निरोगी आरोग्यासाठी हात धुण्याचे महत्त्व किती आहे, हे करोना साथीच्या काळात आपण अनुभवलेच आहे. याची गरज सगळ्यांना माहीत असूनही किती जण हात धुतात नव्हे हात स्वच्छ धुतात हा प्रश्नच आहे. शारीरिक स्वच्छतेच्या दृष्टीने या सवयीत सातत्य असणं महत्त्वाचं आहे. ‘आपले हात स्वच्छ असणे का महत्त्वाचे आहे?’ हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी १५ ऑक्टोबरला असलेल्या ‘जागतिक हात धुवा दिना’निमित्त आजचा हा विशेष लेख.

‘दिवसभरात आवश्यकतेनुसार, वेळोवेळी साबणाचा वापर करून किमान २० सेकंद आपले हात स्वच्छ धुवावेत’, अशी सूचना ‘जागतिक आरोग्य संघटने’ने ‘जागतिक हात धुवा दिन (Global Handwashing Day)’ यानिमित्ताने केली आहे. २००८ पासून, म्हणजे गेल्या साधारणत: १६ वर्षांपासून, १५ ऑक्टोबर या दिवशी ‘जागतिक हात धुवा दिन’ हा जगभर पाळला जातो. हे ऐकून सामान्यत: कुणाचीही, ‘यात नवीन ते काय आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे’, अशी प्रतिक्रिया येऊ शकते. नवीन काही नाही, हे खरं आहे पण एकविसाव्या शतकातील जवळपास पाव शतक उलटून जात असताना आणि ‘जागतिक हात धुवा’ दिवस गेली १६ वर्षे पाळूनदेखील पुन्हा अशी मूलभूत सूचना ‘जागतिक आरोग्य संघटने’ला करणं आवश्यक आहे असं वाटत असेल, तर यासंदर्भात संघटनेकडून काही निरीक्षणांची नोंद केली गेली असणार. म्हणूनच या सूचनेची उजळणी करण्यामागचे काय कारण असू शकते यावर चर्चा होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी याचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी पूर्वीच्या काळी ज्या घटना घडल्या त्या वाचणेही उद्बोधक ठरावे.

world mental health day chaturang article
ऐकावे मनाचे… करावे मनाचेच…
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
sandha badaltana Do old items expire
सांधा बदलताना : या भवनातील गीत पुराणे?
Borderline Personality Disorder BPD among youth
स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
Loksatta chaturang Girlfriend love Family Responsibilities
माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’
newly married girl loksatta article
इतिश्री : वैचारिक सीमोल्लंघन
Learn to express gratitude, mistakes, gratitude,
सांधा बदलताना : चुकांचा स्वीकार
Loksatta chaturang article about children who think they own their parents money
सांदीत सापडलेले…! मालक कोण?

हेही वाचा – जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग

हंगेरी या देशातील, व्हिएन्ना येथील हॉस्पिटलमध्ये काम करणारा फिजिशियन डॉ. इग्नाझ सेमेल्व्हिस यांना हात धुण्याची गरज सांगणारा ‘स्वच्छतेचा जनक’ असे संबोधले जाते. एक काळ असा होता, तेव्हा हात धुण्याची संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. ‘गर्भवती’ आणि ‘बाळंतपणा’च्या संदर्भात काम करताना डॉ. इग्नाझ यांना त्यांच्या निरीक्षणातून आणि संशोधनात्मक कार्यातून, प्रसूती करण्यापूर्वी स्वच्छ हात धुतल्यास रोगजंतू संसर्ग कमी होऊन अनेक मातांचे प्राण वाचू शकतात असं लक्षात आलं. १८४७ मध्ये डॉ. इग्नाझ सेमेल्व्हिस यांनी आपल्या शोधनिबंधातून जगातील शास्त्रज्ञांसमोर ही संकल्पना मांडली. जगभरातील शास्त्रज्ञांनी, प्रसूती सुरू करण्यापूर्वी फक्त ‘हात धुतल्या’मुळे अनेक स्त्रियांचे प्राण वाचवता येऊ शकतात, ही संकल्पना मान्य केली नाही. या गोष्टीचा मानसिक धक्का डॉ. इग्नाझ सेमेल्व्हिस यांना सहन झाला नसावा. ते निराशेच्या गर्तेत गेले. लोकांनी त्यांना ‘वेडा’ घोषित करून अनाथाश्रमात दाखल केलं. तेथील सुरक्षारक्षकाने त्यांना मारहाण केली. त्यांच्या अंगावर जखमा झाल्या. त्या जखमांमध्ये इन्फेक्शन झालं. रोगजंतूंचा संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षांनंतर, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ लुई पाश्चर आणि जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञांनी डॉ. इग्नाझ सेमेल्व्हिसनी आपल्या निरीक्षणातून मांडलेल्या रोगजंतूंविषयक संकल्पना मान्य केल्या. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ‘हात धुण्या’चं महत्त्व समजावून सांगणाऱ्या डॉ. इग्नाझ सेमेल्व्हिसचे बलिदान व्यर्थ जायला नको असेल तर आरोग्याशी संबंधित प्रत्येक कृती करताना हात स्वच्छ धुणे प्रत्येकाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कदाचित यासाठी ‘आपले हात स्वच्छ असणे आजही का महत्त्वाचे आहे?’ या प्रश्नरूपी घोषवाक्यासोबत, ‘जागतिक आरोग्य संघटने’ने या वर्षी समाजात तुमची जी काही भूमिका आहे, उदा. डॉक्टर, वकील, शिक्षक, शेतकरी वगैरे प्रत्येकाने हात धुण्याच्या या जागरूकता मोहिमेत आपले योगदान दिले पाहिजे, असे सुचवलेे आहे.

