तो काळ पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीचा. आमच्या बाजूच्या घरातील माणसं टेबल-खुर्चीवर जेवायला बसायची आणि आमच्याकडे मात्र पाट! मी अप्पांना म्हटलं, ‘‘ते लोक टेबलावर जेवतात. मग आपण का पाटावर?’’ अप्पा फक्त हसले. संध्याकाळी येताना पोपटी रंगाची वेताची छोटी सुंदर खुर्ची व तसंच काच असलेलं पोपटी छोटं टेबल घरी हजर! मी अगदी हरखून गेले.

मी म्हटलं, ‘‘अप्पा, काकू! तुम्हाला काय आवडतं ते नि:संकोचपणे सांगा. घेऊन देईन मी.’’ अप्पा काहीच बोलले नाहीत. काकूंनी मात्र विचारलं, ‘‘तू खरंच मला माझ्या आवडीचं घेऊन देशील? आजवर माझ्या काही आवडी राहून गेल्या आहेत..’’ मग आम्ही बाजारात गेलो. त्या सत्तरीच्या माझ्या आजीने हौसेने काय घेतलं असावं? ..’’

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत

लहानपणी जी, जी माणसं आपले लाड करतात, प्रेमाने सारे हट्ट पुरवतात, ती, ती माणसं आपल्या जन्मभर आठवणीत राहतात. असेच आठवणीत राहिलेले माझे आजी-आजोबा! खरं तर माझ्या वडिलांचे ते काका-काकू! म्हणून सर्वजण त्यांना अप्पा काकू म्हणत. या अप्पा काकूंनी माझे इतके लाड केले की मी बिघडले कशी नाही याचंच मला आश्चर्य वाटतं. त्यांचे हे लाड माझ्या जन्मापासूनच सुरू झाले.

खरं तर माझी मोठी बहीण शोभना ही माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी. माझ्या वेळेस आई बाळंतपणासाठी तिच्या माहेरी, रत्नागिरीला गेली. इथे मुंबईला सासरची माणसं ‘निकाला’ची वाट बघत होती. मुलगा होईल या आशेने उत्साहात जय्यत तयारी सुरू होती. रत्नागिरीहून तार आली ‘मुलगी झाली’. सर्वच जण अतिशय नाराज झाले. माझ्या आईवडिलांना दुसरी मुलगी झाल्याचं दु:ख नव्हतं. पण इतरांना जरूर होतं. विशेषत: वडिलांच्या आई-वडिलांना. त्यांनी रत्नागिरीला बारशासाठी जायचंही रद्द केलं. त्या वेळी अप्पा म्हणजे वडिलांचे काका म्हणाले, ‘‘दुसरी मुलगी झाल्याचं एवढं दु:ख कशासाठी? काय बिघडलं मोठं! काय सांगावं हीच कदाचित मुलगी मोठी झाल्यावर आपल्या घराण्याचं नाव काढेल.’’ आणि म्हणूनच कदाचित इतरांना नकोशी असलेली मी अप्पांची सर्वात जवळची आणि लाडकी नात झाले. त्यांनीच माझ्यासाठी उत्तरा हे नाव सुचवलं.

त्या वेळी असेन मी ३/४ वर्षांची. ग्रँटरोडला भल्या मोठय़ा बंगल्यात आम्ही राहात होतो. खाली मोठ्ठा थोरला हॉल! इतका मोठा की त्या वेळी अनेकांची लग्नं त्या हॉलमध्ये होत. आतल्या बाजूला प्रशस्त स्वयंपाकघर. त्याच्या उजव्या बाजूला वर जायला जिना. वर दोन बाजूंना दोन बेडरूम्स, मध्ये पडवी व पडवीच्या समोर, मागच्या बाजूला फुलांनी फुललेली छान गच्ची! गच्चीच्या उजवीकडील खोली अप्पांची! तिथे मोठा पलंग होता. त्याला लागून दरवाजाच्या आकाराची खिडकी! त्या खिडकीच्या गजातून माझ्या बालवर्गाची शाळा काकूला दिसत असे. शाळा सुटली, की मला बघून ती खाली येई. मला मांडीवर बसवून भात भरवे व वर बेडरुममध्ये घेऊन जाई. सगळा दिवस मग तिच्याबरोबर जाई.

पलंगाच्या उजव्या बाजूला सुंदर काचेचं कपाट होतं. त्यात मोठमोठय़ा काचेच्या बरण्यात अक्रोड, काजू, सुके अंजीर, बेदाणे भरलेले असत. कधीही कपाट उघडावं आणि त्यातला सुका मेवा कितीही काढून घ्यावा व मनसोक्त खावा! कुणीही बोलणारं नव्हतं! एकदा मी फर्मान काढलं, ‘‘अप्पा! यंदा माझ्या वाढदिवसाला वर्गातल्या सर्वाना सुक्या मेव्याच्या पिशव्या वाटायच्या.’’ लगेच अप्पांनी प्लास्टिकच्या पिशव्या आणून त्यात सुका मेवा भरून माझ्या हातांनी सर्वाना वाटायला दिल्या. एकदा तर अप्पांनी मला निरनिराळ्या प्राण्यांचे आकार असलेले सहा साबण आणले. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मग रोज मी त्यांना सांगे, आज हत्तीच्या शेपटीच्या बाजूने मी साबण लावला आणि त्याची शेपटी लहान करून टाकली. मग मी उंटाच्या मानेचा साबण लावला आणि त्याची मानच तिरकी करून टाकली! अप्पा फक्त हसत असत. पण खरंच! अशा आकाराचे साबण मी तोपर्यंत बघितले नव्हते.

मला मोराची पिसं आवडतात म्हणून अप्पा मला नेहमीच मोराची पिसं आणून द्यायचे. एकदा मी अप्पांना म्हटलं. ‘‘मला वाडीतल्या सर्व मित्रमैत्रिणींना मोराची पिसं वाटायची आहेत.’’ झालं, दोन दिवसांतच मोरांच्या पिसांचा मोठा गठ्ठाच अप्पांनी माझ्या समोर ठेवला आणि आमच्या घरी पिसं घेण्यासाठी लहान मुलांची रांग लागली.

एकदा अप्पा-काकूंबरोबर मी एका पार्टीला गेले. तिथे वेगवेगळे पदार्थ खायला ठेवले होते. त्यातला बटाटय़ाचा बारीक सळ्यांचा भरपूर बदाम, काजू, बेदाणे घातलेला चिवडा मला फार आवडला. पहिल्यांदा खात होते मी तो! मला तो इतका आवडला की हावरटासारखी खात राहिले. ३-४ वर्षांच्या मला काय कळत होतं! अप्पांनी ते बघितलं, माझ्या कानात म्हणाले, ‘‘आता आणखी खाऊ नकोस. उद्या मी तुला असला चिवडा घरी घेऊन येईन बरं!’’ आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी एक किलो बटाटय़ाचा चिवडा आणून त्यांनी माझ्यासमोर ठेवला. अशा कितीतरी आठ़वणी..

रोज सकाळी आमच्या बंगल्याच्या माडीवर वाडीतल्या मुलांना अप्पा विनाशुल्क गीता शिकवीत. संस्कृतमधून त्याचा अर्थ सांगत व मग अचूक उच्चार सांगून एकेक अध्याय मुलांकडून पाठ करून घेत. मी त्यांच्या बाजूलाच बसलेली असे. हे सर्व माझ्या कानावर आपोआप पडत असे. त्यामुळे लहान वयातच गीतेचे अनेक अध्याय मला पाठ होते. गीता शिकून मुलं जायला निघाली की ती अप्पांना वाकून नमस्कार करीत. त्या प्रत्येकाला ते खिशातली नाणी काढून देत. मुलं खूश होत कारण साठ वर्षांपूर्वी दोन-चार नाण्यातसुद्धा खूप खाऊ येई. काही मुलं तर त्यांना कधी कधी कारण नसतानासुद्धा नमस्कार करीत, पैसे मिळतील या आशेने!

रोज रात्री झोपताना मी त्यांच्याकडे लांबलचक गोष्टीचा हट्ट करे. ते हौसेने गोष्टी रंगवून सांगत. हळूहळू मला झोप लागे. दुसऱ्या दिवशी मी आदल्या दिवशीच्या गोष्टीचा शेवट सांगे. मग परत अप्पा तो धागा पकडून कल्पनेच्या भराऱ्या मारत गोष्ट पुढे नेत. अशी एकेक गोष्ट आठवडाभर चाले. रात्री जेव्हा ते पाटावर जेवायला बसत तेव्हा मी त्यांच्या पाठीवर रेलून बसत असे. पाठीवर चुळबुळ करत, कधी कधी त्यांच्या पाठीवरच मला झेप लागे. तरी मला न हलवता पाठीवरचं माझं वजन सहन करत ते निमूटपणे जेवत असत. आहे की नाही कमाल!

तो काळ पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीचा. आमच्या बाजूच्या घरातील माणसं टेबल-खुर्चीवर जेवायला बसायची आणि आमच्याकडे मात्र पाट! मी अप्पांना म्हटलं, ‘‘ते लोक टेबलावर जेवतात. मग आपण का पाटावर?’’ अप्पा फक्त हसले. संध्याकाळी येताना पोपटी रंगाची वेताची छोटी सुंदर खुर्ची व तसंच काच असलेलं पोपटी छोटं टेबल घरी हजर! मी अगदी हरखून गेले.

अशा एक ना दोन किती त्यांच्या लाडाच्या कथा सांगाव्यात! दर रविवारी राणीची बाग तर ठरलेलीच! तिथेसुद्धा प्राण्यांना, पक्ष्यांना घालण्यासाठी शेंगा, ऊस, गाजरं, पेरू यांनी पिशवी भरल्याशिवाय मी राणीच्या बागेत पाऊल ठेवत नसे. मग प्रत्येक पिंजऱ्यासमोर जाऊन त्यांना त्या वस्तू खायला द्यायच्या. खूप आनंदून जायचे मी! मग हत्ती आणि उंटावरची रपेट! कधी कुंभार मडकी कसा करतो, हे दाखवण्यासाठी ते मला कुंभारवाडय़ात घेऊन जायचे. तिथे जातानासुद्धा माझा ट्रॅमचा किंवा टॅक्सीचा हट्ट असेच! कारण काय तर म्हणे आगगाडीतील माणसं त्रास देतात! हे सर्व हट्ट पुरवताना, त्याला पैसे लागतात हे माझ्या गावीही नसे. आणि तेही मला कधी जाणवू देत नसत हे विशेष!

असं हे सुंदर बालपण संपलं! लग्न झालं. मी दादरला राहायला आले. माझं नाव झालं, गाडय़ा, ड्रायव्हर असे एकापाठोपाठ आले. मग एकदा मी अप्पा काकूंना म्हटलं की आयुष्यभर लाड केलेत तुम्ही माझे! आता तुमचे लाड करायचेत मला! तेव्हा तुम्ही माझ्याकडे राहायला या. तेसुद्धा मोठय़ा आनंदाने माझ्याकडे राहायला आले. त्यांना गाडीतून फिरवलं, घरीच स्वत: करून त्यांच्या आवडीचं खायला प्यायला घातलं. परत जाण्याच्या आदल्या दिवशी मी त्यांना म्हटलं, ‘‘अप्पा, काकू! तुम्हाला काय आवडतं ते नि:संकोचपणे सांगा मला. तुम्हाला घेऊन देईन मी!’’ यावर अप्पा काहीच बोलले नाहीत. मी त्यांना धोतर-जोडी घेऊन दिली. काकूंनी मात्र मला विचारलं, ‘‘तू खरंच मला माझ्या आवडीचं घेऊन देशील? आजवर माझ्या काही आवडी राहून गेल्या आहेत.’’ मी म्हटलं, ‘‘अगं सांग ना मला, मलासुद्धा उत्सुकता वाटतेय.’’ मग आम्ही बाजारात गेलो. त्या सत्तरीच्या माझ्या आजीने हौसेनं काय घेतलं असावं? एक मोठा पॉण्ड्सचा पावडरचा डबा, नेलपॉलिशची बाटली, खोटे कानातले, पर्स आणि लाल रंगाच्या फॅन्सी चपलांचा जोड!

हे सर्व घेऊन तृप्त मनानं आम्ही घरी आलो. घरी आल्यावर सर्व वस्तू उत्साहानं उघडून तिनं अप्पांना दाखवल्या आणि विचारलं, ‘‘असे कधी लाड तुम्ही केलेत काहो माझे?’’ अप्पा हसून म्हणाले, ‘‘अगं कधी आयुष्यात बोललीच नाहीस तू! या वस्तू मागितल्या असत्या तर दिले असते की मी पैसे तुला.’’ यावर काकू म्हणाली, ‘‘लाड कधी काही मागून होतात का? ते आपणहून करायचे असतात.’’ असं म्हणून नऊवारीतील माझी आजी नेलपॉलिश लावण्यात गुंग होऊन गेली..