शर्मिष्ठा भोसले sharmishtha.2011@gmail.com  

दिवसा-रात्री अडनिडय़ा भागात फिरताना ‘बाई’ नावाच्या सजीव गोष्टीचं किती प्रचंड कुतूहल पुरुषाच्या मनामेंदूत ओसंडून वाहतं ते नजरांमधूनच कळत राहतं.. शिवाय ते कुतूहल ही काही लपवायची गोष्ट नसल्याचंही त्या बेदरकार नजरा सांगत राहतात.. मग पूर्वी ते सगळं टोचणारी माझी नजरच त्या कुतूहलाला सरावत जाते!

Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mla kshitij thakur
“वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

‘आपके महाराष्ट्रा की लडकिया ऐसे घूम सकती है?’ हे विचारणाऱ्या त्याच्या नजरेत काय नव्हतं? थोडाबहुत अविश्वास, खूप सारं आश्चर्य, कुतूहल, आकर्षण.. मी ते सगळं हेरत आधी मनमुराद हसले. तो जरा लाजला. हिंदीत सांगायचं तर झेंप गया.

अशीच कुठं तरी हरियाणा-दिल्लीच्या अधेमधे भटकत होते. एका आडवळणाच्या गावाला जायचं होतं. दिवस कलता झालेला. रस्ताभर उठलेल्या धुरळ्यात एक माल वाहणारा टेम्पो दिसला. मागं घोळकाभर बायका पारदर्शी घुंघट ओढून बसल्या होत्या. मी लिफ्टवाला हात दाखवताच त्यानं ब्रेक लावला. जरा आगाऊपणा करत त्याला म्हटलं, ‘इधर सामने बठ जाऊं?’ त्यानं जरा अडखळतच दरवाजा उघडला. ‘तेरी अखियोंका यों काजल, मन्ने करेसा गोरी घायल’ तोडक्यामोडक्या डेकवर हरयाणवी छोरी सपना चौधरीची गाणी वाजत होती. ‘किधरसे आई हो मडम’ त्याच्या अपेक्षित प्रश्नावर मी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रासे.’’ त्यावर त्यानं विचारलेला वरचा प्रश्न.

मी मग त्याला आधी त्याचं नाव-गाव विचारलं. सूरज हरियाणातल्या झज्जरजवळच्या एका लहान गावातला. मी त्याला समजेल अशा भाषेत सांगू लागले की, ‘इतकं जनरलायजेशन नको करायला, पण तुमच्या तुलनेत आमच्याकडं आबोहवा जरा मोकळी आहे. बंधनं कमी आहेत.’ मग मी त्याला विचारलं, ‘तुला सपना चौधरी का आवडते?’ गडी एकदम रंगात येत बोलायला लागला, ‘अरे वो तो एकदम गजब ठुमके लगात्ती है! कमाल औरत है जी. उसकी चाल-ढाल देक्ख्खी है? फिल्लमकी हिरोईन बकवास लगे है उसके सामने..’ मग आम्ही खूप कायकाय गावगप्पा केल्या. माझंवालं गाव आल्यावर त्यानं मला उतरवून दिलं. पैसे घ्यायला नको म्हणाला. मी म्हणाली, ‘शुक्रिया’. सूरज हसून बोलला, ‘अपणा खयाल रखणा जी.’ नजरेत आदरयुक्त कुतूहल अजून होतंच!

पुढची वाट चालताना वाटत राहिलं, त्याला आवडणारी ठुमकेवाली सपना चौधरी, त्याच्या बाजूला बसलेली जीन्स-टीशर्टवाली अनोळखी मी आणि मागं घुंघट ओढून बसलेल्या त्या सगळ्याजणी. मनात आलं, ‘याच्या देहमनात बाई नावाच्या गोष्टीचा तुकडय़ा-तुकडय़ानं तयार झालेला कोलाज कसला इंटरेस्टिंग असेल ना?’ सोबत दिल्लीतल्या निर्भया म्हणवल्या गेलेल्या तिच्यावर बलात्कार करणारा मुकेश उगाचच आठवला. ‘इंडियाज डॉटर’मध्ये म्हणाला होता, ‘रातको नौ बजेके बाद रास्तेपे घुमनेवाली कोई लडकी शरीफ नही होती.’ एव्हाना मुकेशला फासावर दिलं गेलंय. पण त्या मुकेशच्या नजरेतली ‘ती’ घडवणारा ‘समाजपुरुष’ मला कायमच जास्त भीती घालत आलाय.

