रताळं हे आपण बहुधा उपवासासाठी वापरतो. बटाटय़ापेक्षा जास्त आरोग्यदायी असलेलं हे कंदमूळ भरपूर स्टार्चने युक्त असून शरीराला ताबडतोब ऊर्जा देण्याचं काम करतं. रताळ्याचा गर पांढरा, पिवळट रंगाचा असतो, तर काही रताळी आतून केशरी रंगाची असतात. रताळ्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात असतं. केशरी रताळ्यात ‘अ’ जीवनसत्त्व जास्त असतं. त्यामुळे डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी रताळ्याचा उपयोग होतो. त्यातल्या पोटॅशियममुळे हृदयाच्या कार्यालाही मदत होते. रताळ्यात फॅट नाही, कोलेस्ट्रोल नाही आणि पचायला हलकी आहेत. रताळी भाजून, उकडून खावी, गोड आणि तिखट दोन्ही प्रकारे ती चविष्टच लागतात.
रताळ्याचं पुडिंग
साहित्य : ३ मोठी रताळी, १ संत्रं, १ केळं, १ मोठा चमचा मध, १ चमचा जायफळ पावडर, प्रत्येकी १/२ कप दूध, खजुराचे बारीक
तुकडे, ओटमील आणि अक्रोडाचे तुकडे,
पाव कप साखर, ४ मोठे चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ.
कृती : रताळी ओव्हनमध्ये भाजून किंवा उकडून घ्यावी. सालं काढून तुकडे करावे. त्यात केळ्याचे काप, संत्र्याचा रस,
१ चमचा संत्र्याची साल, मध, दूध, २ मोठे
चमचे तूप, खजूर आणि जायफळ मिसळावं. तुपाचा हात लावलेल्या पॅनमध्ये हे मिश्रण घालावं, ओटमील, साखर, उरलेलं तूप आणि अक्रोड मिसळावे आणि पॅनमधल्या मिश्रणावर पसरावे. १९० सें.वर तापलेल्या ओव्हनमध्ये अर्धा तास भाजावं.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा