गोंड, पट्टचित्र, वारलीसारख्या कलाकृती असोत वा स्पेशल डेकोर, मिररचं लिपणकाम, ग्लास डोक्रा, ब्रासच्या विविध कलाकृती. यातल्या कलेला व्यावसायिक कौशल्याचं कोंदण दिलं की तर एक उद्योग उभा राहू शकतो. हेच लक्षात घेऊन उभं करण्यात आलं, ‘बाया डिझाइन’. त्याच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी शिबानी जैन यांच्याविषयी..
‘सुटीचा दिवस आहे. स्टुडिओत नसेन मी कदाचित, आणि हो, मुलीची दहावीची परीक्षा आहे. तिचा अभ्यास घेण्यात मी व्यग्र असेन. तेव्हा, र्अजट आहे म्हणून फक्त काही मिनिटं आणि तेही घरीच बोलू या मग..’ शिबानी यांचा निरोप होता. स्वत:च निवडलेल्या कलेसारख्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळाल्यानंतरही कुटुंबाबाबत प्रसंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला सारणाऱ्या शिबानी जैन. पूर्वाश्रमीच्या शिबानी दासगुप्ता. ‘बाया डिझाइन’ ही कलेला व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी कंपनी शिबानी यांनी डिसेंबर २००९ मध्ये स्थापन केली. आज त्या त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. चित्र, शिल्प, फ्रेम, प्लेट, वॉल युनिट, भित्तीचित्रे आदी सारं काही तयार करणारा त्यांचा अद्ययावत स्टुडिओ लोअर परेलमध्ये आहे.
बंगाली असलेल्या शिबानी यांचा जन्म, शिक्षण, करिअर आणि पुढे कुटुंबाला मिळालेला चौकोनी आकारही मुंबईनंच दिला. आई मल्टिनॅशनल कंपनीत मनुष्यबळ विकास विभागातील अधिकारी तर वडील नेव्हीमध्ये होते. शालेय शिक्षणानंतर पदवीसंलग्न अभ्यासक्रमासाठी त्यांनी डिझाइन (आरेखन) विषयाची निवड केली. त्यासाठीचा तब्बल पाच वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी अहमदाबाद येथे केला. ग्राफिक डिझायनरची पदवी मिळवलेल्या शिबानी यांनी सुरुवातीच्या कालावधीत काही खासगी कंपन्यांमध्ये डिझायनर म्हणून काम केलं. टाटा समूह, काही डॉट कॉम कंपन्या, त्यानंतर ब्रिटनच्या काही कंपन्यांच्या आरेखन सल्लागार म्हणून त्यांनी भूमिका वठवली.
शिबानी यांनी मग कलेच्या प्रांतात झोकून देण्याचं निश्चित केलं. सहा वर्षांपूर्वी त्यांनी ‘बाया डिझाइन’ तयार केलं. सुरुवातीला ते अगदी ४५० चौरस फुटांच्या दालनात होतं. कंपनीच्या स्थापनेत त्यांनी सर्वस्व ओतून दिलं. कलेची आवड, छंद असणं वेगळं आणि त्याला व्यावसायिक रूप देणं म्हणजे बैठका, तडजोडी, विक्री व विपणन हे सारं माझ्यासाठी आव्हानात्मक असल्याचं त्या कबूल करतात. मात्र त्यातही वर्चस्व मिळवत त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. आज ‘बाया डिझाइन’चं स्वतंत्र वास्तव्य १,५७५ चौरस फुटांत आहे. जोडीला विविध कलाकृती तयार करणारा अद्ययावत स्टुडिओही आहे. कंपनीच्या स्वत:च्या संकेतस्थळांबरोबरच इतर ई-कॉमर्स मंचांवरही ‘बाया डिझाइन’च्या कलाकृती पाहायला मिळतात. अर्थात आपल्या कलाकृतींमध्ये वैविध्य यावं यासाठी त्या सतत नावीन्याच्या शोधात असतात. त्यासाठी त्या स्वत: विविध राज्ये, तिथले कलाकार आणि त्यांच्या कलाकृती यांचा सातत्याने संपर्कात असतात. गेल्या दीड दशकाच्या कलेच्या प्रांगणातील याच शोधामुळे शिबानी विविध कलाकार, त्यांचा समूह तसेच पारंपरिक कला क्षेत्रातील सामाजिक संस्थांशीही जोडल्या गेल्या आहेत.
शिबानी म्हणाल्या, ‘‘कलेला व्यावसायिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी मी काहीशी झपाटले होते. प्रत्येक समाजातील, वर्गातील तसेच प्रांतातील कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ती आज लोकांसमोर येत नाही. तिचे दर्दी असणारे अनेक- अगदी कॉर्पोरेट जगतातही पाहायला मिळतात. पण या कलेला सकारात्मक संदेश देणारं माध्यम, नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचं काम हल्ली फार दिसत नाही. ते ‘बाया’च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मी करते.’’
शिबानी यांच्याकडे असलेल्या कलाकृतींना कंपनी, उद्योग जगतात विशेष मागणी आहे. सध्याच्या मंदीच्या काळात अनेक कंपन्यांकडून कलेवरील खर्चावर कात्री चालविली जात असली तरी कर्मचारी, ग्राहक यांच्यात नवचैतन्य पेरून ठेवण्यासाठी बडे उद्योग समूह, आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक अशा कलेला प्राधान्य देतात, असं शिबानी आवर्जून सांगतात. ‘बाया’मार्फत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन तर मिळतंच पण व्यावसायिक जोडही मिळत असल्याने हा व्यवसाय वाढतो आहे, असं त्या म्हणतात.
