दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाही सुरू आहे. भाजपा उमेदवाच्या प्रचारासाठी सोमवारी झालेल्या सभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर वादग्रस्त घोषणांमुळे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी दिल्लीच्या निवडणूक कार्यालयाने त्यांच्या वादग्रस्त घोषणेची दखल घेत त्या संदर्भात अहवाल मागवला आहे.

आणखी वाचा – …तर अवघ्या एका तासात शाहीनबाग खाली करु: भाजपा खासदार

आप, भाजपा काँग्रेस या तीन पक्षात मुख्य लढत असून, तिन्ही पक्षांनी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रचारात झोकून दिल्याचं चित्र सध्या आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती. रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को..’ घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो *** को’ अशी घोषणाबाजी केली होती. रिठाला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती.