रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५० बड्या कर्जबुडव्यांचे (‘विलफुल डिफॉल्टर’चे) ६८ हजार ६०७ कोटींची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकल्याची कबुली दिली आहे. ज्या व्यक्तींच्या/कंपन्यांच्या कर्जावर बँकेने पाणी सोडलं आहे त्या कार्जबुडव्यांमध्ये पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीचाही समावेश असल्याचे आरबीआयने महिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी केलेल्या अर्जामध्ये ५० मोठे कर्जबुडवे आणि १६ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी घेतलेल्या कार्जाची काय स्थिती आहे यासंदर्भात माहिती मागवली होती. “राहुल गांधी यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच मी हा अर्ज केला होता,” असं साकेत यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
union home minister amit shah slams sharad pawar
‘पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०० साखर कारखाने मृत्युपंथाला’, अमित शहा यांचा हल्लाबोल
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा

केंद्र सरकारने माहिती देण्यास नकार दिला असला तरी आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी साकेत यांच्या अर्जाला उत्तर दिलं आहे. २४ एप्रिल रोजी दिलेल्या या उत्तरामध्ये कर्जबुडव्यांबद्दलच धक्कादायक माहिती समोर आल्याचे साकेत यांनी म्हटलं आहे. “या रक्कमेमध्ये (६८ हजार ६०७ कोटी रुपये) थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत.  देशातील शिखर बँक असणाऱ्या आरबीआयने कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला आहे. यासाठी बँकेने सर्वोच्च न्यायलयाने १६ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या एका निकालाचा संदर्भ दिला आहे,” असं साकेत यांनी एआयएनएसला सांगितलं.

सर्वाधिक कर्जमाफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये चोक्सीच्या मालकीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण ५ हजार ४९२ कोटींचे कर्ज घेतलं होतं. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे १ हजार ४४७ आणि १ हजार १०९ कोटींचे कर्ज घेतले होते. मेहुल चोक्सीने अँटिगाचे नागरिकत्त्व मिळवले आहे. तर चोक्सीचा भाचा आणि १३ हजार कोटींच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असणारा नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे.

सर्वाधिक कर्ज माफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आरआयई अ‍ॅग्रो लिमिटेडचा समावेश आहे. या कंपनीने ४ हजार ३१४ कोटींचे कर्ज घेतले होते. या कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांची मागील वर्षभऱापासून आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. तिसऱ्या क्रमांकावर जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी या कंपनीचा समावेश असून कंपनीने ४ हजार ७६ कोटींचे कर्ज घेतले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीची चौकशी सुरु आहे.

दोन हजार कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्या कंपन्याच्या यादीमध्ये कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या पेन निर्मिती क्षेत्रातील कंपनीचा समावेश आहे. ही कंपनी कोठारी ग्रुपचा भाग असून कोठारी ग्रुपने २ हजार ८५० कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर कुडोस केमी, पंजाब (२ हजार ३२६ कोटी), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, इंदौर (२ हजार २१२ कोटी) आणि झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड, ग्वालियर (२ हजार १२ कोटी) या कंपन्यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

एक हजार कोटींची कर्ज घेतलेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये हरिश मेहता यांची अहमदाबादमधील फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अ‍ॅण्ड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड (१ हजार ९६२ कोटी) आणि फरार असणाऱ्या विजय माल्याची किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (१ हजार ९४३ कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे. तर एक हजार कोटींहून कमी कर्ज घेतलेल्या आणि कर्जमाफीत समावेश झालेल्या २५ कंपन्या आहेत. या कंपन्यांनी ६०५ कोटी ते ९८४ कोटींदरम्यान कर्ज घेतलं आहे.

५० मोठ्या कर्जबुडव्यांपैकी ६ जण हे हिरे तसेच ज्वेलरी उद्योगाशी संबंधित आहेत. “या कर्जबुडव्यांनी मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय बँकांना फसवले. त्यापैकी अनेकजण फरार आहेत किंवा त्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे,” असं साकेत यांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या ५० कंपन्यांमध्ये सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये आयटी, बांधकाम, ऊर्जा, सोने-हिरे व्यापार, औषध क्षेत्रातील कंपन्यांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत.