मुलांची ख्यालीखुशाली पालकांना समजणं आणि ‘डिजिटल’ झालेला अभ्यास, ही शाळकरी मुलांच्या हाती स्मार्टफोन येण्याची प्रमुख कारणं. अडनिडय़ा वयात समाजमाध्यमांवरची आकर्षणं खुणावत असताना स्वत:ची सुरक्षितता जपण्यासाठी मात्र मुलं समर्थ नसतात. जगभरातील पालकांना यामुळे पौगंडावस्थेतील मुलांच्या मृत्यूपासून त्यांच्या हत्येपर्यंतच्या अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागलं आहे. विविध देशांतला असा आईवर्ग आपला शोक बाजूला ठेवून बडय़ा कंपन्यांच्या सैल धोरणांविरोधात उभा राहत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या सिनेटमध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. खूप कमी वेळा असं होतं, की एखाद्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात, कारण त्याची दाहकता सगळय़ांना सारख्याच प्रमाणात जाणवते. हा असा सगळय़ांनाच भेडसावणारा विषय होता- ‘लहान मुलांवर समाजमाध्यमांचा होणारा अनिष्ट परिणाम.’ इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये वाढत चाललेली अमली पदार्थाची व्यसनाधीनता, हा अमेरिकेतील एक काळजीचा मुद्दा आहेच. २०२३ मध्ये ६० हून अधिक पालकांनी याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याच्या सुनावणीच्या वेळेस ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या लोकप्रिय समाजमाध्यमांचे मालक मार्क झुकरबर्ग उपस्थित होते. अनेक तास त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. याशिवाय ‘एक्स’ (पूर्वाश्रमीचं ‘ट्विटर’), ‘टिकटॉक’, ‘स्नॅपचॅट’ आदी माध्यमांच्या मालकांनाही फैलावर घेतलं गेलं. व्यसनाधीनतेमुळे बळी गेलेल्यांचे पालक आपल्या मुलांचे फोटो उंचावून शांतपणे उभे होते. शेवटी झुकरबर्ग यांनी या सगळय़ा पालकांची माफी मागितली. असे दुर्दैवी प्रसंग पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, अशी हमीही दिली. त्यासाठी या सर्व माध्यमांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील, असं आश्वासन दिलं गेलं.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य

हेही वाचा : मुलांना हवेत आई आणि बाबा!

सद्य:स्थितीत अमेरिकेसहित अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये कित्येक पौगंडावस्थेतील, वा ‘टीनएज’मधील मुलांच्या पालकांची झोप उडालेली आहे. लहान मुलांमध्ये पसरत चाललेलं सोशल मीडियाचं व्यसन ही साधीसुधी, सहज सोडवता येण्याजोगी समस्या नाही. यामुळे मुलं अमली पदार्थाच्या आहारी तर जात आहेतच, शिवाय त्यांचं लैंगिक शोषण आणि इतर अनेक प्रकारचा छळही या माध्यमांमधून होताना दिसतो. त्यांचा दैनंदिन अभ्यास, खेळण्याचा वेळ यांवर परिणाम होत आहे. मुलांच्या वयाला साजेसे नसलेले विषय त्यांच्यासमोर सातत्यानं येणं आणि असे व्हिडीओ, रील्स त्यांनी वरचेवर पाहणं, या समस्या केवळ त्याच देशांमध्ये नाहीत, तर भारतातही मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. एकाग्रतेविषयक प्रश्न मोबाइल हातात असणाऱ्या सगळय़ा लहानथोरांना भेडसावत आहेत. प्रचंड वैविध्य असलेली माहिती सतत वाचून आणि बघून आपल्या सगळय़ांचा मेंदू सैरभैर झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापरावर आळा घालावा कसा, हा यक्षप्रश्न आहे. लहान मुलांच्या बाबतीत तो अधिक गंभीर स्वरूप धारण करतो आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये यापायी आत्महत्या करायला प्रवृत्त झालेल्या मुलांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या सगळय़ा बडय़ा कंपन्यांना सातत्यानं प्रश्न विचारले जात आहेत, कोर्टात आव्हान दिलं जात आहे. यामध्ये अनेक स्त्रिया- विशेषत: या वयोगटातील मुलांचा आईवर्ग आघाडीवर आहे असं दिसतं.

हेही वाचा : खाऊ या ‘त्यांच्या’साठीही!

या संदर्भात अमेरिकेतील दोन जणींची कथा अतिशय हृद्य आहे. क्रिस्टीन ब्राईड ही सोळा वर्षांच्या कार्सनची आई. ती पहिल्यापासून कार्सनच्या मोबाइलच्या वापराबाबत जागरूक होती. कार्सनच्या वर्गातील सगळय़ांकडे मोबाइल फोन होते, पण त्याच्याकडे मात्र दीर्घकाळापर्यंत मोबाइल नव्हता. आईनं जेव्हा त्याला मोबाइल दिला, तेव्हा सगळय़ा प्रकारच्या धोक्यांचीही त्याला कल्पना दिली. ‘इंटरनेटवर अशी कोणतीही गोष्ट लिहू नकोस, जी तुला रस्त्यावरच्या एखाद्या पोस्टरवर स्वत:च्या नावासहित, फोटोसहित छापलेली आवडणार नाही,’ हे तिचे शब्द होते. एवढं करूनही, एके दिवशी कार्सननं आत्महत्या केली. तो जाण्याच्या काही काळ आधी एका सोशल मीडिया अ‍ॅपवर एका अनोळखी व्यक्तीशी चॅट करत होता. ती व्यक्ती त्याला सातत्यानं धमक्या देत होती, हे उघडकीस आलं. क्रिस्टीननं या घटनेनंतर स्वत:ला सावरलं. या कंपनीला आव्हान द्यायचं तिनं ठरवलं आणि तक्रार दाखल केली. कालांतरानं त्या अ‍ॅपला याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी अशा अज्ञात मेसेजिंग पोर्टल्सवर बंदी घातली. अर्थात, केवळ बंदी घातल्यानं प्रश्न सुटणार नाहीत. या सगळय़ा बडय़ा कंपन्यांना काही तरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यासाठी क्रिस्टीन सातत्यानं माध्यमांशी बोलत राहते. तिच्यासारखे अनेक जण अमेरिकेत ‘किड्स ऑनलाइन सेफ्टी अ‍ॅक्ट’(ङडरअ) लागू व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. जिथे कुठे याबाबत सुनावणी होते, तिथे क्रिस्टीन कार्सनचा फोटो घेऊन हजर राहते. त्या फोटोवर लिहिलेलं असतं, ‘फॉरेव्हर सिक्स्टीन’. कोणाच्याही हृदयाला घरं पाडेल अशीच ही कहाणी.

कठीण प्रसंगाला सामोरी गेलेली आणखी एक आई म्हणजे जोआन बोगार्ड. तिचा पंधरा वर्षांचा मुलगा मेसनला जेव्हा तिनं मोबाइल दिला, तेव्हा सगळय़ा सोशल मीडिया अ‍ॅप्सवर लहान मुलांसाठी लागू असलेले नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही, याबाबत ती दक्ष होती. अशी ‘चाइल्ड सेफ्टी प्रणाली’ लागू करूनसुद्धा मेसनला एक दिवस एका साइटवर ‘चोकिंग चॅलेंज’चा व्हिडीओ दिसला. श्वास रोखून धरायचं हे ‘चॅलेंज’ मेसनला चांगलंच महागात पडलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. खरं तर अशा धक्क्यातून सावरणं कठीण, पण जोआननं मात्र याविरोधात लढायचं ठरवलं. त्या साइटच्या विरोधात खटला भरून ती थांबली नाही, तर या प्रश्नाबद्दल जनजागृती करण्यात ती आघाडीवर आहे. मेसनच्या स्मरणार्थ ती एक फेसबुक पेज चालवते, त्याचं नाव आहे ‘मेसन्स मेसेज.’ याद्वारे समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे मुलांवर काय परिणाम होतात, याबद्दल चर्चा घडवण्यात येते.

हेही वाचा : सांदीत सापडलेले.. ! : शिस्त

या दोघीजणींच्या गोष्टींत अनेक साम्यस्थळं आहेत. दोघींचीही मुलं ‘टीनएजर’- म्हणजेच धड लहानही नाहीत आणि मोठीही नाहीत, अशा अडनिडय़ा वयातली होती. दोघींच्याही म्हणण्यानुसार त्यांचं त्यांच्या मुलांशी अगदी मोकळं, आधुनिक म्हणावं असं नातं होतं. समाजमाध्यमांच्या दुष्परिणामांची कल्पना त्यांनी मुलांना अगोदरच दिलेली होती. ही मुलं सामाजिक-आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटांतली नव्हती. आवश्यक ती सगळी मदत कदाचित त्यांना मिळू शकली असती, अशाच कौटुंबिक परिस्थितीत दोघंही वाढले होते. तरीही त्यांना जीव गमवावा लागला. आपण इतक्या विचित्र जगात राहात आहोत की समाजमाध्यमांचा विरोध करायला त्याच माध्यमांचा आधार घ्यायला लागतो आहे. या दोन्ही आयांनाही निश्चितपणे त्याचा मनस्ताप होत असावा. परंतु बलाढय़ कंपन्यांना आव्हान देण्याचं कठीण, तरीही उल्लेखनीय कार्य या आणि अशा कित्येक जणी करत आहेत. त्यांना उत्तरं द्यायला भाग पाडत आहेत. या सगळय़ा प्रयत्नांचा परिपाक म्हणजे ङडरअ कायद्याला अमेरिकेच्या सिनेटमध्ये बऱ्यापैकी सदस्यांचं पाठबळ मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात असा कायदा अस्तित्वात आला, तर क्रिस्टीन आणि जोआनसारख्या पालकांचं त्यात मोठं योगदान असेल.

अशीच एक हादरवून टाकणारी घटना २०२२ च्या फेब्रुवारीत ब्रिटनमध्ये घडली. ब्रिआना गे या १६ वर्षांच्या मुलीची तिच्याच वयाच्या दोघांनी भरदिवसा हत्या केली. ब्रिआना ही एका समाजमाध्यमावर अत्यंत सक्रिय होती. ती पारिलगी समूहातली होती आणि तिची लिंगभावी (जेंडर) अस्मिता ती अभिमानानं प्रदर्शित करत असे. त्यामुळे तिला बऱ्यापैकी ‘फॉलोइंग’ होतं. तिची हत्या करणाऱ्या मुलांना तिच्या या ‘वेगळय़ा’ ओळखीबाबत प्रचंड आकस होता. या आकसातून आणि संतापापोटी त्यांनी ब्रिआनाच्या हत्येचा कट रचला. नंतर उघडकीस आलं, की या दोन मुलांना काही मानसिक आजारही जडलेले होते. त्यांच्या ठायी करुणा, सहवेदना, वगैरे मानवी भावनांचा मागमूसही उरला नव्हता. या महिन्याच्या सुरुवातीला या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या सगळय़ात मुलांना लागलेल्या समाजमाध्यमांच्या व्यसनाचा मोठा सहभाग होता, हे कोर्टानं नमूद केलं.

हेही वाचा : माझी मैत्रीण : मैत्रीतलं चुंबकत्व!

ब्रिआनाची आई एस्थर मुलीच्या हत्येमुळे कोलमडून पडली. परंतु त्यातून सावरायला तिनं या प्रश्नाबाबत जनजागृती करायचा निर्णय घेतला. तिच्या मते, सोळा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी वेगळय़ा प्रकारचे फोन बाजारात यायला हवेत, ज्यात या सगळय़ा प्रसिद्ध समाजमाध्यमांचा समावेश नसेल. हा मुलांचा फोन त्यांच्या पालकांच्या फोनशी जोडलेला असेल, जेणेकरून काही चुकीचं घडत असल्यास सज्ञान व्यक्ती हस्तक्षेप करू शकतील. एस्थर हे मान्य करते, की ब्रिआनालाही सोशल मीडियाचं व्यसन होतं. तिला तिच्या मुलीची हत्या करणाऱ्या मुलांच्या पालकांबद्दलही वाईट वाटतं, कारण ते आपल्या मुलांचे गुन्हे आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. जशी एस्थरनं तिची मुलगी गमावली, तशी त्यांनीही आपली मुलं कायमची गमावली. त्यामुळे टीनएजर्ससाठीचे वेगळे मोबाइल फोन्स सगळय़ांना दिलासा देऊ शकतील, असा विश्वास तिला वाटतो. तिनं याबाबत सरकारला विनंती अर्ज केला आहे, त्यावर ९० हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ब्रिटनच्या संसदेतही याबाबतचा कायदा होऊ शकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

असाच एक प्रयत्न आर्यलडमध्ये होतोय. तिथल्या ग्रेस्टोन या छोटय़ा शहरात रेचल हार्पर या एका शाळेच्या मुख्याध्यापिकेनं ‘इट टेक्स अ व्हिलेज’ हा उपक्रम सुरू केला. यामार्फत पालकांना घरात आणि शाळेत मुलांना स्मार्टफोन न देण्याची विनंती करण्यात आली आहे. बहुतांश पालकांनी ती मान्य केली आहे. यातही सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेचा मोठा वाटा आहे. मुलांना या जाळय़ात अडकू न देण्याची जबाबदारी सगळय़ांची आहे, या भावनेतून या प्रयोगाला आकार आला आहे. हे एका शाळेपुरतं मर्यादित नाही, तर शहरातल्या इतर शाळांमध्येही ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. लवकरच हा एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून राबवला जाईल, असं सूतोवाच आर्यलडच्या आरोग्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी केलं. रेचल म्हणते, की ‘‘अशा प्रकारच्या बंधनांचा गैरअर्थ काढू नये. आम्ही नवीन तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही आहोत; परंतु त्याच वेळेस समाजमाध्यमांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवण्याची नितांत गरज आहे.’’ म्हणूनच या प्रयत्नांना बहुतांश पालकांचा पािठबा मिळताना दिसतो आहे.

हेही वाचा : जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट

समाजमाध्यमांवर बंदी घातल्यानं मुलांच्या व्यसनाधीनतेचा प्रश्न सुटेल की नाही, याचं निश्चित उत्तर देता येणं अवघड आहे. पण पाश्चिमात्य देशांमधल्या स्त्रिया, विशेषत: आईवर्ग यावर उपाय शोधतो आहे. आपल्याला यातून अनेक धडे शिकता येण्याजोगे आहेत.. खूप उशीर होण्याआधी!

gayatrilele0501@gmail. com

(क्रिस्टीन ब्राईड मुलगा कार्सन याच्या छायाचित्रासह अमेरिकन सिनेटमधील सुनावणीत उपस्थित राहिल्या. (‘एपी इमेजेस’वरून))

Story img Loader