जन्मलेल्या प्रत्येक मुलात आपापल्या विशिष्ट क्षमता असतात. त्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तांना संधी मिळाली की ते खुलतं. डॉ. गार्डनर यांनी ‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’ हा सिद्धांत मराठीत आणला, तेव्हा त्याला ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’ असं म्हटलं गेलं. हा सिद्धांत मांडताना गार्डनर यांनी आठ बुद्धिमत्ता सांगितल्या. प्रत्येकात त्या कमी किंवा जास्त प्रमाणात असतातच.
‘‘तोकाय हुशार आहे, त्याला अभ्यास करायची काय गरज?’’
‘‘तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक लहानपणापासूनच दिसून आली होती.’’
‘‘ती काय लहानपणापासून हुशार अशी नव्हतीच. त्यामुळे पुढे शिकेल असं वाटलंच नव्हतं. कलाबिला इकडेच ओढा होता तिचा.’’
‘‘आठवीत आला तरी अभ्यासाचं मनावर घेत नाही. मठ्ठ कुठला. रविवारी तरी अभ्यास करावा, तर हा चालला कुठल्यातरी मित्राकडे.’’
अशी वाक्यं आपण अगदी वरच्यावर ऐकत असतो. या सगळ्यातून एकच गोष्ट अधोरेखित होत असते ती म्हणजे, अभ्यासात हुशार असलेलं मूल तेच फक्त हुशार, बुद्धिमान. जी मुलं अभ्यासात हुशार नाहीत, ज्यांना भरपूर मार्क्‍स मिळत नाहीत, ते कमी हुशार. त्यांना आयुष्यात काही तरी करायचं म्हणजे अगदी अवघड. पालकही जेव्हा स्वत:च्या मुला-मुलींबद्दल असंच बोलतात तेव्हा त्यांच्या मुलांची ‘आपण असेच आहोत’ याची पक्की खात्री पटते. बुद्धिमत्ता म्हणजे स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता म्हणजे लेखन, वाचन, गणित उत्तम प्रकारे सोडवता येणं किंवा पटापट उत्तर देण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, असा बुद्धिमत्ता या शब्दाचा अर्थ आपण लावतो. आपल्याकडे जी अभ्यास पद्धत, परीक्षापद्धत आहे त्याला अनुसरूनच बुद्धिमत्तेचा अर्थ लावला जातो.  
अमेरिकेतले एक संशोधक डॉ. हॉवर्ड गार्डनर यांना मात्र काही वेगळंच म्हणायचं होतं. त्यांनी बुद्धिमत्ता या विषयावर सखोल संशोधन केलं. हे संशोधन त्यांनी थेट मेंदूंवर केलं. अनेकांच्या मेंदूच्या आत डोकावून काही गोष्टी शोधून काढल्या. त्या ‘फ्रेम्स ऑफ माइन्ड’ या पुस्तकातून जगासमोर मांडल्या.
‘बुद्धिमत्ता एक नाही, तर अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत,’ असं त्यांनी ठामपणे जगासमोर मांडलं.
प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असली तरी पेशींची रचना, त्यांची जुळणी ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. प्रत्येकाला जसं नाक-डोळे-कान असतात. ते जागच्या जागीच असतात. तरीदेखील प्रत्येकाचा चेहरा वेगळा दिसतो; तसंच काहीसं हे!
व्यक्ती तितक्या मेंदूच्या रचना
जन्मलेल्या प्रत्येक मुलात आपापल्या विशिष्ट क्षमता असतात. त्याच्या नसíगक बुद्धिमत्तांना संधी मिळाली की ते खुलतं. पण त्याच्या बुद्धिमत्तेच्या विरोधात काही करायला सांगितलं की त्याच्यावर ताण येतो. त्यामुळे गरज असते ती आपली नसíगक बुद्धिमत्ता ओळखण्याची.
डॉ. गार्डनर यांनी ‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’ हा सिद्धांत मराठीत आणला, तेव्हा त्याला ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’म्हटलं गेलं. हा सिद्धांत मांडताना गार्डनर यांनी आठ बुद्धिमत्ता सांगितल्या. प्रत्येकात त्या कमी किंवा जास्त प्रमाणात असतात. त्या बुद्धिमत्ता या प्रमाणे,
५ व्यवहारात जी बुद्धिमत्ता सातत्याने वापरावी लागते ती आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. दुसऱ्या व्यक्तींना समजून घेणं, तिच्या मनात शिरणं, मिळून-मिसळून वागणं हे काम असतं आंतर व्यक्ती बुद्धिमत्तेचं. ज्यांच्यात ही बुद्धिमत्ता प्रबळ असते अशा व्यक्ती कायम लोकांच्या घोळक्यात असतात. इतरांशी उत्तम संबंध ठेवतात.
५ स्वत:च्या मनात डोकावणं, स्वत:शीच संवाद साधणं, या संवादातून काही निष्कर्ष काढणं. ही एक विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता आहे. एखादी गोष्ट जितकी जास्त खासगी, तितकी ती वैश्विक असते, असं म्हणतात. ते इथे लागू पडतं. यालाच डॉ. गार्डनर यांनी नाव दिलं आहे – व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता. संयमी, स्वत:वर नियंत्रण ठेवणारा माणूस या बुद्धिमत्तेचा असतो. गांधीजी हे या बुद्धिमत्तेचं एक उदाहरण.
५ एखादा प्रसंग उत्तम पद्धतीने सांगणं, गोष्टी रचून सांगणं, योग्य वेळी योग्य शब्दसंपत्तीचा वापर करणं यात जर मूल चमकत असेल तर त्याच्यात भाषाविषयक बुद्धिमत्ता प्रबळ आहे.
५ गायन, वादन, संगीत देणं हे संगीतविषयक बुद्धिमत्तेच्या माणसांना चांगलं जमतं. संगीताची जाण असणं यासाठीदेखील ही बुद्धिमत्ता आवश्यक असते.
५ काहींचं गणित चांगलं असतं. त्यांच्यात गणित/तर्कविषयक बुद्धिमत्ता असणार, हे उघड आहे. आकडे, आकडेमोड, एखादी समस्या तर्कशास्त्रीय पद्धतीने सोडवणं या गोष्टी या बुद्धिमत्तेच्या लोकांना अतिशय आवडतात.  ते तासन्तास त्यात रमू शकतात.
५ अनेकदा आपल्या नजरेसमोर वस्तू नसतात. जागा नसते, माणूस नसतो आणि तरीही त्याची कल्पना करायची असते आणि त्यानुसार काम करायचं असतं. असं काम कोण करतं? तर चित्रकार. चित्रकार कल्पनेनं चित्र काढतो. ते चित्र पूर्ण झाल्यावर कसं दिसेल, त्यात कोणते रंग भरले तर ते खुलून दिसतील, कोणते रंग चांगले दिसणार नाहीत, हे तो कल्पनेनंच ताडून बघत असतो. अवकाशाचा विचार करू शकणारी अवकाशीय ही एक विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ताच आहे.
५ एखादा खेळ खेळण्यासाठी कमावलेलं शरीर पाहिजे, न दमता कित्येक तास खेळता आलं पाहिजे. परंतु त्याबरोबर डावपेच आखण्यासाठी आवश्यक अशी बुद्धिमत्ताही हवीच. ती नसेल तर प्रतिस्पर्धी त्याला सहज हरवू शकतो. केवळ खेळाडूच नव्हेत तर अभिनेते, वादक आणि नर्तक यांच्यामधेही शरीर/स्नायूविषयक ही बुद्धिमत्ता असते. अभिनेत्याला आपल्या चेहऱ्यावरच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवावं लागतं. हे नियंत्रण योग्य असेल तर त्याचा अभिनय खुलतो.
५ काहींना मनातून निसर्गविषयक ओढ असते. एखाद्या पानाचं निरीक्षण करणं, पशू-पक्ष्यांविषयी प्रश्न विचारणं, त्याच्याशी संबंधित वस्तूंचा संग्रह करणं यातून निसर्गविषयक ही बुद्धिमत्ता दिसून येते. निसर्ग समजून घ्यायला आवश्यक असणारी निरीक्षणशक्ती या बुद्धिमत्तेच्या मुलांमध्ये असते. अशी मुलं चार िभतींत फार काळ रमत नाहीत.
हा सिद्धांत मांडताना डॉ. गार्डनर यांचं समाजाला सांगणं असं आहे की, जर आपल्या प्रत्येकाचा मेंदू निराळ्या घडणीचा आहे, प्रत्येक बुद्धिमत्तेची मागणी वेगळी आहे, तर अशा सर्वाना एकाच प्रकारचा अभ्यासक्रम लादता येईल का? उदा. उपजतच शरीर व स्नायूविषयक बुद्धिमत्ता असलेलं मूल एका जागेवर बसून किती काळ अभ्यास करू शकेल? तरीही त्याच्यावर तशी सक्ती केली तर ते सध्याच्या परीक्षापद्धतीत यशस्वी ठरेल की अयशस्वी? मात्र त्याच्या विशिष्ट बुद्धिमत्तेची परीक्षा घेतली तर तो यशस्वी ठरेल. मात्र त्याच परीक्षेत भाषिक किंवा गणिती बुद्धिमत्ता असलेलं मूल मात्र अयशस्वी ठरण्याची शक्यता जास्त.
शोधूया स्वत:ला आणि मुलांनाही –
आपल्या मुलात कोणकोणत्या बुद्धिमत्ता प्रबळ आहेत, हे समजून घ्यायचं तर त्याला आधी विविध अनुभव मिळायला हवेत. मुलांसमोर छान छान पुस्तकं दिली तर त्याला वाचनाची आवड आहे का, हे समजेल. पहिल्यावहिल्या लेखनाला पाठीवर कौतुकाची थाप मिळाली तर लेखन बहरेल. मुलांना मोकळेपणानं निसर्गात नेलं तर त्याला स्वत:ची ओळख पटेल. सगळ्याच लहान मुलांना खेळ आवडतो. ती त्यांची नसíगक गरज असते. परंतु ही आवड टिकून राहिली, विशिष्ट खेळाकडे ओढा वाटला तर त्याला खतपाणी घालणं, हे मोठय़ांचं काम. लहानपणापासून मुलांना सहजपणे संगीत ऐकण्याचा अनुभव दिला पाहिजे. चित्र काढू पाहणाऱ्याला चित्रं काढू दिली पाहिजेत.
आम्ही ‘अंकुर माध्यम’तर्फे ज्या कार्यशाळा घेतो, त्यातून नेहमीच हे स्पष्ट होतं की, तिथे जन्मलेल्या मुलांमध्ये/पालकांमध्ये वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. एकदा या बुद्धिमत्ता कशा शोधायच्या हे पालकांना समजलं की आपल्या मुला-मुलींच्या बुद्धिमत्ता लहान वयातही शोधू शकतो. त्यांना योग्य प्रकारे संधी पुरवू शकतो. या बुद्धिमत्ता समजल्या तर त्यांच्या वागण्यातली बरीचशी कोडीही उलगडू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या मुलात/मुलीत कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, हे  समजलं तर त्याद्वारे त्यांना नेहमीच्या अभ्यासात जास्त नेमकेपणाने मदत करता येईल. सातवी-आठवीच्या पुढच्या मुला-मुलींना तर याचा नक्कीच फायदा होतो. अध्ययन अक्षम मुलांच्या संदर्भात तर त्याच्या बुद्धिमत्ता कोणत्या आहेत हे समजणं अतिशय आवश्यक आहे. तितकीच सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की बुद्धिमत्ता कळल्या तर करियर निवडतानाही योग्य विचार केला जातो. कारण हा विचार नसíगक बुद्धिमत्तांना अनुसरून असतो. ‘हातचं’ सोडून पळत्याच्या पाठीमागं धावावं लागत नाही.
मुलांना कमी हुशार ठरवणं, त्यांना अभ्यासात गती नाही असं समजणं हा एक प्रकारे त्याच्यावर अन्यायच आहे ! की आपणच त्यांना ओळखण्यात कुठे कमी पडतोय..    
drshrutipanse@gmail.com

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Loksatta kutuhal Artificial Intelligence ISRO and DRDO
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : इस्राो आणि डीआरडीओ