आरती अंकलीकर

‘घर.. ते कोणतंही असो. गावातलं हिरवाई-निळाईच्या कुशीतलं, एकत्र कुटुंबानं गजबजलेलं किंवा मुंबईच्या धबडग्यातलं छोटं, सुटसुटीत. व्यक्तींचे ‘सूर’ तिथे कसे लागतात ते महत्त्वाचं! अशी खूप घरं माझ्या आयुष्यात आली. कर्नाटक, मुंबई, पुणे, स्थळं बदलली; पण या सर्व घरांच्या भिंती सुरांनी अखंड झंकारणाऱ्या होत्या. या झंकारात मिसळून जात त्यात आपला सूर मिसळायला शिकले मी!’  

Auction of Walmik Karad flat averted in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवमधील वाल्मिक कराडच्या फ्लॅटचा लिलाव तूर्तास टळला; वाल्मिकचे दोन फ्लॅट असल्याचं झालं होतं उघड
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Andheri zopu yojana, Eligibility , Disqualification ,
अंधेरीतील झोपु योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता! आणखी सहा झोपडीवासीयांची पात्रता रद्द
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
BDD chawl redevelopment, houses Worli ,
बीडीडी चाळ पुनर्विकास : वरळीतील ५५० घरांचा ताबा मार्चमध्ये, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात घरांच्या वितरणाचा समावेश
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal House: अरविंद केजरीवाल यांच्या घराची गोष्ट; १९४२ चं बांधकाम आणि ३३.६६ कोटींचा दुरुस्ती खर्च!

गेले आठ दिवस आभाळ चांगलंच भरून येतंय पुण्यात. अधूनमधून एखादी सर, पण आज सकाळी मात्र छान पाऊस पडत होता. हवा  छान गार झाली होती. आईनं नाश्त्याला गरमागरम उप्पीट केलं, कैरीचा कीस घालून! कैऱ्यांच्या सीझनमध्ये साली काढून, किसून, फ्रीजरमध्ये झिपलॉकमध्ये ठेवलेला कीस. मस्त झालं होतं उप्पिट. त्या उप्पीटाची चव मला माझ्या लहानपणाच्या कर्नाटकातील विजापुरातल्या घरातल्या स्वयंपाकघरात घेऊन गेली.    

आम्ही २० जण राहात असू त्या घरात. प्रशस्त स्वयंपाकघर होतं त्यात. २० फूट बाय २० फुटांचं असेल. ‘एल’ आकाराचा मोठा ओटा, ६ जणांची डायिनग टेबलावर पंगत आणि आम्हा छोटय़ा ७-८ पिल्लांची खाली बसलेली पंगत. घरातल्या सगळय़ा बायका स्वयंपाकघरात ओटय़ाजवळ. दोघी वाढायला. स्वयंपाकघराजवळच एक मोठ्ठा हॉल. ३० बाय ३० चा असेल. त्यात एक मोठा झोपाळा-६ बाय ४ चा. बाजूला एक कोठीची खोली. आणखीन एक मोठा हॉल, बेडरूम्स वगैरे. घराला चार दरवाजे चार दिशांना. सकाळी ६ ते रात्री १० या दरवाजांमधून ये-जा सतत. गॅसवर कायम चहा ठेवलेला.

आमच्या उन्हाळय़ाच्या सुट्टय़ांमध्ये तर धमालच असायची. झोपाळय़ाच्या हॉलमध्ये आजी बसलेली आणि तिच्यासमोर ५०-६० आंबे असायचे. रस काढायचं काम तिचं. आम्ही बालगोपाळ मंडळींचं झोपाळय़ावर कधी पाढे म्हणणं, कधी माझी गाणी चालू असायची, तर कधी थेट भांडणंच.. आमच्यामुळे झोपाळा मात्र कायम भरलेला, झुलणारा. रस काढून झाला, की आजी एका मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आरामखुर्चीवर बसे दिवसभर! चारही दरवाजांतून ये-जा करणारी मंडळी दिसत तिथून. आजोबा बाजूच्या पलंगावर तक्याला टेकून बसलेले. आजी चापूनचोपून नऊवारी नेसत असे. गळय़ात सोन्यात गाठवलेली बारीक मोत्यांची चेन आणि मंगळसूत्र. केसांना गंगावन लावून मग आंबाडा घालत असे. आजीचं काम अगदी नीटनेटकं. गोड खळी पडत असे गालावर. मोठ्ठा आवाज होता तिचा. आजोबा मात्र कायम शांत. कधी व्यायाम, वॉक करताना पाहिलं नाही मी त्यांना. पांढरं धोतर, पांढराशुभ्र झब्बा घालून पलंगावर बसलेले असत. पाहुण्यांच्या प्रतीक्षेत! सारखी मंडळी येत त्यांना भेटायला. मनसोक्त गप्पा, हसणं, चहापाणी चाले.

असं आमचं  प्रशस्त घर. त्या वेळी खूप दूपर्यंत इतर घरंही नव्हती. आमच्या घरापासून २०० मीटरवर आमची जिनिंग फॅक्टरी होती- म्हणजे कापसातून सरकी वेगळी करण्याची. त्याचा प्रचंड आवाज. त्यामुळेच बहुधा घरातल्या सगळय़ांना मोठय़ानं बोलायची सवय होती. देवघरातून घंटानाद ऐकू येई. हणमंतभटजी पूजा करत येऊन रोज. एका खोलीतून तानपुऱ्याचा झंकार. सुधीरकाका रियाज करत रोज. कधी निडगुंदी बुवा येऊन तालीम देत त्यांना. फॅक्टरी आणि आमचं घर याच्यामध्ये असलेल्या मोठय़ा अंगणात कापसाची अंडगी ठेवलेली असत, शेकडो अंडगी. अंडगं म्हणजे आपली पोती असतात ना, त्याच्या १० पट आकाराची कापसाची जाळीदार पोती. जाळीतून कापूस डोकावत असलेली अंडगी. भाजीवाला कांदे-बटाटे कसे एकावर एक रचून ठेवतो, तशी रचून ठेवलेली. त्या अंडग्यांच्या रचनेत मध्ये बनणाऱ्या पोकळय़ांमध्ये आम्ही लपंडाव खेळत असू. टोचऱ्या कापसाच्या अंडग्यांमध्ये लपून बसण्यात मजा येई.

या विजापूरच्या प्रशस्त घरांमधल्या कोठीच्या खोलीत एका सावळय़ा मुलीचा जन्म झाला. सुरांत रडली असावी! ती मी! विजापूरचं घर माझं पहिलं घर. कानडी, मराठी असं संमिश्र वातावरण. आमची सकाळ ‘नारायण नारायण, ब्यळगाईतु, ब्यळगाईतु’ (नारायणा, नारायणा, सकाळ झाली) या भजनानं होत असे. घरातली सगळी मंडळी एकत्र बसून काकड आरती आणि भजनं म्हणत. अर्धा तास आम्ही डोळे चोळत, आईच्या कुशीत बसून, येतील त्या ओळी पुटपुटत असू. सकाळचं भजन झालं, की मग धबडगा सुरू. महबूब येई. तो घोडय़ाला मालीश करे, खरारा. टांगा साफ करून तयार करे. फिटर मल्लप्पा, घरकामातली मदतनीस पयाबाई, स्वयंपाकासाठी गोविंदा, पूजेसाठी हणमंतभटजी, इतर कामांसाठी हुसेनी, बाहेर थोडी जड कामं करायला लमाणी. सगळय़ांना आजी प्रेमानं जेवायला वाढत असे.  पयाबाई रोज इरकल साडी नेसत असे आणि ठिगळं लावलेली चोळी. लमाण्याच्या बायकोचा ड्रेसही मला खूप आवडे. काचा लावलेल्या कापडाचा परकर-ब्लाऊज, भडक रंगाचा. डोक्यावर पदर, पांढऱ्या जाड बांगडय़ा हस्तिदंती. जवळजवळ दंडापर्यंत. जागोजागी गोंदवलेला चेहरा. मेहबूब आम्हाला टांग्यातून बाजारात नेई, आजोबांबरोबर. छान गाणी गात असे तो चित्रपटातली. जात-पात-धर्म हा विचार कधी शिवलाही नव्हता मनाला. तर आमच्या लहानपणीच्या आकर्षणाचं एक ठिकाण म्हणजे, विजापूरचा गोल घुमट, तो तर प्रत्येक भारतीयानं पाहावाच असा. घुमटात काहीही बोललं तरी त्याचा ७ वेळा येणारा प्रतिध्वनी, तिथली ‘व्हिस्पिरग गॅलरी’ आणि एकूण गोल घुमटाचं स्थापत्य अचंबित करणारं. आमची वारी असेच महिन्यातून एकदा.  याच विजापूरच्या घरातल्या हॉलमध्ये अनेक मैफली होत. माझं नेट प्रॅक्टिसचं ठिकाणच होतं ते. तिथूनच माझ्या गाण्याची सुरुवात झाली..

माझा जन्म विजापूरचा; पण वाढले मुंबईत. नोकरीसाठी बाबा आणि अनुषंगानं आमचं पाच जणांचं कुटुंब मुंबईला स्थायिक झालं. मात्र वर्षांतले ३-४ महिने विजापूरला मुक्काम असेच. मुंबईचं घर माटुंग्याला. गर्द झाडी भोवताली. दोन मजल्यांच्या छोटय़ा छोटय़ा इमारती. जवळचा ‘पाच गार्डन’चा हिरवागार परिसर. विजापूरच्या प्रशस्त घरातून कायम दरवाजे बंद असलेल्या फ्लॅटमध्ये आलो. तरी इतर घरांच्या मानानं प्रशस्तच होतं आमचं घर. हॉल, बेडरूम, डायनिंग रूम, किचन, २ बाथरूम. डायनिंग रूम ही पहाटे स्टडी रूम असे. नंतर डायिनग रूम. शाळा सुटून घरी आल्यावर ती टेबल टेनिस रूम होई! टेबलावर मध्यभागी पुस्तकांचं नेट बनवत असू. आई आमची कोच. मी, माझा भाऊ अरविंद आणि आमची मित्रमंडळी धुमाकूळ घालत असू. बाबांच्या येण्याची वेळ झाली की ‘टे.टे.’ रूमची परत डायिनग रूम होई आणि मी हॉलमध्ये रियाजाला बसत असे. या घरात डॉ. प्रभाताई (अत्रे), माणिकबाई (वर्मा), सी. रामचंद्र, हृदयनाथजी (मंगेशकर), सुरेश वाडकर अशी अनेक मोठी माणसं येऊन गेली. माझ्या साधनेतला खूप मोठा काळ या घरात गेला. फ्लॅट संस्कृती असल्यानं आपापली स्पेस जपू देणारी रचना होती या इमारतींची. शेजारी असलेलं तमिळ कुटुंब अडीनडीला मदत करत असे. इतर वेळी आमची ‘प्रायव्हसी’ जपली जाई.

    १९८३ मध्ये लग्न झालं आणि मी मुंबईतच ताडदेवजवळ नाना चौकातील ‘शास्त्री हॉल’ या कॉलनीत राहायला आले. विजापूरला एकत्र कुटुंब, मुंबईला आल्यावर आमचंच छोटंसं सुटसुटीत चौकोनी कुटुंब आणि आता लग्नानंतर परत एकत्र कुटुंब! मी, उदय (उदय टिकेकर) आणि सासू-सासरे. शास्त्री हॉल चाळवजा कॉलनी. बहुतांशी मराठी भाषकच. परंपरा जपणारे, सांस्कृतिक वारसा चालवणारे. दुपारी जेवण झाल्यावर घराबाहेरील बाकांवर  येऊन बसून निवांत गप्पा मारणाऱ्या स्त्रियांचा शेजार. केवळ रात्री १० ते सकाळी ६ आमचा मुख्य दरवाजा बंद असे. इतर वेळी उघडा. एखादं मोठ्ठं कुटुंब एकत्र राहात असल्याची सुरक्षित भावना इथे. आमच्या घरी सकाळी ६ वाजता तानपुऱ्याचा झंकार सुरू होई, तो दुपारी १ पर्यंत चालूच राही. माझे सासरे, सासूबाई, मी, सगळय़ांचा रियाज चाले एकामागोमाग. जयपूर घराण्याच्या कमलताई तांबे येत अनेक वेळा माझ्या सासूबाईंना तालीम द्यायला. कमलताई या मोगूबाईंच्या (मोगूबाई कुर्डीकर) शिष्या. मीदेखील बसत असे तालमीला. पं. सुरेशदादा तळवलकर देखील येत शिकवायला. मी आणि सुप्रसिद्ध हार्मोनियमवादिका सीमा शिरोडकर या घरात रोज ३-४ तास रियाज करत असू. माझी लेक स्वानंदीचं लहानपणदेखील याच घरात गेलं.

  काही वर्षांनंतर मी पुण्याला आले. उष्ण दमट मुंबईतून कोरडय़ा हवेच्या पुण्यात! धो धो पाऊस कोसळणाऱ्या मुंबईतून पावसाच्या नाजूक सरी पडणाऱ्या पुण्यात. महाराष्ट्राच्या आर्थिक, व्यावसायिक राजधानीतून सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात. ‘बंबय्या’ हिंदी रूढ असलेल्या मुंबईहून ‘पुणेरी मराठी’ अभिमानानं बोलणाऱ्या पुण्यात. चोवीस तास जागं असणाऱ्या मुंबईतून दुपारी १ ते ३ वामकुक्षी घेणाऱ्या पुण्यात. मुंबईएवढं ट्रॅफिक नसलेलं पुणं. दुचाकींचं पुणं. जागोजागी संगीत विद्यालयं असणारं पुणं. भरपूर झाडी असलेलं पुणं. कमीत कमी जागेतून रिक्षा काढणाऱ्या रिक्षावाल्यांचं पुणं. भीमसेनजींचं (पं.भीमसेन जोशी) पुणं, हिराबाईंचं (हिराबाई बडोदेकर) पुणं. रघुनाथ माशेलकरांचं पुणं, जयंत नारळीकरांचंदेखील. भाईकाकांचं (पु. ल. देशपांडे) पुणं, चितळय़ांचंही! सवाई गंधर्व महोत्सवाचं, संगीत श्रोत्यांचं, विद्येचं माहेरघर पुणं!

द्रुत लयीतून मध्य लयीत आल्यासारखं वाटलं पुण्यात येऊन. इथल्या घरानं स्वातंत्र्य दिलं, जबाबदारी शिकवली. इथेच माझ्या चिमुकल्या गुरुकुलाची सुरुवात झाली. बाहेरगावाहून येणाऱ्या संगीताच्या विद्यार्थ्यांची सोय इथं होऊ लागली. गाण्याच्या तालमीबरोबर गुरूच्या सान्निध्यात राहिल्यानं मिळणारं शिक्षणदेखील शक्य होऊ लागलं मुलींना.  प्रत्येक घरानं खूप काही दिलं मला. रागांना  नियमांच्या भिंती असतात, चौकट असते, ज्यामुळे  सौंदर्य निर्माण होतं. तशा भिंती दिल्या घरानं. त्यांनी सुरक्षितता दिली.  एक एक खोली म्हणजे एक एक आवर्तन. हवं तसं सजवावं! रागाच्या चौकटीतून बाहेर डोकावताना विस्तीर्ण संगीतविश्वाचं दर्शन होतं, तसं घरातल्या मोठय़ामोठय़ा खिडक्यांतून आकाशाचं दर्शन! जसा संगीतातून आनंद, तसा घरानंही दिला.

माझ्या स्मरणात घर करून राहिलेली इतर घरं कोणती? याचा विचार करायला गेलं तर पहिलं घर आठवतं, माझे गुरू. पं. वसंतराव कुलकर्णी यांचं. घर म्हणजे १२ बाय १० फुटांची खोली ती एक केवळ! सर आणि वहिनी राहात. नीटनेटकं व्यवस्थित घर, छोटा ओटा, एक मध्यम आकाराचा पलंग, एक छोटा पलंग, एका छोटय़ा खोलीत सगळा संसार होता. खूप प्रेमानं आदरातिथ्य करत वहिनी.  दुसरं घर किशोरीताईंचं. अनेक तानपुऱ्यांनी सजलेली म्युझिक रूम तिथे. २-३ सुगंधी फुलांची रोपं बाल्कनीबाहेर. सुरेख लाकडी झोपाळा, नक्षीकाम केलेला. त्यावर बसलेल्या ताई. भिंतीवर माईंचा (मोगूबाईंचा) मोठा फोटो. ताईंची अवॉर्डस. तिथली शांततादेखील माझ्या मनाला सुरांनी चिंब भिजवत असे. मग ताई शिकवताना, गाताना जे होई ते शब्दातीत!   देवासचं कुमारजींचं (कुमार गंधर्व) घरही स्वरशक्तीपीठ. डोंगराच्या पायथ्याशी. कोरडी हवा असलेलं देवास माळव्यातलं टुमदार घर. सौंदर्यदृष्टीनं नटलेलं. अंगणात झाडं, त्यावर किलबिलणारे पक्षी. तिथल्या वाऱ्याच्या झुळकीत वाहणारे रागसंगीताचे, निगुर्णी भजनांचे सूर; आर्त.

या प्रत्येक घरानं प्रेरणा, आनंद दिला. पुढे कार्यक्रमाच्या निमित्तानं परदेशाचे दौरे करायला लागले, तेव्हा बहुतेक वेळा तिथल्या स्थानिक यजमानांच्या घरी राहावं लागे. नवीन शहर, नवीन होस्ट, नवीन घर. तिथे अ‍ॅडजस्ट होऊन आपल्या संगीतकोषात शिरून कार्यक्रम करण्याची सवय होऊ लागली मला. ‘हे विश्वची माझे घर’ असं काहीसं! आपल्या भोवतालचं वातावरण आपल्याला हवं तसं असण्यापेक्षा, असेल तशा वातावरणात आपल्याला हवी असलेली मनोवस्था मिळवण्याची धडपड सुरू झाली. त्याचा सराव झाला. आता सहजपणे होऊ लागलं!

aratiank@gmail.com

Story img Loader