शिबानी यांचा कला व्यावसायिक प्रवास हा काही अनाहुतपणे सुरू झालेला नाही. हेतुपुरस्सर त्या या क्षेत्रात आल्या. कलेशी संबंधित कोणतीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताना केवळ आवड म्हणून या क्षेत्रात आल्याचं त्या आवर्जून सांगतात. कलेला व्यावसायिक कौशल्याची जोड देण्याबाबत त्या सांगतात की, गोंड, पट्टचित्र, वारलीसारख्या कलाकृतींना मागणी खूपच आहे. भारतातील अनेक कला या त्या त्या प्रांतातील नावाजलेल्या कला आहेत. स्पेशल डेकोर, मिररचं लिपणकाम, ग्लास डोक्रा, ब्रासद्वारे विविध कलाकृती घडविण्याचं कार्य ‘बाया’च्या स्टुडिओत होतं.
‘‘अनेकांकडे उत्पादनं, कलाकृती असते. पण त्याला व्यावसायिक कौशल्याचं कोंदण क्वचितच मिळतं. ‘निफ्ट’ या डिझायनर संस्थेचे काही डिझायनर आणि पारंपरिक कलेचं जतन करणारे अनेक कलाकार यांच्या सहकार्याने मी ते देण्यासाठी आग्रही असते. ‘कन्टेम्पररी आर्ट’चा आग्रह धरणाऱ्या कॉर्पोरेट जगताला जेव्हा आमच्या उत्पादनाद्वारे पारंपरिक पण भारतीय कलाकृतीला व्यावसायिक कौशल्याचं रूप दिलेलं दिसतं तेव्हा मग त्याला
पटतं की हे गुणवत्तापूर्ण तर आहेच, शिवाय परवडणाऱ्या किमतीतही..’’ शिबानी व्यवसायाचं
तंत्र सांगतात.
बाया म्हणजे सुंदर घर. एखादा पक्षी ज्याप्रमाणे त्याचं घरटं काडय़ांनी अत्यंत शिस्तीने बनवितो तेव्हा त्यातील कलाकृती आपल्याला दिसते. हिंदीत त्याला ‘बया’ म्हणतात. त्याला बंगाली ‘टच’ देताना शिबानी यांनी ‘बाया’ केलं आणि कलाकृतींद्वारे माणसांचं वास्तव्य अधिक सुशोभित करण्याचं ध्येय आपल्या आरेखन कौशल्यावर सिद्ध केलं.
शिबानी यांचे पती विपुल जैन हे एका माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संचालक तर मालवाहतूक (लॉजिस्टिक्स) क्षेत्रासाठी आयटीपूरक अन्य एका कंपनीचे भागीदार आहेत. तर मोठी मुलगी साची ही दहावीत आहे. तिचाही आवडीचा विषय अर्थातच डिझाइन आहे. धाकटा रजत हा १३ वर्षांचा आहे. कुटुंबाकडून मिळत असलेलं पाठबळ शिबानी अधोरेखित करतात. पतीचं सहकार्य आहेच. ते जेव्हा काही वर्षांसाठी पुण्यात होते तेव्हा मीही तिथेच राहून माझे छंद जोपासले. सुरुवातीपासून ‘कॉस्मोपॉलिटन’ वातावरण मिळालेल्या शिबानी यांना व्यवसायातही कधीच ‘जेंडर बायस’चा सामना करावा लागला नाही, यावरही त्या भर देतात.
व्यवसायाचा मूलमंत्र
कमिटमेंट. दिलेला शब्द पाळणं हे खूप काळजीपूर्वक करायला हवं. अनेकदा
आपली नैतिकताही त्यावर अवलंबून असते. तुम्हाला ज्या क्षेत्रात शिरायचे त्याचा अभ्यास करा. त्या क्षेत्रातील ‘मार्केटिंग स्किल’,
निधी उभारणी जाणून घ्या. भक्कम व्हा
आणि पुढे जा.
आयुष्याचा मूलमंत्र
आयुष्याबाबतही तेच. व्यवसायाप्रमाणेच आव्हानांचा सामना करा. त्यांचा ताण
जाणवू देऊ नका. खूप आव्हानं असतात पण ताणाखाली कधीच वावरू नका. कठीण कालावधी येणारच. त्यावर मात करा. यश तुमचंच आहे.
कर्तृत्व
टाटा समूहातील टाटा इंटरॅक्टिव सिस्टीम्समध्ये काम करीत असताना समूहाच्या स्टील प्रकल्पासाठी ब्रान्झ धातूमध्ये शिबानी यांनी एक डिझाइन तयार केलं होतं. स्टील, पोलादसारख्या काहीशा कलेपासून दूर असलेल्या क्षेत्रासाठी धातूतूनही कशी अव्वल कलाकृती जन्म घेऊ शकते हे अधोरेखित करणाऱ्या या डिझाइनला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानं सन्मानितही केलं गेलं.
उल्लेखनीय
शहरातील एका आघाडीच्या खासगी बँकेच्या इमारतीतील सर्व- नऊच्या नऊ मजल्यांतील अंतर्गत सारी रचना ‘बाया डिझाइन’नं साकारली आहे. खासगी बँक अशा क्षेत्रातील या संस्थेकरिता तिच्या विविध विभागांनुसार कलेचा पदरही भिन्न स्वरूपात उलगडून दाखविण्यात आला आहे.
– वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com