जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘कर्करोगाच्या पलीकडे’ हा लेख खूपच छान आहे. कर्करोगाविषयी असलेली भीती इतकी खोलवर आहे की, त्या भीतीला बाजूला करण्यासाठी ‘जनजागृती’ आवश्यक आहे. आपण दिलेल्या उदाहरणावरून या जनजागृतीस चालना नक्की मिळेल. लवकर निदान होणे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यावर जरूर ती शस्त्रक्रिया करून जरुरीप्रमाणे केमोथेरपी आणि रेडिओथेरपी करून घेऊन कर्करोगमुक्त होऊ शकतो हा विश्वास रुग्णात निर्माण होणे गरजेचे आहे. वरील सर्व उपचार सुरू असताना मनाचा खंबीरपणा, कुटुंबातील सर्वाकडून जरुरीप्रमाणे मानसिक आधार आणि वेदनारहित राहण्याकरिता भूलशास्त्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने वेदनेवर प्रभावी उपाय करून घेऊन कर्करोगी पूर्ण क्षमतेने आपले वैयक्तिक आयुष्य आणि आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य जबाबदारीने स्वीकारून पूर्ण क्षमतेने उर्वरित आयुष्य जगू शकतो, हे सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा