पश्चिम बंगालमध्ये धार्मिक स्थळं १ जूनपासून सुरु होतील असे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. धार्मिक स्थळं उघडली गेली तरीही काही अटी आहेत ज्यांचं पालन करावं लागेल असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. १ जून पासून रोज सकाळी १० वाजता राज्यातली सगळी धार्मिक स्थळं खुली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ८ जून पासून सरकारी कर्मचारीही कामावर परततील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

धार्मिक स्थळं खुली होतील मात्र तिथे गर्दी करता येणार नाही. एका वेळी मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये फक्त १० लोकांना जाण्याची मुभा असेल. तसेच सगळ्या धार्मिक स्थळांचं निर्जंतुकीकरण केलं जाईल तिथे रोज तशी व्यवस्था असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला खात्री आहे की मोदी सरकार हा निर्णय स्वीकारतील असंही त्या म्हणाल्या.

तसेच ८ जूनपासून राज्यातील सगळ्या सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामावर परततील अशीही घोषणा ममता बॅनर्जींनी केली. तसंच १ जून पासून पश्चिम बंगालमधली ज्यूट इंडस्ट्रीही सुरु होईल असंही त्या म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये असलेले रस्ते, जिल्ह्यांमधले रस्तेही खुले होतील असंही ममता बॅनर्जींनी सांगितलं.

Story img Loader