपये बँकेला द्यायला लागायचे आणि सिरीयलचे मिळायचे किती, तर साडेचार हजार रुपये. कसं केलं असेन मी? पण केलं. खूप धडपडले. पण निभावलं. अर्थात त्याचं फळही मिळालं. जेव्हा मी सगळ्या जबाबदाऱ्यांतून मोकळी होईन, आत्ताच्या मनस्थितीतून बाहेर येईन तेव्हा अगदी ‘पृथ्वी’त जाऊन फ्री नाटकं करेनच, पण आता थोडा निवांतपणा हवाय. यासाठीच मला शिफ्ट व्हायचंय, व्यावसायिकतेकडून कलात्मकतेकडे..
म्हणूनच सध्या मी ब्रेक घेतलाय. जरा या वळणावर विसावलेय.. अर्थात ‘बालाजी’ची एक पूर्ण लांबीची भूमिका असलेली मालिका माझी वाट पाहाते आहे, एका मराठी चित्रपटाचीही ऑफर आहे.. पण हे कुठवर चालत राहाणार हा मी स्वत:च स्वत:ला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्या उत्तराच्या शोधात मी सध्या आहे.
अभिनेत्री म्हणून मी कधी निवृत्त होऊच शकणार नाही. कारण तो माझ्यासाठी माझ्या असण्याचा भाग आहे.. माझ्या जिवंतपणाचं लक्षण.. पण त्याहीपेक्षा दिलीपला दिलेला तो शब्द आहे. मरणापूर्वीचे त्याचे शेवटचे शब्द हेच होते, ‘नीना, थिएटर कधी सोडू नको, तो आपला श्वास आहे..’
मी तो शब्द आयुष्यभर पाळणार आहे..
(शब्दांकन – आरती कदम)