उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो.
मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.
औषधी गुणधर्म-
कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडते. उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जलउत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात. पर्यायाने अशा वेळी थकवा जाणवतो. त्या वेळी कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो. कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो. कारण या बियांमध्ये ‘कुम्बोट्रिन’ नावाचा ग्लुकोसाइड घटक असतो. यातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळत असल्याने ते आरोग्यपूर्ण आहे. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. त्याची साल, फळ व बी या तिघांचाही उपयोग केला जातो.
कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.
आजारावर उपयोग
* मूतखडा झाला असेल तर तो लघवीतून पडून जाण्यासाठी कलिंगडाचा रस सतत काही दिवस द्यावा. * आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी कलिंगड खावे.
* उन्हातून आल्यानंतर किंवा उष्णतेच्या विकाराने डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गर काढलेल्या अध्र्या कलिंगडाची टोपी डोक्यात घालावी. डोकेदुखी थांबून शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो.
* कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अ‍ॅण्टिऑक्सिटेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.
* कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्र्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.
* उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोडय़ाच वेळात शरीराची आग कमी होते.
* सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो.
* कलिंगडाचे बी हे अतिशय पौष्टिक व चवदार असते. मुखशुध्दीसाठी बडिशेपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे तसेच घरी बनवलेले लाडू, बर्फी यामध्येही या बीचा सजावटीसाठी वापर करावा. यापासून केलेले तेल हे पौष्टिक असते. त्याच्याही खाद्यपदार्थ म्हणून वापर करता येतो.
* कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रश्श्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो.
* कलिंगडाचा लाल गर काढल्यानंतर, सालीचा पांढरा गर हा फेकून न देता त्याचा वापर कोिशबीर, थालीपीठ, कटलेट, भजी, धिरडे, भाजी यांमध्ये करावा.
* कलिंगडाची हिरवी साल स्वच्छ धुऊन बारीक किसून सांडगे बनविण्यासाठी वापरावी यामध्ये लोह, चोथा व ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.
सावधानता-
कलिंगड हे फळ पिकल्यानंतर माठाखाली ठेवावे. पाण्याने ओले केलेले थंड कापड त्यावर टाकावे. त्यानंतर चार ते पाच तासांनी कलिंगड खावे. फ्रिजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये. तसेच एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. म्हणून ते लगेचच खावे. अनेक जण कलिंगड खाताना त्यात मीठ टाकून खातात; परंतु कलिंगडामध्ये नसíगकरीत्याच सोडियम क्लोराइड, पोटॅशिअम हे क्षार असतात व मीठ टाकून या क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते. म्हणून मीठ, साखर यांचा वापर न करता आहे त्या नसíगक स्थितीतील पिकलेले कलिंगड कापून लगेचच खावे. फ्रिजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्ल्यास अनेक वेळा फूड पॉयझिनग (अन्न विषबाधा) होऊन जुलाब, उलटय़ा, ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात.
डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com

Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी