लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंचा तुरुंगवासात २२ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आहे. तुरुंगात रवानगी केल्यानंतर शनिवारी आसाराम यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
आसाराम बापूंची आता गुजरात पोलीसांकडून चौकशी
सुरत येथील दोन बहिणींनी काही दिवसांपूर्वी आसाराम यांच्याविरुद्ध लैगिंक छळाची पोलिसांकडे तक्रार केली होती. यासंबंधी या दोघींनी विशेष तपासणी पथकाकडे (SIT) काही पुरावे सादर केले आहेत. या पुराव्यांचा अधिक तपास करण्यासाठी एसआयटीने स्वंयघोषित गुरु आसाराम यांच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणीची याचिका केली. बलात्‍कार केल्‍यानंतर पीडित मुलींना आसाराम बापू आणि त्यांचे सहकारी गर्भपात करण्यासाठी दबाव निर्माण करायचे. गांधीनगर येथील न्‍यायायालयात पोलिसांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. यासंबंधीचे पुरावे सुरत येथील बहिणींनी सादर केले आहेत.एसआयटीने याचिकेत, आसाराम अन्वेषणादरम्यान सहकार्य करत नसल्याचे म्हटले असून, दुस-यांदा करण्यात आलेल्या पुरुषार्थ चाचणीतही त्‍यांचा पुरुषार्थ सिद्ध झाल्याचे सांगितले आहे.
नारायण साईच्या शोधासाठी गुजरात पोलीसांचा बिहारमध्ये छापा
आसारामची पत्‍नी लक्ष्‍मी आणि मुलगी भारती यांची लवकरच चौकशी होण्‍याची शक्‍यता आहे. गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या दोघीही अहमदाबाद पोलीस ठाण्यात हजर राहिल्या होत्या. तसेच, त्यांना पोलिसांकडे पासपोर्टही जमा करावा लागला आहे. यावेळी आसाराम समर्थकांनी प्रचंड गदारोळ केला.
डोळस आंधळेपण..