व्यवसायाचं रहस्य म्हणजे यशाला शॉर्टकट नाही. गुणवत्ता, सचोटी आणि मेहनत हे संस्कार आम्ही घेतले आणि पुढे पोचवले. आज मोठी शहरं जी जागतिक बॅ्रण्ड वापरतात ती वगळली तर महाराष्ट्रात टी टॉप आणि एच.पी. हे लोकप्रिय बॅ्रण्ड आहेत आणि चहाशौकिनांचे ते लाडके आहेत. सचोटीबद्दल सांगायचं तर ‘‘१०० कोटी रुपयांच्या चहाच्या माध्यमातून जगभर पोचू इच्छिणाऱ्या जिद्दी कुटुंबाची. आमचं प्रत्येक काम घरातला माणूसच सांभाळेल आणि व्यवसायमूल्यांशी तसंच माणुसकीशी कुठेही तडजोड करणार नाही, असं ठामपणे सांगणाऱ्या कुटुंबाची ‘दामोदर शिवराम आणि कंपनी’ ची एकशे दहा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही गोष्ट.
कोकणातल्या देवरुख गावातले एक शिक्षक. पण आर्थिक प्रगतीसाठी व्यापारच हवा, ही जाण असलेले. त्यांनी गावातच जोडधंदा म्हणून किराणा व्यवसाय सुरू केला. कै. हरि पांडुरंग गद्रे हे त्यांचं नाव! हरिऑक्ट्रॉय नाक्यावरचे कारकूनसुद्धा म्हणतात, गद्रय़ांचा माल ना, एक तोळासुद्धा कमी-जास्त नसेल! असा व्यवहार आहे आमचा.’’ सांगताहेत ‘दामोदर शिवराम आणि कंपनी’चे सुबोध गद्रे.
गोष्ट आहे सरळ, साधी. एका छोटय़ाशा चहाच्या पेल्याची. त्यात लुटुपुटीची वादळंसुद्धा नाहीत! पण तरीही, घोट-घोट चहा घेत, पुढे काय झालं ही उत्सुकता टिकवून ठेवणारी. कारण ही गोष्ट आहे कपभर  पांडुरंग यांना तीन मुलगे. अनंत, दामोदर आणि शिवराम. अतिशय तरुण वयातच वडिलांना साथ देत. दामोदर आणि शिवराम यांनी व्यवसाय संगमेश्वर आणि कोल्हापूपर्यंत पोहोचवला. होलसेलमध्ये तांदूळ खरेदी करण्यासाठी शिवराम गद्रे (नानासाहेब) हे ब्रह्मदेश आणि पूर्व भारतात जात असत. तेव्हा त्यांच्या व्यापारी नजरेनं चहाची सतत वाढणारी मागणी हेरली आणि कलकत्त्याला जाऊन चहाच्या लिलाव केंद्रातून चहा खरेदी सुरू केली.
थोरले बंधू अनंतराव यांचा ओढा व्यवसायापेक्षा ज्ञानार्जन आणि सामाजिक कामाकडे जास्त होता. त्यांनी आपल्या दोन्ही भावांसह गिरगावात मौज प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली. हा काळ असेल साधारण १९३० च्या आसपास. उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित करण्यावर अनंतरावांनी लक्ष केंद्रित केलं. आचार्य अत्रेंचं ‘झेंडूची फुले’ आणि ‘कऱ्हेचे पाणी’ ही त्यांचीच प्रकाशनं. पण मन सामाजिक कार्याकडे ओढत असल्यामुळे त्यांनी ‘मौज’, त्यांचे परममित्र श्री. पु. भागवत यांना विकले. गद्रेबंधूंनी स्थापन केलेल्या आणि भागवतबंधूंनी जोपासलेल्या ‘मौजे’नं महाराष्ट्र सारस्वताची किती मौलिक सेवा केली ते आपण जाणतोच.  अनंत हरि गद्रेंना पुढे संत गाडगे महाराजांनी ‘समतानंद’ म्हणून गौरवले. याच नावानं त्यांनी पत्रकारिता, समाजसेवा चालू ठेवली.
नुसता चहा आणून महाराष्ट्रात विकण्यापेक्षा स्वत:चा बॅ्रण्ड तयार करणं गरजेचं आहे, हे त्या काळातही गद्रेबंधूंना उमगलं होतं. त्यामुळे त्यांनी ‘लाल छत्री’ आणि ‘एच.पी.’ (हरि पांडुरंग) हे बॅ्रण्ड बाजारात आणले. दरम्यान, दोघा बंधूंची मुलंही व्यवसायात उतरली. केशव दामोदर, पांडुरंग दामोदर, विजयकुमार दामोदर आणि सुरेश दामोदर यांनी कंपनीच्या कोकणातील सर्व शाखा सांभाळायला सुरुवात केली. बॅ्रण्ड नेमनं चहा विकायचा. तर मिळेल तो चहा खरेदी करणं उपयोगाचं नाही. चहाच्या दर्जावरही आपलंच नियंत्रण हवं हे जाणून १९५०च्या दशकात तामिळनाडूतल्या कुन्नूर इथल्या चहाचे मळे कै. माधव दामोदर गद्रे यांनी निगराणीसाठी घेतले. तिथेच स्थायिक होऊन त्यांनी व्यवसाय वाढवला. पुढे हे काम शरद गद्रे पाहू लागले आणि माधवरावांनी पुण्यात स्थलांतरित होऊन कंपनीची शाखा काढली. पुढील काळात ही शाखा त्यांचे बंधू रघुनाथरावांनी खूप वाढवली.
चहाचं हे क्षेत्र मराठी माणसांसाठी नवीन होतं. लिलाव, मोठमोठय़ा खरेद्या, वितरण या साऱ्यांवर गद्रेबंधूंनी प्रभुत्व मिळवलं, तरीही टी टेस्टिंग ही गोष्ट अपरिचितच होती. त्यात परावलंबित्व नको म्हणून वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी श्यामराव गद्रे कलकत्त्याला स्थायिक झाले. श्यामरावांनी अल्पावधीतच टी टेस्टिंग आणि ब्लेंडिंगमध्ये प्रावीण्य मिळवलं. ब्लेंडिंग म्हणजे काय? तर ‘निरनिराळे चहा, विशिष्ट टक्केवारीमध्ये एकत्र मिसळून अपेक्षित चव आणि गुणवत्तेची चहापत्ती बनवणे.’ स्वत:चा बॅ्रण्ड तयार केल्यावर ब्लेंडिंग हे अत्यावश्यक ठरतं. बदलत्या हवामानानुसार चहापत्तीची चव आणि दर्जा बदलत असतो. टेस्टिंग आणि ब्लेंडिंगमुळे त्यावर नियंत्रण राहतं. हेच कसब श्यामरावांकडून पुढे प्रकाश गद्रे यांनी शिकून घेतलं आणि आसाममध्ये गुवाहाटी इथं स्थायिक होऊन त्यांनी १९७० ते १९९४ असं दीर्घकाळ आसाममध्ये वास्तव्य केलं. गुवाहाटीची शाखा आता प्रकाश गद्रे यांची कन्या दीप्ती गद्रे शर्मा बघते आहे.
आसाममधल्या अशांततेच्या काळात दीप्तीचं बालपण-शिक्षण झालं. चहाचे मळे आणि त्याच्याशी संबंधित श्रीमंत लोक हेच अतिरेक्यांचं लक्ष्य असायचं. अशा वेळी महाराष्ट्रात परतावं असं नाही का वाटलं? यावर प्रकाश गद्रे उत्तरले, ‘‘एक तर आम्ही स्थानिक जीवनात मिसळून गेलो होतो. आणि पत्नीनं या काळात धीर धरला.’’ त्यांची मुलगी सांगते, ‘‘संध्याकाळी घरी लौकर परतणं हे बंधन सोडलं तर अशांततेचा त्रास नाही झाला.’’ मुळात असामी लोक प्रेमळ आणि शांत प्रवृत्तीचे म्हणूनच तर प्रकाशराव कोल्हापुरात परतले, पण दीप्तीनं असामी मित्राशी विवाह केला. आज ती पतीच्या अ‍ॅडव्हर्टाझिंग फर्ममध्ये कामं करून शिवाय चहाच्या कंपनीचे अकौंटस् सांभाळते. तिनं अभिमानानं सांगितलं, ‘‘यात मोठा वाटा वडिलांनी प्रशिक्षित केलेल्या कर्मचारीवर्गाचा आहे. मी अगदी नवखी असतानाही त्यांनी मला सांभाळून घेतलं.’’ गेली १७ र्वष दीप्ती गुवाहाटीचे लिलाव, खरेदी आणि अकौंट्स सांभाळते आहे.