‘काय गं, काय चाललंय तुझ्या जगात?’ गावाकडच्या मित्राचा फोन येतो.

मी खूप कायकाय सांगत राहते. माझं जग ‘हॅपिनग’ असतं. सांगून झाल्यावर त्याला विचारलेला तोच उलट सवाल मात्र जळजळीत उत्तरं घेऊन येतो. गावातली तरुण पोरं हाताला काम नसल्यानं कशी सरभर झालीत, तंबाखू-गुटख्यासोबत आत्महत्यांचे किस्से चघळत राहतात, तालुक्याला शिक्षक असलेला कुणी पोरगा गावात आला की त्यांच्या नजरा कशा कावऱ्याबावऱ्या होत्यात, किती जणांची लग्नं कशी खोळंबलीत, असं कायकाय तो सांगत होता. बोलता-बोलता म्हणाला, ‘या दुष्काळानं पोरांना पार नामर्द करून टाकलंय!’ मर्दानगी आणि त्याला वेढून येणाऱ्या नकारात्मक गोष्टी हे सगळं एक वास्तव आहेच. पण रखरखीत भूप्रदेश पुरुषाची आयडेंटिटीच कशी हिसकावून घेतो याचे किस्से जहरी होते. दुष्काळाचं वर्तमान सांगताना क्वचितच कुठल्या बातमी-लेखात ज्यांचा उल्लेख होईल असे!

‘गाय की रक्षा न कर सके तो नपुंसक हो तुम’ ताऊजी कहते थे. पुरुषाच्या कथित पौरुषाला असं चिथावलं, की तो इमोशनल होत वाट्टेल त्या हिंसेसाठी सरसावतो. मला समोर बसलेल्या फुलचंदच्या बोलण्यातूनच ते कळत होतं. बायकोसकट घरातल्या, नात्यातल्या सगळ्या स्त्रियांना त्याचा खूप अभिमान वाटत असल्याचंही तो म्हणाला. फुलचंद समर्पित गोरक्षक आहे. पीळदार मिशा, वपर्यंत दुमडलेल्या शर्टाच्या बाह्य़ा, पीळदार दंड, भगवं उपरणं आणि रांगडी देहबोली. तो गोरक्षणासाठी जे जे करतो ते महान-देशहिताचं आणि कायदेशीर आहे याबाबत तो इतका ‘कन्व्हिन्स’ होता, की वाटलं आता याला ‘परत आणणं’ शक्य नाही.

पंधरवडा होऊन गेलाय इन्स्पेक्टर सुबोध कुमारचा बळी जाऊन. यूपीच्या बुलंदशहरमधली आग खूप काही सांगून गेलीय. मर्दानगीची कवचकुंडलं आणि वर कुठल्यातरी जात, धर्म, प्रदेश वा भाषिक अस्मितेचं चिलखत चढवलेला पुरुष किती अक्राळविक्राळ वागू शकतो हे भारत सध्या पुन्हा पुन्हा अनुभवतोय. ‘मॉब लिचिंग’ करणारा हा मॉब ठळकपणे पुरुषांचा आहे. या गर्दीत स्त्रिया नाहीत. निदान कट्टरतावादी विचारसरणीच्या समर्थक स्त्रिया थेट रस्त्यावरच्या हिंसेत सहभागी होताना दिसत नाहीत. कुठल्याही हिंसेला साहसाच्या वर्खात पेश करत भारतीय पुरुषाला गुमराह करणं सोपं आहे का? कारण ‘साहस हे पुरुषाचं सौंदर्य असतं’ असे सुविचार आपण ऐकत-पचवत आलोय. आणि सत्ता तर साहस मागते!

शिवाय ही सत्ता केवळ राजकीय नाही, सांस्कृतिक, धार्मिकही असते. पुरुष ‘माणूस’ न होता ‘मर्द’ राहणं कुठल्याही सत्तेला पाहिजेच असतं. सोबतच, ती त्यासाठी स्वत: प्रयत्नशीलही असते. सत्ता शबरीमला प्रवेशात स्त्रियांना होणारा विरोध हे त्यासंदर्भातल्या धार्मिक सत्तेचं अलीकडचं उदाहरण.

माझी ट्रान्सजेंडर मैत्रीण दिशा शेख पूर्वी ‘बाजार’ मागायची. मी तिच्यासोबत अशाच एका आठवडी बाजारात फिरत होते. तिच्यासाठी सगळे ओळखीचे लोक. तीपण सगळ्यासाठी ओळखीची. मी नवखी. सगळे विचारायचे की ही कोण? दिशा म्हणायची ‘नयी आयी हमारे साथ.’ एकानं मात्र त्या उत्तरावर उलट सवाल केलेला, ‘पर ये तो ओरिजनल लगती है?’ त्यानं कसलीच भीड न बाळगता ‘कन्फेशन’ देणारा रोकडा प्रश्न टाकणं. माझं ‘ओरिजनल’ आणि दिशाचं ‘डुप्लिकेट’ असणं. आसपासचा कलाकलाट काही सेकंद फ्रिझ झाला. मी आणि दिशा एकमेकींकडे बघत राहिलो. दिशा अनुभवी माणसासारखी गालात हसली. मला मात्र इथल्या मातीत शतकानुशतकं ‘त्या’च्या नजरेत ‘ती’ची प्रतिमा कशी ‘स्टिरीओटाइप’ घडली-घडवलेली आहे ते नीटच कळत गेलं..

आताही दिवसा-रात्री अडनिडय़ा भागात फिरताना ‘बाई’ नावाच्या सजीव गोष्टीचं किती प्रचंड कुतूहल पुरुषाच्या मनामेंदूत ओसंडून वाहतं ते नजरांमधूनच कळत राहतं.. शिवाय ते कुतूहल ही काही लपवायची गोष्ट नसल्याचंही त्या बेदरकार नजरा सांगत राहतात.. मग पूर्वी ते सगळं टोचणारी माझी नजरच त्या कुतूहलाला सरावत जाते!

‘अरे, अशी घाई करून कसं चालंल, मटन नीट मुरलं पाहिजे’ कांदा अजून पातळ कापायला पाहिजे’, ‘दम देताना गव्हाचं पीठ भांडय़ाच्या कडांवर लावणं सगळ्यात अवघड असतंय’ कापणं-तळणं-शिजवणं संपतासंपता घर बिर्याणीच्या नवाबी सुगंधानं भरून गेलेलं असतं.. पप्पांकडून पाककलेचे धडे घेताना माझी बहीण शाश्वती, भाऊ मंदार आणि मी शिजण्या-शिजवण्याकडं ‘बायकी जबाबदारी’ऐवजी ‘कला’ म्हणून बघायला शिकलो.

माझे पप्पा शेफ आहेत. मात्र अपवादात्मकरीत्या, हाताची चव पगारी नोकरीपुरती मर्यादित न ठेवता पप्पा चार भिंतीतल्या स्वयंपाकघरातही सगळं शिजवतात, आमच्यासकट पाहुण्यांनाही खिलवतात. पाहुण्यांच्या कौतुकानंतर ‘भाजी शशांकनं (पप्पांनी) बनवली’ असं सांगताना आईलाही अजिबात संकोच होत नाही. आता कळत्या वयात जाणवतं, बिर्याणी बनवणाऱ्या पप्पांनी, ग्रामीण भागात जन्म घेऊन निमशहरी भागात वाढलेल्या मला ‘जेंडर सेन्सिटिव’ घडवलंय. माझ्या आयुष्यात आलेल्या या पहिल्या पुरुषामुळंच ‘पुरुष अस्साच असतो’वालं रटाळ प्रेडिक्टेबल गाणं न म्हणता मी ‘पुरुष असाही असतो’च्या नव्यानव्या ओळी गुणगुणत आले..

पुढच्या कळत्या-नकळत्या वयातही त्याचं माझं जेंडर विसरून पांचट -कायच्याकायज्यांच्यासोबत बोलू-वागू शकेन असे अनेक पुरुष आयुष्यात आलेत. त्यांनी माझं बाईपण उगाच ‘ग्लोरिफाय’ केलं-करू दिलं नाही, पण हो, बाईपणाचा अवमानही केला नाही. मोह माया प्रेम जिव्हाळ्याचे सगळे प्रदेश त्यानं मला जाणतेपणानं घुमवले. आणि हो, देहमनाला चिकटलेले आसपासच्या पुरुषाचे सगळेच रंग काळे-पांढरे नव्हते, काही ग्रे शेड्स होत्याच. त्यांचं गडद-फिकेपणही मी निरखत राहिले. कधी पुरुषाचा खूप संताप आला, कधी मिठीत घ्यावं वाटलं, कधी फक्त थोपटत राहावं वाटलं त्याला, कधी नुसतंच सोबत असावं वाटलं त्यानं आसपास. लोक म्हणतात, बाई गूढ असते. मला पुरुषही गूढ वाटत आला, त्याला शोधता-अनुभवताना मीपण मला कळत राहतेय की!

chaturang@expressindia.com