आमचे सहस्रबुद्धेकाका बोलायला लागले की काव्य, विचार, सुभाषिते यांच्या अमृतधारा बरसतात. अशीच दोन वाक्ये-
                 ‘झुकता वही जिसमें जान है,
                  अकड मुर्दे की पहचान है’
जो जिवंत आहे, तोच नम्र होऊ शकतो. जो ‘अकडतो’, कडक असतो, झुकत नाही, तो मृतवत असल्याप्रमाणेच आहे. या विचाराने अंतर्मुख केले! जमलेच तर आपण फक्त देवळात काही क्षण नम्र होतो. एरवी आपण आपल्याच मस्तीत असतो. अनुभवात मीच श्रेष्ठ! कामात मीच मोठा. माझे दु:ख एकच असते- माझ्या अनुभवांचा फायदा करून घ्यावा असे माझ्या घरातील लोकांना अजिबात वाटत नाही. माझी कुणाला किंमत नाही. इतरांनी मला देण्याच्या किमतीला माझ्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. म्हणजेच केंद्रिबदूपेक्षा मी परीघ महत्त्वाचा मानते. परिघावर लक्ष देणे हा ओशोंच्या मते झाला प्रपंच, पण जेव्हा आपले लक्ष आपण अधिकाधिक आत वळवू लागतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने परमार्थाकडे वळतो. परिघावर घडणाऱ्या घटनांचा आपल्यावर परिणाम होऊ न देता केंद्रिबदूकडे वाटचाल केली, तर अबोधापासून स्वबोधाकडे जाता येईल. ही खरी आंतरिक जागृती आहे. देवळातील देवापेक्षा, अंतरातील देवत्व जपणे, निर्माण करणे म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ करणे! संतांनी हेच केले. When you are somebody, anybody can harm you, but when you become nobody, you cannot be harmed by anybody.
तिर्यक कटी चक्रासन
दंडस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. दोन्ही पायांत व्यवस्थित अंतर घ्या. दोन्ही हात सरळ समोर घ्या. हातांची बोटे एकमेकांत गुंफवा. आता शरीर कमरेपर्यंत काटकोनात झुकवा. आता पाय गुडघ्यात न वाकविता दोन्ही हात (सरळ ठेवून) व मान उजवीकडे न्या. काही क्षण थांबून मध्यभागी या. हीच कृती डावीकडे पुन्हा करा.  
      या आसनाच्या सरावाने शरीर व मनाचे संतुलन व समन्वय सुधारण्यास मदत होते.

आनंदाची निवृत्ती – शालेय उपक्रमांना वाहून घेतले
रजनी हिरळीकर
मी  माध्यमिक शाळेची अध्यापिका. स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखन-वाचन चळवळीचे काम करण्यात स्वतला गुंतवून घेतले. त्यासाठी ‘मराठी बाल- कुमार साहित्य सभा’ ही संस्था आम्ही कोल्हापुरात स्थापन केली. शाळा-शाळांत जाऊन मुलांना गोष्टी सांगणे, कविता सादर करणे, गोष्ट-कविता कशी लिहावी यासाठी लेखन कार्यशाळा घेणे असे उपक्रम मी चालवू लागले. तेव्हा लक्षात आले या सगळ्यासाठी मुलांचे वाचन वाढवायला हवे. मग त्यांना वाचनाची गोडी लागावी याकडे मोर्चा वळवला. मुलांमधील संस्कृती संवर्धनासाठीही अनेक उपक्रम गेली कित्येक वर्षे मी राबवते आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कथा-कविता-निबंध लेखन स्पर्धाही मी आयोजित केल्या आहेत. अर्थातच त्याला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
 ‘लेखक तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांतून साहित्यिकांचा विद्यार्थ्यांशी परिचय होतो. मनोरंजनातून उद्बोधन हे उद्दिष्ट समोर ठेवून मी काम करत असल्यामुळे विद्यार्थी न कंटाळता सहभागी होतात.
काव्यशाळेत तयार झालेल्या कवितांना वृत्तपत्रे-मासिकांतून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो, कारण आपले लेखन प्रसिद्ध झाल्यावर मुलांना खरी शाबासकी मिळते. या प्रोत्साहनामुळे आणखी लेखन करण्याची जिद्द ते बाळगतात. अनेक मुले लिखाणाबरोबर सादरीकरणातही अव्वल असतात. अशा विद्यार्थ्यांना कोल्हापूर आकाशवाणीवर ‘बालोद्यान’मध्ये कविता वाचनासाठी मार्गदर्शन मी करते. बालसाहित्यात नवनवीन विषय आले आहेत. राजा-राणी, परी, राक्षस हे विषय आता जुने झाले आहेत. पर्यावरण रक्षण, ज्ञान-विज्ञानातून मनोरंजन, चरित्रकथा, प्रवास वर्णने, साहस कथा, अवकाश भ्रमण, आय.टी. जग, एकूणच विश्वात घडणाऱ्या घडामोडींची माहिती गोष्टी-गाण्यांतून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो त्यासाठी सतत माझी भटकंती सुरू असते.
बालकुमार साहित्य संमेलने, बालआनंद मेळावे घेण्याचा प्रयत्न मी अनेक वर्षे करतेय. एक कबूल केले पाहिजे, मुला-मुलींच्या सान्निध्यात वाढते वय बाजूला पडते आणि शरीर-मन प्रसन्न राहते. ‘आनंद द्यावा आनंद घ्यावा’ अशी माझी निवृत्तीनंतरची वाटचाल सुरू आहे. हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांकडून वेगळा आनंद मिळवते आहे.    

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”

खा आनंदाने! – धान्य
भारतीय जेवण म्हणजे वरण, भात, पोळी आणि भाजी असा चौरस आहार! वयोमानाप्रमाणे संपूर्ण आहार आणि योग्य प्रमाणात घेतला जातोच असं नाही. मग थकवा येणं साहजिकच आहे. ‘वय झालं’ म्हणून थकायला होणं वेगळं आणि आहार परिपूर्ण नसणं हे दुसरं कारण किंवा निमित्त! तर आज आपण बोलू या थोडंसं धान्यांविषयी.
 गहू आणि तांदूळ नेहमी आपल्या आहारात असतातच, पण त्याचबरोबर इतरही अनेक धान्ये आहेत जी आहारामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. उदा. ब्राऊ न तांदूळ / पॉलिश न केलेला अथवा हातसडीचा तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, ओट्स, सातू, कुळीथ वगैरे. खाण्यामध्ये विविधता असावी असं आम्ही नेहमी सांगत असतो, पण एक नेहमीचा प्रश्न माझ्या रुग्णांच्या मनामध्ये येतो की वेळ कुठे आहे? आजीला करायला जमत नाही / आज-काल सगळं रेडीमेड आहे तर वेगळे कष्ट का घ्यायचे? वगैरे वगैरे. पण जर काही सोप्या क्लृप्त्या वापरल्या तर कठीण काहीच नाही.  
१. गहूव्यतिरिक्त इतर धान्ये वापरण्याचं अजून एक कारण म्हणजे वयाप्रमाणे गव्हातील प्रोटीन पचवण्याची शक्ती कमी होऊ  शकते. म्हणून इतर धान्ये आहारात सामावून घेणे कधीही चांगले.
 २. ३० ग्रॅम धान्यामध्ये २.५ ग्रॅम  प्रथिनं, फायबरयुक्त, जीवनसत्त्व ब भरपूर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मँगनिझ, पोटॅशियम, कॅल्शियम, आणि जस्त यांसारखी खनिजे भरपूर. अत्यावश्यक अमायनो आम्ल, जीवनसत्त्व ए युक्त अशी सर्व धान्ये आपल्या सोयीप्रमाणे आहारामध्ये समाविष्ट करता येतात.
३. रेडीमेड पदार्थावर अवलंबून राहण्यापेक्षा विविध पदार्थामध्ये धान्य किंवा पीठ वापरता येतात. उदा. भाकरी, थालीपीठ, उकड, खीर, उपमा, सत्त्व, डोसे, इडली, खिचडी वगैरे वगैरे
४. भाकरी करता येत नाही, पिठाची उकड काढून लाटून करा किंवा घावन घालून खा-इच्छा तेथे मार्ग!
५. ब्रेड / बिस्किट्स वगैरे झटपट पदार्थ खाण्याने तब्येतसुद्धा झटपट बिघडते. म्हणून एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी असे पॉवर फुड्स आहारामध्ये असणे कधीही चांगले. फक्त एक लक्षात ठेवायचं की धान्ये परिपूर्ण होण्यासाठी त्याबरोबर कडधान्ये किंवा डाळी जरूर वापराव्यात.
नाचणी भाकरी :
नाचणीचे पीठ : १ कप, ज्वारी  / राजगिरा  पीठ : २ मोठे चमचे, कुळीथ किंवा सातूचे पीठ : २ मोठे चमचे, मेथीची पाने : १/२ कप, आलं- लसणीची चटणी : १ चमचा, तीळ : १ मोठा चमचा, मीठ चवीनुसार, तूप, गरम पाणी.
कृती : पाणी गरम करा आणि त्यात पीठ घाला. मसाला त्यात घालून पीठ मळा. भाकरीप्रमाणे बनवा. भाकरी तुपाबरोबर किवा झुणक्याबरोबर खा.
‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे..’ उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘श्रावणासाठी’ उत्साहपूर्ण शुभेच्छा!संगणकाशी मत्री – चला!  ई-पेपर वाचू या.
संकलन-गीतांजली राणे- rane.geet@gmail.com
संगणकाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे, त्यामुळे प्रत्येक घरात संगणक आणि इंटरनेटचे कनेक्शन असणे ही गरज झालेली आहे. इंटरनेटवर इतरही अनेक गोष्टींप्रमाणे दैनंदिन वृत्तपत्रेही सहज उपलब्ध होत असल्यामुळे वाचकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, कारण कधीही, केव्हाही सहज कोणतेही वर्तमानपत्र इंटरनेटमुळे घरबसल्या वाचता येते. परंतु या सगळ्यात गोची होते ती घरातील ज्येष्ठ नागरिकांची. कारण संगणकाची नसलेली पुरेशी माहिती तसेच वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी नेमके काय करावे याची नसलेली माहिती. तर आजी-आजोबा आता चिंतेचं कारण नाही. आज आपण काही प्रमुख वृत्तपत्रांची संकेतस्थळं, ती कशी वापरायची, त्यावरची आपल्याला हवी असलेली माहिती कशी जपून ठेवायची ही माहिती घेणार आहोत.
 सर्वप्रथम गूगलच्या सर्च इंजिनवर जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या वृत्तपत्राचे नाव टाईप करा. उदा. ‘लोकसत्ता’. आता आपल्यासमोर लोकसत्ता वृत्तपत्राचे संकेतस्थळ असलेले पर्याय सुरू होतील. त्यातील एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर लोकसत्ताच्या वृत्तपत्राची ई-आवृत्ती सुरू होईल. यात वेगवेगळ्या विभागांनुसार तुम्हाला बातम्या, पुरवण्या वाचता येतील. उदा. लोकसत्ताच्या चतुरंग, लोकरंग, वास्तुरंग अशा विविध पुरवण्या आहेत. क्रीडा, महाराष्ट्र, मुंबई, पुणे, अर्थसत्ता असे बातम्यांचे विविध विभाग आहेत. यापकी आपल्याला हव्या असलेल्या पर्यायावर क्लिक करून आपण आपल्याला हवा तो लेख, बातमी वाचू शकता.
आपल्याला वृत्तपत्रातील महत्त्वाची बातमी, लेख यांची कात्रणे करून ठेवण्याची सवय असेल तर आपण आवडलेला लेख सिलेक्ट करून, तो कॉपी करून वर्ड पॅडमध्ये पेस्ट करून सेव्ह करून ठेवू शकता. तुम्हाला अशा पद्धतीने वर्तमानपत्र वाचणे जर कठीण वाटत असेल तर तुम्ही संगणकावरच प्रत्यक्षातील वर्तमानपत्राप्रमाणे वृत्तपत्र वाचू शकता. यासाठी तुम्ही संकेतस्थळावर असलेल्या ई-पेपर या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर लोकसत्ताच्या सर्व आवृत्या येतील. यातील जी आवृत्ती तुम्हाला वाचायची असेल त्यावर क्लिक करून तुम्ही प्रत्यक्षातील वृत्तपत्राप्रमाणे पाने उलटून बातम्या, लेख वाचू शकता. याशिवाय तुम्हाला एखाद्या बातमीवर किंवा लेखावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर तीसुद्धा तुम्हाला लगेच देता येते.  
जर तुम्हाला एखादे जुने वृत्तपत्र वाचायचे असेल तर याचीही सोय संकेतस्थळावर असते. संकेतस्थळावरील मागील अंक या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हवे ते वर्ष, तारीख निवडून वृत्तपत्र वाचता येते. ऑनलाइन वृत्तपत्रांमुळे कधीही, कुठेही  हवी तितकी वृत्तपत्रे वाचण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. ही वृत्तपत्रे तुम्ही अगदी तुमच्या स्मार्टफोनवरही सहज वाचू शकता.

कोणती  बातमी आधी?
एक म्हातारे गृहस्थ डॉक्टरांकडे जातात. सगळ्या तपासण्या करून झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात, ‘ रिपोर्टस् पाहता, तुमच्या प्रकृतीबाबत निदान करण्यात आले आहे- पण तुम्हाला चांगली बातमी आधी सांगू की वाईट? ’
क्षणाचा विलंबही न लावता आजोबा म्हणाले, ‘वाईट बातमी आधी’
‘तुम्हाला कर्करोग झाल्याचे स्पष्ट होते आहे. आणि तुमच्या हातात साधारण दोन वर्षे आहेत.
‘अरे देवा, हे ऐकल्यावर कोणती चांगली बातमी काय असू शकते का?
‘अहो आहे ना! तुम्हाला अल्झायमरपण झाला आहे. दोन-एक महिन्यात मी काय सांगितले हेही तुम्ही विसरून जाल.’