प्रकाशरावांप्रमाणेच अभिजित गद्रे यांनीही श्यामरावांकडून ब्लेंडिंगचं ज्ञान अनुभवातून मिळवलं. अभिजित यांची कन्या निवेदिता. तिनं पदवी फॅशन डिझायनिंगमध्ये मिळवली. पण लहानपणापासून आजोबां(श्यामराव)बरोबर ती लिलाव पाहायला जायची. आजोबांच्या कामाचं तिला आकर्षण वाटायचं. गेल्या दोन-तीन वर्षांत तिनं कलकत्त्याच्या कामाचा मोठा भार उचलला आहे. ती म्हणते, ‘‘आता ब्लेंडिंगचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळतं, पण लाखो सॅम्पल्सचा अनुभव तुम्हाला कितीतरी जास्त शिकवतो. निवेदिताच्या आधी या टी ब्लेंडिंगच्या कामात संपूर्ण भारतात दोन-तीन स्त्रियाच आहेत. आता कॉम्प्युटरमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. व्यापाराचं स्वरूपही बदललं. गुवाहाटी, कोची, कोइम्बतूर, कुन्नूर, सिलिगुडी आणि कलकत्ता या सर्व केंद्रांवरच्या खरेदीवर प्रकाश गद्रे लक्ष ठेवतात पण ब्लेंडिंगचं काम कोल्हापुरात करतात. महाराष्ट्रात कोकण, कोल्हापूर, चिपळूण, कराड, सांगली, मुंबई, पुणे अशा शाखा, गोव्यात मडगाव, कर्नाटकात निपाणी इथेही दामोदर शिवराम आणि कंपनीच्या शाखा आहेत. अमेरिका, ब्रिटनलाही चहा निर्यात होतो.
लाल छत्री, एच. पी. या ब्रॅण्डस्चं ब्लेंडिंग हातकणंगले इथल्या सनराइज टी प्रोसेसिंग कंपनीत होतं. चहाच्या पेल्यातल्या या गोष्टीतला चहा आता शंभर कोटींची उलाढाल करतो आहे. पहिल्या पिढीचा किराणा व्यवसाय, दुसऱ्या पिढीनं चहा आणला, देशभर पोहचवला आणि तिसऱ्या पिढीनं निर्यात वाढवली.
अनेक विद्याशाखांत पारंगत चौथी पिढी आपल्याच व्यवसायातले वेगवेगळे विभाग सांभाळते आहे. प्रकाश गद्रे चेअरमन, सुरेंद्र गद्रे मॅनेजिंग डायरेक्टर तर संदीप, प्रदीप, प्रसन्न, सुबोध, संतोष, अभिजित, सत्यजित, तुषार, गजानन, निरंजन, अरविंद, मधुसूदन, राहुल, नंदकुमार, कांचन, विजयकुमार आणि अभय हे सारे गद्रे आपापले विभाग सांभाळून संचालक म्हणून कार्यरत आहेत. या सर्वावर कुशल देखरेख अजूनही कुटुंबप्रमुख चंद्रकांत ऊर्फ कांताभाऊ यांची आहे.
एवढं मोठं कुटुंब कोणत्या धाग्यानं एकत्र ठेवलं आहे. आणि १०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचं रहस्य काय? यावर सुबोध गद्रे म्हणतात, ‘‘यशाला शॉर्टकट नाही. गुणवत्ता, सचोटी आणि मेहनत हे संस्कार आम्ही घेतले आणि पुढे पोचवले. आज मोठी शहरं जी जागतिक ब्रॅण्ड वापरतात ती वगळली तर महाराष्ट्रात टी टॉप आणि एच.पी. हे लोकप्रिय ब्रॅण्ड आहेत. आणि चहाशौकिनांचे ते लाडके आहेत. सचोटीबद्दल सांगायचं तर ऑक्ट्रॉय नाक्यावरचे कारकूनसुद्धा म्हणतात. गद्रय़ांचा माल ना एक तोळासुद्धा कमी-जास्त नसेल. असा व्यवहार आहे आमचा. व्यवसाय वाढवायचंच ब्रीद असतं तर हजार कोटींवरसुद्धा जाईल. कारण चहाला खप असतोच पण आमच्या गुणवत्तेच्या आग्रहानं आम्ही सर्व विभागांचं नियंत्रण गद्रे कुटुंबीयांच्याच हातात ठेवलं आहे आणि त्यात आम्ही समाधानी आहोत.’’
समाधानाच्या तुळशीपत्राचा स्पर्श नसेल तर उत्तुंग यशही तोकडंच वाटतं, खरं ना! गद्रे कुटुंबीयांनी आपल्या यशाची गंगा अनेक सामाजिक संस्थांच्या अंगणात पोहचवली आहे कोल्हापूरच्या अनाथाश्रमापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत, करवीरनगरवाचन मंदिरापासून ते वेदपाठशालेपर्यंत आणि शिक्षण संस्थांपासून ते गायन समाज देवळ क्लबपर्यंत अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ आहेत. हरि पांडुरंग यांचा व्यवसाय आणि सामाजिक कार्याचं समतानंद अनंत हरि गद्रेंनी लावलेलं रोपटंही छान वाढलं आहे. घराणेशाहीचं हे हवंहवंसं वाटणारं प्रत्यंतर आहे.    
vasantivartak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा