इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या मानसी बीडकर यांनी लग्नानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरू केला. एलईडी दिव्यांचे वाढत जाणारे महत्त्व लक्षात घेता एलईडी ड्रायवर, स्ट्रीट लाइट, डाऊनलाइट, बल्ब, टय़ूबलाइट ही एलईडी दिव्यांची श्रेणी बाजारात आणली आहे. इलेक्ट्रिक दिव्यांच्या उत्पादनात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या मानसी बीडकर यांच्या उद्यमशील प्रवासाविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खडकी, पुणे इथल्या कंपनीचा मानसी बीडकर यांना फोन आला की तुमचे बॅलेस्ट वापरले की आमच्या टय़ूबलाइट तडकतात. (टय़ूबलाइटमध्ये विजेचा प्रवाह सीमित करण्यासाठी जे आयताकृती उपकरण वापरत त्याला बॅलेस्ट म्हणतात.) तर या कंपनीचा प्रश्न सोडवण्यासाठी मानसी यांनी बॅलेस्ट बदलून पाहिले, त्याच जर्मन कंपनीच्या अनेक टय़ूबलाइट वापरून पाहिल्या, पण प्रत्येक वेळी टय़ूब तडकली. ग्राहकाचे म्हणणे होते की तुमचे बॅलेस्ट खराब आहेत. ते खरोखर तपासून पाहण्यासाठी मग मानसी यांनी एका नामवंत कंपनीचे बॅलेस्ट आणले आणि तरीही ती टय़ूबलाइट तडकली. म्हणजे त्या टय़ूबलाइट सदोष होत्या हे सिद्ध झालं. यावेळी मात्र त्यांच्या ग्राहकांचा मानसी यांच्या बॅलेस्टवर विश्वास बसला आणि त्यांनी त्या जर्मन कंपनीच्या टय़ूब्स परत केल्या. या एका ग्राहकाचा विश्वास बसला पण मानसी यांना त्यातून वेगळाच मुद्दा लक्षात आला. आपलं उत्पादन कितीही चांगलं असलं तरी त्याला ‘ब्रँड व्हॉल्यू’ असणं खूप जरुरी आहे. ब्रँडेड वस्तूच्या नावावर ग्राहकांचा भरवसा आहे आणि त्यांचं उत्पादन खराब असू शकत नाही, असा ग्राहकांना विश्वास आहे, तसाच तो आपल्या उत्पादनावर असायला हवा आणि त्यासाठी उपकरणाची गुणवत्ता, वेष्टन (पॉकेजिंग) आणि नाव (ब्रँडनेम) या तिन्ही गोष्टींवर काम करायचं हे त्यांनी ठरवलं.

हा अनुभव येण्याआधीही अनेक वर्षं मानसी व्यवसायात होत्या. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर सुमारे तीन वर्षे त्यांनी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नोकरी केली. त्यांचे पती मनोज बीडकर यांचा स्वत:चा व्यवसाय होता. लग्न झाल्यावर मानसी यांच्याकडे नोकरी किंवा व्यवसाय करणे असा मार्ग निवडायचा पर्याय होताच आणि त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं. सर्वसाधारणपणे नवराबायकोपैकी एकाचा व्यवसाय असला तर दुसऱ्याने नोकरी करण्याकडे कल असतो, कारण एक ठरावीक पगार घरात यावा असा विचार केला जातो. पण तो विचार बाजूला करून मानसी यांनी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्या काळात संगणकांसाठी घराघरात यूपीएस घेतले जात. ते यूपीएस, इमर्जन्सी लॉम्प, सिक्युरिटी सिस्टीम, वॉटर लेव्हल कंट्रोलर इत्यादी बनवायला सुरुवात केली.

१९९७-९८ मध्ये बीडकर दाम्पत्य हाँगकाँगला एका प्रदर्शनासाठी गेले होते. तिथे दोघांच्या असं लक्षात आलं की लाइटिंग म्हणजे विविध प्रकारचे विद्युत दिवे यांना भविष्यात खूप मागणी असेल. पुढचा विचार करून मानसी यांनी मग टय़ूबलाइटचं बॅलेस्ट स्वत: डिझाइन करून बनवलं, त्याचं प्रमाणीकरण करून घेतलं आणि विकायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त ३६ वॉटचं बॅलेस्ट बनवलं. मग मागणीनुसार विविध वॉटचे आणि प्रकाराचे बॅलेस्ट तयार करण्यात आले. बॅलेस्टची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणाहून मागणी आली आणि हा व्यवसाय वाढत गेला. परदेशातही बॅलेस्टची निर्यात होऊ  लागली. स्वत:च्या उत्पादनावर मानसी यांचा विश्वास होताच, पण त्या खडकी इथल्या कंपनीच्या अनुभवावरून त्यांनी स्वत:चा ब्रँड विकसित करायचं ठरवलं आणि ‘मेलकॉन’ (माधवी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल – यात माधवी हे सासूबाइभचे नाव) चा उदय झाला.

‘मेलकॉन’ हे नाव प्रचलित व्हावं म्हणून मानसी यांनी सतत प्रयत्न केले आणि अजूनही सुरूच आहेत. उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच वेष्टनावर (पॉकेजिंग) वर विशेष लक्ष पुरवण्यात येतं. तसंच टीव्ही, विविध मासिकं, वर्तमानपत्र अशा ठिकाणी सतत ‘मेलकॉन’च्या जाहिराती करण्यात येतात. वेगवेगळ्या प्रदर्शनात भाग घेऊन ‘मेलकॉन’ची उत्पादने ग्राहकांसमोर आणली जातात. ‘मेलकॉन’ हा ब्रँड लोकांच्या मनात ठसवण्यासाठी खर्च करायची आणि मेहनत घ्यायची मानसी यांची सदैव तयारी असते.

साधारण २००५च्या सुमारास त्या चीनला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाला गेल्या होत्या. इथे बघायला चार दिवस पुरे पडणार नाहीत इतके प्रचंड संख्येने स्टॉल्स होते. तिथे त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या काळात एलईडी दिव्यांची मागणी वाढणार आहे. तिथे एलईडी दिव्यांचे अनेक प्रकार आणि उपयोग त्यांना पाहायला मिळाले. परत आल्यावर बीडकर दाम्पत्याने पुन्हा एक मोठा निर्णय घेतला. आत्तापर्यंत दोघांच्या दोन वेगळ्या कंपन्या होत्या. त्यामुळे खर्च आणि विविध कर वेगवेगळे होतेच, शिवाय व्यवसाय छोटे असल्याने सरकारकडून विशेष सवलती घेता येत नव्हत्या. हे दोन्ही व्यवसाय बंद करून दोघांनी मिळून एक मोठी कंपनी सुरू करायची असं ठरवलं आणि ‘मिलक्स कंट्रोल गिअर्स प्रा. लि.’ची स्थापना झाली.

‘मिलक्स कंट्रोल गिअर्स प्रा. लि.’ने ‘मेलकॉन’ या ब्रँड अंतर्गत एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरू केलं. विजेची बचत करणारी आणि विविध प्रकारची एलईडी दिव्यांची श्रेणी त्यांनी बाजारात आणली आहे. यात एलईडी ड्रायवर, स्ट्रीट लाइट, डाऊनलाइट, बल्ब, टय़ूबलाइट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. सुरुवातीला प्रस्थापित मोठय़ा कंपन्यांच्या तोडीची उत्पादनं बनवणं आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करणं हे एक मोठं आव्हान होतं. तसंच चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त मालाशी स्पर्धाही होती. लोकांनी केवळ स्वस्त म्हणून चिनी माल न घेता गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करणाऱ्या ‘मेलकॉन’ला प्राधान्य द्यावं, यासाठी मानसी यांना सतत झटावं लागलं आणि अजूनही ते काम सुरूच आहे.

२००७ मध्ये पाच हजार चौरस फुटाच्या जागेत ‘मिलक्स’चे कामकाज हलवलं. आधीच प्रस्थापित नाव असल्याने यावेळी कर्ज उभारणे तुलनेत सोपं गेलं. अद्ययावत अशी नवीन यंत्रणा आयात केली. उपकरणे तपासण्यासाठी स्वत:ची टेस्टिंग लॉब उभारली. आता सुमारे ४० जण कंपनीत आहेत. इतक्या सगळ्या लोकांकडून चांगल्या गुणवत्तेचं आणि प्रमाणीकरण असलेलं काम करून घेता यावं म्हणून त्यांनी आयएसओ ९००१ चे प्रमाणपत्रही प्राप्त केलं. त्यानुसार उत्पादन तयार केल्यावर सगळ्यात शेवटी नाही तर प्रत्येक पायरीला गुणवत्ता तपासली जाते. डीआरडीओ किंवा रेल्वे यांचे व्हेंडर डेव्हलपमेन्ट प्रमाणपत्र ‘मिलक्स’ला मिळाले आहे. त्यामुळे त्यांना उपकरणे पुरवली जातात. कंपनीतलं उत्पादन (प्रॉडक्शन) आणि कच्च्या मालाची खरेदी (प्रोक्युरमेंट) या दोन्ही गोष्टी मानसी स्वत: बघतात. त्यामुळे पुढची आखणी करणं, खूप भांडवलासाठी न अडकता कच्च्या मालाचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहणं, अॅर्डर वेळेवर तयार करणं या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित नियंत्रित करता येतात.

मानसी यांना ‘आम्ही उद्योगिनी’ (२०२४), ‘महाराष्ट्र उद्योगिनी’ (२०१०), ‘रमाबाई जोशी पुरस्कार-मराठा चेंबर अॅफ कॉमर्स’ ( २०१२) असे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात शिकणाऱ्या मुलांना प्रत्यक्ष व्यवहारात वापरता येणारे इलेक्ट्रॉनिक्स शिकायला मिळावे, शिक्षण संपवून नोकरीला लागणाऱ्या मुलांकडे या कामासाठीचं कौशल्य विकसित व्हावं म्हणून त्या विविध ठिकाणी व्याख्याने देतात, वाडिया कॉलेजचा अभ्यासक्रम ठरवण्यात त्यांचा सहभाग आहे, स्किल इंडियावरही त्या व्याख्यात्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात येणारी नवीन पिढी अधिक चांगली असावी यावर त्यांचा भर आहे.

केवळ दर्जा आणि गुणवत्तेकडे लक्ष ना देता, त्याचं पॉकेजिंग आणि ब्रँड नाव विकसित करण्याकडे लक्ष देणं आणि त्यासाठी मेहनत घेणं यात मानसी बीडकर यांचं वेगळेपण दिसून येतं. पुढच्या काही वर्षात ‘मेलकॉन’ हा सुपरब्रँड म्हणून प्रचलित करण्याचं त्यांचं स्वप्न नक्कीच साकार व्हावी ही शुभेच्छा.

उद्दिष्ट

मोठय़ा जागेत कंपनी विस्तारायची आहे. जीपीएस आधारित लाइट कंट्रोल, प्रकाश कमी-जास्त करता येणारे एलईडी दिवे, मोबाइल वापरून घरातली उपकरणे कंट्रोल करणं, स्कॉडा सुपरव्हायझरी कन्ट्रोल अँड डाटा अॅक्विझिशन (एससीएडीए) अशा नवीन तंत्राचा वापर करून नवनवीन उपकरणे बाजारात आणायची आहेत.

सल्ला

व्यवसायात उतरताना संयम ठेवून उतरा. नवीन मुलांना झटपट पैसा हवा असतो. महाविद्यालयीन शिक्षण संपायच्या आत मोठय़ा पगाराच्या नोकरीचं पत्र हातात हवं असतं. पण नीट विचार करून व्यवसायात उतरलात तर भविष्य जास्त उज्ज्वल असतं ते लक्षात ठेवा. व्यवसायात इन्स्टंट पैसे नाही, सुरुवातीची अनेक वर्षं झगडावं लागतं, भांडवल उभं करावं लागतं, पण हळूहळू जम बसला की मात्र भरभराट होतेच. फक्त त्यासाठी संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

मानसी बीडकर, पुणे

‘मिलक्स’ कंट्रोल गिअर्स प्रा. लि.

http://www.melconindia.com

manasi@melconindia.com

९३७०६६२०९९

swapnalim@gmail.com