‘हात धुणे’ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, याची जाणीवदेखील सर्वांना आहे. करोना साथीच्या दरम्यान, तर वारंवार सॅनिटायइर वा हॅण्डवॉशच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात होता. त्यावेळी कधी कुणाच्या जिवाचं काय होईल असं भयभीत करणारं, अनिश्चिततेचं वातावरण होतं. आपल्या जिवावर बेतू नये यासाठी आपण सर्वांनी हात धुण्याचा नियम काटेकोरपणे पाळला. असं असलं तरी, जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा साधा, सोपा पण जिवाचं रक्षण करणारा संदेश गेला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला ही सवय लागली पाहिजे, असं ‘जागतिक आरोग्य संघटने’ला वाटत असणार.

अस्वच्छ हातामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. अस्वच्छ हाताने जेवल्याने तोंडाद्वारे घातक जिवाणू-विषाणू शरीरात प्रवेश करतात. डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म रोगजंतू आपल्या हातावर असतात. या रोगजंतूंमुळे हात दूषित होतात. त्यामुळे हात स्वच्छ न धुतल्यास या दूषित हातांमुळे रोगजंतूंचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसार होतो. हातातील घाणीमुळे जुलाब, डोळे, त्वचारोग असे अनेक आजार उद्भवतात. ही घाण आणि जंतू कोणत्याही वस्तूला स्पर्श करणे, तिचा वापर करणे आणि अनेक प्रकारचे दैनंदिन काम केल्याने होते. या रोगजंतूंमुळे जुलाब, अतिसार यांसारखे पचनसंस्थेशी संबंधित आणि सर्दी-खोकला (इन्फ्लुएंझा), न्यूमोनिया, करोनासारखे श्वसन संस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. काही वेळा हे आजार गंभीर स्वरूपदेखील धारण करतात. प्रसंगी जिवावर बेतू शकतं. विशेषत: पाच वर्षांखालील बालकांमध्ये या आजारांनी गंभीर रूप धारण केल्यास, मृत्यूची शक्यता जास्त असते. असे जिवावर बेतणारे आजार फक्त ‘हात धुण्या’च्या सवयीमुळे नियंत्रणात राहू शकतात. याची जाणीव या ‘हात धुवा दिवसा’च्या निमित्ताने लोकांना झाली पाहिजे.

हात धुण्याच्या बाबतीत दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ‘ठरावीक वेळेस हात धुणं’ आणि दुसरी म्हणजे ‘साबणाचा उपयोग करून हात धुणं’. अद्यापही अनेक लोकांना ‘हात कसे धुवावेत?’ याबाबत माहिती नाही. लोक सहसा हात धुण्याच्या नावाखाली फक्त औपचारिकता पार पडतात. चुकीच्या पद्धतीने ‘हात धुणे’ हे हात न धुण्याइतकेच घातक आहे. त्यामुळे हात नेहमी योग्य पद्धतीने आणि स्वच्छ धुतले पाहिजे. किमान २० सेकंद हात धुणे आवश्यक आहे. साबणाने हात धुताना तळहातासह हाताचा मागचा भाग, हाताची बोटे आणि नखे यांच्यातील जागा साबण लावून नीट स्वच्छ केली पाहिजे. या पद्धतीने हात धुतल्यास हातावर असलेले व्हायरस, जिवाणू किंवा हानीकारक घटकांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. लक्षात ठेवा, नेहमी आपला चेहरा धुण्याच्या अगोदर आपले हात स्वच्छ धुवा. हात न धुता चेहऱ्याला हात लावल्यास तोंड, नाक आणि डोळ्यांद्वारे रोगजंतूंचा प्रसार होऊ शकतो. ज्याची आपल्याला अनेकदा जाणीवही होत नाही.

हेही वाचा – माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’

वेळोवेळी हात धुण्याची सवय ही आर्थिक दृष्टीने परवडणारी बाब आहे. हात धुण्याच्या सवयीमुळे माणूस काही आजारांपासून दूर रहाणार असेल, तर त्याचा अर्थातच डॉक्टर आणि औषधावर होणारा खर्च वाचेल. हा एक अप्रत्यक्षरीत्या होणारा आर्थिक फायदाच म्हणायला हरकत नाही. स्वयंपाक करण्यापूर्वी, करताना आणि स्वयंपाक झाल्यानंतर हात धुण्याच्या सवयीने अन्नपदार्थांतून होणाऱ्या जंतुसंसर्गाचे ( foodborne infections) प्रमाण कमी होते.

जागतिक हात धुवा दिनानिमित्त, ‘जागरूकता अभियान’ शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांमध्ये वर्षभर राबवले जाणे अपेक्षित आहे. कारण शालेय जीवनात लागलेली चांगली सवय, सहसा आयुष्यभर टिकून राहाते. केनिया या देशात केलेल्या अभ्यासानुसार, ही सवय लागण्यासाठी समवयस्कांचा प्रभाव खूप परिणामकारक असतो, म्हणून शालेय विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्यासंबंधीचे ‘जागरूकता अभियान’ गांभीर्याने राबविले गेले पाहिजे.

१९८०च्या दशकात, अन्नपदार्थांतून रोगजंतूंच्या प्रसारामुळे जगात अनेक ठिकाणी लोक मृत्युमुखी पडले, त्यानंतर २००९ मध्ये ‘स्वाईन-फ्लू’च्या आणि २०२०च्या करोनाच्या उद्रेकामुळे जगभरात लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले. या जीवघेण्या आजारांपासून आपण दूर राहावं या दृष्टिकोनातून लोकांना ‘हात स्वच्छ धुण्या’ची समज येत आहे, हे जरी खरे असले, तरी जगभरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा छोटासा पण महत्त्वाचा संदेश पोहोचवणं फार गरजेचं आहे. यासाठी आपण पुन्हा एकदा सर्वांना ‘नियमित आणि स्वच्छ’ हात धुण्याची सवय लागण्यासाठी प्रयत्न करू. त्यातच आपले आरोग्य सामावले आहे.

साबण लावून हात स्वच्छ धुण्याच्या साध्यासोप्या, सहज साध्य सवयीमुळे श्वसनसंस्थेच्या जंतुसंसर्गाने होणाऱ्या आजारांचं (Respiratory Infections) प्रमाण २० टक्क्यांनी आणि जुलाबसदृश (Diarrheal Diseases) आजार साधारणत: ३० ते ५० टक्क्यांनी कमी होतात.

‘न्यूमोनिया’ आणि ‘जुलाब’ ही दोन्ही कारणं एकत्रित केल्यास पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचं प्रमाण साधारणत: साडेतीन दशलक्ष इतकं आहे.
हात स्वच्छ धुण्याचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने किती आहे, हे माहीत असूनदेखील निम्न सामाजिक आणि आर्थिक स्तरातील फक्त १९ टक्के लोक शौचास जाऊन आल्यानंतर साबण लावून हात धुतात, असं ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे.

हात धुण्याच्या जागरूकता मोहिमेत जर एक डॉलर गुंतवणूक केल्यास, आरोग्यावर होणाऱ्या खर्चाच्या संदर्भात संभाव्य परतावा आठपट एवढा आहे.
जगभरात, ६० टक्क्यांपेक्षा जास्त आरोग्यसेवेशी संबंधित लोक अपेक्षित पद्धतीने हात धूत नाहीत. अपेक्षित वेळ (२० सेकंद) पेक्षा सरासरी अर्धाच वेळ ते हात धुतात, असं आढळून आलं आहे.

atnurkarkishore@gmail.com