सुंदर, बांधेसूद दिसण्यासाठी आज फक्त तरुणवर्गच नव्हे तर सर्व वयोगटातील लोक सजग झाले आहेत. त्यासाठी अक्षरश: हजारो, लाखो रुपये खर्च करत आहेत. हे लोण उच्चवर्गीयांकडून आता उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांपर्यंत आलेलं आहे. सगळ्यांचा सौंदर्यासाठी आग्रह नसेलही, पण अनेक जण त्याकडे आत्मविश्वासाचं माध्यम म्हणून बघतात. अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या कॉस्मेटिक ट्रीटमेंटस्विषय़ी आणि सौंदर्यशास्त्राच्या प्राचीन  इतिहासाविषयी..

सौंदर्य बघणाऱ्यांच्या नजरेत असतं.. हे फक्त सुभाषित म्हणून ठीक आहे.. परंतु अलीकडे लोकांची जीवनशैली पहाता प्रत्यक्षात हे तसं नसतंच याचा प्रत्यय येऊ लागला आहे. आताचं जगणं मला हवं तस्सं असाच आग्रह असू लागला आहे. गोरीपान, नाकीडोळी नीटस ही जी काही सौंदर्याची व्याख्या आहे, त्यात बसणारं सौंदर्यच  सगळ्यांनाच हवं असतं. स्टाईल आणि लूक्स यांना अतोनात महत्व आलंय म्हणूनच तर आज सौंदर्य प्रसाधनांपासून सौंदर्यशास्त्रापर्यंत सगळ्याला प्रचंड मागणी आहे. या क्षेत्राचे म्हणजेच कॉस्मेटिक ट्रीटमेंटस्चे भारताचे स्थान ‘ग्लोबल मार्केट’मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
म्हणूनच काही आठवडय़ांतच गोरेपान करण्याचा दावा करणारी क्रीम हा-हा म्हणता संपतात, तेही हे असं क्रीम लावून गोरं होता येतं का? किंबहुना काळा किंवा सावळा रंग असला तर काय बिघडतंय? हा सारासारा विचार न करताच. गोरा रंगाचा इतका हव्यास का? हा प्रश्न जेव्हा दहा-बारा मुलींना विचारला तेव्हा यामागे लग्नाच्या बाजारात गोऱ्या रंगाला किंमत आहे इथपासून गोऱ्या रंगामुळे आत्मविश्वास वाढतो.. इथंपर्यंत अनेक कारणं सांगितली गेली!
गोऱ्या रंगाचा जर इतका हव्यास असेल तर मग नाकीडोळी नीटस दिसण्याची तर चक्कगरजच आहे म्हटलं पाहिजे. वाकडं नाक, फाटलेला ओठ, तुटलेले किंवा पुढे आलेले दात, मुलींच्या चेहऱ्यावर येणारे केस यापासून पुरुषांना अगदी तरुण वयात पडणारं टक्कल यापर्यंतच्या अनेक समस्या असतात. याचा अनेकांवर परिणाम होतो, विशेषत: भावनिक. त्यांचा यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. समोरची व्यक्ती आपल्या व्यंगाकडे बघून हळहळत असेल किंवा मग टिंगल करत असेल हे विचार सतत डोक्यात राहिल्याने त्याचा परिणाम संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होत असतो. काही वेळा तर अशी व्यक्ती न्यूगगंडाकडे झुकते,असंही आढळून आलं आहे.   
कॉस्मेटिक सर्जन डॉ. सुहास अभ्यंकर यांनी बाबतीत सांगितलं, ‘हे अगदी खरं आहे. सौंदर्य म्हणजे फक्त सुंदर दिसणंच नसतं, तर सौंदर्य तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवत असतं किंवा बदलत असतं. या अशा अनेक केसेस मी रोज माझ्याकडेच बघत असतो.. त्याचा दूरगामी परिणाम माणसांच्या जगण्यावर पडत असतो.’
डॉ. अभ्यंकरांकडे गेले असताना तिथे त्यांच्याकडे थेट कोकणातून केसाच्या ट्रीटमेंटसाठी येणारा, तिशीच्या आसपास वय असणारा दर्शन बसलेला होता. त्याची डॉक्टरांनी ओळख करून दिली. तेव्हा तो खूष दिसत होता. तो जेव्हा प्रथम डॉ. अभ्यंकर यांच्याकडे आला तेव्हा त्याला नव्वद टक्क्यांहून अधिक टक्कल पडलं होतं. त्यानं कॉस्मेटिक सर्जरीबद्दल वाचलं- ऐकलं होतं त्यावरून तो डॉक्टरांकडे चौकशी करायला आला. दर्शन म्हणतो, ‘कोकणात आमचं दुकान आहे. पूर्वी मी जेव्हा दुकानात बसत असे तेव्हा आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांपकी अनेकजण- काय रे, या वयात     
तुला टक्कल कसं पडलं, असं कुत्सितपणे विचारत किंवा काही लोक तर माझ्याशी बोलतदेखील नसत. त्या वेळी ते नेमकं माझ्याबद्दल काय विचार करत असतील हाच विचार सतत मनात घोळत राही. अनेकांनीच काय माझीही मी अनेकदा समजूत घातली होती, पण विचार जात नसत. मी जेव्हा डॉक्टर अभ्यंकरांना भेटलो तेव्हा त्यांनी मला केसरोपणाविषयी माहिती दिली. त्याच वेळी मी ठरवलं की, आपणही ही ट्रीटमेंट करून घ्यायची.’        
दर्शन त्यासाठी रत्नागिरीहून खास मुंबईत फक्त ही ट्रीटमेंट करून घेण्यासाठी येऊ लागला. आता दर्शनच्या डोक्यावर जवळपास तीस टक्के केस दिसू लागले आहेत. तो म्हणतो, ‘तुम्हाला खोटं वाटेल पण आता खरंच लोक आवर्जून माझी चौकशी करतात. चांगला दिसतो म्हणतात. पूर्वी जे लोक माझ्याशी बोलत नाहीत असं मला वाटत असे ते खरंच माझ्याशी बोलत नसत, कारण मी त्यांच्या खिजगणतीत नसे. तेच लोक मला माझ्या ट्रीटमेंटविषयी विचारतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं. माझ्यातला आत्मविश्वास आधी कमी झाला होता, असं मी म्हणणार नाही, पण आज माझ्या मनात कोणतीही कमतरतेची भावना नाही हाही मोठ्ठा प्लस पॉइंट आहेच.’
या ट्रीटमेंटमुळे त्रास किती होतो? किंवा त्याचा खर्च किती असतो? विचारता डॉ. अभ्यंकर म्हणतात, ‘खरं तर या प्रश्नांची उत्तरंही दर्शनच अधिक चांगल्या रीतीने देईन, पण मला विचाराल तर मी सांगेन की, त्रास फारसा होत नाही. याचे आफ्टर इफेक्टच नसतात. काही काळानंतर औषधं वगरेही नसतात, पण खर्च मात्र असतो, तोही प्रत्येक रुग्णाला वेगवेगळा येऊ शकतो. दर्शनने जर पन्नास हजार खर्च केला असेल तर अजून कोणाला लाखभर रुपये येईल, तर कोणाचं पंचवीस हजारांतही काम होईल.’
पण इतका खर्च करून सौंदर्यवृद्धीच्या ट्रीटमेंट करून घ्यायला सर्वसामान्य मुलं-मुली तयार असतात? या प्रश्नावर डॉक्टर सांगतात, ‘ग्लोबलायझेशनचे जे अनेक बरेवाईट परिणाम बघायला किंवा अनुभवायला मिळतायत ना, त्यातलाच हाही एक परिणाम म्हणता येईल. कालपर्यंत जे शास्त्र फक्त श्रीमंत, तेही सिनेमा इंडस्ट्रीशी संबंधित असणाऱ्यांपर्यंत मर्यादित होतं किंवा मी ‘बर्न एक्सपर्ट’ म्हणून काम करतो, त्याबाबतीत बोलायचं तर सर्वसामान्य माणसाचा संबंध फक्त दुर्दैवाने भयंकर भाजण्याला तोंड द्यावं लागलं, तर स्किन ग्राफटिंग करून घेण्यापुरतं मर्यादित होतं. तेच शास्त्र आज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. उच्च मध्यमवर्गीयच काय, पण अगदी मध्यमवर्गीय मुलं-मुलीदेखील चांगलं दिसण्यासाठी म्हणून ट्रीटमेंट करून घेतात, तेही चक्क लाखो रुपये खर्च करून!’
कालपर्यंत आपण पडद्यावर दिसणाऱ्या अभिनेते- अभिनेत्रींविषयी, हिने नाक सरळ करून घेतलं, तर तिने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवणारी ट्रीटमेंट करून घेतली, असं म्हणत होतो. आता माझ्या मत्रिणीने किंवा शेजारी राहणाऱ्याने अमुक एक ट्रीटमेंट करून घेतली आहे हे सांगता येईल. इतक्या या ट्रीटमेंट आपल्या दरवाजापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. इतकंच नाही तर परदेशात ज्या सफाईने ही ऑपरेशन्स होतात त्याच सफाईने आपल्या इथेही होत आहेत. आज मेडिकल टुरिझमअंतर्गत आपल्याकडे अ‍ॅस्थेटिक डेंटिस्ट्रीसाठी आखाती देश किंवा इतर देशांतून लोक येतात तसंच कॉस्मेटिक सर्जरी करून घेण्यासाठी येणाऱ्या पेशंट्समध्येही लक्षणीय वाढ झाल्याचं या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांकडून समजतं.
यामध्ये सगळ्यात जास्त कोणती ट्रीटमेंट करून घेतली जाते, सांगताना डॉ. अभ्यंकर म्हणतात, ‘स्त्रियांच्या बाबतीत अनावश्यक केस कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी लेझर ट्रीटमेंट दिली जाते, त्याला प्रचंड मागणी आहे. यासाठी सगळ्या स्तरातल्या स्त्रिया येतात. त्या खालोखाल म्हणायचं तर लायपोसक्शन म्हणजेच वजन कमी करून घेण्याची ट्रीटमेंट. यामध्ये अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते. या ट्रीटमेंटसाठी कोणत्याही वयातले स्त्री-पुरुष येतात. त्यानंतर मागणी असते ती चेहऱ्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटची. सगळ्यात कमी प्रमाण आहे ते नाक, डोळे, ओठ आदी ‘बिघडलेले’ अवयव नीट करून घेण्यासाठीच्या ट्रीटमेंटचे. खरं तर तर ती ऑपरेशनच असतात, पण ती करून घेण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषदेखील येतात.’
आधीच म्हटल्याप्रमाणे ही ट्रीटमेंट फक्त सुंदर दिसण्यासाठी नसते, तर आत्मविश्वास वाढविण्यासाठीही करून घेतली जाते. अशाच वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेणाऱ्या काही मुला-मुलींना बोलतं केलं ..
स्वत: डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस करणारी डॉ. सुप्रिया म्हणते, ‘माझ्या ओठांच्यावर, हनुवटीवर प्रमाणाबाहेर केस होते. जेव्हा माझे रुग्ण माझ्याकडे येत तेव्हा त्यांना माझ्याकडे बघून ओंगळवाणं वाटत असेल, हीच भावना माझ्या मनात असे. त्याचा परिणाम म्हणजे मी रुग्णांशी मोकळेपणाने संवादच साधू शकत नसे. लेझर ट्रीटमेंटमुळे माझ्या दिसण्यात जसा फरक पडत गेला तसं मला जाणवलं की, मी आता खूप आत्मविश्वासाने त्यांच्याशीच काय सगळ्यांशीच बोलते आहे. त्याचा परिणाम मला माझ्या प्रॅक्टिसवर दिसतो आहे.’
महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रेया म्हणते, ‘माझे दात खूपच वेडेवाकडे होते. त्यामुळे विद्यार्थी माझी टिंगल करतात आणि मला सीरियसली घेत नाहीत हे मला कळत होतं. पण आज दातांची ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेला बदल मला खरंच सुखावून जातो. आज मी खरंच मोठय़ा आत्मविश्वासाने कॉलेजमध्ये वावरते.’
आज कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीचं प्रमाणही खूप वाढलं आहे. याबाबतीत बोलताना गेली पंचवीस र्वष कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीमध्ये काम करणारे डॉ. सुहास लेले यांनी सांगितले, ‘मी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्या प्रमाणात आज ही ट्रीटमेंट करून घ्यायला उत्सुक असणाऱ्याचं प्रमाण जवळपास साठ टक्क्यांनी वाढलं आहे. पंचवीस हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंतच्या या ट्रीटमेंट करून घ्यायला लोक सहज तयार होतात. वय र्वष अठरा    ते तीस या वयोगटात तर या ट्रीटमेंट करून घेण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे.’
या ट्रीटमेंसाठी येणाऱ्या स्त्री-पुरुषांचा वयोगटही ठराविक नाही. त्यांच्याकडे अठरा वर्षांच्या मुली-मुलं येतात तसेच साठीच्या पुढचे स्त्री-पुरुषदेखील येतात हे ऐकल्यावर आश्चर्यच वाटतं! डॉक्टरांनी आपला एक अनुभव सांगितला, ‘नाक सरळ करून घेण्यासाठी ऑपरेशन करायला माझ्याकडे साठीच्या बाई आल्या होत्या, त्या मला म्हणाल्या..‘ज्या वयात करून घ्यायचं त्या वयात पसा नव्हता. आज मुलं खूप कमावतायत. या ऑपरेशनसाठी खर्च करणं शक्य आहे. मग आत्ता तरी मी माझी चांगलं दिसण्याची हौस पूर्ण करून घ्यायला काय हरकत आहे..’

Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…
Sunayana won gold medal in womens bodybuilding competition
खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान
Story img Loader