आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारावेत असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांना एक आवाहनही केलं आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “मी सर्व पक्षांना आणि खासदारांना हे आवाहन करू इच्छितो की, जास्तीत जास्त अवघड प्रश्न विचारा, धारदार, बोचरे प्रश्न विचारा मात्र सरकारला शांततेत, शिस्तबद्ध रितीने त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची संधीही द्या. यामुळे लोकशाही आणि लोकांचा विश्वास अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसंच विकासाची गतीही वाढेल.”

dhairshil mane
कोल्हापूर: खासदारांचा संपर्क नाही; ही विरोधकांची स्टंटबाजी, धैर्यशील माने
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”
Case against Congress workers for burning effigy of Prime Minister
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

“मला असं वाटतं, करोना महामारीबद्दलच्या प्रत्येक अडचणीवर आणि त्याविरुद्धच्या लढ्यावर चर्चा होईल. मी सर्व सदस्यांना ही विनंती करतो की त्यांनी उद्या संध्याकाळी ४ वाजता या करोना महामारीशी संदर्भातल्या चर्चेस उपस्थित राहावे”, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांना करोना परिस्थितीवर प्राधान्याने वादविवाद, चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावं. किमान पहिला डोस तरी त्वरीत घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.

आणखी वाचा- लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो – नरेंद्र मोदी

संसदेचे पावसाळी अधिवेशन, आज सोमवारपासून सुरू होत आहे. करोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ आदी मुद्दय़ांवरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून, अनेक विधेयके मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर असेल. दरम्यान अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पावसाळी अधिवेशनाआधी नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं.