या त्रलोक्यात ॐ हेच नादचतन्य खाली नमूद केलेल्या अष्टगुणांनी युक्त आहे. साधकाने आपल्या ॐकार उच्चारणात हे अष्टगुण जास्तीत जास्त प्रभावीपणे जाणीवपूर्वक व्यक्त करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. यापूर्वीच्या काही लेखांतून आपण ॐकार उच्चारणातील मूलतत्त्वं समजून घेतली. ती मूलतत्त्वं ॐ उच्चारणात जर अंगीकारली व शास्त्रशुद्ध पद्धतीने ॐकाराचं उच्चारण केलं तर साधकास ॐ नादचतन्याचे सर्व गुण साकारताना दिसतील व अनुभवास येतील, ते अष्टगुण कोणते याचा विचार करू.
१. विस्सष्ठ –
ॐकार नादाचं प्रथम वैशिष्टय़ म्हणजे विस्सष्ठ. विस्सष्ठ याचा अर्थ विश्वासयुक्त, दमदार, वजनदार व बळकट. तो तसा उच्चारला गेला पाहिजे. यासाठी साधकाने सुरुवातीला आपल्या बोलण्याच्या आवाजाच्या पट्टीच्या दोन-तीन स्वर उंच पट्टीत ओम उच्चारण करावे. जशी जशी आवाजाची उंची वाढते तसेतसे स्वरतंतू एकमेकांच्या निकटतम येतात व मग तो ॐकार नाद बळकट, विश्वासयुक्त, वजनदार, दमदार व तेजोमय लागतो.
२. मंजु-
मंजु म्हणजे गोड. हा ॐ नादचतन्याचा विशेष गुण आहे. कारण त्याच्या उच्चारणात अ व उ हे मूलस्वर व अनुनासीक ओष्ठय व्यंजन म्कार आणि ओठ मिटल्यानंतर होणारा म्कार नादगुंजन यांचा समावेश आहे. ॐ चा उच्चार मधुर, गोड होण्यासाठी ओ चा उच्चार ब्रह्मकंठातून होणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे म्च्या उच्चारणात ओठांचा आतला भाग एकमेकांशी जुळला पाहिजे. बाहेरचा भाग नव्हे. दुसरी गोष्ट म्हणजे म्कार गुंजनाला कधी जोर लावू नये. ते कर्कश व रेकट करू नये व ते कंपीतही होऊ देऊ नये.
ते स्थिर व मुलायम असावं. असं झालं तरच तो ॐकार उच्चार मंजू म्हणजेच मधुर, गोड व मंजुळ होतो.
अष्टगुणी ॐकार उच्चारण
या त्रलोक्यात ॐ हेच नादचतन्य खाली नमूद केलेल्या अष्टगुणांनी युक्त आहे. साधकाने आपल्या ॐकार उच्चारणात हे अष्टगुण जास्तीत जास्त प्रभावीपणे जाणीवपूर्वक व्यक्त करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे.
First published on: 28-03-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toward health from rhythm