क्षमा एरंडे

साधारण वीसेक वर्षांपूर्वी नोकरीत असताना मोबाइल नामक एक ‘संदेशवहनाचं साधन’ ऑफिसतर्फे आम्हाला देण्यात आलं होतं. त्यावर फक्त फोन घेण्याची-करण्याची सुविधा होती. ऑफिसच्या अनेक शाखा असल्यामुळे आणि महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे फोन दिला गेला होता. त्याचं त्या काळी फारच अप्रूप वाटायचं. 

Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
Realme 14 Pro 5G Series Launch in India
नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा! रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात होणार लाँच; थंड तापमानात रंग बदलणार
Smart electricity meters , elections , mahavitaran ,
निवडणुकीनंतर ग्राहकांवर स्मार्ट वीज मीटर लादले, शासनाची ही घोषणा…

  कालांतरानं मुलांनी एका वाढदिवशी स्मार्टफोन घेऊन दिला आणि कॉलेज संपल्यानंतर कित्येक वर्षांनी मी परत एकदा विद्यार्थीदशेत आले. सुरुवातीला फोन वाजला की घ्यायचा एवढंच डोक्यात बसलं होतं, त्यामुळे मग ती रिंग मेसेजची असो, नाही तर फोनची, आपसूक फोन उचलला जायचाच. नवीन फोन असल्यानं कमालीची उत्सुकता, उतावळेपणा आणि वेगळं काही तरी शिकायला मिळतंय याचं कुतूहल, असे संमिश्र भाव होते. या फोनवर नाना तऱ्हेची अॅप डाऊनलोड केली. त्यातलं एक होतं ‘व्हॉटस्अॅप’. नवीन ग्रुप कसा बनवायचा, फोनच्या यादीतून एखाद्याला त्यात कसं समाविष्ट करायचं याचे धडे घेतले. मग ते अॅप वेगवेगळय़ा ग्रुप्सनं भरून गेलं. सुरुवातीला मी अखंड व्हॉटस्अॅपवर असायचे. त्यावरून मला एक आधुनिक वाक्प्रचार सुचला- ‘खाली मुंडी ‘व्हॉटस्अॅप’ धुंडी!’ मजा म्हणजे सगळय़ांना तो पटला.

 पूर्वी कुणी एखाद्याचा फोन नंबर मागितला, की मी फोन नंबर बघून कागदावर उतरवून घ्यायचे आणि मग परत फोन करून सांगायचे. असं न करताही फोन नंबर कसा पाठवायचा, ते मुलांनी शिकवलं. राहत्या घराचं किंवा एखाद्या ठिकाणाचं लोकेशन पाठवायला शिकले.मला लघुकथा लिहिण्याची आवड आहे. मग मी फोनवरच ‘जीमेल’मध्ये ती लिहून त्याचा ड्राफ्ट सेव्ह करू लागले. शब्दकोडी बनवण्याचाही मला छंद आहे. रोज एक तरी कोडं मी वेगवेगळय़ा ग्रुप्सवर पाठवते. मुलाकडून फेसबुकवर स्वत:चं पेज उघडायला शिकले. या पेजला भेट देऊन अनेक जण कोडी सोडवण्याचा आनंद घेतात, तेव्हा बरं वाटतं.

फेसबुक, यूटय़ूब म्हणजे मला ‘खुल जा सिम सिम’ सारखंच वाटू लागलं. सातासमुद्रापार असलेल्या लेकीशी व्हिडीओ कॉलवरून बोलायला शिकले. लेकीला रोज भेटण्याचा आनंद मिळू लागला. व्हॉटस्अॅपवर आलेला एखादा मेसेज, व्हिडीओ ‘स्टार’ करून कसा ‘सेव्ह’ करायचा, अशा अनेक बारीकसारीक गोष्टी मी दहा वर्षांच्या नातीकडून शिकले. हल्लीची पिढी हुशार, टेक्नोसॅव्ही आहे, काळाबरोबर चालणारी आहे.

सर्वात जास्त शिकण्याचं समाधान मला मिळालं ते म्हणजे ‘गूगल पे’ची सुविधा वापरायला शिकल्यावर. ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे बऱ्याच गोष्टी बाहेरून मागवाव्या लागतात. अशा वेळी फोनची किंमत कळते. बाहेर जाण्यासाठी गाडी कशी बुक करायची याचे धडे घेतले. या सगळय़ा सुविधा आता मी कुणाच्याही मदतीशिवाय वापरू शकते. खरंच, या फोनमुळे घरबसल्या अनेकांशी संवाद साधता येतो, ख्यालीखुशाली समजते.

मला स्मार्टफोननं काय दिलं?.. तर मला ‘स्मार्ट’ बनवलं.. मनातली भीती घालवली!

Story img Loader