करनो विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कामगारांना कमी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु या आर्थिक समस्येवर टाटा कंपनीने मात्र अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन संपल्यावरही हे कर्मचारी कायमचं घरातूनच काम करणार आहेत.
टाटा इंडस्ट्रीमधील ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेज’ (TCS) या कंपनीने हा वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतला. ट्रॅक डॉट इन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीत सध्या जवळपास तीन लाख ५५ हजार कर्मचारी काम करत आहेत. यांपैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी घरातून काम करण्यास सांगितले आहे. व २० टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये काम करतील.
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार या अनोख्या योजनेला त्यांनी ‘मॉडेल २५’ असं म्हटलं आहे. हा प्रयोग सुरुवातीला ते २०२५ पर्यंत करुन पाहणार आहेत. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर हा प्रकार तसाच सुरु राहील.
“एक मोठी कंपनी चालवण्यासाठी भरपूर पैसे लागतात. लॉकडाउनमुळे सध्या अर्थव्यवस्थेचे चक्क पूर्णपणे थांबले आहे. कंपन्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आटत चालले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पुरेसे पैसे नाहीत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणे हा देखील कुठल्याच समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही वर्क फ्रॉम होमचा पर्याय प्रायोगिक तत्वावर स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.” असे सीईओ सुब्रमण्यम म्हणाले.