भारतात साखरेची प्रतवारी ठरवण्याची रासायनिक पद्धत उपलब्धच नव्हती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय साखरेला खूप कमी दर मिळे. आपण या क्षेत्रात काही तरी करावं, आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करावा, असं डॉ. वसुधा केसकर यांना वाटायला लागलं आणि त्यांनी ‘मार्क लॅब’ची स्थापना केली. आज खाद्यउद्योगाच्या जागतिक नकाशावर ‘मार्क लॅब’ आणि त्याचबरोबर डॉ. वसुधा केसकर हे एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुमारे वीसएक वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अनेक ठिकाणी साखर बनत असे आणि तिची प्रतवारी चक्क डोळ्यांनी बघून ठरवली जात असे. म्हणजे पांढरीशुभ्र असेल तर शुद्ध आणि मग तिला जास्त भाव. पिवळसर असेल तर जरा अशुद्ध आणि तिला कमी भाव असा प्रकार असायचा. देशातल्या देशात हे चालून जायचे आणि यात बदल करायची कोणालाच गरज भासत नव्हती. साधारणपणे दर तीनएक वर्षांनी साखरेचे प्रचंड उत्पादन झाले की साखर निर्यात करायची वेळ यायची आणि मग परदेशातलेच रिफाइंड म्हणजे शुद्ध साखरेचे नियम लावून आपली साखर प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला जायचा. त्या वेळी मात्र साखरेची प्रत अगदी कमी दिसायची आणि दरही अगदीच कमी मिळायचा.
१९८६ ते १९९६ अशी दहा र्वष वसंतदादा इन्स्टिटय़ूटमध्ये काम करता करता रसायनशास्त्रज्ञ
डॉ. वसुधा केसकर यांना भारतातल्या या परिस्थितीचा नेमका अंदाज आला होता. शिवाय कामाच्या निमित्ताने साखरेच्या प्रती आणि त्यांचे परदेशातले प्रमाणीकरण यांचाही बराच अभ्यास करता आला होता. मग त्यांच्या लक्षात आलं की परदेशातली रिफाइंड किंवा शुद्ध साखर ही आपल्याकडच्या साखरेपेक्षा वेगळी असते. त्यामुळे सरसकट परदेशातले नियम लावून आपली साखर तपासली तर त्यात अनेक वैगुण्य दिसणार आणि साखरेचा दर कायम कमीच मिळणार. त्या वेळी आपण या क्षेत्रात काही तरी करावं, आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करावा असं त्यांना वाटायला लागलं आणि डॉ. एस.एस. निंबाळकर यांच्याबरोबर त्यांनी स्वत:ची लॅब (प्रयोगशाळा) सुरू करायचा निर्णय घेतला. अशा रीतीने ‘मार्क लॅब’ (MAARC LABS) चा प्रारंभ झाला.
सुरुवातीला प्रयोगशाळा उभारण्यासाठी फारसे भांडवल उपलब्ध नव्हते, त्यामुळे थोडेसे कर्ज घेऊन त्यांनी एक प्रयोगशाळा उभारली. इथे आपल्या आधीच्या ज्ञानावर आधारित अजून संशोधन केलं आणि साखरेच्या काही चाचण्या प्रमाणित केल्या. या चाचण्या कारखान्यांना शिकवून त्यातून थोडा पैसा उभारता येईल आणि या चाचण्या साखर कारखान्यांना वापरताही येतील असा विचार करून त्यांनी अनेक कारखान्यांना भेटी देऊन आपल्या चाचण्यांबद्दल माहिती दिली. या सगळ्या चाचण्या सुलभ पद्धतीने करता याव्यात म्हणून सुक्रोस्कॅन नावाचे एक उपकरणही बनवलं. साखरेत अनेक प्रकारची अशुद्धता, कचरा, धातूचे अंश, रसायनं असू शकतात. सुक्रोस्कॅनमुळे त्या सगळ्याची माहिती मिळते. अनेक ठिकाणी हे उपकरण दाखवून त्याची माहिती दिल्यावर साखर कारखान्यांना ही पद्धत आवडली आणि काही कारखान्यांनी सुक्रोस्कॅन विकत घेतलं. अर्थात हे काही सहज सोप्पं होतं अशातला भाग नाही. डॉ. वसुधा आल्या आणि त्यांनी सांगितल्याबरोबर साखर कारखाने बदलले असंही घडलं नाही. त्यासाठी डॉ. वसुधा यांनी भारतातल्या अनेक राज्यांत, अगदी आडगावी असणाऱ्या कारखान्यांना भेटी दिल्या. या क्षेत्रात अगदी आजही स्त्रियांची संख्या नगण्य असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कारखानदारांच्या पचनी पडायला वेळ लागला. जवळपास दहा र्वष त्यांना संघर्ष करावा लागला, नंतर मात्र हळूहळू बदल घडत गेले.
हे उपकरण विकताना डॉ. वसुधा यांनी अक्षरश: हजारो साखर नमुने तपासले. त्या नमुन्यांच्या अभ्यासातून त्यांनी साखर तपासणीची आणखी शास्त्रशुद्ध पद्धत शोधून काढली. भारतात लागवडीप्रमाणे साखरेची प्रत वेगळी असू शकते. त्यासाठी डॉ. वसुधा केसकर यांनी ‘प्लांटेशन व्हाइट शुगर अॅनालिसिस’ असा एक शोधनिबंध तयार केला. २००४ मध्ये ICUMSA (International Commission for Uniform Methods of Sugar Analysis) या साखर चाचण्यांच्या जागतिक प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेच्या अटलांटा येथील एका सभेत हा शोध डॉ. वसुधा यांनी मांडला. त्यानंतर ‘आयसीयूएमएसए’ने आपल्या दस्तावेजीकरणात या ‘प्लांटेशन व्हाइट शुगर अॅनालिसिस’ हा विभाग आणला. जगभरात प्रथमच भारतातल्या साखरेला तपासण्याची ही पद्धत मान्य करण्यात आली आणि ‘आयसीयूएमएसए’च्या सदस्यांनी एकमताने या विषयातल्या ‘रेफ्री’ म्हणून डॉ. वसुधा यांची निवड केली. त्यानंतरही त्यांनी वेळोवेळी या चाचण्यांमध्ये सुधारणा घडवली आहे. आता अगदी एक बटण दाबून ही चाचणी घेता येईल इतकी सोपी केली आहे.
ही पद्धत जगमान्य झाल्यामुळे भारतातील साखरेला योग्य दर मिळायला लागला. तसेच साखर कारखान्यांनाही आपल्या उत्पादनाची प्रत काय, चांगली प्रत ठेवण्यासाठी काय करायला हवे याबद्दल जागरूकता आली. एक मोठाच क्रांतिकारी बदल या साखर जगतात घडला असं म्हणायला हवं. ‘पेप्सिको’, ‘कोकाकोला’, ‘नेस्ले’ अशा मोठय़ा कंपन्या प्रचंड प्रमाणावर साखर खरेदी करतात. साखर ही त्यांच्या उत्पादनाचा एक महत्त्वाचा कच्चा माल आहे. अशा वेळी त्यांना प्रमाणित केलेली आणि अगदी शुद्ध अशी साखरच हवी असते. ‘मार्क लॅब’मुळे या कंपन्यांना साखरेच्या प्रतीची नि:शंकपणे चाचणी करून घेता यायला लागली. त्यामुळे ‘पेप्सिको’ आणि ‘कोकाकोला’ या दोन्ही कंपन्यांनी ‘मार्क लॅब’ला जागतिक मान्यता असलेली थर्ड पार्टी लॅब असा दर्जा दिला. पूर्ण आशिया खंडात हा दर्जा फक्त ‘मार्क लॅब’लाच मिळाला आहे हे अधिक वैशिष्टय़पूर्ण! गेले दहा ते बारा वर्षे या कंपन्या ‘मार्क लॅब’सोबत काम करत आहेत. साखर कारखान्यातून साखर आणणे, त्याची त्याच दिवशी चाचणी घेणं आणि रिपोर्ट तयार करून कंपनीला देणं हे काम ‘मार्क लॅब’ अगदी खात्रीपूर्वक करते असा लॅबचा लौकिक आहे.
वीजनिर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉयलर्समध्ये वापरले गेलेले पाणी जरा जरी अशुद्ध असेल तर बॉयलर खराब होतात, हा प्रश्न ओळखून डॉ. वसुधा यांनी अॅक्वास्कॅन नावाचे उपकरणही तयार केलं आहे. या उपकरणालाही कारखान्याकडून खूप मागणी आहे. साखरेची तपासणी करताना गुळात सल्फर वापरलं जातं हे त्यांच्या लक्षात आलं आणि अशी रसायनंविरहित ‘कनक गूळ’ त्यांनी तयार केला. अशा अनेक महत्त्वपूर्ण योगदानासाठी हरी मालिनी जोशी पुरस्कार, तसंच मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार, उद्योग जननी कमल पुरस्कार असे अनेक पुरस्कार डॉ. वसुधा केसकर यांना प्राप्त झाले आहेत.
आजकाल बाजारात येणाऱ्या सगळ्याच खाद्यपदार्थानाोररअक ची मान्यता असणं जरुरी आहे. त्यामुळे उत्पादकांना विविध लॅबमधून खाद्यपदार्थ तपासून द्यावे लागतात. ‘मार्क लॅब’ला एफएसएसएआयची मान्यताही प्राप्त झाली आहे. तसंच फळफळावळ परदेशात निर्यात करण्याआधी अतिशय कठोर चाचण्या केल्या जातात. या चाचण्या APEDA (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) द्वारे केल्या जातात आणि ‘मार्क लॅब’ला ‘एपीइडीए’ची मान्यताही मिळाली आहे. द्राक्ष आणि डाळींब या फळांच्या चाचण्या करण्यासाठी जी कोटय़वधी रुपयांची उपकरणे लागतात ती आज ‘मार्क लॅब’कडे आहेत आणि डॉ वसुधा यांची मुलगी डॉ. सई केसकर यांच्याकडे त्याची जबाबदारी आहे.
आता जवळपास २० ते २३ देशांतून साखर आणि साखरेचा सिरप (पाक) तपासणीसाठी ‘मार्क लॅब’कडे येतो. तसेच ‘मार्क लॅब’ विविध ठिकाणी लॅब उभारून देते. परदेशात सुदान, इथियोपिया अशा देशातही त्यांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा उभारून दिल्या आहेत. डॉ. वसुधा म्हणतात की, त्यांचा भर फक्त उपकरणे विकण्यावर नसून त्याद्वारे कंपन्यांना जागरूक करणे, उपयोगी अशी मानके तयार करणे हेही महत्त्वाचं आहे. अनेकवेळा केवळ कच्च्या मालाची योग्य प्रत वापरली तर तयार होणारं उत्पादन हे खूप चांगल्या प्रतीचं, चवीचं आणि टिकाऊ असतं असा त्यांचा अनुभव सांगतो किंवा शुद्ध साखर वापरली तर उत्पादनखर्च कमी होतो. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे अनेक कंपन्यांना फायदा झाला आहे. बऱ्याच वेळा तर भारतातच असणाऱ्या मोठय़ा मल्टिनॅशनल कंपन्यांना परदेशातून ‘मार्क लॅब’ला संपर्क करायच्या सूचना येतात आणि मग त्या ‘मार्क लॅब’शी संपर्क करतात असंही झालं आहे. त्यामुळे खाद्यउद्योगाच्या जागतिक नकाशावर ‘मार्क लॅब’ आणि त्याचबरोबर डॉ. वसुधा केसकर हे एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे हे नक्की.
सल्ला
आजकालची रसायनशास्त्र विषयाची पदवीधर तरुण पिढी जेव्हा मुलाखतीसाठी येते तेव्हा अगदी साध्या गोष्टीसुद्धा त्यांना माहीत नसतात. ज्या विषयाची आपण पदवी घेतली त्याचं ज्ञान असलं, त्याविषयी अधिकाधिक शिकायची तयारी असली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. पण कदाचित आजकालच्या शैक्षणिक पद्धतीमुळेही असेल पण मुलांची ज्ञानार्जनाची क्षमता कमी होत जातेय. नोकरी किंवा व्यवसायात काहीही करायचं असेल तरीही या विषयाचं सखोल ज्ञान फार महत्त्वाचं आहे.
उद्दिष्ट
निर्यातक्षेत्रात नुकतंच काम सुरू केलं आहे ते वाढवायचं आहे. त्याशिवाय आज देशात ‘मार्क लॅब’चा एकाधिकार आहे. ‘मार्क लॅब’सारख्या अजूनही प्रयोगशाळा तयार व्हाव्यात अशी इच्छा आहे. त्यासाठी दरवर्षी प्रशिक्षण देणं, लॅब उभारून देणं अशा गोष्टी सुरू आहेतच. त्या अजून वाढवायच्या आहेत.
मार्क लॅब्स प्रा. लि.
पुणे-४११०४१
फोन-९३७२४११८१४
maarclabs.pune”gmail.com
swapnalim@gmail.com
स्वप्नाली मठकर